स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महामृत्यंजय मंत्राच्या शेवटच्या ओळीचा "मृत्योर्मुक्षिय मा अमृतात" या ओळीचा नक्की अर्थ हवाय. त्यातला मा (नको / नाही) नक्की काय सांगतो?

उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात

ज्याप्रमाणे पक्व झालेले फळ सहजपणे शाखेपासून विलग (मुक्त) होते, तद्वत (मला) मृत्युपासून मुक्त करून अमृतत्व प्रदान कर....

ढोबळ अर्थ दिलाय. जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच!

अश्विनी,
धागा छानच आहे.
फक्त संस्कृत लिखाणात बर्‍याच ह्रस्व-दीर्घाच्या आणि संधीविग्रह इत्यादीच्या चुका आहेत.
(अर्थात् श्लोक्/स्तोत्र म्हणताना भाव महत्वाचा हे मान्यच)
तरीही, योग्य तो शब्द म्हटला जाणंही महत्वाचं वाटतं.
चू.भू.दे.घे.

-चैतन्य

फक्त संस्कृत लिखाणात बर्‍याच ह्रस्व-दीर्घाच्या आणि संधीविग्रह इत्यादीच्या चुका आहेत.
(अर्थात् श्लोक्/स्तोत्र म्हणताना भाव महत्वाचा हे मान्यच)
तरीही, योग्य तो शब्द म्हटला जाणंही महत्वाचं वाटतं.
>>>>
१०८% खरं आहे. समोर बिनचूक लिहिलेलं असेल तर ते बघून टाईप करताना चुका होण्याची शक्यता कमी असते पण इथे लिहिणारे लोक कदाचित पाठ असलेलं देखिल लिहित असतील त्यामुळे या चुका झाल्या असतील. माझ्या तर खूपच असतील Happy
या व्याकरणातील चुकांबद्दल मी सपशेल ओक्साबोक्शी माफी मागते Happy

दत्तजयन्ती निमित्त मराठीत दत्तबावनी देत आहे.

जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रतिपाळ II
अत्रनुसये करूनि निमित्त II प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥
ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतासि तू आधार ॥
अंतर्यामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।। शांति कमंडलु करकमळी ॥
कुठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू निर्धार ॥
आलो चरणी बाळ अजाण ॥ दिगंबरा ,उठ जाई प्राण ॥
ऐकुनि अर्जुन- भक्ती- साद ॥ प्रसन्न झाला तू साक्षात ॥
दिधली ऋद्धि सिद्धी अपार ॥ अंती मोक्ष महापद सार ॥
केला का तू आज विलंब ॥ तुजविण मजला ना आलंब ॥
विष्णुशर्म द्विज तारूनिया ॥ श्राद्धिं जेविला प्रेममया ॥
जंभे देवा त्रासविले ॥ कृपामृते त्वा हांसविले ॥
पसरी माया दितिसुत मूर्त ॥ इंद्रा करवी वधिला तूर्त ॥
ऐसी लीला जी जी शर्व ॥ केली ,वर्णील कैसी सर्व ॥
घेई आयु सुतार्थी नाम ॥ केला त्याते तू निष्काम ॥
बोधियले यदु परशुराम ॥ साध्य देव प्रल्हाद अकाम ॥
ऐसी ही तव कृपा अगाध ॥ कां न ऐकशी माझी साद ? ॥
धांव अनंता पाही न अंत ॥ न करी मध्येच शिशुचा अंत ॥
पाहुनि द्विज पत्नीकृत स्नेह ॥ झाला सुत तू नि:संदेह ॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ॥ जडमुढ रजका तारी दयाळ ॥
पोटशुळी द्विज तारियला ॥ ब्राम्हण श्रेष्ठी उद्धरिला ॥
सहाय का ना दे अजरा ? ॥ प्रसन्न नयने देख जरा ॥
वृक्ष शुष्क तू पल्लविला ॥ उदास मजविषयी झाला ॥
वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने ॥ फळली झाली गृहरत्ने ॥
निरसुनी विप्रतनूचे कोड ॥ पुरवी त्याच्या मनिंचे कोड ॥
दोहविली वंध्या महिषी ॥ ब्राम्हण दारिद्र्या हरिसी ॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न क्षेम ॥ दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥
ब्राम्हण स्त्रीचा मृत भ्रतार ॥ केला सजीव , तू आधार ॥
पिशाच्च पिडा केली दूर ॥ विप्रपुत्र उठविला शूर ॥
अंत्यज हस्ते विप्रमदास ॥ हरूनी रक्षिले त्रिविक्रमास ॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ॥ दर्शन दिधले शैली नेक ॥
एकच वेळी अष्टस्वरूप ॥ झाला अससी , पुन्हा अरूप ॥
तोषविले निज भक्त सुजात ॥ दाखवुनि प्रचिती साक्षात ॥
हरला यवन नृपाचा कोड ॥ समता ममता तुजला गोड ॥
राम-कन्हैया रूपधरा ॥ केल्या लीला दिगंबरा ॥
शिला तारिल्या , गणिका , व्याध ॥ पशुपक्षी तुज देती साद ॥
अधमा तारक तव शुभ नाम ॥ गाता किती न होती काम ॥
आधि -व्याधि -उपाधि -गर्व ॥ टळती भावे भजता सर्व ॥
मूठ मंत्र नच लागे जाण ॥ पावे नर स्मरणे निर्वाण ॥
डाकिण ,शाकिण , महिषासूर ॥ भूतें ,पिशाच्चे ,झिंद असूर ॥
पळती मुष्टी आवळुनी ॥ धून -प्रार्थना -परिसोनी ॥
करूनि धूप गाइल नेमे ॥ दत्तबावनी जो प्रेमे ॥
साधे त्याला इह परलोक ॥ मनी तयाच्या उरे न शोक ॥
राहिल सिद्धी दासीपरी ॥ दैन्य आपदा पळत दुरी ॥
नेमे बावन गुरूवारी ॥ प्रेंमे बावन पाठ करी ॥
यथावकाशे स्मरी सुधी ॥ यम न दंडे त्यास कधी ॥
अनेक रूपी हाच अभंग ॥ भजता नडे न मायारंग ॥
सहस्र नामे वेष अनेक ॥ दत्त दिगंबर अंती एक ॥
वंदन तुजला वारंवार ॥ वेद श्वास हें तव निर्धार ॥
थकला वर्णन करतां शेष ॥ कोण रंक मी बहुकृत वेष ॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ॥ ऐकुनी हंसता खाइल मार ॥
तपसि तत्वमसी हा देव ॥ बोला जयजय श्री गुरूदेव ॥

