उरण-अलिबाग-उरण रिटर्न

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 May, 2011 - 08:46

काही दिवसांपुर्वी एका कामानिमित्त अलिबागला जाण्याची संधी मिळाली. अलिबागला जाण्यासाठी उरणच्या करंजा ह्या गावातुन तर (बोट) असते. ही तर १५ मिनीटांत अलिबागच्या रेवस किनार्यावर पोहोचते. इतके जवळ की दोन्ही किनारे एकमेकांना हाय हॅलो करतात.

सकाळी ९ ची तर पकडायची होती. पण नेहमी प्रमाणेच उशीर होऊन ९ ची तर नुकतीच गेली होती. आता दुसरी तर १ तासानंतर होती. मग टाईमपास काय करायचा? सोबत श्रावणी, आहो, त्यांचे मित्र आणि त्याची बायको म्हणजे माझी मैत्रीण होती. आहो, त्यांचे मित्र आणि श्रावणी गेले खाउ शोधायला. माझी मैत्रीण आणि मी दोघी धक्क्यावर थांबलो. आता वेळ होता म्हणुन फोटो काढण्याचीही खुमखुमी आली.

करंजा बंदरावरुन ट्रॉलत, बोटी मच्छी पकडण्यासाठी समुद्रात जातात. त्या बोटी विश्रांतीसाठी किनार्यावर पहुडल्या होत्या.

समुद्रात मासेमारी करीता निघालेल्या बोटी

बोटिंचे आणि किनार्याचे निरिक्षण करता करता माझे लक्ष अचानक कुठे जाणार हे तुम्ही ओळखलच असणार.
आता ह्यांचे आणी माझे नक्कीच काहीतरी रुणानुबंध आहेत ह्याची मला खात्री पटली. मग माश्यांना पाहून पर्समधील कॅमेर्यानेही बाहेर येण्याची धडपड चालू केली आणि मच्छीवर फ्लॅश मारायला सुरुवात केली. आता मी शोधू लागले कुठले कुठले मासे आहेत ते, मासे अर्धवट सुकलेले होते. ते अशा प्रकारे टाकले होते की जणू काही कचरा म्हणून फेकुन दिलेत. कारण त्यावर प्लॅस्टिक वगैरे उडुन आल होत.

पण हा माझा भ्रम एका कोळणीने येउन मोडून काढला. ती त्या माश्यातली मांदेली निवडून टोपलीत घेत होती. आणि ती तिला अजुन खडखडीत सुकवणार होती.

मग शोध घेत असताना मैत्रीणिने इचर मासा बाजुला काढला. तिच्या माहीतीनुसार मोठ्या इचरांचे कालवण करतात. कोलंबीप्रमाणेच साधारण लागतात.

मग त्यात एक आकर्षक मासा आम्हाला दिसला त्याचे आम्ही फोटो सेशन केले. तिथे बाजुने चाललेया एका कोळी गृहस्थांना त्या माश्याची माहीती विचारली. त्यांच्या माहीती प्रमाणे त्यामाश्याचे नाव ठेम आहे. हा मासा विषारी आहे. मनात म्हटल तरीच कधी ह्याच दर्शन बाजारात झाल नाही.

कोळणी तेथे माश्यांच्या पाट्या घेउन येत होत्या व रिक्षात बसुन उरणच्या बाजारात विकायला नेत होत्या त्यामुळे त्यांना रिक्षात थांबवुन फोटो काढायला मागितले असते तर त्यांनी गोंगाट करुन पब्लिक गोळा केली असती म्हणुन त्या फंदात पडले नाही. पण एक्-दोन कोळणी तिथेच बसल्या. लगेच आम्ही उत्सुकतेने तेथे गोलो. आम्ही जायच्या आतच तिच्या भोवती घोळका जमा झाला. काही हॉटेल्सवाले खास मासे नेण्यासाठी रोज इथवर येतात ही माहीती नव्याने मिळाली. त्या कोळणिकडे कोलंबीची पाटी होती. कसाबसा तिची परमिशन मागुन फोटो घेतला पाटीचा पटापट.

आता तर येताना दिसली तसे आम्ही तरीच्या दिशेने जाउ लागलो. हा मार्ग समुद्रातील तरीवर जाण्याचा.

