रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

२)अण्णा हजारे रामदेवबाबांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनस्थळी हजेरी लावणार होते,त्यामुळे आंदोलनाची ताकद वाढली असती-जे सरकारला होऊ द्यायचे नव्हते?

३)बाबा आंदोलनस्थळावरून सरकारचे एखादे मोठे बिंग फोडण्याची शक्यता होती?

ती आता नाहीशी झाली?

४)भविष्यात अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी दहशत बसावी म्हणून? की

५)सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे बनत चालले आहे? असे असेल,तर मग सरकारचे आणि भारताचे भविष्य अंधारमय आहे ,असे नाही वाटत?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

सत्याग्रहाची रामदेवी तर्‍हा :
१) आपल्या अनुयायांनी दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी या असे आवाहन करून त्या प्रमाणे लोक दिल्लीत येऊ लागलेले असतानाच रामदेव यांनी सरकारशी बोलणी करायला सुरुवात केली आणि मी उपोषण मागे घेईन, उपोषण नव्हे तर व्रत/तप आचरणार आहे असे आश्वासनही दिले.
२) परवानगी घेतली योगशिबिरासाठी, पाच हजार लोकांसाठी. पोडियमवर (त्याला व्यासपीठ कसे म्हणावे?) बॅनरही योग शिबिराचे. मात्र आरंभले काल्या पैशाविरोधी आंदोलन, ५०००० लोकांना गोळा केले. हा कुठला 'सत्या'ग्रह?
३) पोलिस त्यांना आंदोलन स्थळावरून घेऊन जाण्यास आले, तेव्हा मी माझे सामान गोळा करून येतो त्यासाठी वेळ द्या , असे म्हणुन आपल्या समर्थक/अनुयायांमध्ये उडी टाकून दडून बसले. त्यांना पोलिसी कारवाईचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले.(यालाच चिथावणी दिली असा पर्यायी शब्दप्रयोग खरे तर जास्त फिट बसेल). आंदोलकांनी दगडफेक, फुलझाडांच्या कुंड्यांचा वापर करून पोलिसांशी संघर्ष सुरू केला. मग अर्थातच त्यांना पोलिसी कारवाईचा सामना करावा लागला.
स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या अनुयायांमध्ये दडून बसायचे, त्यांना पोलिसी कारवाईला सामोरे घालून आपण महिलांसमवेत आणि स्त्रीवेशात पळ काढायचा हे कसले नेतृत्व?
४) बाबांना योगाचरण करूनही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवता आलेले दिसत नाही. पत्रकार परिषदेत अत्यंत घाबरलेले दिसत होते. पोलिसांनी गोळीबार केला असा खोटा आरोपही त्यांनी केला.>>>>>>>>.
मला हेच लिहायचं होतं

मी आणखी एक लिहायला आले आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी नसलेले यांच्यामधला वाद हा निरंतर सुरू राहणार आहे. कुणीही कुणाचंही कुठल्याही प्रकारे मतपरिवर्तन करू शकत नाही. त्यामुळे आता या पोस्टउप्पर मला या चर्चेत सहभागी व्हायचं नाहीये...

सरकारला असं वाटत असेल की माझ्याकडे काळा पैसा आहे आणि मी तो भारतीय बँकांमध्ये दडवून ठेवला आहे तरी तो शोधायला किमान २० दिवस लागतात. माझी सर्व खाती शोधून त्यातला मी योग्य मार्गाने मिळवलेला, ज्यावर कर भरला आहे तो आणि कर भरलेला नाही हे शोधायला वेळ लागतो. शिवाय बँकांकडून एक साधं स्टेटमेंट मिळण्यासाठीची एक प्रक्रिया असते. ती पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या ग्राहकांबद्दल काहीही माहिती दिली जात नाही. हे झालं भारतीय बँकांचं. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बँकांचे, त्यांच्या सरकारचे त्यांच्या ग्राहकांबद्दलचे नियम वेगळे असतात. ग्राहक भारतीय असला तरीही भारत सरकारने कायदा केला म्हणून ते नियम या बँकांना लागू होत नाहीत. कुठलीही बँक आलं हो भारत सरकार, दाखवा बघू यांच्याकडचा काळा पैसा दाखवणार नाही. ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे.

