ऐतिहासिक भटकंती ...

Submitted by सेनापती... on 26 May, 2011 - 12:47

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...

तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.

पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.

१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.

२. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.

३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर.

४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.

५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.

६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू

७. वढू येथे काढलेली रांगोळी -

आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.

८. देहू येथील तुकाराम महाराज गाथा मंदीर -

९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.

१०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -

११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.

इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.

१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.

१३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.

१४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.

१५. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा -

१६. पुतळा आणि विजयस्तंभ

१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.

भटकंती आणि इतिहास प्रकाश चित्रांमधून गुंफायचा हा एक छोटासा प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा. Happy

समाप्त...

गुलमोहर: 

सही रे एकदम

पराभूत इंग्रज सैन्याला सोडून न देता थेट मुंबईवर धडक मारून इस्ट इंडिया कंपनीचे उच्चाटन केले असते तर ईतिहास केवढा बदलला असता....

Sad

रोहन, सुंदर फोटो.

संभाजी महाराजांची समाधी खुप वर्षांपुर्वी बघितली होती. आता नव्याने बांधकाम झाल्याचे दिसतेय. तशी जागा रम्य आहे ती, पण तिथे मन भरुन येतं. इतिहास थोडा वेगळा घडता तर..

धन्यवाद जिप्सी आणि यो...

रोहित... ती जागाच अशी आहे की स्फुरण चढतेच..

आशुचँप .. ते तितके सोपे नव्हते... वडगाव युद्धावर एक वेगळा लेख लिहितो इतिहास विभागात.. Happy

दिनेशदा.. होय आता अजून छान केलंय... हा सर्वच परिसर रम्य आहे... वढू वरून पुढे गेले की पाबळ देखील आहे.. मस्तानीची कबर आहे तिथे...

मस्त. पण शेवटून दुसर्‍या फोटोत पुतळ्याबरोबर जो विजयस्तंभ म्हटलंय ती दीपमाळ आहे ना? चुभुद्याघ्या.

ऋयाम...

दूरगामी परिणाम नक्कीच वाईट झाले पण त्याला अनेक करणे आहेत.. इथे ऐतिहासिक चर्चासत्र घडवता येईल... Happy ह्या लढाईवर एक छोटा लेख लिहायचा प्रयत्न करतो... Happy

प.भ. मस्त फोटो आणि माहिती. ४-५ महिन्यापुर्वी तूळापुरला गेले होते. तेव्हा पासून वाट पहात होते. एखाद्या मा.बो. वीराने फोटो टाकण्याची. संभाजी राजांच्या समाधी जवळ, नदीकाठी, संभाजी राजांवर एक कविता लिहिली आहे. तिचा फोटो नाही काढला का? असो.

व्वा, भटक्या ! मस्तच! साधारणतः वर्षभरापुर्वी आम्ही गेलो होतो तुळापुरला...ते आठवलं!
एक विचित्र प्रकारची शांती पसरलेली असते तिथे. या पुतळ्याजवळच छोटीशी बाग आहे. एक छोटेखानी रेस्टॉरन्ट आहे.
भटक्या त्या नदीकाठच्या कमानीचा नाही काढलास फोटो! त्याच कमानीखाली संभाजीराजांची हत्या झाली! Sad

थांब तुला झब्बु देते.

दुर्दैवाने लोकांना या बलिदान स्थळाचं गांभिर्य वै. अजिबात नाही.
आम्ही गेलो तेव्हा तिथे एक मोठ्ठं गुजराती कुटुंब आलेलं! २५-३० पुरुष स्त्रीया नि ८-१० मुलं डबेच काय पाणीपुरीच्या पाण्याचा एक भला मोठा पिंप ..पाणीपुरीचे पॅकेट्स असं सर्व काही घेउन आले होते. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी बसुन त्यांची पळापळ खाणे पिणे चालु होते. काही लहान मुलं महाराजांच्या जवळ उभे राहुन त्याच पोजमधे फोटो काढत होती. Sad

ग्रेट रे !
इतिहासाने कायम उपेक्षीलेल्या त्या महावीरास माझा त्रिवार मानाचा मुजरा !

रच्याक वडगाव मावळला कुठे उभारले आहे हे महादजींचे स्थानक आणि कधी? शिंदे टेकडीवरच आहे का?
मी ८९-९० मध्ये पुण्याला एस.पी. ला होतो १२ वी साठी, तेव्हा वडगावातच राहात होतो. शिंदे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या माळीनगर मध्येच. पण तेव्हा हे स्मारक नव्हते उभारलेले अजुन.

दूरगामी परिणाम नक्कीच वाईट झाले पण त्याला अनेक करणे आहेत.. इथे ऐतिहासिक चर्चासत्र घडवता येईल... ह्या लढाईवर एक छोटा लेख लिहायचा प्रयत्न करतो..>>> वाट पाहतोय Happy

आर्या... ५ वा फोटो कमानीतूनच घेतलाय.. आणि कमानीचा फोटो पण घेतलाय... Happy नीट आला नाही फारसा..

मला इतरवेळी तिथे जाऊन बघायचं काय परिस्थिती असते...

विशाल... शिंदे टेकडी कुठे आहे मला माहित नाही... ही जागा मुंबई-पुणे हायवेवर 'वडगाव'ला आहे.

.

.

.

.

.

....

Pages