जाता जाता परत माझी आवडती दृश्ये दिसली. तेथिल दगडानवर कालव होती. अशी दगडाला कलवांच्या कवचा असतात.

हे कवच खरळाने फोडून कालवे बाहेर काढली जातात. हे खुप मेहनतीचे काम असते. एक बाई कालव काढतच होती.

कालवांवरुन आठवण झाली मारुती चित्तमपल्लि ह्यांच्या जंगलाच देणं ह्या पुस्तकात त्यांनी त्यांना मिळालेल्या माहीतीचे वर्णन करताना सांगितले आहे की ही कालवे जेंव्हा उघड मिट करतात कवचांचे तेंव्हा मच मच आवाज येतो.

आता तरीममध्ये जागा मिळवण्याची धांदल सुरु झाली त्यामुळे कॅमेरा गपचुप आपल्या जागेवर जाउन बसला. मग एकदम रेवसचा किनारा आल्यावरच तो बाहेर पडला. रेवसच्या किनार्यावर दुरवर खारफुटी पसरली आहे. पुर्वी ही खारफुटीची झाडे स्थानिक लोकं तोडून जाळण्यासाठी सुकवायचे. पण ह्या खारफुटींच्या झाडांमुळे वादळांपासुन काहीप्रमाणात गावांचे रक्षण होते. ह्यांची मुळे घट्ट जमिनीत रुतलेली असतात त्यामुळे तुफानाचे पाणि गावात शिरण्यात अडथळा निर्माण होतो म्हणुन सरकारने खारफुटी तोडण्यावर बंदी घातली आहे म्हणुन ह्या खारफुटीचे आता जंगल झाले आहे.

अलिबाग रेवसचे खारफुटीचे जंगल

धक्यालगतच्या खारफुटीला फुले आलेली होती.

समोर उरण करंजा गाव दिसत आहे.

अलिबाग मध्ये खाडीच्या दिशेने पाण्याची वाट

हा पुल अलिबाग मध्ये जाण्याचा.

पुढे गेले की बायका रेवस स्पेशल खाउ घेउन बसलेल्या असतात.
रेवसची ही फेमस कसर. ही कसर उकडूनच वाटे करुन इथे विकायला ठेवलेली असतात. कसर ही तळ्यातील वेलीची मुळे असतात. त्यांना केस असतात. ह्या कसरांचे वरचे साल सुरीने किंवा दाताने काढावे लागते. त्याच्या अतील गरही कडक असतो पण तो खाताना तोंडाचा व्यायम होतो. पण चविष्ट असल्याने खुप जण आवडीने खातात.

दुसरा मेवा असतो तो म्हणजे मिठाच्या पाण्यात मुरवलेले मोरावळे. ह्या आवळ्यांवर पाणि प्यायले की पाणी गोड लागते.

इथे मिळणारी खोबर्याची चिक्कीही फेमस आहे. लहानमुलांचा अगदी आवडीचा खाउ.

हे सगळ गोळा करुन आम्ही रिक्षात बसलो परत कॅमेरा आत गेला कारण रिक्षा इतकी जोरात आणि दणादण आपटत होती की आम्हीच आम्हाला सावरत होतो. पण आजुबाजुला दिसणार्या निसर्गसौदर्यामुळे रिक्षा दगदगीची वाटली नाही.

आलिबाग उरकुन परत आम्ही रेवसवरुन करंज्याला आलो. आता तर मला आनंदाच्या उकळ्याच फुटल्या हे दृश्य पाहुन. धक्यावर बोंबिल आणि वाकट्यांच्या पताका लावलेल्या होत्या. एखादा सण असल्यासारखेच मला वाटत होते.

मी हावर्यासारखे जवळ जाउन फोटो काढले

हे बोंबला चे तोरण

अजुन जवळ जाउन फोटो काढला.

ह्या वाकट्या

अजुन सुकत लावलेला म्हावरा.

अशा प्रकारे निसर्ग आणि मासे ह्या दोन्हींची भेट झाल्याच्या आनंदपुर्तीत माझा प्रवास पुर्ण झाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आजच्या झी मराठी न्युज बघा ह्या कर.न्जा गावात बिबट्या शिरला आहे. त्याला एका घरात को.न्डले आहे. पकडण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याने दोन जणा.न्ना जखमी केलय.