दुसरी गोष्ट, अलीकडेच अण्णा हजारेंची आणि माझी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली. ते म्हणाले, कुठलं उपोषण कधी करायचं, कुठल्या मागण्या करायच्या आणि कुठल्या मान्य करायच्या याचे काही आडाखे असतात. उपोषण कधी मागे घ्यायचं याचेही काही नियम असतात. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू नाहीये. बाबांच्या म्हणण्यानुसार सरकारने अध्यादेश काढला तरी तो संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आणि राज्यांच्या २/३ मतांनी पारित करावा लागेल कारण त्यात राज्यांच्या कायद्यांशी संबंधित काही विषय आहेत. समजा राज्यांनी तो नाकारला तर तुम्ही काय करणार आहात? आणि मला खात्री आहे की भाजपप्रणित राज्यंच तो नाकारतील. काळा पैसा भारतात आणणं अशक्य आहे. तो आणला तरी त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी होऊ शकत नाही.- हे आहे अण्णांचं स्पष्ट मत.

बाकी, सरकारने काय करावं काय? चार चार मंत्री जाऊन समजूत घालतात तेव्हा तुम्ही मान्य करता की आम्ही फक्त व्रत करू. मग म्हणता की सरकार बाबापुढे झुकलं. मग तुम्ही जाऊन वाकडीतिकडी विधानं करता. मग सरकारकडून वारंवार विनंती झाल्यावरही तुमचा आडमुठेपणा कायमच असतो. एकतर पाच हजार लोकांची परवानगी घेऊन तुम्ही पन्नास हजार लोक जमवता. मग योगशिबिराच्या नावाखाली सरकारला वेठीला धरायचा प्रयत्न करता. सरकारने नुसतं हुसकावून लावलं तर तुम्ही ती "हिट" उडी मारून बाईच्या वेषात पळून जाता. दुसर्‍या दिवशी अमुक एवढ्या लोकांना मारलं आणि प्रेतं दफन केली, लाखभर लोकांना मारलं असे आरोप करता. बरं चॅनलकडे पोलिसांनी मारलेले व्हिज्युअल्स नाहीत तर बायकांनी पोलिसांना मारल्याचे व्हिज्युअल्स आहेत...

बरं हे सगळं कोण करतं? एक चौथी पास बाबा, जो आपल्या एका शिबिरासाठी पाच हजार रुपये घेतो. योग एका शिबिरात किंवा दिवसात शिकता येत नाही. त्यासाठी स्टेप बाय स्टेप जावं लागतं. मुंबईत आम्ही योग शिकवायला फक्त महिना दोनशे रुपये घेतो. शंकराचार्यांनीही बाबावर "हा खरा बाबा नाहीच" असा ठपका ठेवला आहेच.
खरंच, आमचा पहिला महात्मा बॅरिस्टर होता, दुसरा महात्मा आठवी पास आणि तिसरा चौथी पास! धक्कादायक आहे सगळं. कुठे चाललो आहोत आपण?

याचा अर्थ माझा बाबाच्या उपोषणाला विरोध आहे. मी हिंदुत्वाच्या विरोधात आहे असं नाही. पण सरकार पाडण्यासाठी बाबाला हाताशी धरून जे ब्लॅकमेलिंग चाललं आहे त्याला आहे. एवढं करून बाबा निवडणुकीला उभा राहिलाच तर तो पडेलच. कारण त्याचे अनुयायी विखुरलेले आहेत. त्याला एकगठ्ठा मतं कधीही मिळणार नाहीत.

खूप मोठी पोस्ट झाली. बाकी, आभारी आहे.

रामदेव बाबावर पिक्चर येणार आहे, त्यात संजय दत्त रामदेव बाबा होणार आहे, असे मिड डे मध्ये आले आहे म्हणे. अजुन शिनेमावाल्यांपैकी कुणी या प्रकरणात कसे पडले नाही ?

http://www.mid-day.com/entertainment/2011/jun/070611-Mani-Shankar-film-R...

