परतीचे दोर

Submitted by मानुषी on 27 March, 2011 - 03:30

परतीचे दोर

.......................... कॉफ़ीचा वाफ़ाळता कप हातात घेऊन आज पूर्वा कधी नव्हे ती निवांतपणे बाल्कनीत बसली होती. संध्याकाळ हळूहळू आपलं जाळं विणत होती. फ़ेब्रुवारी संपत आला होता.
’समर’ची चाहूल घेणं सुरू झालं होतं. आज ऑफ़िसमधून लवकर सुटका झाली होती. शुक्रवार संध्याकाळ ...वीकेंडची अगदी आयडियल, छानशी सुरवात! तेवढयात सेलफ़ोन खणखणला. आत्ता कोण...म्हणत पूर्वाने फ़ोन पाहिला.
"अरे...धनूदी.........? हाय! काय गं दी? कशी चाललीये टूर? सध्या कुठे आहेस? ..पोर्टलंडला जायची होतीस ना? अगं........" पूर्वा जरा विचारात पडली होती.
"अगं हो, पोर्टलंडलाच आहे मी आत्ता ....पूर्वा, आय नीड युवर हेल्प राइट नाउ!" धनू म्हणाली.
"दी...काय गं... काय झालंय? आर यू ऑलराइट?" पूर्वा आणि धनू मावसबहिणी...आणि आता दोघी अमेरिकेत. पण एक इस्ट कोस्टला तर दुसरी वेस्ट कोस्टला. पण नेहेमीच एकमेकींच्या टचमधे!
"पूर्वा यू नो एमी?......आदीज गर्लफ़्रेंड.....अगं मला माहिती होतं की.... दे आर बेस्ट फ्रेंड्स.....बट..........जस्ट आत्ताच मी माझ्या आयफ़ोनवरून आदीचं फ़ेसबुक प्रोफ़ाईल पाहिलं...अ‍ॅन्ड यू नो .. पूर्वा..........आय वॉज शॉक्ड....." धनूच्या आवाजातून चिंता अगदी स्पष्ट दिसून येत होती.
"दी ..अगं काय झालंय.................आणि तू ऑफ़िस टूरवर आहेस ना? कशाला लेकाच्या फ़ेसबुक प्रोफ़ाइलवर हेरगिरी करत्येस?" पूर्वाचा सूर वरवर चेष्टेचा होता पण आता पूर्वालाही काळजी वाटायला लागली.
"पूर्वा ...कॅन यू इमॅजिन.....आदीने त्याचा स्टेटस "कमिटेड" असा दिलाय. फ़ॉर द फ़र्स्ट टाइम! पूर्वा, आदी इज जस्ट फ़ोर्टीन् ..अ‍ॅन्ड आय ऍम स्केअर्ड....पूर्वा, एक काम करशील प्लीज? सी.......... आय डोंट हॅव मच टाइम इन माय हॅंड राइट नाउ. आय हॅव टु रश फ़ॉर अ मीटिंग....प्लीज जरा त्याच्या प्रोफ़ाइलमधे जाऊन सर्च कर आणि त्याच्या फ़्रेंडसपैकी एमीचं स्टेटस काय आहे पहाशील का प्लीज? आणि मला कळवशील? मला टेक्स्ट मेसेज कर. फ़क्त येस ऑर नो कळव. लगेच! ..मी आदीशीही बोलेनच......चल बाय पूर्वा ...मी ठेवते." धनूने एका दमात सगळं सांगून फ़ोन ठेवला.
"बाय धनूदी." पूर्वानेही फ़ोन ठेवला.
..............तोपर्यंत विहंगही आला होता ऑफ़िसमधून. त्याने पूर्वाचं शेवटचं वाक्य ऐकलं होतं.
"काय गं..... धनूदी टूरवर आहे ना? परवाच संदीपशी बोलणं झालं फ़ोनवर. संदीप इज ग्रेट यार....ही इज डुइंग ग्रेट ऑन द होम फ़्रंट. अगं बायकोच्या अनुपस्थितीत आदिम आणी अमनसारख्या मुलांना सांभाळून ऑफ़िस वगैरे... हॅट्स ऑफ़ टु हिम यार!" विहंग बूट काढता काढता म्हणाला.
"विहंग...........आय गॉट इट.............एमीचं स्टेटस सुद्धा "कमिटेड"!..........अब गयी धनूदी कामसे!" पूर्वाच्या मांडीवर लॅपटॉप आणि नजर स्क्रीनवर! पटकन उठली......लगोलग सेल फ़ोन वरून धनूला "येस्" असा टेक्स्ट मेसेज केला. विहंगच्या बोलण्याकडे पूर्वाचं लक्षच नव्हतं! विहंग नुसता तिच्याकडे पहात राहिला.
............पूर्वामावशी लाडक्या भाच्याच्या फ़्रेंड लिस्टमधे होतीच त्यामुळे तिला साधारण आपल्या भाच्याचा प्रेझेंट स्टेटस माहिती असायचा." प्रेझेंट स्टेटस"...म्हणजे शाळेत काय चाललंय, कुठे पिकनिकला गेलेला...त्याचे फ़ोटो...इथपर्यंतच! पण हे असं पहिल्यांदाच! असं "कमिटेड" वगैरे! बाप रे....मुलं मोठी होताहेत. पूर्वाला वाटलं. तिनं थोडक्यात विहंगला सगळं सांगितलं.
"नाऊ कमॉन पूर्वा! त्यात एवढं सीरियसली घेण्यासारखं काय आहे? आदिम इ्ज अ टीनएजर...ही इज नो मोअर अ चाइल्ड नाउ....... तुम्ही बायका पण ना ...." विहंग नेहेमीप्रमाणे लाइट मूडमधे.
"विहंग ...ही अमेरिका आहे, इंडिया नाही.....मला माहिती होतं संदीपदादाही हे लाइटली घेणार. म्हणूनच धनूदीने मला आधी कळवलं. विहंग, अरे, आदिम फ़क्त चौदा वर्षांचा आहे. आणि माहिती आहे ना ...इथे सगळ्या गोष्टी किती लवकर चालू होतात ते! दी ने किती काळजीपूर्वक वाढवलंय मुलांना....आणि आता दी तिकडे टूरवर आणि मुलं तिथे सॅन होजेत. आता घरी पोचेपर्यंत दीचं काही खरं नाही.....तिची टूर संपायला अजूनही दोन तीन दिवस आहेत.............संदीपदादा काहीही सीरियसली घेणार नाही ..."
...........पूर्वा अस्वस्थपणे बोलत होती. एकीकडे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू होती. थोडया वेळाने शार्दूलही आला शाळेतून. जेवणं झाल्यावर थकला भागला शार्दूल...झोपायला गेला.
"विहंग, अजून शार्दूल पाचवीतच आहे, पण त्यालाही किती मैत्रिणी आहेत आत्ताच......आपल्याला जमेल का रे सगळं बरोबर? मला काळजी वाटते रे. खूप फ़रक आहे रे आपल्या आणि अमेरिकन थिंकिंगमधे! बेसिक गोष्टीतच फ़रक आहे......." पूर्वा म्हणाली.
"हे बेब्स.... आत्ता आपला वीकेंड सुरू होतोय...आत्ता काहीतरी काढून आहे हा क्षण वाया घालवू नको." विहंगने पूर्वाला जवळ ओढलं. पूर्वाचं बोलणंच बंद झालं. विहंग अजूनही पूर्वाला बेब्स म्हणायचा...थेट कॉलेजमधे असल्यापसून. विहंगने बेड लॅंप घालवला.
------------------------------------------------------------------------------------
.............."हे मॉम, आय ऍम स्मेलिंग कुकीज.........वॉव.......!" सकाळच्या त्या शांत प्रहरी शार्दूलच्या आरोळीने पूर्वा दचकली. ती बेकिंग ट्रेमधल्या कुकीज काढण्याच्या नादात होती. पहाते तो शार्दूल वादळासारखा बॅकयार्डातून स्केट्बोर्डासह घरात शिरला होता. अंगावर, केसांत पांढुरके स्नो फ़्लेक्स!
अरे.....परत सुरू झाला वाटतं स्नो! तरी परवापासून स्नो फ़ॉल अगदी बंद झाल्यामुळे हा निदान बॅकयार्डात तरी फ़िरू शकतोय.......तिला वाटलं. विहंग आणि ती, दोघेही आळीपाळीने शॉवेलने बर्फ़ साफ़ करत होते दोन तीन दिवस!
"अरे हो हो ............... तो स्केटबोर्ड तर काढशील! आणि नुस्ता काढू नको...नीट बेसमेंटमधे जागेवर ठेऊन ये."
बेसमेंटकडे जाताजाता शार्दूलने डायनिंग टेबलवरच्या दोन तीन ताज्या ताज्या जिंजर कुकीज अगदी अलगद उडवल्या होत्या. तोंडात बकाणा भरलेला. पूर्वाला वाटलं, हा कधी चालतो बरं आपल्या पायांनी?....पहावं तेव्हा आपला त्या स्केटबोर्डवर............कधी तरंगत, कधी घरंगळत. पूर्वाला खुदकन हसू आलं.
...........................................लहानपणी आपण नाही का भैय्याबरोबर एक पाय टेकवत, "स्कूटर"वरून गल्लीबोळ पालथे घालायचो! तेव्हाही असंच तरंगल्याचं, घरंगळत गेल्याचं स्वर्गसुख मिळायचं. विशेषत: जमिनीवर एका पायाने जोर देत देत एकदा का स्कूटरला गती मिळाली की मग दोन्ही पाय स्कूटरवर ठेऊन उभं रहायचं, मस्तपैकी दोन्ही हातांनी स्कूटरचं हॅंडल धरून घरंगळत जायचं! थंड वारा चेहेऱ्याला स्पर्शून केसांच्या झिपऱ्या उडवायचा. ही भटकंती शक्यतोवर घराच्या मागच्या गल्लीतूनच चालायची. कारण तोच एक रस्ता डांबरी आणि त्यातल्या त्यात गुळगुळीत होता...............तो थेट सहस्रबुद्ध्यांच्या वाडयापर्यंत! तिथून मग मारुती रोड ...कारण त्या रस्त्याला छानसा लांबलचक फ़ुटपाथ होता...गुळगुळीत! मग स्कूटर स्वार त्या फ़ुटपाथवर स्वारी करायचे!

