निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ही लिलि माझ्या आईकडे भरपुर आहे. ही लिली फक्त पावसाळ्यात फुलते. मी नेहमी हिच्या फुलण्याचा खेळ पहायचे. एक एक पाकळी मस्त फुलते हीची रात्री. आई नेहमी संध्याकाळी कळ्या काढून ठेवते आणि धाग्याने बांधते म्हणजे ती जास्त उमलत नाहीत सकाळी. पुर्ण फाकलेल फुल आहे ते दुसर्‍यादिवशी होत. आदल्या दिवशी खुप सुंदर फुल दिसत. ह्याला एक मंद वास येतो. आतले पिवळे पराग हे आदल्या संध्याकाळीच असतात. दुसर्‍या दिवशी सहसा नाही दिसत. हे पराग हातालाही चिकटतात.

ह्यामधे एक पुर्ण वर्ष फुलणारी पण जात असते. तिची पाने थोडी रुंद आणि फिकट असतात. वरच्या लिलिची पाने अरुंद आणि गडद हिरवी असतात. मी फुलांच्या सोबत लिलिच्या पात्या सजावटीसाठी लावायचे. ह्या लिलिला बाजुला अजुन कंद फुटतात. हारामध्ये ह्या लिलिचा वापर करतात.

हो जागु, सगळीकडे हारात हीच लिली दिसते. आणि हारही मस्त भरगच्च दिसतो या फुलांमुळे. नेरुळला आता जिथे शनिचे मंदिर आहे तिथे आधी खुप मोठी बाग होती. आता अर्धीच उरलीय. तिथे या लिलीचे खुप मोठे बन होते. नेरुळमध्ये डिमार्टच्या पुढे जी लहान बाग आहे त्यातही हिचे खुप मोठे बन आहे.

सिडकोने नव्या मुंबईत हे बागा बनवायचे काम खुप सुंदर केलेय. नेरुळमध्ये लहानमोठ्या मिळुन कमीतकमी २५ बागा आहेत. आणि या केवळ पुर्वेच्या. पश्चिमेला मी जात नाही त्यामुळे माहित नाही, पण तिकडेही तलाव वगैरे खुप आहेत. आता माझ्या घराजवळच उरण रोडवर एक खुप मोठी बाग बनतेय. खारघरला सेंट्रल पार्क जे आहे तेवढे मोठे पार्क मुंबईतही कुठे नसेल.

सेंट्रल पार्कमधल्या अँफिथियेटरमध्ये १०,००० लोक बसु शकतात, अर्थात पाय-यांवर. अँफिथियेटरमध्ये. त्याची रचनाच तशी असते. आणि एवढे मोठे थेटर बागेचा एक लहान भाग आहे. यावरुन कल्पना करा बाग किती मोठी आहे ते. एका बाजुला संगित विभाग आहे. तिथे बागेतच ठिकठिकाणी खरी वाद्ये जसे तबला वगैरे ठेवली आहेत जी मुले संध्याकाळची बडवत असतात. आणि ही बाग अजुन in the making आहे. जेवढी उघडलीय तीच बघायला वेळ पुरेसा पडत नाही. उरलेली बाग अजुन बनतेयच.

नेरुळमध्ये बागा आहेत आणि त्या बागांमध्ये झाडेही छान आहेत. वर लिहिलेल्या शनी आणि अय्यप्पा मंदिराजवळाच्या बागेच्या मागेच मी राहात होते. तेव्हा बागेला बाग असे रुप नव्हते. पण एक प्रचंड मोठे पांढ-या लिलीचे बन, एक खुप मोठे मोग-याचे बन, एक कागडा/नेवाळीचे बन, एक कुंदाचे बन, एक अनताचे बन असे बरेच होते. प्रचंड मोठी बाग. गेल्या महिन्यात एका रविवारी खुपच उदास वाटायला लागले Happy असेच भटकत भटकत नेरुळला जिथे राहायचो तिथे गेले. आमच्या जुन्या घरी एवढे बदल केलेत की ओळखता येईना. मग मागची बाग बघितली. आता मस्त रुपडे दिलेय त्या बागेला. बनेही अजुन आहेत तशीच आहेत. मी नेवाळीची थोडी फुले तोडुन घेतली. फुलझाडांना कुंपणात बंदिस्त केले नाहीय. तिथे राहात होतो तेव्हा ऐशु ४ वर्षांची होती. तेव्हा अनंताचे बन तिच्यापेक्षा उंच होते. तिला झाडाखाली उभे करुन काढलेला फोटो अजुनही पाहते मधुन मधुन. आता ऐशु आली की परत जाणार तिकडे.