।। श्री गुरूदेव दत्त ॥

नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन |
(ह्याचा अनुप्रास अतिशयच उत्तम आहे)

|| गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती |
श्रीगुरु दत्तराजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती |
ब्रह्मा-विष्णु-शंकराचा असे अवतार श्रीगुरुचा,
कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि-ऋषिचा,
धरिला वेष असे यतिचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा |
काशीक्षेत्री स्नान करितो, करविरि भिक्षेला जातो
माहुरि निद्रेला वरितो -
तरतरित छाटि, झरझरित नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती ||१||
ओवाळितो प्रेमे आरती ||
गाणगापुरी वसति ज्याची, प्रीति अवदुंबर छायेची,
भीमा-अमरसंगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची,
वाट दावुनिया योगाची, ठेव देतसे निजमुक्तीची,

(इथल्या मधल्या दोन ओळी आठवत नाहियेत.
कुणाला माहिती आहेत का? )

त्यासी करुनि नमन अघशमन होइल रिपुदमन
गमन असे त्रैलोक्यावरती ||२||

अवधुत स्वामि सुखानंदा ओवाळितो सौखकंदा
तारि हा दास हृदयकंदा सोडवी विषयमोहछंदा
आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरु ब्रह्मानंदा,
चुकवी चौर्‍याएंशीचा फेरा, घालिति षड्रिपु मज घेरा,
गांजिति पुत्र-पौत्र दारा-
वदवी भजन मुखी तर पुजन करितसे
सुजन जयाचे बलवंतावरती ||३||
ओवाळितो प्रेमे आरती ||

