वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I agree to possess this scented hand.

अंजली, परत कधी येऊ?

लालूच्या बिट्समधे काही अ‍ॅडिशन्स :

** जगातले तीन चतुर्थांश लोक भावनाप्रधान असतात. पार्ल्याक्वा उरलेल्या १ टक्क्यात येतात. Proud
** तुम्ही पुढच्या जन्मात जोडीने (माबो) संन्यास घ्याल
** तसे केल्यास गिधाडांच्या xxx झाल्या असत्या (सदर वाक्य एका प्रकाशित पुस्तकातील असल्याने प्रताधिकार कायद्यानुसार पूर्ण उद्धृत करता येत नाही. फुल्ल्या म्हणजे शिव्या(च) हा समज चुकीचा आहे. :P)

@ वैद्यबुवा: फार कॉन्फिडन्स मधे राहू नका...!! सौ. दैत्य ह्यांनी पण पुण्याचं पाणी प्राशन केलं आहे.....तुमचंच रॅगिंग होण्याची शक्यता जास्त आहे!.... Lol

अरे अरे ! बुवा, दैत्य ही जहाल भाषा ... किं कारणे? कल्लोळात मेधा यांनी मी अभिवादन करतो ते सुजन पार्ल्यात भेटतील, तेंव्हा बाराबाफवर "सुजन" शब्द फुका दवडू नका असा मौलिक सल्ला मला दिल्याचे विसरलात की काय? बाकी कल्लोळातला वसंत तुम्हा सर्वांच्या भेटीत सापडला! अंजली, उत्तम संयोजनाबद्दल तुमचे विशेष अभिनंदन! आणि मधुरिमा, तुम्हारा जेवण आणि लोणचा हमपर उधार रहा Proud

बाकी नाना, तुम्ही दुपारी(पण) आला असतात तर अजून धमाल आली असती :). तुम्ही बारा(बाफ) सोडून पार्ल्यात येणार होतात, त्याचं काय झालं?

नाना Lol बरोबर आहे, कोणी सुजन नाहीच तिथे. अंजली, परंपरेला जागून तुही एक वृत्तांत लिहून टाक. गाईडलाईन्स हव्या असल्यास लालूशी संपर्क कर. Proud

आणि मधुरिमा, तुम्हारा जेवण आणि लोणचा हमपर उधार रहा >>>>> क्या बात है! क्या बात है! Wink

वृत्तांतही मीच लिहायचा का? बुवा, परंपरेनुसार आधी तुम्ही सगळ्यांनी आणि शेवटी मी लिहायला पाहिजे. त्याच परंपरेनुसार किमान ६-७ वृत्तांत यायला हवेत Proud
मागच्या कल्लोळाचे वृत्तांत वाचून डिजे शेवटी कल्लोळ नको पण वृत्तांत आवरा असं म्हणाली होती, तीही परंपरा राखायची आहे :फिदी:.

हो हो, प्रत्येक राज्याचा निदान एक वृत्तांत (याच्या चष्म्यातून, त्याच्या लेन्सांतून इ.इ.) यायला हवा.

स्वाती: मैं तुम्हारे बस में नहीं आनेवाला विक्रम.. Proud

शिंडे माझा वॄत्तांत येतोच आहे.. लवकरच लिहायचा विचार करायला सुरूवात करेन म्हणतो Happy

कल्लोळाला गेलेल्यांच्यात नी आमच्यात फरक तो काय? बुवा, बाई ह्यांच्यापर्यंत ही फोटो पोचलेच नाहीत अजून Biggrin व्हय की नाय सिंडी.

मी लिहू का? माझा तोंडी वृत्तांत ऐकतानाच अंजली चिडली माझ्यावर. तिच्या भाषेत म्हणायचं तर मी डोक्यातच गेले असेन बहुधा Wink

हो ना सायो. मला वाटत होतं मी गेले नाहीये अजून पण.......आता कुणी शिल्लक असावं असं वाटत नाही. काय अंजली? मी काही फोन करत नाही आता थोडेदिवस तुला Happy

आता दगडासारखे डोके असले तर नाही जात डोक्यात.
पण काही लोक भावनाप्रधान या नावाने जगतात. त्यांना कविता समजते, लोकांची दया येते, वगैरे.

मोहना, मी कधी चिडले Uhoh
हां आता दोन रात्री सतत गप्पा मारून माझी झोप पूर्ण नव्हती झाली, त्यामुळे जरा त्रास होत होता पण त्यासाठी पार्ल्याक्का जबाबदार आहेत :फिदी:.
लिहा हो तुम्ही वृत्तांत बिनधास्त. मायबोली 'freedom of speech' साठी प्रसिध्द आहे. आणि नविन कायदा भारतात लागू झाला आहे, अमेरीकेत नाही ;).

पन्नाताईंनी काढलेले फोटो..
सकाळचा ब्रेकफास्ट
IMG_3061.JPG

तंदुरी पनीर
IMG_3065a.jpg

तंदूरी चिकन
IMG_3066.JPG

चि. आदित्य, चि. शिवानी, चि. हर्ष आणि वेबमास्तर मॉ. गॅ. चे काही पदार्थ तयार करत होते.
IMG_3068.JPG

चि. आदित्यचा मॉ. गॅ. मेन्यू
IMG_3071.JPG

दुपारच्या जेवणाचे, मटण कबाब, व्हेज कबाब, जिलबी, मोहनानं आणलेले स्वीट, योगीने आणलेले केक यांचे फोटो काढायचे राहून गेले..

अंजली, अगदी दणक्यात पार पाडलेलं दिसतयस गटग. बरं आता फोटो टाकलेस गटगच्या आधी असले फोटो टाकले असतेस तर गर्दी कंट्रोल करणं कठीण झालं असतं. Happy

Pages