........त्याच रस्त्यावर आधी मारुतीचं आणि पुढे मुरलीधराचं देऊळ....इथे मात्र ती आजीबरोबर यायची. मुरलीधराच्या देवळाच्या पाय़ऱ्या अनवाणी चढताना तिच्या पावलांना होणारा तो काळ्या फ़त्तराचा थंडगार स्पर्श तिला खूप आवडायचा. आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी तसाच काळ्या पाषाणातून बांधलेला, वरपर्यंत गेलेला थंडगार गोलाकार कठडा. संध्याकाळच्या झुळुकांनी आणखीनच थंडगार बनलेला. याच झुळुकेबरोबर देवळातल्या फ़ुलांचा, धूप उदबत्तीचा, हळदी कुंकवाचा संमिश्र सुगंधही यायचा. नाकपुडया फ़ुलवून, एक दीर्घ श्वास घेऊन तो वास ती छाती भरून घ्यायची. जणू तो वास मनात अगदी कायमचाच साठवून ठेवायचाय!
आजीबरोबर जाताना वाटेत कुणी कुणी भेटत रहायचं. सगळ्यांशी बोलत बोलत, एकीकडे तोंडाने, "अगं पूर्वा...चल लवकर ...कीर्तन सुरू होईल गं, चटाचटा पाय उचल बघू..." म्हणत पूर्वाचा हात ओढत, आजी पूर्वाला देवळात घेऊन जायची.
कीर्तनकार बुवांचं कीर्तन चालू असायचं. आजीचे हात वाती वळण्यात गुंतलेले आणि डोळे आणि कान बुवांकडे लागलेले!
नंतर थेट भैरवीच्या स्वरांनीच पूर्वाला जाग यायची. जोडीने आजीच्या खरखरीत बोटांचा गालावर स्पर्श! कीर्तन सुरु झाल्या झाल्या, दिवसभर दंगा करून थकलेल्या पूर्वाच्या शरीरावर आणि मनावर निद्रादेवीचं साम्राज्य सुरू व्हायचं. घनदाट आणि काळंभोर....खोल खोल विहिरीसारखं ! एखाद्या काळ्या भोर खोल विवरात गरगरंत आत आत ओढलं जावं, तशीच पूर्वा झोपेच्या आधीन व्हायची.........................आजी गालाला हात लावून उठवत असायची.

..................घरी पोचताना दारातच आमटीच्या चरचरीत फ़ोडणीतल्या हिंगाचा खमंग वास नाकातून डोक्यात जायचा. पोटात भूक खवळायची. कधी एकदा अन्न पोटात पडतयसं व्हायचं. आईने डायनिंग टेबलवर पानं मांडून ठेवलेली असायची. एकीकडे... उद्यासाठी विरजण लाव, ते करता करता डायनिंग टेबलवर अगदी पेंगुळल्याचं नाटक करणाऱ्या भैय्याचा अभ्यास घे, अशी काहीबाही कामं काढून या दोघींची वाट पहात असायची. अप्पा हातात पेपर धरून टीव्ही पाहात बसलेले. आजूबाजूला वेगवेगळ्या वर्तमानपत्रातली पानं पसरलेली. अप्पा एवढे शिकलेले ...म्हणजे आईपेक्षा खूपच जास्त शिकलेले होते...आई फ़क्त बी.ए. तर अप्पा इंजिनिअर. तरी ते भैय्याचा किंवा पूर्वाचा अभ्यास कधीच घ्यायचे नाहीत. ते आपले रात्री नुसते टीव्ही तरी पहायचे किंवा काहीतरी वाचत सगळ्यांशी काहीतरी मजेदार बडबड करत बसायचे. आई तर कधीकधी त्यांना ओरडायची सुद्धा....अगदी डोळे मोठे करून....विशेषत: ती अभ्यास घेत असेल तर!
..........................."हं....आल्या का ताईबाई.....चला हातपाय धुवून पाणी बिणी घ्या बरं!" आल्या आल्या आईची ऑर्डर कानावर पडायची. खरं म्हणजे आईला कधीच पूर्वाच्या मदतीची गरज लागायची नाही.....तिचं आपलं नेहेमी सगळं तयार! पण हे म्हणजे आपलं ...पूर्वाला थोडी घरकामाची सवय व्हावी म्हणून! असं आजीच म्हणायची.
आई कधीच रागावायची नाही. पण स्वयंपाकघरात काम करताना कधी काही हातातून पडलं....खरं म्हणजे पूर्वाच्या हातातून नेहेमीच काही ना काही पडायचं.........तर आजी म्हणायची,"हं....धडम धाडवा आणि अवसेला पाडवा..................कसं होणार गं हिचं सासरी...जरा तरी मुलीसारखं वागत जा गं बाई....सारखा आपला मोठया भावाच्या बरोबरीने धिंगाणा!"
आजीला नक्की काय म्हणायचंय हे पूर्वाला नीटसं कळायचंच नाही. त्यात हे मुलीसारखं वागायचं म्हणजे नक्की कसं.... हेच...कळायचं नाही. पण तिच्या टॉमबॉईश वागण्याला आणि सतत भैय्याबरोबर असण्यालाच मुळात आजीचा नहेमीच विरोध असायचा. पण भैय्यात आणि तिच्यात फ़क्त एकच वर्षाचं अंतर असल्याने ते दोघे बरोबरच वाढले. पटकन कुणाला कळायचंच नाही कोण मोठं ते!
"आई, उगीच आत्तापासून तिला काहीतरी भीति घालून ठेऊ नको. आमची ठकुबाई खूप शिकणार आहे." अप्पा आपल्या आईला विरोध दर्शवायचे.
"हो रे राघवा.....मी काय तिला शिकवू नको म्हणत्येय का? पण सारखी मोठया भावाची बरोबरी? ....जसं काही "जुळ्याचं दुखणं"! काहीही आणा पियुषला ...पूर्वालाही तेच हवं. राघवा.... जड जाईल बाबा हे नंतर...म्हणून मी बोलते...............मुलीची जात आहे रे शेवटी....." आजी नेहेमी "मुलीच्या जाती"च्या ध्रुपदाने समेवर यायची.

..........आजीचं बोलणं अप्पा हसण्यावारी नेत आणि उलट नेहेमीच पूर्वाची बाजू घेत. आणि आजीला पक्कं माहिती होतं की आई किंवा अप्पा, कुणीच तिच्यात आणि भैय्यात कधीच मुलगा मुलगी म्हणून भेदभाव करणार नाहीत. जी कामं पूर्वाकडून, कधीमधी अपेक्षित असत...उदा. टेबल लावणं, आवरणं, बाजारातून आणलेली भाजी नीट सॉर्टिंग करून, प्लॅस्टिक पिशव्यात भरून फ़्रिजमधे ठेवणं...अशी बरीच....तीच कामं भैय्यालाही सांगितली जात.
हे आता भैय्याच्या लग्नानंतर जास्त जाणवतं....जेव्हा तो अनितावहिनीच्या बरोबरीने घरात वावरतो...मुलांचंही किती व्यवस्थित करतो आणि त्याबद्दल अनिता नेहेमीच अगदी मोकळ्या मनाने सासूला क्रेडिट देते. म्हणते, " पियुष अगदी गृहकृत्यदक्ष नवरा आहे...त्याच्या आईच्या हाताखाली तयार झालेला."
..........................पण आता तर भैय्या बंगलोरला शिफ़्ट झाल्यापासून आपलंही एकदाच जाणं झालंय त्याच्याकडे. तेच सगळे आले तरच भेट व्हायची. भारतवारीतले वीस पंचवीस दिवस आपलं आणि विहंगचं गाव करता करताच संपून जातात. आता आता तर आई अप्पांना सोडून येताना अगदी जीव घाबरा होतो. आणि हे अधून मधून सतत जाणवणारं ..... हे जीव कुरतडून खाणारं गिल्टी फ़ीलिंग येतं............काही वेळा काहीच कारण लागत नाही. एकदमच जीव घाबरा होतो............का ते उमगत नाही.............. !
------------------------------------------------------------------------------------