||सद्गुरुनाथार्पणमस्तु||

अमोघशिवकवचम -
ऋष्यादिन्यासः
ॐ ब्रह्मऋषये नमः शिरसि| अनुष्टुप छन्दसे नमः मुखे|श्री सदाशिवरुद्रदेवताय नमः हृदि|ह्रीं शक्तये नमः पादयो:|वं कीलकाय नमः नाभौ|श्रीं ह्रीं क्लीमीती बीजाय नमः गुह्ये|विनियोगाय नमः सर्वांगे|
अथ करन्यासः
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने ईशानात्मने अड्गुष्ठाभ्यां नमः|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने तत्पुरुषात्मने तर्जनीभ्यां स्वाहा|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने मध्यमाभ्यां वषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने वामदेवात्मने अनामिकाभ्यां हुम|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने सद्योजातात्मने कनिष्ठिकाभ्यां वौषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने करतलकरपृष्ठाभ्यां फट|
हृदयाद्यड्ग्न्यासः
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ ह्रीं रां सर्वशक्तीधाम्ने ईशानात्मने हृदयाय नमः|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ नं रीं नित्यतृप्तीधाम्ने तत्पुरुषात्मने शिरसे स्वाहा|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ मं रूं अनादिशक्तीधाम्ने अघोरात्मने शिखायै वषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ शिं रैं स्वतंत्रशक्तीधाम्ने वामदेवात्मने कवचाय हुम|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ वां रौं अलुप्तशक्तीधाम्ने सद्योजातात्मने नेत्रत्रयाय वौषट|
ॐ नमो भगवते ज्वलज्वालामालीने ॐ यं रः अनादिशक्तीधाम्ने सर्वात्मने अस्त्राय फट|
अथ ध्यानम
वज्रदंष्ट्रं त्रिनयनं कालकण्ठ्मरिंदमम्|सहस्त्रकरमत्युग्रम वन्दे शम्भुमुमापतिम||
ऋषभ उवाच
अथापरं सर्वपुराणगुह्यं नि:शेष्पापौघहरं पवित्रम| जयप्रदम सर्वविपद्विमोचनम वक्ष्यामि शैवं कवचं हिताय ते||
नमस्कृत्य महादेव विश्वव्यापीनमीश्वरम्|वक्ष्ये शिवमयंवर्म सर्वरक्षाकरम नृणाम||१||
शुचौ देशे समासीनो यथावतकल्पितासन:| जितेंद्रियोजितप्राण्श्चिंतयेच्छिवमव्ययम||२||
हत्पुण्ड्रीकान्तरसंनिविष्टं स्वतेजसा व्याप्तनभोवकाशम्|अतीन्द्रियंसूक्ष्ममनन्तमाद्यं ध्यायेतपरमानन्दमहेशम||३||
ध्यानावधूताखिलकर्मबन्धश्चिरं चिदानन्द्निमग्नचेता:|षडक्षरन्यासमाहितात्मा शैवेन कुर्यात कवचेन रक्षाम||४||
मां पातु देवोSखिलदेवतात्मा संसारकूपे पतीतं गभीरे|तन्नम दिव्यं वरमंत्रमूलं धुनोतु मे सर्वमघं हृदिस्थं||५||
सर्वत्र मां रक्षतु विश्वमूर्तिज्योतिर्मयानन्दघनश्चिदात्मा|अणोरणीयानुरूशक्तीरेकः स ईश्वरः पातु भयादशेषात||६||
यो भूस्वरूपेण्बिभर्तिविश्वं पायात स भूमेर्गिरीशो Sष्ट्मूर्ति:|योSपां स्वरूपेण नृणां करोति संजीवनं ससोवतु मांजलेभ्य||७||
कल्पावसाने भुवनानि दग्ध्वा सर्वाणि यो नृत्यति भूरिलीलः|स ककालरुद्रोवतु मांदवाग्ने र्वात्यादिभीतेर्खिलाच्च तापात||८||
प्रदीप्तविद्युतकनकावभासो विद्यावराभीतीकुठारपाणि:|चतुर्मुख्स्तत्पुरुषस्त्रिनेत्रः प्राच्यां स्थितं रक्षतु मामजस्त्रम||९||
कुठारवेदाड्कुशपाशशूल कपाल्ढक्काक्षगुणानदधान्|चतुर्मुखोनीलरुचिस्त्रीनेत्रः पायादघोरो दिशी दक्षीणस्याम||१०||
कुंदेन्दुशड्ख्स्फटीकावभासो वेदाक्षमालावरदाभयाड़कः|त्र्यक्षचतुर्वक्त्र उरूप्रभावः सससद्योधिजातोवतु मां प्रतीच्याम||११||
वराक्षमालाभयटड्कहस्तः सरोजकि़ज्ज्ल्क्समानवर्णः|त्रिलोचनश्चारूचतुर्मुखो मां पायादुदीच्यां दीशी वामदेव||१२||
वेदाभयेष्टाड्डकुश्पाशटंक कपालढक्काक्षशूलपाणि:|सितद्युति: पंचमुखोSवतान्मा मीशान उर्ध्वं परमप्रकाशः||१३||
मूर्धान्म्व्यान्ममचंद्रमौलि र्भालं ममाव्यादथ भालनेत्र:|नेत्रे ममाव्याद भगनेत्रहारी नासां सदा रक्षतु विश्वनाथ||१४||
पायाच्छ्रुति मे श्रुतीगीत्कीर्ति: कपोलमव्यात सततः कपालि|वक्त्रः सदा रक्षतु पंचवक्त्रो जिव्हां सदा रक्षतु वेदजिव्हः||१५||
कण्ठं गीरीशोSवतु नीलकण्ठः पाणिद्वयं पातु पिनाकपाणि:|दोर्मुलमव्यान्ममधर्मबाहु र्वक्षस्थलं दक्षमखान्त्कोव्व्यात||१६||
ममोदरं पातु गिरीन्द्रधन्वा मध्यं ममाव्यादमदनान्तकारी|हेरम्ब्तातो मम पातु नाभिंपायात कटि धूर्जटिरीश्वरो मे||१७||
उरुद्वयं पातु कुबेरमित्रोजानुद्वयं मे जजगदीश्वरोव्यात्|जड्घायुगं पुड्गवकेतुरव्यात पादौ ममाव्यात सुरवंद्यपाद||१८||
महेश्वर: पातु दिनादियामे मां मध्ययामेवतु वामदेव:|त्रियंबकः पातु तृतीययामे वृषध्वजः पातु दिनान्तयामे||१९||
पायान्निशादौ शशिशेखरो मां गड्गाधरो रक्षतु मां नीशीथे|गौरीपति: पातु निशावसाने मृत्युंजयो रक्षतु सर्वकालम||२०||
अन्तस्थितम रक्षतु शंकरो मां स्थाणु सदा पातु बहि:स्थितं माम्|तदन्तरे पातु पति: पशुनां सदाशिवो रक्षतु मां समन्तात||२१||
तिष्ठन्तमव्याद्भुवनैकनाथ: पायाद व्रजन्तं पप्रमथधिनाथः|वेदान्त्वेद्योवतु मां निषण्णं मामाव्ययः पातु शिवःशयानम||२२||
मार्गेषु मां रक्षतु नीलकण्ठ शैलादिदुर्गेषुपुरत्रयारि: अरण्यवासादिमहाप्रवासे पायान्मृगव्याधौदारशक्ति:||२३||
कल्पान्त्काटोपपटुप्रकोपः स्फुटाट्टहासोच्चलिताण्ड्कोशः|घोरादिसेनार्ण्वदुर्निवार महाभयाद रक्षतु वीरभद्र||२४||
पत्यश्वमातड्ग्घटावरुथ्सहस्त्रलक्षायुतकोटीभीषणम अक्षौहीणीनांशतमाततायिनां छिन्द्यान्मृडोघोरकुठारधारया||२५||
निहन्तु दस्युनप्रलयानलार्चिर्ज्वलत त्रिशूलं त्रिपुरांतकस्य शार्दूलसिंहर्शवृकादिहिंस्त्रान्संत्रायत्वीशधनु: पिनाकम||२६||
दु:ख्प्रदुश्शकुन्दुर्गतिदौर्मनस्दुर्भिक्ष्यदुर्व्यसन्दुस्सहदुर्यशांसि उत्पाततापवीष्भीतीमसदग्रहार्तिव्याधींश्च नाशयतु मे जगतामधीश||२७||