ज्या जागी आधी राहात होतो किंवा अन्य काही कारणांनी ज्या जागांशी संबंध आलेला त्या जागांना बराच काळ लोटल्यावर परत भेटुन काय काय बदल झाले आणि काय काय आहे तसेच राहिले हे पाहणे मला खुप आवडते. Happy

हे अँफिथिएटर.

amphi.jpg

ह्या बागांमुळे आणि तळ्यांमुळे मला नवी मुंबई मुंबईपेक्षा बरी वाटते. मुंबईतली तळी तर उरली नाहीतच आता.. बांद्राचे तळे आहे एक शिल्लक. पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे बागाही नष्ट झाल्यात. सांताक्रुझ पुर्व भागात तर आता एकही बाग जिथे मुलांना घेऊन जाता येईल अशी शिल्लक नाहीय.

आस | 10 March, 2011 - 13:40

अजुन एक दोन झाडे होती. पण नक्की नावे आठवत नाही आहेत.
एक जास्वंदीच्या कळीसारखेच पण लाल भडक फुले असणारे झाड होते.<<

हेच का ते झाड पण मलाही याचे नाव आता लक्षात नाही

jaswand.jpg

साधना नेरुळच्या बालाजी मंदीरात ते नविनच बांधले होते तेंव्हा मी गेले होते. आता परत जाऊन बघायला मलाही आवडेल.

माझ्या घरी कॉमन टेरेसवर दुधाचे मोठे ट्रे आणी कुंडीतुन बरीच झाडे लावली आहेत पण आता लाल मुंग्याचा खुप त्रास होतो आहे. काय करता येईल, सोसायटीत लहान मुले आहेत संध्याकळी टेरेस वर खेळायला येतात. त्यामुळे लवकर उपाय करावा लागेल.

कुंडीच्या बाहेर हिट किंवा तत्सम फवार. मी तरी लाल हिट मारते सगळ्यांवर. झाडांवर फवारु नकोस. मुंग्याची रांग कुठुन येतेय ते सहज कळते, बिचारे रांगेचा फायदा सर्वांनाच यावर विश्वास ठेवुन चालतात. तर आपण ती रांग कुठुन कुठे जातेय ते पाहावे आणि स्टार्ट व एंड दोन्ही ठिकाणी फवारावे. मला वाईट वाटते हे करताना पण काय करणार?? सगळीकडे भुतदया करायला गेले तर घर मुंग्यानी आणि झुरळांनी भरेल. तरी मी मारायच्या आधी त्यांना सांगते की बाबानो, मला माफ करा, मला तुम्ही दुसरा पर्याय ठेवलाच नाही त्यामुळे मी तरी काय करु......

साधना, अशी बने आणि थिएटर असताना, विरंगुळ्यासाठी काय हवे आणखी ? पारंपारीक अँफीथिएटरमधे ध्वनीव्यवस्था नसे, पण सर्वांना नाटक नीट बघता येत असे.
पण यात समोर पडदा नसल्याने काही प्रॅक्टीकल अडचणी येत. (म्हणजे नाटकात एखाद्याचा खून झाला, तर त्याला उचलून नेण्याची व्यवस्था करावीच लागत असे. )

पूण्याला का दिल्लीला आहे ते आठवत नाही, पण नैसर्गिक चड उतारांचा वापर करुन अशी एक जागा तयार केलीय, आणि तिथे प्रयोगही होऊ शकतात.)