दुसरी न्युज उरण्च्या मर्स्क क.न्पनीत क.न्टेनर मध्ये स्फोट झाला आहे.

मस्त सफर जागू. कसर आणि चिक्कीच्या फोटोबद्दल धन्स. कालच या चिक्कीची आठवण आली होती.

जागू चंगळच झाली म्हणायची. या खारफूटीतील काही झाडांबद्दल मी लिहिले होते मागे. इथला खाऊ (म्हणजे शाकाहारी खाऊ ) पण सिझनप्रमाणे वेगवेगळा असतो.

म्हमईकर आहो बिचवर नव्हतो गेलो.

अमी, रचु, स्वाती धन्स.

वर्षू, मानसी आता व्हिडीओ ही दाखवताहेत आगीचा.

दिनेशदा मला लि.न्क द्या.

माझ्या एका मित्राला जिवंत कोंबडी दिसली तरी तोंडला पाणी सुटायचे तसे जागूला मासे बघून तों पा सु असणार Happy

मस्त Happy

व्वा! शाकाहारी लोकांच्याही उड्या पडाव्या हीच तर जागुच्या फोटोंची आणि रेसिपींची खासियत आहे. Proud

जागु, ४थ्या फोटोत हे मासे असेच पडलेले असतात? त्यांना कोणी वाल्या कोळी आय मिन वाली नसतो का? Uhoh

जागू, तो इचर नावाचा मासा काही वेळा सुकटीबरोबर येतो. तो खातात हे माहित नव्हते. कसा खातात? त्याला कवच असावे असं वाटतय.

दुसरी न्युज उरण्च्या मर्स्क क.न्पनीत क.न्टेनर मध्ये स्फोट झाला आहे.

>>
Sad

ते तर माझे client आहे आणी डि. ते मार्च मी तेथेच shcedule होते.

जागु अतिशय सुरेख फोटो आणि सफर.. फार आवडले फोटो... तु केलेलं सगळ वर्णन पण अप्रतिम आहे, वाचताना मजा आली एकदम.. Happy
एकूण लिखाणात तुझं मत्स्यप्रेम जाम जाणवतंय आणि.. Happy

फोटो अगदी मस्त.. मजा आली पाहताना.. अगदी तिथे गेल्यासारखे वाटले. वाळत घातलेल्या वाकट्या पाहुन मला नेहमी ह्या रिबीनी कशाला वाळत घातल्यात असे वाटायचे Happy

कॉलेजात असताना एकदा अर्नाळ्याला गेलो होतो. ब-याच ठिकाणी जमिन शेणाने नीट सारवुन त्यावर करंदी आणि ओला जवळा वाळत घातलेला. जाताना वाळत घातलेला दिसला, येताना दोन-तिन बाया हिराच्या केरसुणीने सुकलेली करंदी आणि जवळा गोळा करत होत्या. ते पाहुन आमच्यातल्या ब्राम्हण मुलींनी तर 'तुम्ही कसला कचरा खाता ते बघा स्वतःच्या डोळ्यांनी' म्हणुन आमची वाट लावलेली Happy आम्ही 'असे लगेच खात नाही काय कोणी, चांगला पाखडुन, कचरा काढुन, धुवुन मगच खातो बरे' असे म्हणत सारवासारव केलेली.

जागू, परमेश्वराने मत्स्यावतार आपल्या सारख्या मत्स्यप्रेमींमुळेच घेतला असणार असं वाटतय आता. पुन्हा एकदा अलिबाग फिरून आलो या निमित्ताने. मस्तय लेख आणि फोटो.

त्या बिबट्याला पकडल तो आधी करंजा जेट्टिवरच होता नंतर कुठल्यातरी घरात घुसला हे लोकांनी पाहील आणि त्याला घरात अडकवल. डिटेल न्युज आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि टिव्हिवर येतायत.

जागु, मस्त सफर घडवलीस.

तू हे असले माशांचे फोटो आणि माश्यांच्या रेसिपीज टाकतेस ना, म्हणून बिबट्या आला होता. Happy

मामी, साधना तो बिबट्या मासे खाण्यासाठीच गेला होता जेट्टीवर. नंतर माझ्याकडे येणार होता पण माणसांनी त्याला येउ नाही दिले. एका घरात कोंडून ठेवले.

Pages