ॐ नमो भगवते सदाशिवाय सकलतत्वात्मकाय सकलतत्वविहाराय सकललोकैककर्त्रे सकललोकैकभर्त्रे सकललोकैकहर्त्रे सकललोकैकगुरवे सकललोकैकसाक्षिणे सकलनिगमगुह्याय सकलवरदप्रदाय सकलदुरितार्तिभंजनाय सकलजगदभयंकराय सकललोकैकशड्कराय शशांड्क्शेखराय शाश्वत निजाभासाय निर्गुणाय निरुपमाय नीरुपाय निराभासाय निरामयाय निष्प्रपंचाय निष्कलंकाय निर्द्वंद्वाय नि:संड्गाय निर्मलाय निर्गमाय नित्यरुपविभवाय निरुपमविभवाय निराधाराय नित्यशुद्धबुद्धपरिपूर्ण्सच्चिदानंदाद्वयाय परमशांत प्रकाशतेजोरूपाय जय जय महारूद्र महारौद्र भद्रावतार दु:खदावदारण महाभैरव कालभैरव कल्पान्तभैरवकपालमालाधर खट्वाड्ग्खड्ग्चर्म्पाशाड्कुश्दमरूशूल्चाप्बाण्गदाशक्तीभिन्दीपाल तोमरमुसलमुद्गरपट्टिशपरशुपरिघभुशुण्डिशतघ्नि चक्राआयुधभीषणकर सहस्त्रमुख दंष्ट्राकरालविकटाट्टहासविस्फारीत्ब्रह्मांडमंडल्नागेंद्रकुंडल नागेंद्रहार नागेंद्रवलय नागेंद्रचर्मधर मृत्युंजय त्र्यंबक त्रिपुरांतक विरुपाक्ष विश्वेश्वर विश्वरूप वृषभवाहन विषभूषण विश्वतोमुख सर्वतो रक्ष रक्ष मा ज्वल ज्वल महामृत्युभयपमृत्युभयं नाशय नाशय रोगभयमुत्सादयोत्सादय विषसर्पभयं शमय शमय चोरभयं मारय मारय मम शत्रुनुच्चाटयोच्चाटय शूलेन विदारय विदारय कुठारेण भीन्धी भीन्धी खड्गेन चीन्धी चीन्धी खट्वाड्गेन विपोथय विपोथय मूसलेन निष्पेषय निष्पेषय बाणै: संताडय सांताडय रक्षांसि भीषय भीषय भूतानि विद्रावय विद्रावय कूष्माण्ड्वेताल्मारीगण ब्रह्मराक्षसान संत्रासय संत्रासय माम्भयं कुरु कुरु वित्रस्तं मामाश्वासयाश्वासय नरकभयान्मामोद्धारयोद्धारय संजीवय संजीवय क्षुत्तुड्भ्यां मामाप्याययाप्यायय दु:खातुरं मामानन्दयानन्दय शिवकवचेन मामाच्छादयाच्छादय त्र्यंबक सदाशिव नमस्ते नमस्ते नमस्ते|