.............."बेग बेग आयो मंदिर
बहुत दिनन बीते पिया" ....सकाळीच पंडितजींचा ’अहीर भैरव’ ... उदबत्तीचा सुगंध दरवळावा तसा पूर्ण घरात दरवळत होता. घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. त्या सुरांच्या लाटेवर विहरतच... पूर्वाची सकाळची कामं अगदी तालासुरात चालली होती. हा अहीरभैरव लागला की आई सांगायची, "पूर्वा... याला अहीर भैरव का म्हणतात माहिती आहे का? अगं, अहीर म्हणजे गवळी. पूर्वी गवळी लोक घरोघरी दूध घालायला पहाटेच यायचे. तेव्हा ते काही सुरावटी गुणगुणायचे त्याच सुरावटी म्हणजे आपला अहीर भैरव. बघ आपलं लोक संगीत आणि शास्त्रीय संगीत किती एकमेकात मिसळून गेलंय." असं प्रत्येक रागाविषयी इतकं काही छान छान सांगायची आई... अगदी ऐकत रहावंसं वाटायचं. "विविध भारतीवर" जा तोसे नाही बोलू कन्हैय्या...लागलं की लगेच "हंसध्वनी"विषयी इतकं छान बोलायची ........... असं ऐकत ऐकतच आपल्याला या संगीताची गोडी लागली.
पूर्वाचा हात पोळपाटावर चालू होता आणि मनाचे खेळही चालू होते. असं पूर्वाचं मन सतत "तळ्यात मळ्यात" खेळत रहायचं!
..................."मॉ SSSS म..................मॉम, नॉट अगेन........प्लीज मॉम....आय कान्ट बेअर इट एनिमोअर!" तेवढयात शार्दूल आपल्या रूममधून ओरडत आला...आला तोच मुळी तोंड वाकडं...आणि कानात बोटं घालूनच. शार्दूल असं काही बोलत होता की इतके दिवस त्याने फ़ार सहन केलं, आता त्याला फ़ार त्रास होतोय आणि अगदी ऐकवत नाही.
"शार्दूल ...हाऊ कम यू टॉक लाइक धिस? डू यू नो हूम यू आर टॉकिंग अबाउट?"
"मॉम ...अगं मला नाही आवडंत हे आआउउ.....तू कंपल्शन का करतेस ऐकण्याचं? तू तुझ्यापुरतं लाव ना ते!" शार्दूल अगदीच ऐकून घेण्याच्या मूडमधे नव्हता. तरी त्याच्या कानात इअरफ़ोन्स होते.
पूर्वाचा मूडच गेला. एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून आणि अगदी सहेतुक प्रयत्न करूनही त्यात अपयश यावं असं काही तरी फ़ीलिंग आलं.

.................आपली पुढची पिढी आपल्या मुळांपासून लांब चाललीये का? हा आपलाच लेक आपल्याला असा अचानक अनोळखी का बरं वाटतोय? आपल्या भारतीय मुळांशी याला काही देणं घेणंच नाहीये का? पण याला कारण आपणच आहोत का? आपणच डिसिजन घेतला ना अमेरिकेत यायचा? पण म्हणून आपल्या सगळ्या गोष्टींपासून नाळच तोडून टाकायची का?
विहंग टीव्ही बघता बघता हेही सगळं पहात होता.
"बेब्ज सोडून दे गं.....कशाला त्रास करून घेतेस छोटया छोटया गोष्टींचा! त्याला नाही आवडत क्लासिकल...मला सांग आपल्या भारतात तरी शार्दूलएवढ्या किती मुलांना कळत असेल गं क्लासिकल"? विहंग पूर्वाची समजूत घालत होता.
"अरे ते कळलंच पाहिजे असं कुठाय? पण निदान लावलेलं आवडायला काय हरकत आहे? आणि मी लावलं तर त्याला इतका त्रास व्हावा?" पूर्वा दुखावली गेली होती.
"अगं आपली गोष्ट वेगळी होती. आपल्या कानावर,सकाळी उठल्यापासून किती संस्कार व्हायचे कळत नकळत संगीताचे....रेडिओ, ग्रामोफ़ोन, कॅसेट प्लेअर, टीव्ही इतक्या सगळ्या माध्यमातून आपल्यावर हे संस्कार झालेले आहेत. आता आपल्या तुटपुंज्या कॅसेट्स आणि सीडीवर तू जे काही लावशील तेवढंच! बाकी तो ...तुझा लेक पूर्णपणे अमेरिकन वातावरणात वाढतोय हे विसरू नको!" विहंगने तिला डिस्टर्ब्ड पाहून समजावायचा प्रयत्न केला.
"अरे, पण द वे ही टॉक्ड टू मी ................." पूर्वाला एकदमच रडायला आलं....काहीतरी मनात ठसठसत होतं.
"बेब्स.....व्हाय आर यू क्राइंग? नथिंग हॅज हॅपन्ड! अगं त्याच्या बाकीच्या गोष्टी विसरतेस तू.....परवा आपल्या डीसी मराठी मंडळात मनाचे श्लोक किती छान म्हटले त्याने! बक्षिस उगीच मिळालं का त्याला? अं?...आणि तुझ्या बर्थडेला किती सुंदर कार्ड केलं होतं त्याने....मराठीत....चुकीचं मराठी का असेना..." विहंगने तिला जवळ घेतलं. मग तिलाच हसू आलं त्या कार्डातलं मराठी आठवून! दोघेही हसू लागले.
----------------------------------------------------------------------------------

.......... शनीवार दुपार अंगावर आलेली होती. पूर्वाचं बाहेर लक्ष गेलं. बाहेर अजूनही पांढरी पांढरी बर्फ़ाची सूक्ष्म पिसं हवेत तरंगत अलगद खाली येत होती. काटेसावरीच्या म्हाताऱ्या अश्याच हवेत उडायच्या आणि गावाबाहेरच्या माळरानात आपण भैय्याबरोबर किती पळायचो त्यांच्या मागे........ ! विचार करतच ती क्लॉजेटमधे घुसली. विहंग आळसावून बेडवरच लोळत होता.
..........."हे बेब्स... आज अनीशकडे पॉटलक आहे. आपल्याला व्हेज पुलाव न्यायचाय.... विसरली नाहीस ना? तू करशील ना? की मी करू?..... बेब्स....कुठं लक्ष आहे?" विहंग विचारत होता. त्याचा घरकामात ...विशेषत: पदार्थ बनवण्यात...खूप मोठा वाटा असायचा. त्याला जात्याच आवड होती, स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करायची!
पूर्वा क्लॉजेटमधेच होती....संध्याकाळच्या पार्टीची तयारी........टांगलेले कपडयांचे हॅंगर सरकवत तिथूनच विहंगला विचारत होती.
"सांग ना रे...हा ड्रेस कसा वाटतो....की तो टॉप घालू...आईने शिवलेला...ब्लॅक लेसचा? जीन्सवर?" पूर्वा विचारत होती.
"हा ड्रेस? अगं किती शॉर्ट आहे हा ड्रेस....समर अजून सुरू झालेला नाही.....टेंपरेचर पाहिलंस का आजचं?....येताना गारठशील बरं का!" विहंगने तिच्या ड्रेसकडे जरा नापसंतीचा कटाक्ष टाकला.
"असं काय रे विहंग....मी किती वाट पाहिली समरची या ड्रेससाठी! पूर्ण थंडीभर नुस्ते ते अंगभर हेवी कपडे घालून बोअर झाले रे मी...आणि मी बरोबर घेतेय ना जॅकेट....." पूर्वा फ़ुरंगटून म्हणाली.
"हं.. काहीही बोलतेस पूर्वा......जसं काही विंटरमधे बाईसाहेब ऑफ़िसला अगदी फ़ारच साध्या कपडयात जातात." विहंग नेहेमीप्रमाणेच चेष्टेच्या मूडमधे होता.
"आणि काय गं... या खेपेला इंडियाहून...तुझ्या त्या "मोची गल्ली"तून ती किती किलोनी जंक जुवेलरी आणलीस ती ऑफ़िसवेअरवर घालण्यासाठीच ना...येताना आपल्याला एक्स्ट्रा सामानासाठी एक्स्ट्रा पे करावं लागलं! " विहंग तिला चिडवत होता.

