पिवळाई !

Submitted by Yo.Rocks on 23 May, 2011 - 14:01

उन्हाळा म्हटले की मला पहिले आठवते ते बहरलेला बहावा ! पिवळ्या फुलांचे झुंबर लक्ष वेधून घेतातच.. मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.. पण हाच बहावा मी सावंतवाडीला मोती तलावाजवळील जगन्नाथ भोसले उद्यानात पाहिला.. त्या उद्यानात शिरलो नि बस्स कसला खुष झालो.. कारणच तसे होते.. या आवडत्या बहाव्याची तब्बल सहा- सात झाडे होती.. नि पुर्णतः बहरली होती.. उद्यानात पिवळाई पसरली होती.. झाडांवरती पिवळे झुंबर नि खाली गळून पडलेल्या फुलांची रांगोळी... पहिल्यांदाच इतका बहावा एकदम बघितला.. नि मग काय क्लिकींग सुरु केले.. पण प्रत्यक्षात जे काही दिसत होते ते अप्रतिम.. फोटोंनी समाधान होत नव्हते.. खरे तर मला टिपताच येत नव्हते.. Happy पण तिथले काही प्रचि दाखवण्याचा मोह आवरत नाही..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि ९

प्रचि १०

गुलमोहर: 

खुपच सुंदर ! मुंबईत पण आहेत हि झाडे. कोल्हापूरात रंकाळा रिक्षा स्टँडजवळ आहेत त्याची फूले जास्त गडद रंगाची असतात.

मस्तच यो. माझं फार्फार आवडतं झाड आहे हे.
मराठीतल्या या बहाव्याला हिंदीमध्ये एक अतिशय गोड नाव आहे-'अमलताश'!
आणि इंग्रजीमध्ये त्याच्या स्वभावाला शोभेल असं-'गोल्डन शॉवर ट्री'.
<< मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.
काय म्हणतोस? वसईतच पाच-सात आहेत. डहाणूकडे जाताना एक अख्खं जंगल आहे बहाव्याचं. मुंबईत एक अख्खाच्या अख्खा रोड या झाडाच्या नावाने आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खूप सारी बहाव्याची झाडं रस्त्यावर कमान टाकून उभी आहेत. 'लॅबर्नम रोड'-मणि भवन जिथे आहे तिथे.

सह्हीच!!

प्रच, ३, ४, ५, खुप्पच आवडले.

प्रचि ५ मधे नैसर्गिक पिवळे झुंबर आणि स्ट्रीट लाइटचे झुंबर - मस्त आयडिया Happy

वा! सुंदर Happy
माझे अतिशय आवडते झाड आहे हे.
३,५,८ आणि १० एकदम अप्रतिम फोटो.

मणि एकदा तुझ्याबरोबर त्या डहाणुच्या बाहव्याच्या जंगलात जायचय Happy

छान प्रचि.. शिर्षक वाचुन वाटले होते की पिवळे धम्मक आंबे बघायला मिळतात की काय.. Happy
गावी गेल्यावर कन्यारत्नाचे आवडते गार्डन.. Happy

Pages