ऋषभ उवाच
इत्येत कवचं शैवं वरदं व्याहृतं मया|सर्वबाधाप्रशमनं रहस्यं सर्वदेहिनां||२८||
यःसदा धारयेन्मर्त्यः शैवं कवचमुत्तमम्|न तस्य जायते क्वपि भयं शम्भोर्नुग्रहात||२९||
क्षीणार्युमृत्युमापन्नो महारोगहतो Sपि वा|सद्यः सुखमवाप्नोति दीर्घमायुश्च विन्दति||३०||
सर्वदारिद्र्यशमनं सौमंगल्यविवर्धनं यो धत्ते कवचं शैवं स देवैरपि पूज्यते||३१||
महापातकसंघातैर्मुचते चोपपातकै:|देहान्ते शिववाप्नोति शिववर्मानुभावतः||३२||
त्वमपिश्रद्धया वत्स शैवं कवचमुत्तमम|धारयस्व मया दत्तं स्द्य श्रेयो ह्रावाप्स्यसि||४०||

इति श्रीस्कंदमहापुराणे एकाशीतीसाहस्त्रयांतृतीये
ब्रह्मोत्तरखंडे अमोघ शिवकवचं संपूर्णं|

> प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

अश्विनी, हे मात्र इतके ब्लॅक अँड व्हाईट नसते. प्रकाश व अंधार या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजु आहेत. बरेचसे तथाकथीत प्रकाशाचे उपासक हे ज्याप्रमाणे स्वत:च्या उन्नतीकरता उपासना करतात, त्याचप्रमाणे अंधाराचे उपासक देखील. त्या पण प्रार्थना इथे द्याव्या असे अर्थातच माझे म्हणणे नाही. पण अनेकदा कोणीतरी त्या प्रार्थना करते म्हणुनच इतरांना दूसर्‍या (प्रकाशमान्/प्राकशीत) प्रार्थनांची गरज भासते.