जागो,
आवडलं.. Happy

बाकी काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी "आमचा नाईलाज होता" असे कारवाई बाबतीत विधान केल्याचे ऐकले. यावर काय बोलावे- असा पंतप्रधान सहन करावा लागतो हा सामान्यांचाही नाईलाज आहे! Sad

हल्ली टीव्ही सीरीयल्स मधे काही राम न राहील्याने जाहीरातींचे कमी होणार उत्पन्न पाहता वाहीन्यांनीच सरकार आणि रामदेवबाबांना या रिअ‍ॅलिटी शो मधे अभिनयासाठी मानधन दिल्याची चर्चा आहे.

जो आपल्या एका शिबिरासाठी पाच हजार रुपये घेतो. योग एका शिबिरात किंवा दिवसात शिकता येत नाही. त्यासाठी स्टेप बाय स्टेप जावं लागतं. मुंबईत आम्ही योग शिकवायला फक्त महिना दोनशे रुपये घेतो.

तुम्ही २०० घेता याचा आणि बाबाचा काय संबंध? उद्या आणि कुणीतरी म्हणेल आम्ही योगा ३५ रुपयात शिकवतो तर तुम्हीही ३५ रुपयात शिकवणार का? Proud

>>> बाबाला योगातले कळते तर त्याने फक्त योगातच उजेड पाडावा असे मंत्रानी तारे तोडले आहेत. ज्यातले कळते त्यावरच बोलायचे असेच करायचे म्हटले तर अर्धे मंत्रीमंडळ बरखास्तच करावे लागेल. कृषीमंत्रयाला शेतातले किती कळते? किती आरोग्यमंत्री स्वतः डॉक्टर असतात?

हा सिब्बल पूर्वी सायन्स व टेक्नॉलॉजी या खात्याचा मंत्री होता. त्याला या खात्यातले काय कळत होते? मिलॉर्ड, मिलॉर्ड म्हणून कायद्यातल्या पळवाटा काढून खतरनाक गुन्हेगारांना वाचविण्यात याची आख्खी कारकीर्द गेली. त्याला या खात्यातले काय कळत होते? आपल्या कृषिमंत्र्यांना क्रिकेटमधले काय कळते? काँग्रेसच्या पाठिंब्यावर ८ वर्षे बिहारची मुख्यमंत्री असलेली राबडी अंगठाबहाद्दर होती. तिला कशातलेच काही कळत नव्हते.

>>> खरंच, आमचा पहिला महात्मा बॅरिस्टर होता, दुसरा महात्मा आठवी पास आणि तिसरा चौथी पास! धक्कादायक आहे सगळं. कुठे चाललो आहोत आपण?

आपल्या सुपर पंतप्रधान व भावी पंतप्रधान फक्त १० वी पास आहेत! कुठे चाललो आहोत आपण?

आपल्या कृषिमंत्र्यांना क्रिकेटमधले काय कळते?

दोन्हीमधे आधी जमीन बघतात..
शेतीत पीक घेण्याआधी आणि क्रिकेटमधे टॉस उडवण्याआधी.. बाकि मग आंधळीपट्टाच असतोय सगळा

मास्तुरे, तुमच्यासाठी ज्या सुपर पंतप्रधान आहेत त्या केंब्रिज विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. राहुल गांधी हार्वर्डमधला एमबीए आहे. आरोप करताना तांत्रिक मुद्दे माहीत करून, समजून घ्या, अभ्यास करा आणि मग आरोप करा.
किरण अण्णा आठवी पास आहेत.

बाकी तुमचं चालू द्या. Happy

>>काळा पैसा भारतात आणणं अशक्य आहे. तो आणला तरी त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी होऊ शकत नाही.- हे आहे अण्णांचं स्पष्ट मत.

