वासंतिक कल्लोळ २०११

Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता: 
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना

वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना

परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्‍या भांडणं-वादांना पण परंपरा आहे. Wink
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्‍या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल. Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नै तर काय
शालजोडीतल्या बाई, शॉटगन मैत्रेयी आणि बारीक चिमटा पेशलिस्ट पन्ना गाडीत आहे म्हणजे काय चेष्टा वाटली काय?
तरी बरं गाडी राजधानीत थांबून अजून शिटं घेणार नाहीये हे नक्कीये. (वाचलो.. Proud )

सशल्, त्यांनी दाढी उत्रवली असली तरी इतके गुळगुळीत नाहीयेत गं त्यांचे गाल. निदान लांबून तरी दिसत नाहीत. Proud

ते शॉटगन शत्रू च्या चालीत होतं सशल, नॅविगेटर सीट बद्दल नाही.

सशल, Lol तू कशाला काळजी करतेस, तू नाहीयेस ना गाडीत. Wink

आवरा Biggrin

पाप्या, चिमटे काय .. गाडीत एक छुपा व्हिडीयो कॅम लावा बरं
<<< गाडीतल्या जीटीजीचा वृत्तान्त वाचायचीच जास्त उत्सुकता आहे Biggrin

स्वाती, तुला छुप्या कॅमर्‍याची नी प्रायव्हेट सर्क्युलेशची काळजी नाही वाटतं. Wink

१४ मे ला स्कायलॅब लाँच केले होते.
१४ मे हा वहिदा रेहमान आणि केट ब्लांचेटचा वाढदिवस.
१४ मे फ्रँक सिनात्रांचा स्मृतीदिन.

आणि १४ मे हा 'नॅशनल बटरमिल्क बिस्किट डे' आहे.

मे महिना जागतिक 'साऊथ एशियन हेरिटेज' मन्थ आहे आणि 'झॉम्बी अवेअरनेस' मन्थ पण. Happy

सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत?

१४ मे ला स्कायलॅब लाँच केले होते.
१४ मे हा वहिदा रेहमान आणि केट ब्लांचेटचा वाढदिवस.
१४ मे फ्रँक सिनात्रांचा स्मृतीदिन.
१४ मे हा 'नॅशनल बटरमिल्क बिस्किट डे' आहे.
.
.
.
.
.
१४ मे हा वासंतिक कल्लोळाचा दिवस आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी अनिलभाई, स्वाती आणि तू घ्याल असं वाटलं होतं.

आपण 'राधा गौळण करिते मंथन' टाइप गाणी म्हणू 'बटरमिल्क डे'साठी.
स्कायलॅब्ज उडण्यासाठी काही विशेष करावं लागेल असं वाटत नाही. Proud
झॉम्बींना अवेअर कसं करतात? Proud

अरे YB मी येणार असते तर गोष्ट वेगळी होती .. तेव्हा मग आता नविन अचूक किनार्‍यावर बसून खानपान सेवेची जवाबदारी पेलते झालं! :p

Pages