पालक बेसन पोळा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 June, 2011 - 03:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ जुडी पालक (थोडे पाणी घालुन वाफवुन पेस्ट करुन घ्या)
गरजेपुरते बेसन
१ चिरलेला कांदा
थोडी चिरलेली कोथिंबिर
२-३ चिरलेल्या मिरच्या
हिंग
हळ्द
मिठ
थोडा गोडा किंवा गरम मसाला (ऑप्शनल)
तेल

क्रमवार पाककृती: 

वरील साहित्यातील तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. चांगले ढवळा.

आता तव्यावर थोडे तेल पसरवुन ह्याचे पोळे, धिरडे काय म्हणाल ते तुमच्या आवडीच्या साईझ मध्ये टाका. एकदम पण मोठा नको नाहीतर उलटताना त्रास होईल.

गॅस मिडीयम ठेवा ४-५ मिनीटांनी उलथा. थोडेसे तेल परत सोडा (जर तव्याला असेल तर नाही टाकलेत तरी चालेल)परत ५-६ मिनीटे ठेउन दाबुन शिजला आहे का ते पहा. जर दाबल्यावर त्यातुन ओला रस येत असेल तर गॅस मंद करुन थोडावेळ दोन्ही बाजुने शिजु द्या. आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी. आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा.

वाढणी/प्रमाण: 
आता एक पोळा किती जण खातात त्यावर आहे. वरील मिश्रणात २ ते ३ पोळे होतात.
अधिक टिपा: 

पौष्टीकतेसाठी तसेच लहान मुले पालकची भाजी नुसती खात नाहीत म्हणून पालक टाकला आहे. ह्या अजुन किसलेला गाजर, बिट, कोबी तसेच आवडीच्या भाज्याही टाकु शकतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचेच प्रयोग. पण ओरिजनल बेसन पोळा आईकडून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाढणी/प्रमाण:
आता एक पोळा किती जण खातात त्यावर आहे. वरील मिश्रणात २ ते ३ पोळे होतात.
>>> जागू, एक जण एक धिरडं तरी खाणारच. खूप मोठं आहे का फोटोतलं धिरडं?

आयडिया छान आहे.

जागु, मस्तच.

मी नेहमी करते पालक घालुन धिरडी. त्यात मिक्स पिठं घालते. जास्त कणिक + तांदळाचे पिठ आणि नाचणीचे पिठ/मुग डाळीचे पिट वगैरे कॉम्बिनेशन्स. कांदा, मिरची, मसाला नाहीघालत कारण लेकीला द्यायचं त्यामुळे. त्याऐवजी जीर्‍याची भरड पूड किंवा ओव्याची पूड, थोडी आलं लसुण पेस्ट घालते. कधी कधी यात थोडं वरणं ही ढकलते.. यक्स्ट्रा हेल्दी Lol

अश्याच पधतीने गाजराचे, झुकिनीचे, बीटाचे धिरडे करते Happy

अग जाड असत ना. मग पिठ जास्त घे जास्त हवे असतील तर. नाश्त्यासाठी हवे असतील तर जास्त घे. जेवणावर अर्धा पोळा पण पुरतो ग.

छान प्रकार. धिरडे टाकताना त्याचा आकार, उलथणे किती मोठे आहे आणि गॅसचा बर्नर केवढा आहे, त्यावर ठरवायचे.

मस्तच..मला तो बेसनाचा/चण्याचा पोळा प्रचंड आवडतो.

रच्याकने, तुझ्या किचनमध्ये मिसळणाच्या डब्याच्या आजूबाजूलाच म्हणजे हाताशी चार्ज केलेला कॅमेरापण असतो कां? Wink नेहमी अगदी तयारीसकट फोटो असतात तुझे.

जागू मस्त रेसिपी.. Happy
माझी मैत्रिण थापोळं नावाचा एक प्रकार करते... डाळिच्या पीठात, कांदा, तिखट मीठ घालून झटपट तयार होते... मला प्रचंड आवडते.. Happy
तु केलेलं पण एकदम तोंपासु दिसतंय... पोळित रोल करून खायला मस्त लागेल एकदम. Happy

आउटडोअर्स जेव्हा वेगळा पदार्थ करायचा असेल तेंव्हा कॅमेरा किचनमध्ये काढुन ठेवते. इतरवेळी त्याची जागा पर्समध्ये असते.

दक्षे तस थापोळ माझी आई करायची आधी. हल्ली बरेच दिवस नाही केल. त्याच पिठ जरा भाकरी चपाती सारख कडक ठेवतात मग डायरेक्ट तव्यावर तो पोळा थापायचा. रुचकर लागतो. पण शिजायला जरा जास्त वेळ लागतो.

छान गं. मी अशा पद्धतीने टोमॅटो ऑमलेट करते, फक्त पालक प्युरी एवजी टोमॅटो प्युरी.
पालकाचं ट्राय करून बघते या शनिवारी.

जागू... काल रात्री ही पाकृ वाचली... विचार आला... पालक प्यूरी + बेसन + दही असे करूनही हा पोळा/ धिरडे करता येईल का?
पालक + बेसन कॉम्बो चे आपल्याकडे किती पदार्थ / भाज्या प्रकार आहेत ना? पण प्रत्येक पदार्थाची चव आणि खासियत निराळी.

मी पालक पेस्ट न टाकता पालक चिरुन घालते. आणी कांदा न टाकता टमाटा घालते. आता असे पण करुन बघिन. आमच्या कडचा आवडता ब्रेफा आहे.

आज एकदम माव्साहारी पाककृती वरून शाकाहारी एकदम आम्ही वरती तुज नाव वाचल कि खाली काही माव्साहारी असणार असे ठरवून चालतो

अहाहा! जागुतै ...काय हिरवा-गार(म) पोळा...... थोडा खरपुसवुन कुरकुरीत खायला मज्जा येइल नय..टी टाईम वेळी.. Happy

याच प्रकारे इतर पालेभाजी ट्राय मारायल काही हरकत नाही न..?

चातक हो ह्यात इतर पालेभाज्या पण ट्राय करता येतील.

अरुंधती दही पण चांगले लागेल एकदा टाकुन बघेन.

दिनेशदा, अखि Happy

महेश तुम्ही नविन आहात म्हणून अस वाटतय. आता पावसाळा चालु झाला आता सगळ्या रानभाज्या परत येतील. ह्यावर्षी रानभाज्यांचे वेगवेगळे प्रयोग म्हणजे साधे सोपेच करायचे ठरवले आहेत.