......... इथे वॉशिंग्टन डीसीत जवळपास पाच महिने तरी विंटरच असायचा. त्यामुळे छान फ़ॅशनेबल कपडे घालण्यासाठी ती समरची वाट पहात रहायची. अर्थातच ऐन थंडीतही ती ऑफ़िसला जाताना ती अगदी छान तयार होउनच जायची. अगदी पूर्णपणे ट्रेंडी, लेटेस्ट फ़ॅशनचे आणि ब्रॅंडेड बिझिनेस सूट ती ऑफ़िससाठी वापरायची आणि त्यावर ती कधी जंक जुवेलरी... कधी डायमंड्स अगदी टुकीने वापरायची....................
..............अरे...........ही नटण्यामुरडण्याची हौस कधी शिरली आपल्यात? आजी तर.... मुलीसारखी वाग ..मुलीसारखी वाग...म्हणून कायम कानीकपाळी ओरडायची.
वर म्हणायची..."झाली दुपार...चालल्या पूर्वा बाई अर्धी चड्डी चढवून ग्राउंडवर खेळायला....अरे राघवा... आधीच ही काळी, आणि आता नुसती ताडमाड होत चाललीये...अरे, हिला नवरा कसा रे मिळणार......?आणि हे काय वय आहे का खेळण्याचं?.........ना कपाळाला कुंकू, ना हातात बांगडया." आजीचं आपलं सगळं तिच्या खेळण्याशी येऊन थांबायचं, सगळ्या गोष्टींचा संदर्भ नवरा मिळण्याशी जोडला जायचा.

.................................. पूर्वाला स्वता:तल्या बदलाचं आश्चर्य वाटत होतं!.................. माणसं काळासुसार बदलतात का? की परिस्थिती त्यांना बदलायला लावते? की हा बदल आपसूकच होतो माणसात? स्वता:च्याही नकळत.....! खेळाच्या वेडामुळे नटण्यामुरडण्यापासून आपण कायम लांबच होतो. आणि सावळ्या रंगाचा तर कधीच कॉम्प्लेक्स नव्हता आपल्याला! आपण नेहेमीच खेळात मश्गूल आणि स्वता:वर खूष! कधीच अंगाला दागिने, मेकपचा स्पर्शही होऊ दिला नाही...तशी त्याची कधी गरजही भासली नाही.........आणि आता.............!
आपल्या देशात आपल्याला रंगावरून हिणवणारे, टॉन्ट मारणारे किती तरी जण आपल्या अवती भोवती होते. त्या करंदीकर काकू तर एकदा आपल्यासाठी फ़ेअर ऍन्ड लव्हलीची ट्यूब घेऊन आल्या होत्या...वर आईला म्हणाल्या होत्या, "वहिनी....सुरू करा आत्तापासून....बघू काही फ़रक पडला तर....नाहीतर नंतर प्रॉबलेम येईल हो...!"

...................पण नंतर इतकी वर्षं काढली विहंगबरोबर कॉलेजपासूनची ...त्याने तर आजतागायत कधी उल्लेखही केला नाही आपल्या वर्णाचा........पूर्वाला हसू आलं.........बहुतक तो आपल्या सावळ्या वर्णाच्याच प्रेमात पडला..........?
आणि इथे............ आपल्याला "प्रिटी, ब्युटिफ़ुल" समजतात. अश्या कॉम्प्लिमेन्टसना आपण अगदी सरावलोय. पूर्वाला काही तरी आठवून खुदकन हसू आलं. ऑफ़िसच्या पार्टीत एक ज्युवेलरी डिझायनर आली होती. किती तरी वेळ ती नुसती पहात होती आपल्याकडे....नंतर तिने तर चक्क आपल्याला तिच्या ज्युवेलरी शोसाठी मॉडेल बनण्याची ऑफ़र दिली. आपण अगदी चकीतच झालो होतो. नुसत्या कॉम्प्लिमेन्टस मिळणं वेगळं आणि अशी ऑफ़र मिळणं.............................! आधी विहंगचा होता थोडासा विरोध पण नंतर तोही मावळला. हे मॉडेलिंग शेवटचंच... असं आपल्याकडून वदवून घेऊन.......! तरीही आपण याही क्षेत्रातला एक छोटासा अनुभव अगदी मनापासून एन्जॉय केला होता.......औट घटकेची मॉडेल! आताही आजी असती तर?............या विचाराने पूर्वाला हसू आलं. परत वाटलंच....देश, समाज बदलला की मूळ संकल्पनांमधे इतका फ़रक असू शकतो? एखाद्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य फ़क्त त्याच्या वर्णावरच अवलंबून असावं?

..................................या खेपेच्या भारत वारीत पूर्वाला असे खूप बदल जाणवले. अप्पा चक्क आईला टेबल लावायला, आवरायला ...अर्थातच त्यांना जमेल तेवढी..... मदत करताना दिसले. भांडी, चमचे, डाव वगैरे हातात धरलेले अप्पा इतके वेगळे आणि फ़नी दिसत होते! पूर्वा पहातच राहिली होती. त्यांच्या हातात सुरी बघून तर तिला गहिवरूनच यायला लागलं....ते चक्क फ़ळं कापत होते. आईचाही स्पीड थोडा कमी झालेला जाणवला. अर्थात तिच्या चेहेर्‍यावरचं हसू............मनाचा स्पीड आणि उत्साह तोच होता.
आणखी एक काळामुळे झालेला बदल म्हणजे...."राघवा राघवा" करत घरभर तुरूतुरू फ़िरणारी आजी नव्हती. आता ती कधीच दिसणार नव्हती.....................................!
------------------------------------------------------------------------------------

...................................विहंगनेच शेवटी पुलाव केला आणि सगळे अनीशकडे पार्टीला गेले. मुलं एका खोलीत कॉंम्प्युटर गेम्स खेळत बसली. मोठे सगळे हॉलमधे जमले. हळूहळू पार्टीला रंग चढत गेला. बघता बघता मध्यरात्र झाली.
दोन पेग पोटात गेल्यावर सगळे मनातलं आणि खरं बोलायला लागले. आणि एकमेकांच्या जरा जास्तच जवळ आले.
"हे मॅन, व्हाय आर यू लुकिंग सो मच डिप्रेस्ड?...विहंग, तेरेसे बात करा हूं यार...... तेरे थोबडेपे बारा क्यूं बजे है?" रंजन खूपच प्रेमाने विहंगशी बोलत होता. रंजनच्या पोटात एखादा पेग गेला की त्याची भाषा बदलत असे. पण पियू आपल्या नवऱ्यावर बरोब्बर लक्ष ठेऊन होती.
"रंजन, अब बस भी करो. जाते टाईम मैंही ड्राइव्ह करूंगी लेकीन नाउ...प्लीज कंट्रोल युवरसेल्फ़...स्टॉप ड्रिन्किन्ग नाउ!" रंजनचं पिणं आणि थोडा जड येणारा त्याचा शब्द बघून पियू इरिटेट झाली होती.
"रंजन ...यार... ऍम मिसिंग ओमी ! ....यार, उसने जो किया, वही सही था... लग रहा है......राइट टाईम राइट डिसिजन!.....पुनित मोठा होण्या आधीच गेले सगळे परत!" विहंग खूपच सेंटी झाला होता. हातात ग्लास आणि नजर शून्यात.....! ओमी आणि पम्मी नेहेमीच इथे रहाण्याबाबत कन्फ़्यूज्ड असायचे. किंबहुना त्यांचा अर्धा जीव नेहेमीच तिकडे भारतात अडकलेला असे. पम्मीच्या....पुनितच्या वेळच्या...बेबी शॉवरच्या वेळीच सगळ्यांना अंदाज आला होता...की हे परत जातील. पुनित झाल्यापासून त्यांचं भारतात परत जाण्याचं पक्कं झालं. शेवटी ओमीच्या वडिलांच्या आजारपणाचं निमित्त झालं आणि पुनित दोन वर्षाचा असतानाच ते भारतात परत गेले. ते कायमचेच!

.............पूर्वाला वाटलं ...खरं तेच बोलतोय विहंग. आता खूप वेळा वाटतं..... जावं परत ...विशेषत: कुणाच्या आई वडिलांविषयी किंवा कुणाही जिवलगांविषयी काही अचानक घडल्याची वाईट बातमी आली तर.......अगदीच जीव घाबरा होतो!
आणि इथे आपल्याला नुसता सर्दी खोकला झाला तरी आईची आठवण होते...वाटतं आत्ता कपाळावरून मायेचा हात फ़िरवायला आई हवी होती. आणि आईचीही तिकडे अशीच अवस्था...आपल्या साध्या सर्दी खोकल्याने, साध्याश्या डेंटल प्रॉब्लेमने तीही तिकडे अस्वस्थ.........!

