आमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

परवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का?)

आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?

'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?

(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?

(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. :))

प्रकार: 
शब्दखुणा: 

माझं मत आकाशला... फुनसुख वांगडु कायच्या कै एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी कॅरेक्टर दाखवलाय... कुणाचा तरी डमी म्हणून ४ वर्षं इंजिनियरिंग करण्यापासून ते गरज लागल्यास डिलिव्हरी करेपर्यंत Uhoh सर्व कामे करणार. हे अतिशय अनरियलिस्टिक वाटतं. त्यापेक्षा आधी आयुष्याकडे फारच कॅज्यूअली पाहणारा आकाश, मित्रं तुटल्यावर आणि खरोखरी प्रेमात पडल्यावर एखाद्या सामान्य माणसासारखा बदलतो ते जास्ती रियलिस्टिक वाटतं..

आकाश. आणि भुवन. आणि डीजे.
रँचो मध्ये म्हातारपण लपविले आहे ते कळते.

अय्यो! दोनपैकी कुठला आवडतो ते सांगायचंय का? मग मी पण आकाशच निवडेन.
पण आमिरखानचे म्हणून मला आवडलेले सिनेमे म्हणजे:
१. सरफरोश २. दिल है के मानता नही ३. लगान

आकाश !
<< फुनसुख वांगडु कायच्या कै एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी कॅरेक्टर दाखवलाय... कुणाचा तरी डमी म्हणून ४ वर्षं इंजिनियरिंग करण्यापासून ते गरज लागल्यास डिलिव्हरी करेपर्यंत अ ओ, आता काय करायचं सर्व कामे करणार.>> दक्षिणाला अनुमोदन. Happy ( तरीपण आमिर आहे म्हणून तोही आवडला :फिदी:)

मला आमीरखान कधीही, कसाही, कोणत्याही रोलमध्ये आवडतोच. Proud

पण इकडे दोनच ऑप्शन आहेत तर 'आऽऽकाऽऽऽश' निवडेन मी Happy

सैफला चिडवताना त्याच्या डोळ्यांत दिसणारा खट्याळपणा, 'आता मिळाला बकरा....' टाइप भाव, भुवया उडवणे. सुरुवातीचे 'Im Gr8' टाइप वागणे आणि नंतरचे 'आपण ज्या मुलीच्या प्रेमात पडलोय ती दुसर्‍याशी लग्न करतेय ' हे कळल्यावरचे दु:ख...सगळेच अप्रतिम निभावले आहे आमीरने Happy

कायच्या कै एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी कॅरेक्टर वगळलं तर मग नवरा नावाचं मटेरिअल शिल्लक राहतं Wink

एनी वे, दोन्हीत आकाशच उजवा वाटतो

आमीर आमीर आमीर. (आकाश की फुनशुख की अजून कोणी सांगणं फार्फार अवघड आहे.) आमीर कसाही, कुठेही, कधीही. Happy
आफॅक्ल काढावा का ?

आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?

'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?>> रोल म्हणशील तर 'थ्री इडियट्स' मधला रँचो. पण आकाश जास्त भावतो.

ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?>> आकाश!

पण मुलांना मात्र कटरिना आवडते.>> अनुमोदन Proud

मला आमिर खानच नाही आवडत................. >>> जल्ला कतरिना तरी आवडते ना?

एसीपी राठोड Happy

आमिर!!

कुठलाही रोल करतांना त्याच्या मुळाशी जातो! म्हणजे गजनीच्या रोलसाठी बॉडी बिल्ड केली वगैरे ऑब्व्हियस मुद्दे वगळूनही - त्याची पूर्ण बॉडी लॅन्ग्वेज, डोळ्यांतले भाव ज्या प्रकारे बदलतात! अमेझिंग!

वर कोणीतरी उल्लेख केलेला 'दिल चाहता है'मधला सैफला चिडवतांनाचा प्रसंग असो किंवा '३ इडियट्स'मधे अच्युत पोतदारच्या वर्गात बसलेला असतांनाची त्याच्या चेहर्‍यावरची एक्साइटमेन्ट, (मला हे नीट सांगता येणार नाही, पण) 'उडत उडत' चालण्याची, सहज चालता चालता मधेच एखादी उडी मारण्याची लकब - अगदी कॉलेजचं वय सगळ्या देहबोलीत दिसतं - डोळ्यांत दिसतं! ग्रेट! Happy

आमिर खान डोक्यात जातो हल्ली.
आकाऽश होता तोपर्यंत लय आवडायचा.

तरीही फुन्सुख वांगडु मधे वाटतो कॉलेजातला. त्यासाठी फिदा.
पण माज करतो लय. जा घरी म्हणाव. .

>> पण माज करतो लय. जा घरी म्हणाव.
ऋयाम, तुम्हीच ना ते कंगना रानावत आवडणारे? मग बरोबर! Proud

आमिर खान डोक्यात जातो हल्ली>> नक्कीच तरीपण आवडतो.

माज करतो>> सॉरी. ही कमेन्ट चालणार नाही.

आSSकाSSश Happy
आणि आणि ए.सी.पी राठोडपण Happy

नक्कीच आकाश.
दक्षिणाशी सहमत.
शिवाय रँचो च्या अवतारात "अ‍ॅक्टिंग" जाणवते अन वय लपत नाही Sad

Pages