या पांढर्‍या लिलीच्या जोडीने लाल केशरी लिली पण असायची. त्याकाळी बागेत लावण्यासाठी, भडक राणी कलरचा चिनी गुलाब, पिवळी पांढरी शेवंति, मोगरा वगैरे अगदी कॉमन होते.

सचिन ती जास्वंदच, त्याचेही आकार आणि रंगावरुन २ प्रकार आहेत.

बालाजी मंदिरासमोर ने रुळ गावकर्‍यांचा पाठिराखा '' झोटिंग'' देवाचं मंदिर आहे. तिथे घेतलेला हा माझ्या चिंगीचा ( कु.जान्हवी) फोटो. रांजणाच्या अहमदाबादी मेवा )झाडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे.

हे ते मंदिर.

a href="https://picasaweb.google.com/lh/photo/9utYoG_MqK2wAGtyYTstsbBe-WzhPYRFbp...">

हे बालाजी मंदिर.

अच्छा, म्हणजे बालाजीकडे जायच्या शॉर्टकटवर जे मंदिर आहे ते झोटिंग?? मला ते आधीचे बालाजी मंदिर खुप आवडायचे. आधी नविन मंदिराच्या मागच्या बाजुला पण जाता यायचे. तिथुन एनाराय एस्टेट दिसायची आणि मागची खाडी. आता तेही पॅक करुन टाकले. मी हल्ली ब-याच वर्षांनी बालाजी मंदिरात गेले तेव्हा जायच्या वाटेवर झालेल्या इमारती पाहुन प्रचंड मोठा धक्का बसला. Sad ८-१० वर्षांपुर्वी त्या टेकडीवर उंच झाडे होती आणि आज टॉवर्स Sad

मी हा मेवा खाल्लाय फक्त, झाड नव्हते बघितले. (नावावरुन तो अहमदाबाद वरुनच येत असावा असे वाटायचे.)
बाय द वे, झोटींग हि कोकणात पुर्वी सौम्य शिवी म्हणून वापरायचे. संगीत संशयकल्लोळ नाटकातील एका पदात (ह्रुदयी धरा हा बोध खरा ), संशय खट झोटींग महा, अशी ओळ आहे.

डॉक, साधना,सचिन
छान फोटो ...!
साधनाने केलेलं कौतुक बघुन मला आता एकदा तरी नेरुळला भेट द्यावीच अस वाटायला लागलयं.
Happy

लाल मुंग्यांसाठी मी कासवछापचे तुकडे करुन कुंड्यांमधे खोचुन ठेवते किंवा जळालेल्या गुडनाईटच्या वड्या!
एक्पायरी झालेल्या टॅबलेटस वगैरे चुरा करुन कुंड्यांमधे टाकाव्या. कॅल्शियम चा डोस! Happy

आर्या, ते कासवछाप पायरेथ्रम नावाच्या एका झाडापासून करतात. त्याचे पिक केनयात घेतात. शेवंतीच्या कूळातली वनस्पति आहे ती. शेवंतीसारखीच पांढरी फूले येतात तिला.

जर त्याने मुंग्या जात असतील, तर त्याचीही लागवड करता येईल. मागणी केल्यास मोठ्या नर्सरीत रोप मिळेल त्याचे.

आम्ही मलेरिया प्रतिबंधक धुरीकरणात पायरेथ्रम आणि किंग फॉग वापरतो. पायरेथ्रम हे एक चांगलं अँटी अ‍ॅडल्ट मस्किटो आहे.

डॉ. मी ओडोमॉस नावाचे पण एक झाड बघितले होते. त्याच्या पानाला अगदी ओडोमॉस क्रीमचाच वास येतो.
इथे आफ्रिकेत पायरेथ्रमच्या बरोबर आणखी पण काही झाडे (पाने) डासांच्या निवारणासाठी वापरतात. पण शहरी लोकांना त्याबद्दल सांगता येत नाही. जंगलातल्या माकडांना पण ती पाने माहीत असतात, ती पाने गोळा करून, ती माकडे अंगाला चोळतात !