................."ओह्.....नाउ कमॉन यार...डोंट स्पॉइल द फ़न! ऍन्ड... मिसिंग ओमी? स्साला, त्या ओमीला त्याच्या आईने इमोशनली ब्लॅकमेल करून बोलावून घेतलं राव इंडियात, आणि तो येडा गेला." अनीश म्हणाला. त्यालाही जरा जास्तीच झाली होती.
"अनी...........डोंट टॉक रबिश यार..............इट्स् देअर पर्सनल मॅटर..........व्हाय आर यू ब्लेमिंग हिज पुअर मदर फ़ॉर दॅट?" नेहा तिच्या स्वभावानुसार आपल्या नवर्‍याला हळू आवाजात झापत होती.
"येस् नेहा... देअर यू आर! ऍन्ड ... अनीश .....आय डोन्ट अग्री विथ् यू अ‍ॅट ऑल.......अनीश, काहीही बोलतोस तू.
आई आणि ब्लॅकमेल?...व्हॉट रबिश.....अरे, कुठल्या आईला वाटणार नाही, आपली मुलं, नातवंडं जवळ असावीत म्हणून? उलट तो गेला ...छान झालं. आपल्या माणसात, आपल्या देशात गेला तो. आपल्या मातीशी इमान राखलं त्यानं!" विहंग अजूनही शून्यात नजर लावून बोलत होता.
"विहंग ..मग तुम्ही पण का नाही रे जात परत? तुझी आई हल्ली आजारी असते ना..." अनीश ऐकून घ्यायच्या मूडमधे नव्हता. आणि हा बाण विहंगच्या अगदी जिव्हारी लागला होता. जखमेतून भळभळ रक्त वहायला लागलं. या खेपेला आधीच आईकडे खूप कमी दिवस मिळाले. त्यात खरंच तिची तब्ब्येतही हल्ली बरी नसते.
सगळे बालमित्र हमरीतुमरीवर येतीलसं वाटायला लागलं. खरं म्हणजे पार्टीच्या सुरवातीला विहंगचा पुलाव आणि पियूचे "रोशोगुल्ले" अगदी हिट ठरले होते. सगळे एन्जॉय करत होते.....छान खेळीमेळीचं वातावरण होतं...........................
पण शेवटी वातावरण बदलत गेलं, नको त्या विषयावर वादंग झालं आणि अनीशकडची पार्टी आवरती घेतली गेली............. हा विषय म्हणजे सर्वांसाठी अगदी दुखरी जागा झाली होती.
------------------------------------------------------------------------------------
............................ यावर्षी सुद्धा इंडियात गेल्या गेल्या आधी शार्दूल तापाने फ़णफ़णला नंतर विहंगच्या पोटावर गदा आली. आणि परत पूर्वालाच गिल्टी फ़ीलिंग आलं. विहंगने आईच्या हातचं, हे खायचं ते खायचं, म्हणून किती प्लॅन्स केले होते....तिकडे गेल्या गेल्या भराभरा सामान आणून टाकलं...आई नको म्हणत असताना. आणि शेवटी व्हायचं तेच झालं........... अमेरिकेत गेल्यापासून इथे भारतात आल्यावर आपण का आजारी पडतो? पाळंमुळं इथलीच ना आपली? जन्म इथलाच ना आपला? मग इथली धूळ, गर्दी, गडबड, कलकल, पोल्युशन, हवा...हे सगळं कधीपासून आपल्याला अनोळखी झालं? पूर्वा मनातल्या मनात खंत करत राहिली.
भरीत भर म्हणून पूर्वाला थ्रोट इन्फ़ेक्शन, सर्दी तापाने घेरलं. सर्वांची धावपळ! शेवटी किती वर्षांपासूनचा चाललेला प्लॅन पुन्हा एकदा कॅन्सल करायला लागला. कोकणात कुलदेवीला जायचं ठरवलं होतं ते ऐन वेळी कॅन्सल करायला लागलं.
"काय गं पूर्वा, तुम्हाला इथली सुखं पण टोचतायत तर तिकडे कोकणात कसं व्हायचं तुमचं........" आई म्हणाली. खरं म्हणजे तिला पूर्वालाच काय, पण कुणालाच दुखवायचं नव्हतं पण तिचाही डिसमूड झाला होता. मनातल्या मनात ती बोलली होती देवीला की, ....या खेपेला तरी लेकरांना घेऊन येईन तुझ्या पायाशी....पण तिलाच जाणवलं होतं की आता हे आपल्या हातातलं राहिलेलं नाही. कारणं काहीही असोत. यापुढे कधी जमणार हे? दरवर्षी असंच काहीतरी होतंय...... या विचारात आईही जरा कधी नव्हे ती अपसेट झाली.
------------------------------------------------------------------------------------

......................गावी पोचल्याच्या दुसयाच दिवशी बाजारपेठेत ...तेही स्कूटीवर....हो...कारण तिथे कार नेण्याची काही शक्यताच उदभवत नाही. ..आणि आता तर अमेरिकेत लेफ़्ट हॅन्ड ड्रायव्हिंगची सवय अगदी वज्रलेप झालेली असल्याने इथे भारतात, कार ड्रायव्हिंगच्या ती फ़ंदातच पडत नसे............स्कूटीवर आईला मागे बसवून................स्कार्फ़ नाही, गॉगल नाही....अशीच किती फ़िरली....अगदी हौसेनं.....! शार्दूलला आप्पांबरोबर घरीच ठवलं होतं. शेजारच्या राजूचा संकेतही आला होता शार्दूलशी खेळायला.
........... शाळेत असताना आईच फ़िरवायची आपल्याला...तिच्या व्हेस्पावरून..........पूर्वाला आठवत होतं....!
............बाजारपेठेतली ती "मोची गल्ली"..........छोटया छोटया दुकानांबाहेर टांगलेल्या रंगीबेरंगी बांगडया, टिकल्यांची पाकिटं, पर्सेस, स्कार्फ़स्, हळद, कुंकू, गुलाल, बुक्क्याचे छोटे छोटे टोकदार डोंगर, खराटे, कुंचे, पोळपाट लाटणी......! सगळं कसं एखाद्या कुशल चित्रकाराच्या कुंचल्यातून आल्यासारखं जिवंत, रसरसलेलं आणि रंगीबेरंगी! त्या वळणावळणाच्या, उबडखाबड, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांच्या, छोटया छोटया निरुंद गल्ल्या, कायमच इतक्या गजबजलेल्या असायच्या की वाटायचं इथे सतत कसला तरी उत्सव चालू आहे. आणि तो दुकानांबाहेरचा रंगीबेरंगी, झगमगीत डिस्प्ले? तो तर आपल्या डीसीतल्या "क्रेट ऍण्ड बॅरल", "मेसी"ज यांच्याही तोंडात मारेल! तिला कल्पनेनेच हसू आलं होतं. अरे.... कशाची तुलना कशाशी करतोय आपण?...........तरी सगळं कसं आणि किती डोळ्यात साठवू असं झालं होतं तिला! मनात तर हे गाव कायमच वस्तीला होतं तिच्या!
आईला ती म्हणाली सुद्धा, "आई मीनाआत्या सुट्टीत अमरावतीहून इथे आली की बाजारपेठ आणि मोची गल्लीत जायला अगदी आसुसलेली असायची. आणि त्या बाजारपेठेत आणि मोची गल्लीत तिचं काय गाठोडं ठेवलं होतं आत्ता कळतय गं मला!"

.............खरेदी झाल्यावर "मथुरा" मधलं चाट! आंबट गोड, पुदिना चटणीवालं चाट खाण्यातली ती मजा औरच असायची. तेही इतकं रंगीबेरंगी.....पांढरं दही, लाल तिखट, गडद चॉकलेटी चिंचेची चटणी, हिरवीगार पुदिना चटणी, सगळ्यावर पिवळी धम्मक बारीक दीशेव...अगदी नेत्रसुखद!!.....पण आता मात्र फ़क्त नेत्रसुखंच घ्यायचं... इच्छा असूनही हे सगळं खाण्याची हिंमतच होत नाही.... असंही लगोलग मनात आलं तिच्या! असं काय झालंय आपलं?

............लहानपणी मीनाआत्याबरोबर ती नेहेमी जायची बाजारपेठेत. आत्याचे अजू, विजू घरीच थांबायचे....भैय्याबरोबर. त्यांना या कार्यक्रमात काहीच इंटरेस्ट नसायचा. पण बाजार पेठ, मोची गल्लीत गेल्याशिवाय मीनाआत्याला माहेरपण सुफ़ळ संपूर्ण झाल्यासारखंच वाटायचं नाही. पूर्वाला वाटलं तशीच आपलीही गत झालीये. काळ बदलला की काय काय बदलतं! तेव्हा वाटायचं आत्याला एवढं काय आकर्षण वाटतं या बाजाराचं.....इतकं असूनही आपण मीनाआत्याबरोबर बाजारपेठेत जाण्याची संधीच शोधत असू. पण आता इतक्या लांब साता समुद्रापलिकडे गेल्यावर हा आपला गाव, हा बाजार, या गल्ल्या, ही वळणं, ही दुकानं...... या सार्‍याची ही ओढ काही औरच! इथल्या प्रत्येक जागेला, रस्त्याला, वळणाला काही तरी पूर्वीचा संदर्भ चिकटलेला आहे. मी इथेच वाढले........ वयाची किती तरी वर्षे याच गावाशी, याच रस्त्यांशी, याच गल्ल्यांशी माझं नातं होतं............ इथेच माझं अस्तित्व होतं.... हेही माझंच जग आहे आणि ते वॉशिंग्टन डीसीतलं जग? ....................आईबरोबर फ़िरता फ़िरता पूर्वाच्या डोक्यात हा "तळ्यात मळ्यात" चा खेळ चालूच होता!

