किमया

Submitted by अज्ञात on 2 February, 2009 - 22:54

IMGP5863.jpg

अशी माणसांची हृदये जुळावी
फुलोर्‍यास अवघी नाती मिळावी
नवी पालवी जून मातीत यावी
कुबेरास ही माया ठेवा ठरावी

किती कोपरे असे; दृष्टी खळावी
खलांची शिवारे सुगीने जळावी
लमाणांपरी पाउले चालवावी
हरी प्रार्थितो; तूस किमया कळावी

....................अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात,
फोटो आणि कविता अतिशय सुंदर... Happy

छानच

अज्ञातजी, हा उपक्रम एकदम आवडला हो.
फोटो तर वेगळे आणि सुंदर असतातच, पण त्या बरोबरच्या कविता म्हणजे दुग्ध-शर्करा योगच.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

पण हा फोटो आहे कसला?
एवढ्या छान कविता सुचतातच कशा?
अचानक सुचतात की बरेच दिवस विचार करुन लिहता?
बाकी फोटो आणि कविता अप्रतिम Happy

सहीच फोटो आहे कविता ही फारच सुंदर.

पोर्णिमाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला मलाही आवडेल Happy
-योगेश

योगी, लयकारी आणि अज्ञातवासला भेट दे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अवश्य, अवश्य भेट देईन. इथे हाफिसात नाही चालत दोन्ही. घरी गेलो की पाहीन. (म्हणजे बहुतेक वीकांतालाच!)
-योगेश

हरी प्रार्थितो; तूस किमया कळावी >>> सुंदर विचार Happy

फोटो की कविता दोन्हीही छान... पण आधी काय ? कविता की फोटो पौर्णिमेसारखेच मला ही प्रश्न पडलेत.. Happy

आता विशाल सांगतोय तर तिथेही जाऊन पाहिलेच पाहिजे.. Happy

पण हा फोटो आहे कसला?
एवढ्या छान कविता सुचतातच कशा?
अचानक सुचतात की बरेच दिवस विचार करुन लिहता?
बाकी फोटो आणि कविता अप्रतिम

पौर्णिमा आणि योगेश,
हा फोटो ब्रम्हगिरी जवळच्या डोंगरातल्या एक वनस्पतीचा आहे. नाव मलाही माहित नाही. सुंदर दिसला ;टिपला; साठवून ठेवला; माझा आनंद सर्वांना वाटला. तुमच्या आनंदाने माझा आनंद अजून वाढला.

कविता छान वाटल्या ते तुमचं क्रेडिट आणि माझं; माझ्या कवितेचं नशीब !!

अनेक विचार नेहमीच चालू असतात. पण अशा रचना अचनकच सुचतात. कशा ते सांगणं अवघड आहे. तरीही ही प्रक्रिया "कविता एक प्रवास" (" कविता एक प्रवास भाग १ ते ५" गुल्मोहर/ललित/नोड २३६०)ह्या लेखमालेत मी त्या शक्य तेवढ्या विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात आत्मप्रौढी नसून ज्याला कुणाला अशा प्रेरणा होतात त्या त्याने त्या त्या वेळी "त्याच्या स्वतःसाठी" नोंद करून ठेवाव्यात ह्या प्रामाणिक उद्देशातून मांडल्या आहेत. अशा नोंदी केंव्हाही वाचल्या तरी लिहितांना होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पुनःप्रत्ययाचा आनंद देतात हा माझा अनुभव आहे. कदाचित त्यातून तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील. तसं झालं तर ते मला नक्की सर्वार्थानं पावेल.

आपल्या प्रश्नांबद्दल आभारी आहे. आपले समाधान होईल अशी अशा आहे. जरूर वाचा जरूर लिहा. तुम्हाला जे दिसलं ते इतरांना दाखवा आणि इतरांचं समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे दुर्मिळ असतं.

बिंदु बिंदु रेष
रेषवळणांपासून अक्षर
अक्षरांचा शब्द
शब्दा शब्दांचे कडवे,
थेंब थेंब तळे कधी ओहळ कधी नाले
प्रवाहाचे पाणी कुणी अर्थासाठी अडवे

तहान भूक पोटासाठी
खरे त्यातिल गाणे
अर्थाविना येणे जाणे
प्राण्यांचे ते जगणे
उघडून पहा डोळे सारे कुणाचे हे देणे
निसर्गाच्या सौन्दर्याचे तूही एक लेणे

..........अज्ञात

you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com

Happy

अर्थाविना येणे जाणे
प्राण्यांचे ते जगणे >>> __/\__ Happy

कुलकर्णी सर.... शब्दच नाहीत....फक्त सलाम ! Happy

ह्याला म्हनतेत द्रिष्टी.... नजर........ शोधक, बिनचुक, चपखल आणि कलात्मक