एका चंद्रासाठी..

Submitted by मी मुक्ता.. on 22 February, 2011 - 06:47

तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
आणि तोसुद्धा मला तुझ्याचसोबत वाटून घ्यायला हवा असायचा..
त्याला पूर्णत्व यायचंच नाही त्याच्याशिवाय माझ्यालेखी..
पण आता असं राहिलं नाही..
आधी मुद्दाम आणि आता सवयीनेच हे टाळतेय..
हल्ली माझ्या आभाळातली छोटी मोठी चांदणी पण
अपार कौतुकाने न्याहाळत असते मी..
शांतपणे त्यांचे कवडसे मुरवून घेत असते स्वतःमध्येच..
आणि हे सगळं होताना स्वतःमधले बदल पहात रहाते
त्रयस्थपणे...
आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..
पण आता सवय झालीये..
खरच सवय झालीये..
मान्य आहे तुझ्यासोबत असताना कवडसे जसे लखलखायचे
तसे आता नाही चमकत..
पण आता येणारा काळोखही फारसा अंधारा नसतो..
ते लखलखणं आणि त्या काळोखी गर्तांतले हेलकावे झेपेनासे झालेत..
माझ्या चुकार चांदण्यांचे किरण घेवून चालत असते मी आता..
खरंच..
तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...

गुलमोहर: 

मुक्ता -
तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
हे खूप छान वाटले ...!!

आवडली !
म. म. देशपांडेंची एक खुप जुनी कविता आठवली...
" तुला इतकी नक्षत्र कशाला हवीत?
मला काही त्यातली, तू देना..."
तू म्हणालीस,
"तुला सूर्य पुरे.
मला सारी नक्षत्रे हवी आहेत्,तुझ्यावर उधळायला
.... सूर्य नसला म्हणजे... "

प्रकाश, क्रांति, श्यामली,
खूप खूप आभार.. Happy

पंत,
लव्ह मॅरेज नाही पण कोणत्याही लव्हनंतर हे होतच ठराविक काळाने.. कदाचित मैत्रीत पण.. Happy

अमित,
Happy धन्यवाद..

अवल,
आभार.. छानच आहे ही कविता.. माहित नव्हती... Happy

"तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा.."

.... छान

UlhasBhide,
धन्यवाद.. Happy

रोहनजी,
खास आभार.. ब्लॉग वर प्रतिसाद दिलेले आपणच ना... Happy

व्वाह!

कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..

क्या बात है!!
सुंदर लिहितेस.. लिहित रहा.
खुप शुभेच्छा.

वैद्यबुवा, सहेलिजी.,
धन्यवाद.. Happy खूप आभार...

माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..>>>छान.

कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..>>>मस्त.

<<<पंत,
लव्ह मॅरेज नाही पण कोणत्याही लव्हनंतर हे होतच ठराविक काळाने.. कदाचित मैत्रीत पण.. <<<

मुक्ता एकदम पटेश..!!
एकदम सही वाटली .

<<आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..<<
<<तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...<<

मस्त मस्त! खुप आवडली. "तरुण वयातलं भन्नाट वेडेपण, भावनिक गुंतवणुक आणी त्यानंतर वयपरत्वे येणारा समंजसपणा, आपली वेगळी स्पेस वै. असं काहिसं वाटतय! Happy

Pages