.............पण हा "बाजारपेठ, मोची गल्ली" एपिसोड झाल्यावर लगेचच दुसयाच दिवशी लक्षात आलं घशाची वाट लागलीये! आई म्हणत होती..........स्कार्फ़ गुंडाळ....खूप धूळ आहे...म्हणून ....! सगळ्यांची आजारपणं एकदमच चालू झाली होती. अजून राहिलेल्या मुक्कामात विहंगच्या गावीही जायचं होतं. तिथंही त्याची आई, वडील, धाकटा भाउ, त्याची फ़ॅमिली सगळेच वाट बघत असणार............पण सगळ्यांची आजारपणं ..... तिकडे जायलाच इतका उशीर झाला की तिकडचा मुक्काम वेळेअभावी अगदी दोनच दिवसात हलवावा लागला. विहंगच्या घरचे नाराज झाले. तरी विहंग तसाच आजारी अवस्थेत पुढे गेला होता...त्याच्या गावी. पूर्वा, शार्दूल अगदी.. जायच्या आधी दोन दिवस विहंगच्या गावी गेले. खरं म्हणजे पूर्वाला सासरी थोडं जास्त दिवस रहायचं होतं. आजीलाही नातवाचा सहवास मनासारखा नाहीच मिळाला. रात्र थोडी सोंगं फ़ार........शेवटी हे गिल्टी फ़ीलिंग...ही हुरहूर... माझ्या पाचवीलाच पुजलं आहे....पूर्वाला वाटलं. होता होता जायचा दिवस आला. विहंगच्या आईनेही सून मुलाचं, नातवंडाचं होता होईल तो कोड कौतुक केलं. पण त्यांच्याही नाजुक तब्ब्येमुळे आणि वयामुळे त्यांनाही फ़ारसं काही झेपलंच नाही. विहंगलाही आई, भाऊ, वहिनी, मुलं, ....सगळ्यांच्यात दिवस कसे गेले कळलंच नाही. पण पूर्वालाच काही तरी विचित्र फ़ीलिंग आलं होतं...वाटत होतं... कुणालाच समाधान मिळालं नाही.

...........मुठीतली सुळसुळीत वाळू कधी मुठीतून निसटून गेली कळूच नये..... फ़क्त शेवटी मुठीतलं रितेपण अचानक लक्षात यावं.......... तसंच काहीसं वाटंत होतं. शेवटी विमानात बसताना काय विचित्र मन:स्थिती होती...तिचं तिलाच काही कळलं नाही. फ़क्त आई अप्पाच्यांबरोबर थोडं तरी रहाता आलं त्याचा आनंद मनात ठेऊन तिने डोळे मिटले.
-----------------------------------------------------------------------------------

..................."आई पोचले बाई माझ्या माझ्या घरी....ओह......व्हॉट अ फ़ीलिंग....होम स्वीट होम!!"
पूर्वाच्या चेहेर्‍यावरचा आणि आवाजातला, उत्साह आणि आनंद लपत नव्हता. भारतात डिसेंबर घालवून पूर्वा आणि मंडळी अमेरिकेत परत आली होती. स्काइपवर सगळेच जमले होते.
"हो का? दरवर्षीचं आहे बाई हे तुझं! तिकडे असलीस की कधी एकदा भारतात येते आणि पुन्हा भारतातला मुक्काम संपत आला की पुन्हा तुझ्या "होम..स्वीट होम"च्या आठवणीनी अस्वस्थ! हो ...... पण आता तब्येतीला जप बाई...सगळ्यांच्याच! " आई कृतककोपाने....हसत हसत बोलत होती.
"आई, अगं इथे पोचल्यापोचल्या सगळे ठणठणीत झालेत." लेकीचा आनंदी आवाज एकून आणि जावई नातवाचे आनंदी चेहेरे पाहून आईही खूष झाली...म्हणाली, "बरं वाटलं बाई ऐकून! चला...कुठेही रहा पण खुष रहा."
समस्त आई जमातीचा विचार!................पूर्वाला वाटलं!

..........................बाहेर हिमवर्षाव चालू होता. झाडांचे खराटेही बर्फ़ाच्या लोलक झुंबरांनी सुशोभित झाले होते. सारी सृष्टी सफ़ेद पांघरुणात गुडुप झोपली होती. दोन दिवसांपूर्वी ऑफ़िसमधे काम करता करता सगळ्यांनाच स्नो स्टॉर्मची सूचना देणारी मेल आली होती. भराभरा सगळं ऑफ़िस रिकामं झालं. सगळं कसं शिस्तीत. कुठेही घाई गडबड, गोंधळ नाही.
..............कॉलेजच्या सुटीत पुण्याहून जर कधी बसने गावी जायची पाळी आली तर मधल्याच स्टॅंडवर पूर्वाला उतरायचं असायचं...ती बॅग घेऊन हताशपणे बसच्या दरवाज्यात उभी असायची. पण चढणारे इतकी गर्दी करत आणि चढण्याची इतकी घाई करत की तिलाच काय कुणालाच उतरताच येत नसे. ज्यांना धक्काबुक्की, ढकलाढकली मस्त जमते ते मात्र चटकन उतरून जायचे. पण कुणालाच काही वाटायचं नाही. शेवटी ती आरडा ओरडा करायची...मोठा आवाज काढून लोकांना थांबवायची. तरी काहीच उपयोग व्हायचा नाही. आणि शेवटी हातातल्या सगळ्या सामानासह कशीबशी उतरायची..आणि उतरताना सर्वांगाला झालेले ते किळसवाणे स्पर्श......काही जाणतेपणाने केलेले, काही अजाणतेपणाने झालेले! हे कधीच बदललं नाही.............तिला खूप वर्षापूर्वीचं आठवत होतं.

आणि इथे... मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनला दरवाज्यातला प्रत्येक जण खाली उतरतो. चढणारे चढले की परत सगळे अगदी शांततेत गाडीत चढतात...हे सगळं इतक्या कमी सेकंदात............! कलकल नाही. गोंधळ, ढकलाढकली नाही...............माणसामाणसाच्या मेंटॅलिटीत देशपरत्वे असा इतका फ़रक कसा काय असू शकतो?
...................... स्नो स्टॉर्मच्या सूचनेमुळे विहंगही ऑफ़िसमधून लौकरच आला. आल्या आल्या त्याने हॉलमधल्या बार मधून ग्लासेस काढले. चिकन नगेट्स मायक्रोव्हेव्ह ओव्हनमधे ठेवले. प्लेट्स, काटे चमचे, टिश्यूज सगळं टेबलवर नीट छान मांडलं. काम करता खुषीत काहीतरी गुणगुणतही होता. त्याला मन लावून हे सगळं करताना बघून तिला अगदी भरून आलं....तिला रहावलं नाही..ती पळत पळत जाऊन त्याच्या गळ्यात पडली.
"अरे अरे ...हे काय? इंडियाला जाऊन आल्यापासून विचित्रच वागतेयस तू....." विहंग कौतुकाने हसत हसत म्हणाला. पण तोही सुखावला...त्यालाही ते हवंच होतं! त्यानेही तिला एका हाताने वेढून तिच्या गालाचं प्रेमभराने चुंबन घेतलं. त्याची मिठी मोठया कष्टाने सोडवून पूर्वाने कालची राहिलेली भांडी डिश वॉशरमधे घासायला घेतली. तेवढाच अचानक मिळालेल्या सुट्टीचा फ़ायदा! भांडी घासता घासता मनाचे खेळ सुरू झाले. अचानक परत फ़्लॅशबॅक सुरू झाला.

................ अप्पा तर कधीच पाणीही हाताने घ्यायचे नाहीत. ते ऑफ़िसमधून आल्या आल्या आई आधी हसतमुखाने पाणी पुढे करायची मग चहा! आजीही अगदी पुढे मागे करायची अप्पांच्या. आई कधी कधी कौतुकभरली तक्रारही करायची मैत्रिणींच्यात, "पाणी सुद्धा द्यावं लागतं हातात." पण पूर्वाला तेव्हा असं कधीच वाटलं नाही की आई अप्पांच्या बद्दल काही तक्रार करतेय. पण आत्ता तिला स्वता: संसारात पडल्यावर वाटायला लागलं की अप्पा तर अगदी डिक्टेटरशिपच करायचे की साऱ्या घरावर...! पण मग तेव्हा आपल्याला किंबहुना कुणालाच तसं कधीच का नाही वाटलं? आणि आत्ता एकेका गोष्टीचं काही वेगळंच इंटरप्रिटेशन् कसं काय होतंय आपल्या मनात?

