बटाटा चटपटा

Submitted by चारुलता on 11 July, 2008 - 01:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराचे बटाटे, दही, बारिक चिरलेला पुदिना कांदा, टोमॅटो, टोमॅटो प्युरी, खोबरे, लवंग दालचिनी पावडर, तिखट.

क्रमवार पाककृती: 

बटाटे धुवुन त्याच्या साधारण मोठ्याच फोडी कराव्यात. दही बारीक चिरलेला पुदिना चवीनुसार मीठ एकत्र करावे. या दह्यातच बटाट्याच्या फोडी घालाव्यात. साधारण वीस मिनिटे तरी ठेवावे.

तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे, टोमॅटो आणि कांदा कढईत तेल गरम करुन चांगले परतावे. त्यातच तिखट ही घालावे. किसलेले खोबरे भाजुन घ्यावे. मिक्सरमधुन प्रथम हे भाजलेले खोबरे वाटुन घ्यावे. नंतर त्यातच तिखटाबरोबर भाजलेला कांदा व टोमॅटो वाटुन घ्यावे.

कढईत तेल तापवुन जिर्‍याची फोडनी करावी, त्यात हे वाटन आणि टोमटो प्युरी आणि दह्यात भिजवलेले बटाटे दह्यासह घालावेत. थोडा पुदिना या फोडनीत घालायला हरकत नाही.

थोडे पाणी घालावे. बटाटे शिजत आल्यानंतर लवंग दालचिनी ची पावडर घालावी.

आंबट तिखट अश्या चवीचा बटाटा छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
गरजेप्रमाणे बटाटे वाढवावेत.
माहितीचा स्रोत: 
स्वनिर्मीत
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारु
रेसिपि chan aahe aajach karun baghate.wachun tari patkan karawasa watala padarth. pan 1, 2 shanka aahet:-
batata dahya barobar shijwayala wel laagat asel, aani dahi fatat nahi ka?