मनाचे संक्रमण घडवणारा तिळगुळ....

Submitted by kalpana_053 on 13 January, 2009 - 18:55

मैत्रिणींनो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.....
मकर संक्रांतीच्या निमित्ताने एक आठवण झाली......
माझी स्वभावाने गरम असलेली मैत्रिण मला नेहमी म्हणते...... "ज्यांना गोड बोला म्हणून सांगावे लागते.... अशांना तिळगुळ द्यायचाच कशाला...... किंवा त्यांच्याकडून तो औपचारिकता म्हणून घ्यायचा तरी कशाला....?" तिच्या या बोलण्यात व्यावहारिक पातळीवर थोडसं तथ्य असलं तरी कुणावरही..... कोणत्याही कारणासाठी आयुष्यभर रागावून बसणं बरोबर आहे कां? माणसाला सुधारण्याची संधी द्यायला नको कां? वरील माझ्या मैत्रिणीप्रमाणे विचार करणं थोडसं नकारात्मक वृत्तीचं वाटतं...... खरंच या संक्रांतीच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या तिळगुळाने काय साध्य होत नाही? मैत्रीत थोडसं भांडण..... हे असतंच..... जीवंत मैत्रीचं ते एक लक्षण आहे...... पण त्याचे स्वरूप वाढत जाऊन..... त्याला जास्त उग्र स्वरूप येऊन जेव्हा सुसंवादाऐवजी विसंवाद सुरू होतो..... किंवा संवादच मिटतो.... तेव्हा मानसिक वेदना दोन्ही बाजूच्या व्यक्तीस होतात...... काही ठराविक काळ हे मतभेद मनांत घर करून बसतातही. पण काही काळाने खरंतर त्याचा विसरही पडतो. नंतर शिल्लक रहातो तो केवळ "इगो..... अहंपणा....."! अन् या इगोला जपण्यासाठी या भांडणाचा विसर पडत असला तरी विसर पडू दिला जातच नाही. मूळ भांडणाचा विषय रहातो दूर..... अन् मने पोखरली जातात रागाने..... हा राग मग कधी कधी शारीरिक अस्वास्थ्यासही कारणीभूत होतो..... खरंतर एखाद्या विषयानुरूप झालेल्या भांडणाला तो विषय संपला की विसरून जायला हरकत नसावी..... पण बर्‍याचदा तसे होत नाही.... मैत्रीप्रमाणेच कोणत्याही नात्याला ही गोष्ट लागू होते..... आणि म्हणूनच या सर्व भांडणांना मिटवून परत आनंदाने मैत्री करण्यासाठी, जुन्या मैत्रीला जोपासण्यासाठी...... नात्यांना उजाळा देण्यासाठी आहे हा संक्रांतीचा सण...... अन् या तिळगुळाचं आगळं वेगळं महत्व......! हा तिळगुळ एकमेकास दिल्यानंतर तिळगुळातील तीळ व गुळाप्रमाणे घट्ट मैत्री चालू ठेवण्याचाच जणू हा आपल्याला संदेश देत असतो. पूर्वीसारखी परत मैत्री चालू करण्यासाठी पारंपारिक सण संक्रातीने हे औचित्य सर्वांना छान बहाल केलंय. त्याचा निश्चितच उपयोग करून घ्यायला हवा. हा चार दाण्यांचा.... अन् पाच शब्दांचा तिळगुळ मनातील मळभ दूर सारून परत नव्या जोमाने मैत्री जोपासण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. याचा प्रत्यय अनुभवायचाय? अनेक दिवस न भेटलेल्या एखाद्या मैत्रिणीला एक फोन करून तर बघा..... विचारा तिला, "कशी आहेस तू....?" निश्चितच मिळेल बघा प्रेमाचा ओलावा.... गोडवा.....! थोड्याशा रूसलेल्या मैत्रिणीचा रूसवा या निमित्ताने काढून तर पहा..... दुपटीने प्रेम मिळेल तुम्हाला तिच्याकडून....... ही मैत्रिण रागावली होती...... यावर तुमचाच विश्वास बसणार नाही......! त्यासाठी लागणार नाही..... खूप मोठे पैसे..... धनदौलत...... लागेल तो फक्त मनाचा मोठेपणा..... अन् चार दाण्यांचा तिळगुळ......!बघा मग नव्या विणीने बनेल परत घट्ट अतुट मैत्री......!!!

गुलमोहर: 

कल्पनाताई,
तुम्हीच लिहील्याप्रमाणे "कोणत्याही नात्याला ही गोष्ट लागू होते.....". मग लेखाच्या सुरूवातीला फक्त मैत्रीणींनाच का बरं संबोधित केलं आहे?
असो. लेख आवडला...

छान लेख....
-----------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

कल्पना ताइ खरंच मस्तंय!!!!
........................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही Wink Happy