इथे फ्लावर शो झाला मागच्या आठवड्यात, तिथनं लेमन क्यूकंबर ( लिंबाच्याचवीची काकडी ) च्या बिया आणल्यात. शिवाय सीड्स ऑफ इण्डिया नावाच्या साइटवरून गोंगूरा, लाल माठ, मायाळूच्या बिया मागवल्यात. सध्या घरातच बिया रुजवायचे प्रयत्न चालू आहेत. महिन्याभरात अंगणातली माती थॉ होइल मग बाहेर नेऊन लावीन रोपं .

पहिले डेफोडिल्स अन क्रोकसेस उगवायला लागले आमच्या इथे .

माकडे पाने अंगाला चोळून डासांपासून बचाव करतात हे मी पण वाचून आहे. पण विस्ट्रुत माहिती अजू मिळाली नाही.

पण शहरी लोकांना त्याबद्दल सांगता येत नाही. जंगलातल्या माकडांना पण ती पाने माहीत असतात, ती पाने गोळा करून, ती माकडे अंगाला चोळतात !
दिनेशदा,
एकदम पटलं बरं का !
अशा काही बाबतीत शहरी (गावाकडचीदेखील) माणसे नक्कीच अनपढ वागताना आपण तर पाहतोच !
Wink

पहिले डेफोडिल्स अन क्रोकसेस उगवायला लागले आमच्या इथे .

फोटो टाक ना मेधा इथे. मला डॅफोडिल्स खुप आवडतात. क्रोकसेस माहित नाही काय आहेत ते.

व्हीटीहून नरिमन पॉईंटला कोणी रोज जाते का? हल्ली एका प्रकारच्या झाडांना फिकट गुलाबी रंगाचा खुप फुलोरा आलेला दिसतोय. फुले पातळ, पारदर्शक आणि ट्यूब आकाराची आहेत. झाड बर्‍यापैकि उंच दिसते.

मी रोज ज्या रस्त्याने ऑफीसमधे येते त्या रस्त्यावर खुप ठिकाणी जांभळ्या रंगाच्या फुलांचे घोस फुलले आहेत. दुरुन ती झाड खुप सुंदर दिसतात. काही झाडांवर फक्त फुलचं आहेत. फोटो काढायची खुप इच्छा होते पण एकतर फुल खुप उंच आहेत आणि सकाळी ऑफिसची घाई असते, संध्याकाळी घरी जायची.

आणि माझ्या आजीच्या घरामागे एक प्रकारची रानटी झुडूपं होती. त्याला जांभळी घंटेच्या आकाराची फुल यायची. आम्ही त्यालम 'बेशरम' म्हणायचो. याची उंची साधारण ५ -६ फुट आणि कितीही तोडल तरी जोमाने वाढायच. कुणाला माहीती असेल तर सांगा याबद्दल.

हो! ही बेशरमची झाडे कितीही तोडली तरी येतात्...फार चिवट जात! पाणथळ जागी उगवतात. परंतु त्यांच्यापासुन अतिशय उपयुक्त असं किटकनाशक बनवतात असं ऐकिवात आहे.

अमि ते टॅबेबुया किंवा ट्रंपेट फ्लॉवर. त्या फूलांचा सडा पण पडतो रस्त्यावर. (इथे मायबोलीवर आहे लिहिलेले, त्याबद्दल)
स्निग्धा, ते झाड जकरांदा असेल, आणि त्या वेलीवरच्या जांभळ्या फूलांना घंटाळी असे पण नाव आहे. त्याची पाने पण सुरेख दिसतात. त्याचा एक प्रकार असतो, गुलबट जांभळा. त्याचे उंच दांडे असतात. त्या दांड्यांचा, रेडीओची एरियल म्हणून, उपयोग करता येतो, असे वाचले होते.

Pages