मायबोलीवर लेखनाचा पहिला प्रयत्न: प्रकाशचित्रे

Submitted by खालिद on 29 April, 2011 - 22:18

गेली २ वर्षे मी मायबोलीवर वाचनमात्र आहे. सद्ध्या थोडा मोकळा वेळ मिळत असल्यामुळे लेखन करायची इच्छा आता पूर्ण करुन घ्यावी म्हणतोय Happy

आता आपल्याला ज्या विषयात गती आहे त्यातच सुरुवात करावी. फोटोग्राफी हा तसा जिव्हाळ्याचा विषय आणि काही मेंदूला ताण देऊन शब्दांचा पिट्ट्या पाडायची पण गरज नाही Happy

अशीच काही चित्रे डकवतोय; पहिलाच लेखनाचा प्रयत्न असल्याने सांभाळून घ्यावे

१. DSC1451
हे छायाचित्र १० सेकंद अ‍ॅपर्चर घेउन काढलेले आहे. पाण्याला आलेला स्मूथ इफेक्ट त्यामुळेच दिसतो. भरदुपारी असे अ‍ॅपर्चर ठेवल्यास फोटोमध्ये फक्त पांढरा प्रकाश येईल. म्हणून लेन्स समोर एक वेल्डिंग काच ठेवून त्याचा उपयोग १२ स्टॉप एन डी फिल्टर सारखा केला आहे. फोटोशॉप मध्ये ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करून थोडा सेपिआ टच देण्याचा प्रयत्न केला आहे.

२. Untitled_HDR2

हा डाउनटाउन चा फोटो फोटोशॉप मध्ये HDR प्रकारचे टेक्निक वापरून बनवला आहे. मुळात दोन फोटो काढून (१ अंडरएक्सपोज आणि दुसरा ओव्हरएक्सपोज) ते मर्ज केले आहेत आणि त्यानंतर इमेज च्या टोन, कलर वगैरेच्या कर्व्हज ठीक ठाक केल्या आहेत. (इमारती आणि आकाशाचे रंग मुख्यत्वे)

३. DSC_0272

४. DSC_0274

३ आणि ४ पुन्हा एकदा वेल्डिंग काच वापरून ३० सेकंद अ‍ॅपर्चर ठेवून काढलेले आहेत. एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट तर दुसरा कलर एडिट केला आहे.

५. DSC_0317(1)

हे चित्र फोटोशॉप मध्ये कलर मधून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट करून नंतर बाकीच्या रंगांचा परिणाम शून्य केला आहे. म्हणून काळ्या पांढर्‍या चित्राला एक स्मूथ इफेक्ट आला आहे.

६. DSC_0046

वसंतातले पहिले उमललेले फूल टिपून फक्त तेवढेच फोटोत उठावदार करुन बाकीचे रंगहीन छायाचित्र सरलेल्या उदास हिवाळ्याचे प्रतीक आहे. (फोटोशॉप सॉफ्ट फोकस)

७. DSC_0504(1)

८. DSC_0489(1)

छायाचित्रे ७ व ८ ही ३ व ४ प्रमाणेच. फक्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रात ४ सेकंदाचा शटर स्पीड असल्याने लाटा दिसतात तर रंगीत चित्रात ४५ सेकंद शटर स्पीड असल्याने समुद्राला स्मूथ इफेक्ट येतो.

आपणही जर निरनिराळी टेकनिक्स वापरून छायाचित्रे काढली असल्यास येथे शेअर करावीत. तेवढीच आपणा सर्वांच्या फोटोग्राफी ज्ञानात मोलाची भर पडेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप आवडले. esp तो चौथ फोटो एकदम 70's मध्ये काढल्यासारखा आलाय.
फुलांचा फोटो पण खुप आवडला. फोटो कसा काढला असेल ते ,टेक्निक्स लिहिल्यामुळ थोडीफार कल्पना करता आली.

सर्व फोटो मस्त, प्रयोगासंबंधी माहिती दिल्यामुळे अजून छान. परंतु सर्व फोटो मूळ स्वरुपात कसे आहेत हे कळू शकेल का ?

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

बर्‍याच जणांनी विचारल्यावरुन मूळ छायाचित्रे खाली देत आहे. त्याबद्दलच्या कॉमेंट्स रात्री लिहीन.

DSC_0145

DSC_0317

DSC_0011

DSC_0273

DSC_0514

DSC_0504

खालिदराव मस्तच
७ आणि ८ सुंदर. पहिला पण छान, पण वाहत्या प्रवाहालाच १० किंवा कमीने लावलेल्या स्पीडने फोटो आणखी उच्च दिसतो. उदा तुमचा ७ वा.

खूप म्हणजे खूपच सुंदर हा व्यवसाय आहे का कि असाच विरंगुळा म्हणून करता खूपच सुंदर शब्दच नाहीत.

एकूण आलेल्या सर्व प्रतिसादांवरून असं वाटतंय की फार सॉलिड फोटोग्राफी करता तुम्ही.. पण मला एक पण फोटो दिसत नाहिये इथे Sad

छानच!!

Pages