कसं सांगू तुला?

Submitted by सुनिल जोग on 3 April, 2011 - 02:07

सहनही होत नाही
कसं सांगू तुला ?
उंची परफ्युम मधील
करपट्,अहंकाराचा दुर्गंध
आणि तुझी नजर मदांध
कसं सांगू तुला ?
मनातल्या मनात हरलेला तू
जितं मया,जितं मया
म्हणून बेहोश नाचण्याचा
अभिनय करतोस
तेव्हा...
तुझी कीव करु ?
की
तुला माफ करू ?
कसं सांगू तुला ?
तू अजाण बालक नाहियेस
की तुझ्यावर रागवावं
पण...
दुर्लक्ष करण्याइतका
मॅच्युअर्ड पण नाहियेस
कसं सांगू तुला ?
प्रत्येक पावलाला डगमतोस
तरीही उभे रहाण्याचा तुझा
खोटा अभिनय रोज पहाताना
मनात हसते मी
त्याचाही तुला राग येतो
मग...
तू चिडचिडतोस्,आदळआपट करतोस
मग...
तू माझ्यातील चुका शोधतोस
क्षुल्लक कारणांनी तुटून पडतोस
तेव्हा तर तू अधिकच केविलवाणा होतोस
कसं सांगू तुला ?
... तर तू हे केविलवाणं होणं बंद कर
स्वच्छ मनानं सुंदरसं निरागस हास
आणि पूर्वीसारखा साधा,सरळ माणूस म्हणून
समोर ये..
मला तुझं वैभव,सत्ता,पद
कशातच रस नाही
फक्त तू पूर्वीचा साधा,सरळ
माणूस म्हणून ये...

गुलमोहर: 

आहे मनोहर तरी

तू हे केविलवाणं होणं बंद कर
स्वच्छ मनानं सुंदरसं निरागस हास
आणि पूर्वीसारखा साधा,सरळ माणूस म्हणून
समोर ये..
मला तुझं वैभव,सत्ता,पद
कशातच रस नाही
फक्त तू पूर्वीचा साधा,सरळ
माणूस म्हणून ये...

मस्त!
पण खरं सांगू?
तसाच राहिला तर त्याचही महत्त्व मानलं जात नाही.
सतत जोडीदाराकडून बदलाची अपेक्षा!
चंचलतेचं दुसरं नाव माणूस! आहे त्यात समाधान नाही.
(इथे स्त्री-पुरुष भेद नसावा)
सगळे रस एकाच फळात?