हे अण्णांचं खाजगीतलं मत आहे का सार्वजनिक केलेलं विधान? तशी लिंक आहे का?
नसेल तर मला वाटतं अशी वाक्ये देताना आजच्या घडीला तरी थोडी अधिक दक्षता अपेक्षित आहे.

बाकी ठामादेवी यांचे ईतर मुद्दे रास्त असले तरी निरपराध व वयस्कर स्त्री, पुरूष, लहान मूले ईत्यादींवर रात्री पोलिस कारवाई करायचे काय कारण? यावर सरकार सकट सर्वच गप्प आहेत. ईतकी "असुरक्षितता"सरकारच्या मनात का यावी? ऊत्तर स्पष्ट आहे कारण यातून मोठे राजकीय आंदोलन ऊभे राहील (भले ते "गैरफायदा" का असेना) याची भिती आहे. अण्णांच्या अलिकडील ऊपोषणाला ज्याप्रकारे ग्लॅमर आणि प्रतिसाद ऊपलब्ध करून दिला गेला त्याचे दूरगामी परिणाम आता लक्षात येत असतील. ऊपोषण हे चूकीचे नसले तरी ते हाताळताना चूकीचा पायंडा सरकारने पाडला जे त्यांना भोवतय.
अण्णांचे ऊपोषण आणि त्यानंतरचे नाट्य यात बर्‍याच लोकांचे डोके जागेवर असल्याचे चिन्ह होते. पण रामदेव बाबांच्या नाटकात मात्र सर्वांचे "शीर्षासन" झाले आणि लोचा झाला.

तेही दहावी म्हणजे अकरावी असेल हो! Proud

कुठे चाललोत आपण

आता तुम्हीच बघा ! इंग्रजी कारकिर्दीत महात्मासुद्धा बॅरिस्टर होता. आणि स्वतंत्र भारतात शाळ्करी शिक्षण घेतलेल्या व्यक्तीना महात्मा करायला लागले.. Proud

>>खरंच, आमचा पहिला महात्मा बॅरिस्टर होता, दुसरा महात्मा आठवी पास आणि तिसरा चौथी पास! धक्कादायक आहे सगळं. कुठे चाललो आहोत आपण?

>>आपल्या सुपर पंतप्रधान व भावी पंतप्रधान फक्त १० वी पास आहेत! कुठे चाललो आहोत आपण?

अरे लोक्स,
ही लोकसत्ता, टाईम्स, एक्स्प्रेस मधली वाक्ये आहेत... थोडी वोरिजिनालिटी येवू द्यात Happy

शाळेत शिकलेलेच शहाणे असतात असं कुणी सांगितल ?
वसंतदादा पाटील विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी चमकताहेत कि...

तेच मला म्हणायचंय जामोप्या. आम्हाला दोन लाख मतं मिळवून आलेल्या सरकारवर, यंत्रणेवर मुख्यमंत्र्यांवर, पंतप्रधानांवर विश्वास नाही आणि विश्वास आहे तो चौथी पास बाबावर ज्याला काळा पैसा म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, सरकार कोण चालवतं, अध्यादेश कुठल्या परिस्थितीत काढतात तेही माहीत नाही! याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर भारताची राज्यघटना पायाखाली घातल्यासारखं आणि हुकुमशाही आणण्यासारखं होईल. मग कुठलातरी एक मूर्ख जिना किंवा बाबा देशाचा सार्वभौम बनेल. तुम्ही हे जे विचार ज्या मूलभूत हक्कांचा आधार घेऊन मांडता आहात त्या हक्कांचं काय होईल मग? श्वास घेणं ही कठीण होईल की!

मान्यय की मला किरण... पण त्यांच्याकडे व्हिजन होती. त्यांनी राज्यासाठी जे केलं ते इतर मुख्यमंत्री करू शकले नाहीत. म्हणून त्यांना मानलं पाहिजे.

ही लोकसत्ता, टाईम्स, एक्स्प्रेस मधली वाक्ये आहेत... थोडी वोरिजिनालिटी येवू द्यात >>> लिंक द्यावी.