...............आई पूर्ण वेळ घरीच असायची म्हणून हे सगळं तिनेच करायचं, यात आईवर काही अन्याय होतोय असंही कधी तेव्हा वाटलं नाही आणि आईनेही कधी नाराजी दाखवली नाही. हे सगळं जाणवणारही नाही इतक्या सहजपणे ती घरातलं काम करायची....जोडीने शिवण.............आत्ताआत्तापर्यंत आपण डीसीला परत जाताना आईने शिवलेले टॉप्स घेऊन जात होतो. आई बाजारहाटही स्वता:च करायची....तिच्या व्हेस्पावरून.....दोघांना शाळेतही व्हेस्पावरूनच सोडायची....आणायची. गंमत म्हणजे आईच्या घरी कार असल्याने, अप्पांनी कार घेण्याआधीपासूनच तिला कार चालवायला येत होती. त्या छोटया गावात लोक तिच्याकडे असूयेनेच आणि आश्चर्यानेच बघत. आईला पोहायलाही येत होते. तेव्हा या गोष्टींचं आपल्याला काही विशेष वाटायचं नाही पण आत्ता वाटतंय .........आई तिच्या काळाच्या खूपच पुढे होती. आईच्या गावी नदी होती आणि आजोबा खूपच हौशी होते त्यामुळे त्यांनी तिला अगदी लहानपणीच नदीत पोहायला शिकवलं होतं. पूर्वा, पियुषला गाडीत घालून क्लबमधे पोहायला शिकवणारे आई अप्पाच होते. अप्पा कधी बीझी असले तर आईच घेऊन जायची पोहायला. ....गाडीतून!

........आईला एरवी सुद्धा आडवी झालेली पाहिली ती फ़क्त रात्रीच. कामकरी मुंगीसारखी सतत कामात असायची ती. आत्ता आपण मल्टीटास्किन्गच्या गप्पा मारतो...आई, किती फ़्रंट्सवर किती एफ़िश्ंटली कामं करायची? ती फ़क्त पैसे मिळवत नसली म्हणून काय झालं?

........... किती सहजसोप्या होत्या गोष्टी तेव्हा....! खरंच सोप्या होत्या की आईमुळे त्या सहज सोप्या वाटायच्या? की आईमधे सगळ्या गोष्टी सोप्या करून सोडवण्याची काही वेगळीच शक्ती होती? शार्दूलची आई म्हणून माझ्यात आहेत का या कपॅसिटीज? आईने जसं आम्हाला वाढवलं तसं मी माझ्या मुलाला इथे वाढवू शकेन?......... पूर्वाचं विचारचक्र भिरभिरत होतं.
------------------------------------------------------------------------------------

..........................रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या डिशवॉशरचं संगीत ऐकत झोपण्याचा प्रयत्न करत होती. विहंग त्याच्या लॅपटॉपवर होता. पण पूर्वाच्या मनात घालमेलच चालू होती.
"विहंग, आपण शार्दूलला वाढवण्यात काही कमी पडतोय का रे"? शेवटी मनातली खळबळ बाहेर पडली
"आता आणि नवीन काय काढलंस हे...झोपायचं नाही का"? विहंग एका हाताने तिला थोपटत होता.
"नाही रे...तुला काय वाटतं आपण परत जायला हवं होतं का? आपले परतीचे दोर कापले तर गेले नाहीत ना रे?....मला खूप अस्वस्थ वाटतं रे कधी कधी....." पूर्वाने त्याचा हात घट्ट धरून ठवला होता.
"बेब्स ......डोन्ट थिंक इमोशनली...ट्राय टु थिंक रॅशनली...इज इट पॉसिबल नाउ, टु गो बॅक....ऍन्ड डु यु रियली वॉन्ट टु गो? देन व्हॉट अबाउट शार्दूल? अगं त्याचा ओव्हरऑल परफ़ॉर्मन्स किती सुधारत चाललायं दिवसेंदिवस.....पाहतोय ना आपण ?" विहंग म्हणाला.
"हो रे मला माहिती आहे की आता शार्दूल तिकडे नाही ऍडजस्ट होणार....इथे त्याचं चांगलं बस्तान बसलंय..खरंच अगदी छान चाललंय त्याचं........... तरीही....." पूर्वाची, कळतय पण वळत नाही अशी अवस्था झाली होती.
"ओक्के...देन व्हॉट एल्स डु यु वॉन्ट?
आणि तसं आपण किती टचमधे असतो सर्वांच्या....इंटरनेटमुळे!....परत आपण दर वर्षी प्रयत्न करतो ना भारतात जाण्याचा. कधी ते लोक इकडे येऊन जातात..आणि तूच म्हणतेस ना टेक्नॉलॉजीमुळे अंतरं राहिली नाहीत." विहंगने मूळ कल्पनेलाच विरोध दर्शवला.
शार्दूल आत्ता पाचवीत आहे.......आता तो भारतात...अ‍ॅडजस्ट होणं हा तर लांबचा विचार आहे...
पण कायमचा म्हणून.... आधी यायलाच तयार होणार नाही. पण यात त्याची बिचार्‍याची काहीच चूक नाहीये! तरी दर वर्षी व्हेकेशनमधे नवलाई म्हणून येतो आपला! ...नाही म्हटलं तरी दोन्हीकडचे आजी आजोबा, भावंडं यांची अजून तरी ओढ आहे शार्दूलला. काका काकू, मामा मामी, भावंडं......निदान अजून तरी सगळ्यांची आठवण तरी ठेवतो.............हो आणि नाही म्हटलं तरी इथे शाळेतही त्याचा परफ़ॉरमन्स अगदी समाधानकारक आहे. इथे किती खुष असतो तो! त्याची जन्मभूमी हीच आणि त्याचं भविष्यही इथेच असणार!
हळूहळू पूर्वा जरा पॉझिटिव्हली विचार करू लागली. .....................पूर्वाचा सेल खणखणला. धनूदीचं नाव बघून खूष झाली.

.............."हाय पूर्वा......झोपला नाहीत ना गं?" धनूचा फ़ोन होता.
"नाही गं दी! कुठे आहेस? आदीशी झालं का बोलणं?" पूर्वा मोठ्या बहिणीची आपलेपणाने चौकशी करत होती.
"अगं परवा चालले मी परत सॅन होजेला, अगं असं वाटतंय किती वर्षं झाली माझ्या बाळांना भेटून! पण पूर्वा.........आय् थिंक ऑल इज् वेल नाउ! संदीपशीही बोलले. आता तो आदीशी काय बोललाय नक्की माहिती नाही.
पण पूर्वा... तुला माहिती आहे ना आमचा मंत्र?..." धनू थोडी रिलॅक्स वाटत होती.
"दी, अगं मला मंत्र पाठ आहे....पण आय फ़ाइंड इट फ़नी नाऊ..... कन्सिडरिंग आदीज एज. आता तर मला वाटतंय त्याचा काहीही उपयोग होणार नाही. " पूर्वा हसत हसत बोलत होती.
"आय ऍम युवर फ़्रेंड ऍन्ड यू हॅव टु टेल एव्हेरीथिंग टु युवर फ़्रेंड!...........दी, हा तुमचा मंत्र मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होता गं. एकदा त्यांच्यावर मंत्र टाकला की आली मुलं आपल्या कह्यात! असं कुठं असतं तर.........."पूर्वा अजूनही हसतच होती.
"पूर्वा, डोन्ट ट्राय टु पुल य़ुवर बिग् सिस्टर्स लेग हं! अगं, काय काय तिकडम लढवावे लागतात मुलं मोठी करताना...कळेलच तुला हळूहळू!" धनू धाकटया बहिणीला समजावत होती. दोघी बहिणी आता बर्‍याच रिलॅक्स होत एकमेकीची उडवत होत्या.
"अगं दी, बरोबर आहे गं.....पण आता तूही.. आदी तुला सगळं सांगेल...ही अपेक्षा करू नको." पूर्वाही मोठया बहिणीसमोर आपले विचार मांडण्य़ाचा प्रयत्न करत होती.
"पूर्वा......ते काही असो....आदीने माझं ऐकलंय. त्याने परत फ़ेसबुकवर "सिंगल" स्टेटस नोंदवलंय. पूर्वा, तुला म्हणून सांगते.....लिसन केअरफ़ुली..... आय डोन्ट वॉन्ट दॅट, वन फ़ाइन मॉर्निंग....सम व्हाइट अमेरिकन लिंडा ऑर सिंडी कम्स् टु मी ऍन्ड कम्प्लेन्स अबाउट आदी ..दॅट.... युवर सन हॅज मेड माय डॉटर प्रेग्नण्ट! नो! ...अगं पूर्वा आता त्यानं कमिट केलंय की एमीशी त्याची फ़क्त मैत्री राहील. मी त्याला खूप समजावलं...की अजून तुला खूप मोठं व्हायचंय, खूप शिकायचंय...आत्तापासून कुठे एखाद्या मुलीत गुंतलास तर तुझं शिक्षणावरंच लक्ष डायव्हर्ट होईल. "धनू म्हणाली.
"दी... पण फ़ेसबुकवरच्या त्याने नोंदवलेल्या स्टेट्सवरून फ़ार काही गृहित धरता येत नाही." पूर्वा म्हणाली
"हो गं पूर्वा....मी समजू शकते...पण जोपर्यंत तो आमच्या घरात आमच्याबरोबर रहातोय, तोपर्यंत त्याला या ना त्या विषयाच्या निमित्ताने, नीट समजावून सांगणं हे तरी माझं काम नाही का? अगं इथे किती स्वातंत्र्य असतं मुलामुलींना ...............भीति वाटते गं कधी कधी. आणि संदीप तर.....तुला माहिती आहे.. वडील म्हणून काहीच सांगत नाही मुलांना. उलट सतत त्यांच्या बरोबरीने मस्ती करतो. आदी एकदा युनिव्हर्सिटीत गेला की मग मी कशाला जाईन त्याला सांगायला. आणि तो एकदा घराबाहेर पडला की मी त्याला कुठे कुठे पुरी पडणारे ? पण तोपर्यंत तो जरा मॅच्युअर होईल.....थोडी समज येईल..... असं आपण समजू. आणि पूर्वा, जशी मुलं मोठी होत गेली तसं, आमच्या मंत्राला नंतर मी एक एक्स्टेन्शनही जोडलं होतं. तेही तुला पाठ आहेच." धनू म्हणाली.
"हो गं दी...तेही मला पाठ आहे....येस् टु गर्लफ़्रेंडस् बट नो टु एस् ई एक्स.’" पूर्वा हसत सुटली होती. तिला वाटत होतं की या गोष्टी अशा मंत्र म्हणून होत असत्या तर...........! आणि आपल्याला या "एस् ई एक्स" बद्दल कुठे कधी, आपल्या आईने, मावशीने, किंवा शाळेतल्या शिक्षकांनी काही शिकवलं होतं? आणि तशी कधी वेळही आली नाही..........आपणही प्रेम केलं...पण हे "नो टु एस् ई एक्स" प्रकरण कधी सामोरंच आलं नाही. जे काही शिकलो ते लग्नानंतरच! या बाबतीतलं तर बहुतेक सगळं विहंगकडूनच! तिला हसू फ़ुटत होतं. पूर्वाला एकदम हलकं आणि रिलॅक्स वाटायला लागलं!

