ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.

Submitted by प्रज्ञा९ on 29 March, 2011 - 11:51

IMG_4619.JPGमी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!

यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्‍या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.

मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.

प्रक्रिया करताना फोटो नाही काढले, पण पुढच्या वेळी नवीन काही सजावट करेन तेव्हा टाकेन इथे फोटो. Happy

ही फ्रेम. Happy कालच केली. आधीच सगळं मटेरिअल तयार होतं, आता नवीन कागद आणले की स्टेप बाय स्टेप देइन. यात लावायला माझ्याकडे फोटो त्याच मापात नाहिये Sad
सगळे ४*६ आहेत.

गुलमोहर: 

छान ! Happy

सावली,
मी जपानमधे नाहिये, अमेरिकेत आहे. माझ्या हस्तकलेच्या बाई साऊथ इंडिअन आहेत, त्या ऑरिगाता म्हणतात, पण ओरिगाता असाच असावा उच्चार. Happy

बाकी सर्वांना धन्यवाद!

पुढच्या प्रोसेसचे फोटो टाकेन. अगदी सुरुवातीपासून कसे टाकायचे बघायला हवं, कारण ते कागद, चुण्या करून, धुवून, वाळवून ठेवले होते क्लास सुरू झाला तेव्हाच!
पण नक्की देते इथे, नवीन आणून करता येइल. Happy

केशरी फुलं दिसतातच खूप गोड! "साईड फ्लार्स लूक सू क्यूट!" असं बाई म्हणातात.
Happy

पुढच्या वेळी एकेक स्टेप, सूचनांसकट टाक प्लीज >>>
Happy

आता ही नवी फ्रेम केलिये काल, फुलं वगैरे केली होती आधीच.

खूपच छान! अगदी खरी दिसतायत फुलं. तरी म्हटलं ही हल्ली गप्पा मारायचं सोडून कुठे गायब झालीय म्हणून! वेळ चांगला सत्कारणी लावलास हो!

internet वर किवा class न करता शिकता येइल का ? तुमचि छान छान फुले पाहुन शिकावे वाटत आहे. तुम्हीच मा.बो. करान साठी class घ्या ना.

पूर्वा,

तयारी करायलाच जरा वेळ लागतो. क्रेप पेपर्स आधी जपानी पंख्यासारखे चुण्या करून फोल्ड करायचे, मग ते नळाखाली अगदी चटकन फिरवून ३-४ सेकंदात ओले करायचे,( जास्त वेळ केलं तर त्यांचा रंग जातो आणि ते फाटायचे शक्यता जास्त), मग ते निथळायला २ तास ठेवायचे.
निथळले की पूर्ण वाळायच्या आत, निट हलक्या हाताने उलगडून वाळवायचे. मी बाथटब मधे रॉडवर चक्क कपडे वाळवतो तसे वाळवले!
ते वाळायला ३-४ तास. मग मधे दुमडूम एका बाजूला थोडा थोडा फेव्हिकॉल लावत दुसरी बाजू दुमडायची त्यावर, म्हणजे पेपर जाड आणि थोडा कडक होतो. हे चिकटकाम सगळ्यात कटकटीचं, कारण वाळताना पेपर जरा वाकडातिकडा होतो. त्यात त्याला अजून चुण्या पडणार नाहीत अशा बेताने तो किंचित ताण देत, पण शक्यतो फाटणार नाही अशा प्रकारे चिकटवायचा. मग जरा अर्धा तास वाळू द्यायचा आतला फेव्हिकॉल.
मग तयार पेपरच्या पाकळ्या, पानं वगैरे करायची. शेवंतीची फुलं आहेत ती एकेरी कागदची आहेत. म्हणजे नुसता ओला करून मग वाळवलेला कागद. चिकटवलेला नाही.
पानं आणि फुलं एका विशिष्ट पद्धतीने पिळायची आणि २४ तास ठेवायची तशीच.
दुसर्‍या दिवशी पीळ हलकेच सोडवून, थोडासा नैसर्गिक पान/पाकळी वाटेल इतपत पीळ ठेवून मग मधे परागकण घेऊन ती दोर्‍याने बांधायची.

यातली मुख्य फुलं आहेत त्यात पाकळी करतानाही पीळ सोडवून वेगळा आकार पुन्हा देऊन ग्लू गन ने चिकटवलीत. मग कागदाचा साधा गोल कापून घेऊन त्यावर पाकळ्या वरून चिकटवल्यायत.

पाना-फुलांना जास्त ग्रेस यावी म्हणून प्रत्येकी ४-५ कोट्स दिलेत व्हार्निश स्प्रेचे.

आणि आवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद! Happy

मस्तच झालय गं प्रज्ञा .. अप्रतिम... क्लासच्या बाई म्हणजे अगं मला एकदम शिकवणीला गेल्यासारखं वाटलं Happy

मस्तये! मलापण जुलरी बॉक्सपेक्षा फ्रेम जास्त आवडली. त्या जुलरी बॉक्सचा समोरून पण फोटो टाक ना एखादा.

Pages