मुक्तक..

Submitted by मी मुक्ता.. on 14 December, 2010 - 01:20

गझलेच्या वृत्त्तात लिहिलेल्या रुबाईला मुक्तक म्हणतात असे कळले म्हणुन नाव बदलतेय. अधिक माहितीसाठी पहा.
-----------------------------------------------------------------------
अजून काही मनात दाटे
तुझे हसू पापण्यांत दाटे
तुला पिसे लागता नभाचे
धुके नव्याने वनात दाटे..
==*==*==*==*==*==*==
जगी मानभावी उमाळे असे
मला पोळती हे उन्हाळे असे..
जरा शिंप रे तू तुझे चांदणे
जरी कोरडे पावसाळे असे..
==*==*==*==*==*==*==
चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही,
बागेश्रीही तार मनाची हलवत नाही,
शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..
==*==*==*==*==*==*==
जाणकारांकडून मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.. Happy

गुलमोहर: 

शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..>>> व्वा!

चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही,
बागेश्रीही तार मनाची हलवत नाही,
शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..

वाह.....

बागेश्रीही तार मनाची हलवत नाही,.......... फार छान मिसरा.

मी मुक्ता,आपण इतरही वृत्तात रुबाया ट्राय कराव्यात. फार छान लिहीले आहे. अभिनंदन.

वाह!!

मला एकदम जुने दिवस आठवले.. माझ्या काव्यलेखनाची सुरूवात रूबायांनीच (रूबाई, अनेकवचन रुबाया?) झाली होती... त्या लिहिलेली डायरी एकदम उघडून वाचावीशी वाटली... Happy

मुक्ता छानच!
हरिवंशराय बच्चन आणि रॉय किणीकर यान्च्या रुबाया आवर्जून वाच.

>> चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही,
ही ओळ क्लासिक!! Happy

धन्यवाद निशिकांतजी, बेफिकीरजी.. Happy

डॉक, आपल्या सुचनेवर नक्की प्रयत्न करेन.. Happy

आनंदयात्री.. रुबाईचं अनेकवचन रुबाईयत. Happy प्रतिसादाबद्दल आभार.. Happy

प्राजु, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रुबाई म्हणजे चार ओळींची गझल. पण त्या चारही ओळी एकाच विषयावरच्या असतात. चारही ओळी एकाच वृत्तात. पण तिसर्‍या ओळीत यमक नसते. रुबाईत सगळ्यात प्रसिद्ध नाव म्हणजे खय्याम. त्याच्या फारसी रुबाई आजही अभ्यासाचा विषय आहे. हरिवंशराय बच्चन यांनी अनुवाद केलाय माझ्या माहितीत. खात्री नाही. आपल्याला नेट वर काही रुबाईयत वाचायला मि़ळु शकेल.

धन्यवाद झाड.. Happy

माधव ज्युलियन, वा. ना. सरदेसाई search करा.
अशातच हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला,अन्य रुबाइयत ओझरत्या वाचल्या होत्या.
काही विशेष संदर्भ मिळाल्यास इथे पोस्ट करा.

रच्याकने,
तुमच्या रुबाइयतही छान आहेत

चंद्र,चांदण्या,स्वप्ने यांच्यावर Ph.D. चालु असल्याचा दाट संशय आहे Uhoh

बागेश्री मात्र नवनीत!

रामकुमार,
माधव ज्युलियन, वा. ना. सरदेसाई search करा.
काही विशेष संदर्भ मिळाल्यास इथे पोस्ट करा.>>>
Lol चांगलच कामाला लावताय तुम्ही.. असो, पाहिन सवडीने. काही खास असेल तर आपल्याला कळवते विपूत..

तुमच्या रुबाइयतही छान आहेत>> धन्यवाद.. Happy

चंद्र,चांदण्या,स्वप्ने यांच्यावर Ph.D. चालु असल्याचा दाट संशय आहे>> संशय काय अहो? हा अपमान आहे माझा.. मी तर Ph.D. केलीच आहे.. स्वप्नात... ती पण चंद्रावर जाऊन.. Wink Lol

बागेश्री मात्र नवनीत >> उपमा आवडली.. Happy

शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..

एकच नंबर... नवीन नवीन प्रयत्न असेच चालू दया...

अमित, छाया देसाई, क्रांति,
खूप खूप आभार.. धन्यवाद.. Happy

विशालजी,
अगदी अगदी... झालच तर उर्दु मध्ये खय्याम.. Happy

खूप धन्यवाद रोहण.. Happy

मुक्ता,

विशेष माहिती नसल्याने हा प्रश्न विचारीत आहे. सर्व जाणकारांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करावा

रूबाई ही प्रचलित असलेल्या ५४ वृत्तातच लिहावी असे म्हणतात... वरील रूबाईआत त्यापैकी कुठल्या वृत्तात आहेत हे सांगता येईल काय?

माझ्यामते होईल त्या वृत्तात रूबाई लिहायला शास्त्राच्या दृष्टीने परवानगी नसावी.

उत्तराच्या अपेक्षेत.

कणखर,
रूबाई ही प्रचलित असलेल्या ५४ वृत्तातच लिहावी असे म्हणतात>> हे माहिती नव्हते.

किंबहुना फार महिती नाहीच आहे. जेवढी माहिती आहे तेवढी एका प्रतिसादात लिहिलिये. त्यापेक्षा जास्त नाही.. Sad

जाणकारांनी मार्गदर्शन करावे असं मी माझ्या पोस्टच्या खाली पण नमूद केलय...

रुबाई म्हणजे काय ?

रुबाईत पहिल्या ओळीत एक वक्तव्य / विधान. नंतरच्या दोन ओळीत त्याच्या समर्थनार्थ तर्कनिष्ट विवरण ( विस्तार ) आणि चवथ्या चरणात मंत्रमुग्ध करणारा आकर्षक समारोप असतो . एकूण ४ ओळी.

अजुन माहिती इथे वाचा

http://www.sardesaikavya.com/rubai.php

अजूनही माहिती हवी आहे. शंका आहेतच..