>>> बरं चॅनलकडे पोलिसांनी मारलेले व्हिज्युअल्स नाहीत तर बायकांनी पोलिसांना मारल्याचे व्हिज्युअल्स आहेत...

चॅनेलकडे पोलिस लोकांना झोडपून काढत असल्याची व्हिज्युअल्स आहेत. एका महिलेच्या स्पायनल कॉर्ड वर जोरात लाठी लागल्याने तो गंभीर अवस्थेत रूग्णालयात आहे.

>>> आणि मला खात्री आहे की भाजपप्रणित राज्यंच तो नाकारतील.

आणि काँग्रेसप्रणित राज्ये तो प्रचंड बहुमताने मंजूर करतील!

>>> सरकारने नुसतं हुसकावून लावलं तर

रामदेवबाबांनी घटनेच्या कोणत्या कलमाचा भंग केला होता म्हणून त्यांना सरकारला हुसकावून लावावं लागलं? आणि जर भंग केला असेल तर गुन्हा दाखल करून अटक का केली नाही? आणि जर भंग झाला नसेल तर हुसकावून का लावलं?

>>> पण सरकार पाडण्यासाठी बाबाला हाताशी धरून जे ब्लॅकमेलिंग चाललं आहे त्याला आहे. एवढं करून बाबा निवडणुकीला उभा राहिलाच तर तो पडेलच. कारण त्याचे अनुयायी विखुरलेले आहेत. त्याला एकगठ्ठा मतं कधीही मिळणार नाहीत.

सध्याचे सरकार पडणे अशक्य आहे हे मी कालच विविध पक्षांचे संख्याबल सांगून दाखवून दिले आहे. हे सरकार पडणे अशक्य आहे हे सर्व पक्षांना माहित आहे. त्यामुळे तसा कोणीही प्रयत्न करत नाही. बाबांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते जिंकतील किंवा पडतील हा प्रश्नच उद्भवत नाही. आपले स्वच्छ आणि सुसंस्कृत पंतप्रधान तर आजवर कोणतीही निवडणूक जिंकलेले नाहीत.

>>> ग्राहक भारतीय असला तरीही भारत सरकारने कायदा केला म्हणून ते नियम या बँकांना लागू होत नाहीत. कुठलीही बँक आलं हो भारत सरकार, दाखवा बघू यांच्याकडचा काळा पैसा दाखवणार नाही.

अमेरिका, जर्मनी आदि काही देशांनी स्विस बँकाकडून त्याच्या नागरिकांच्या काळ्या पैशाची माहिती मिळविण्यात यश मिळविले आहे. भारताने निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा.

वसंतदादा पण रामदेवबाबांइतकेच शाळा शिकले होते, पण आजवरचे सर्वात यशस्वी आणि धुरंधर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

मास्तुरे, सरकारने प्रयत्न करण्याचं मान्य केलेलं आहे. पण वेळ न देता नुसतंच थयथयाट करणं याला काहीच अर्थ नाहीये.

बाकी पहिल्या ज्या मतांना तुम्ही आक्षेप घेताय ती माझी नाहीत. अण्णा हजारेंची आहेत.

किरण्यके, तूच सांग वसंतदादा आणि बाबा यांच्या विचारांमध्ये, व्हिजनमध्ये किती फरक आहे? तुलनाही होऊ शकत नाही.

तुलनेचा प्रश्न नाही. मुद्दा व्यक्तीच्या शिक्षणाचा आहे.
शिकलेली व्यक्तीही शहाणी असेल असं ठामपणे म्हणता येत नाही. शहाणपणा आणि शिक्षण यांचा तसा काही संबंध नाही. एक चार भिंतींच्या शाळेत मिळतं दुसरं जगाच्या शाळेत.

मला एकदा ट्रेनमधे एक गुजराथी कुटूंब भेटलं होतं. मोठा व्यवसाय होता. गप्पांच्या ओघात त्यांना मी विचारलं कि तुमच्यात शिक्षणाला महत्व नाही..
तर तती बाई म्हणाली.. आप लोग ला़खो रूपये देके एमबीए करते हो. ..और हम आपको नौकरी देते है !

