नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा - झब्बू

Submitted by आशुचँप on 26 April, 2011 - 13:12

यो ने आधीच इथे आमच्या मिनी गटगचा वृत्तांत दिला आहे. त्याला माझा झब्बू...
आदले दिवशी आणखी एक मायबोलीकर स्मितहास्य याच्याबरोबर सहकुटुंब सहपरिवार जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर झोप अनावर झाली होती. पण मुंबईचा उकाडा आणि डास यांनी आपले काम चोख बजावत अजिबात स्वस्थता लाभू दिली नाही. त्यातच प्रचंड गर्दीतून लोकलवारी घडल्याने अंगही चांगले आंबून निघाले होते. पण भटक्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच.
सकाळी जिप्सीचा फोन आल्यावरच डोळे उघडले.
"अरे आम्ही तिन हात नाक्यापाशी येऊन थांबलोय. ये लगेच.."
घड्याळात पाहिले तर सव्वा सहा वाजून गेले होते. पटपट उठून आवरायला घेतले तर माझ्या भावाने टांगारू होण्याचा बेत जाहीर केला. आता अडचण अशी की मला कसे जायचे याबाबत शून्य माहीती होती. हे फोनवरून कळवताच त्या बिचार्या दोघांनी मला माहीती असलेल्या ठिकाणी यायची तयारी दाखवली. त्यातच माझी
गाडी रिझर्वला आलेली त्यामुळे तुम्हाला पेट्रोलही द्यावे लागेल असा इशारा देऊनही ते मला घेऊन जाण्याच्या ध्येयापासून ढळले नाहीत.. (खरे मुंबईकर).
जिप्सी आणि डीडीला पहिल्यांदा भेटतोय असे वाटलेच नाही. वाटेत गाडीत पेट्रोल आणि चालविणार्यांच्या टाकीत चहा-बिस्कीटे भरून बोरीवली गाठले. यो आमची वाट पाहून कंटाळून आत पाखरे बघत बसला होता. Happy

प्रचि १

जंगलात बिबटे काय नाय दिसले हे दोघे मात्र दिसले.

उडीबाबा

हे दोघे सख्खे भाऊ असावेत असा माझा बरेच दिवस संशय होता. रंगारूपाने वेगळे वाटत असले म्हणून काय झाले...भाऊ ते भाऊच Happy

बाकी वृत्तांत यो ने दिलाच आहे. त्यात एक भर ...
कान्हेरी लेणी पाहून झाल्यावर एका कोल्ड्रींकच्या दुकानापाशी आलो. तिथे वडापाव आणि भज्यापण दिसत होत्या. मी आपले कोल्ड्रींककडे पाहून थंड आहे का एकदम असे विचारले.
हो हो सगळे एकदम थंडगार आहे असे दुकानदाराने सांगताच..
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो, आता राहूंदे असे जिप्सीने सांगत त्याची विकेट उडवली. Biggrin

गुलमोहर: 

चँप.. मस्त मस्त मस्त ! पहिला, सोनबहाव्याचा नि शेवटचे दोन खूप खूप आवडले.. Happy
तो उडीबाबा अदभुत शक्ती लाभलेला लुटारु वाटतोय.. !! Proud

अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो> Lol

मस्तच रे...
हायल्ला हितंबी उडीबाबा हायेच का? Wink
आन फरक काय फकस्त रंगातच न्हाय, जिप्स्याला अप्सरेवानी नाचता येतं का? Proud

मस्तच.

फोटो आणि वृतांत खासच रे!!! Happy

पहिला आणि तिसरा फोटो भ न्ना ट आवडला. Happy

जिप्सी आणि डीडीला पहिल्यांदा भेटतोय असे वाटलेच नाही.>>>>अगदी अगदी. आतापर्यंत भेटलेल्या मायबोलीकरांबाबत माझाही अनुभव सारखाच आहे. Happy

जिप्स्याला अप्सरेवानी नाचता येतं का?>>>>नाय ब्वॉ Happy त्येचा कॉपीराईट फकस्त यो रॉक्साकडंच. Happy

अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो>>>>:खोखो:

रच्याकने, तुमच्या दोघांनी काढलेले भन्नाट फोटो आणि त्याला साजेसा वृतांत वाचुन/पाहुन अस्मादिकांनी स्वत: काढलेले फोटो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. Happy

मस्त! मला तुमचा हेवा वाटतो.

चालू द्या धम्माल!

शेवटले कमळाचे प्रचि सुरेख आलय. बेहद्द आवडले.

मस्त आलेत फोटो,
आशु, बहाव्याचे जबराट आलेत.
योग्या, तू टाक की तुझा झब्बु

आशुचँप, खुपच सुरेख प्रचि...
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो, आता राहूंदे असे जिप्सीने सांगत त्याची विकेट उडवली. >>>> Lol Lol

चंप्या Happy धम्माल केलीय तुम्ही...सर्वप्रचि सुंदर आलेत..!

पण प्रचि ५ मध्ये तिनच जण आहेत....... चौथा..? Wink

धन्यवाद सर्वांना
तो उडीबाबा अदभुत शक्ती लाभलेला लुटारु वाटतोय.. !! Biggrin
रच्याकने, तुमच्या दोघांनी काढलेले भन्नाट फोटो आणि त्याला साजेसा वृतांत वाचुन/पाहुन अस्मादिकांनी स्वत: काढलेले फोटो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिप्स्या...मार खाशील...मुकाट्याने फोटो टाक नाहीतर पुढच्या गटगला कॅमेरा गायब करीन तुझा. कॅमेराच्या बाबतीत माझा पायगुण खूप वाईट आहे.
वा आडो...झब्बू पे झब्बू...
कमळाचा काय सुरेख आलाय फोटो...

नाखु - माझ्याकडे कॅनन ५५० डी आहे

चातका...सारखा अमानविय बाफवर राहून राहून तुलाही त्याची बाधा झालीये बाकी काही नाही Happy

दादाश्री - हरीण फारच लाजरे बुजरे होते आणि प्रसिद्धीपरान्मुखही...त्यामुळे पळून गेले लगेच
स्वप्ना, कांदापोहे धन्स..
किरू - अरे मी तर पाहुणाच..यजमानांनीच आवताण द्यायला विसरले तर मी बापडा काय करणार

आशु,
सुंदर फोटो !
Happy

जंगलात बिबटे काय नाय दिसले हे दोघे मात्र दिसले.
आणि तिसरा बिबट्या फोटो काढत होता..
Lol

यजमानांनीच आवताण द्यायला विसरले तर मी बापडा काय करणार>>>>>>> Happy
यजमानांनाच कळत नव्हते कि नक्की कुठे जाणार आहोत ते Happy सागर उपवन, येऊर कि नॅपात Happy
रात्री उशीरा ठरले नॅपात जायचे ते Happy

पहिला फोटो मस्त आहे... गुहांची अजून फोटो असले पाहिजे होते... उभ्या बुद्ध मूर्तीचा फोटो कुठाय???

हा असा...
>

Pages