................आत्तापर्यंत विहंगचं डोकं लॅपटॉपमधून निघून पूर्वाच्या मांडीवर विसावलं होतं. त्यामुळे त्यालाही धनूचं बोलणं अधून मधून ऐकू येतच होतं. विहंगच्या दोन्ही हातांचा हार पूर्वाच्या गळ्यात पडला होता. तो डोळ्यांनीच विचारत होता ...काय चाललंय? धनूच्या फ़ोनमुळे पूर्वाचा मूड थोडा चेंज झालेला बघून तोही जरा खुष झाला होता.
"काही नाही रे......चल.... झोपायचं का?" म्हणत पूर्वाने विहंगच्या कपाळावरचे केस मायेने बाजूला सारले.... हसत हसतच बेड लॅम्प मालवला.

................डिश वॉशरचं संगीत थांबलं होतं. सगळीकडे अगदी नीरव शांतता होती. बाहेर काळ्या भोर रात्रीच्या ओंजळीतून बर्फ़ाची पांढरी स्वच्छ, हलकी हलकी, वजनरहित फ़ुलं, खुषीत तरंगत, स्वता:भोवती नाजूक छोटया छोटया गिरक्या घेत, खाली जमिनीवर अगदी अलगद सांडत होती. हीच बर्फ़ुलं झाडांच्या खराटयांवर स्थिरावत तिथे सुंदर, चमकदार लोलक झुंबरं तयार करत होती. हळूहळू जमिनीवर एक सफ़ेद गालिचा अंथरला जाऊ लागला!
...............सारी सृष्टी या बर्फ़ुलांचं नर्तन पहात रात्रीच्या बाहुपाशात विसावली!

------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Happy
एकदम छान लिहिले आहे ABCD लोकांचे मनोगत ..
शेवट पण मस्त .. ह्याचे कसे आहे ना.. अमेरिका आणी भारत ह्याच्या कभी हा कभी ना मधे
विजय $ चाच होतो, आणी आपल्या नकळतच मुळ संस्क्रूती ला तिलांजली दिली जाते Sad
ह्या लिंक मधे खरी खुरी अमेरीकेन लाईफ ऑफ देशी ऐकायला मिळेल

http://www.youtube.com/watch?v=clRgupTDuW4&feature=player_embedded

चांगभलं धन्यवाद! मी काही ते "गृहशोभिका" वाचत नाही........किंवा टिपिकल बायकांची मासिकं म्हणजे काय तेही कळलं नाही. कारण तीही मी वाचत नाही. पण माझी कथा "तशी" आहे
हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

आवडली.
मानुषी, चांगभलंने लिहिले आहे, तशा टिपिकल मासिकांचे अमाप पिक पूण्यामुंबईत आलेय. अगदी एकसाची कथा असतात. काहि कथांचा तर ताळमेळच लागत नाही. छपाई पण यथातथाच असते. कथेचा आणि त्यासोबतच्या रेखाचित्राचाही काही संबंध लावता येत नाही. पण हि मासिकं जोरात चालतात, हे मात्र खरे.
आमच्याकडे येतात ही मासिके. (एका घरपोच लायब्ररीवाल्याला मदत व्हावी म्हणुन ). आईला दुपारी झोप काढताना, उपयोगी पडतात.

मानुषीताई, माफ करा पण कथा थोडी घरंगळल्यासारखी वाटतेय. तुम्हाला जो गोंधळ अधोरेखित करायचाय त्यापेक्षा नुसतं राहणीमानच जास्त आलंय असं काहीसं होतंय.

नाही आवडली. फुल क्लिशेज व स्टीरीओ टाइप्स भरलेली आहेत. फेसबुक वर मुलांना इन्फ्लुअन्स करू नये. तीत्यांची प्रायवेट जागा आहे. परवा कट्ट्यावर चांगली चर्चा झालेली यावर. फॉर द रेकॉर्ड डिस्मूड नावाचा शब्द इंग्रजीत नाही. परत मॉरल स्टिरीओटाइप्स पण आहेत. हळवे हळवे गोड गोड. Happy

दाद आणि नीधपला अनुमोदन.

आवळा नामक आयडीची मते एकांगी वाटताहेत..त्यांच्या मते भारतातले सगळे संस्कॄतीला धरुन वागताहेत जणु. असो.

नाही आवडली. धनू आणि पूर्वा दोघींनीही सुतावरून स्वर्ग गाठलाय असे वाटतेय... आणि लिखाणातही नक्की कुठल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकावा ह्यात गोंधळ झाल्यासारखे वाटत आहे.

त्यांच्या मते भारतातले सगळे संस्कॄतीला धरुन वागताहेत जणु. असो.>>>

चिंगी, नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे.
आवळा यांचा आक्षेप कदाचित अशा प्रकारच्या वाक्यांवर असावा,
<<<<<ट्राय टु थिंक रॅशनली...इज इट पॉसिबल नाउ, टु गो बॅक....ऍन्ड डु यु रियली वॉन्ट टु गो? देन व्हॉट अबाउट शार्दूल? अगं त्याचा ओव्हरऑल परफ़ॉर्मन्स किती सुधारत चाललायं दिवसेंदिवस.....पाहतोय ना आपण ?" >>>>>>>

आणि कथेत मांडलेली मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत असे अजिबात नाही Happy

प्रसंग गुंफायची पद्धत आवडली.

शीर्षक आणि गोष्ट मात्र एकमेकांपासून लांब आहेत. परतीचे दोर आहेत की नाही ही चाचपणीच दिसली नाही. परतीचे दोर कापून टाकल्यानंतरची मानसिक आंदोलनं दिसली, ती चांगली लिहिली आहेत Happy

अनावश्यक पूर्णविराम मात्र खूप आहेत.

नाही आवडली. घरंगळण्याबाबत नीधपला अनुमोदन. खूपच फापटपसारा वाटली त्यामुळे नक्की काय म्हणायचं आहे हेच लक्षात आलं नाही. वाचून झाल्यावर संपली एकदाची असंच वाटलं. तसेच परत जायचं, रहायचं इथेच हे विषय तसे चावून चोथा झालेले असल्याने नाविन्य वाटलं नाही.

गोष्टीतल्या दोन तीन गोष्टी खटकल्या. पहिल्याच ओळीत
>> कॉफ़ीचा वाफ़ाळता कप हातात घेऊन आज पूर्वा कधी नव्हे ती निवांतपणे बाल्कनीत बसली होती. संध्याकाळ हळूहळू आपलं जाळं विणत होती. फ़ेब्रुवारी संपत आला होता.>>>

कथेची नायिका इस्ट कोस्टवर राहतेय असं दाखवलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी हा थंडीचा पिक सिझन असताना कुणीही बाल्कनीत निवांत कॉफी पित बसायची शक्यताच नाही.

तिसर्‍या ओळीत >>> ’समर’ची चाहूल घेणं सुरू झालं होतं>>> समर आणि विंटर ह्यात स्प्रिंग हा ऋतु येऊन जातो की.