>>> आम्हाला दोन लाख मतं मिळवून आलेल्या सरकारवर, यंत्रणेवर मुख्यमंत्र्यांवर, पंतप्रधानांवर विश्वास नाही

आपल्या पंतप्रधानांनी आयुष्यात एकदाच निवडणूक लढवायचे धाडस केले होते (१९९९) आणि त्यात त्यांचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी कधीही निवडणूक लढविलेली नाही. दोन लाख कुठली त्यांना दोन मते सुध्दा मिळालेली नाहीत.

>>> आणि विश्वास आहे तो चौथी पास बाबावर ज्याला काळा पैसा म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, सरकार कोण चालवतं, अध्यादेश कुठल्या परिस्थितीत काढतात तेही माहीत नाही!

ज्यांनी आपली खुर्ची वाचविण्याकरता झोपेचे सोंग घेऊन यथेच्छ भ्रष्टाचार चालून दिला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा?

>>> याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर भारताची राज्यघटना पायाखाली घातल्यासारखं आणि हुकुमशाही आणण्यासारखं होईल.

परवा जे झाले ती काय लोकशाही होती का राज्यघटनेचा सन्मान होता?

>>> मग कुठलातरी एक मूर्ख जिना किंवा बाबा देशाचा सार्वभौम बनेल.

या अत्यंत भ्रष्टाचारी नगांपेक्षा एखादा बाबा काय वाईट?

>>> तुम्ही हे जे विचार ज्या मूलभूत हक्कांचा आधार घेऊन मांडता आहात त्या हक्कांचं काय होईल मग? श्वास घेणं ही कठीण होईल की!

परवा झोपलेल्या लोकांवर अश्रूधूर सोडून त्यांना तुमच्याच सरकारने श्वास घेणे कठीण केले होते व भ्रष्टाचाराविरूध्द उपोषण करण्याच्या बाबांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली केली त्याचं काय?

>>> तुमच्यासाठी ज्या सुपर पंतप्रधान आहेत त्या केंब्रिज विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. राहुल गांधी हार्वर्डमधला एमबीए आहे. आरोप करताना तांत्रिक मुद्दे माहीत करून, समजून घ्या, अभ्यास करा आणि मग आरोप करा.

अहो त्यांनी १० नंतर लंडनमध्ये इंग्लिश भाषेचा एक सर्टिफिकेट कोर्स केला होता. तेवढेच त्यांचे शिक्षण. राहुलच्या एमबीए ची मात्र ब्रेकिंग न्यूज आहे.

अगदीच किरण... मी तेच म्हणतेय... व्हिजन पाहा.

असो, ज्यांना राहुल आणि सोनिया गांधींच्या शिक्षणावर आक्षेप आहे त्यांनी

http://india.gov.in/govt/loksabhampbiodata.php?mpcode=4074

http://india.gov.in/govt/loksabhampbiodata.php?mpcode=130

हे जरूर पाहा. सरकारी माहिती आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. नसेल विश्वास तर मी काही करू शकत नाही

बाकी मास्तुरे, तुमची समजूत मी घालू शकत नाही. मला घालायचीही नाही. मला जे म्हणायचं होतं ते म्हणून झालेलं आहे. या दोघांच्या शिक्षणाच्या डिटेल्सबद्दल मी कदाचित चुकीचं सांगितलं असेल. पण ते दोघे उच्चशिक्षित आहेत हे नक्की.. असो रजा घेते...

ह्या सगळ्याला भाजप सुद्धा जबाबदार आहे, काळा पॅसा भारतात आणण्याची मूळ मागणी त्याचीच होती मग त्यांनी आंदॉलनाला उघड पाठिंबा का दिला नाही? का त्यांचेही हात रंगलेले आहेत. विरोधक निश्क्रीय आहेत हेच खरे, अजुनही विरोधकांनी सरकारविरुध्द अविश्वास ठराव मागवावा, आता त्यांचा फायदा होइल.

Pages