हो अस्चिग, अंधाराच्या उपासना ह्या स्वतः बरोबर आपसूकच उपासकाच्या आणि इतर लोकांच्या आयुष्यात वाईटाचीच पेरणी घेऊन येतात. ही उपास्य दैवतं परमात्म्याच्या सत्य, प्रेम आणि आनंद या तत्वांच्या पालनाला बांधलेली नसतात. ती उपासकाच्या काहीतरी मिळवण्याच्या हेतूमधे जर चुकीचे काही असेल तर अडथळा आणत नाहीत. आणि म्हणूनच ती, उपासनेत थोडीशी चूक झाली तर उपासकावरच उलटतात. कारण एकच, ती कुणाचं भलं करण्यासाठी नसतातच.

दुसरीकडे प्रकाशाच्या उपासना अशा उलटत नाहीत. कारण परमात्मा श्रद्धावानाच्या चुका आईच्या मायेने पोटात घालतो. शुद्ध दैवताकडे जर कुणी उपासना करुन 'सत्य प्रेम आनंद' यात न बसणारी गोष्ट मागत असेल तर ती मिळू शकत नाही. उपासक खरंच चांगल्या आचार विचार आहार विहारांचा असेल तर त्याला ते मागणे चूक कसे आहे ते कशाही रितीने दाखवले जाते. समजून चुकला तर ठीक, नाहीतर त्याला त्याचे कर्मस्वातंत्र्य वापरु दिले जाते पण परमात्मा स्वतःचा कायदा बदलत नाही. म्हणजेच परमात्म्याच्या इच्छेच्या प्रांतात रहायचे की कायद्याच्या हे ज्याच्या त्याच्या कर्मस्वातंत्र्य वापरण्याच्या स्वातंत्र्यावर अवलंबून असते.

ashwinee ani kiran ya doghancha 7 august 2010 cha sanvad vachala . mi civil engineer ahe . construction field madhe sudha barech vela ase hote ki pustaki dynanane 30 varshanni ekhadya building madhalya ekhadya column la nakki kay hoil te nishchitpane sangata yet nahi . aapan tar sarva vidynan pustakatunach shikalo . tyamule parameshwarache astitva manya karavech lagel .
- saurabh kulkarni 8805443041 .

घोर हा नको फार कष्टलो
निजहितास मी व्यर्थ गुंतलो
वारि शीघ्र संसारयातना
हे दयानिधे श्री गजानना |
(हे स्तोत्र पूर्ण आहे का कुणाकडे? एकूण २१ श्लोक आहेत.)
ह्यातला अजून एक श्लोक म्हणजे
गणपती तुझे नाम चांगले
आवडे बहू चित्त दंगले
प्रार्थना तुझि गौरिनंदना
हे दयानिधे श्री गजानना |

लहानपणी एक छान स्तोत्र म्हणायचो रोज झोपताना-

प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
प्रार्थना माझी ऐक एकवार |
चुका-खोड्यांची सांगु का तुला यादी?
क्षमा मिळण्याची मज असे आज संधी |
किती मानू मी उपकार तुझे देवा
दया-प्रेमाचा तू अससि योग्य ठेवा |
शरिर माझे किति छान तुवा केले
त्यात आरोग्य भरपूर ओतियेले |
विनंती माझी ऐकुनी एक घेई
आज रात्री मज झोप सुदे देई|
सोबतीला मम तूच इथे राही,
भिति मग मुळिच मला वाटणार नाही |

निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे |
अंबे जगदोद्धारिणि गे |
श्री महालक्ष्मी प्रणवरूपिणी,
मधुकैटभ-महिषासुरमर्दिनी
शुंभ-निशुंभासुरअसुवाहिनी
चित्सुखदायिनि गे ,अंबे चित्सुखदायिनि गे ||१||
स्वरूप लक्ष्यालक्ष्यधारि गे
उत्पत्ती-स्थिति-लयाकारिके
अनंत कोटि ब्रह्मांडनायिके
भवभयनाशिनि गे ,अंबे भवभयनाशिनि गे ||२||
हर्षे वासुदेव तुझिया पायी
निजशरणागत होउनि राही
नाम मुखी, हृदयि कीर्ति ध्यायी
पतीतपावनि गे अंबे पतीतपावनि गे ||३||
निजपद दर्शन दे जगदंबे जगदोद्धारिणि गे
अंबे जगदोद्धारिणि गे ||
||जगदंब नारायणी उदयो$स्तु||

वरील रचना बहुतेक वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची आहे.

अवांतर: (अवग्रहाचे चिन्ह कसे टंकायचे?)

अश्विनि के. आपन लिहिलेल लेख आनि इथे एकन्दरित चललेलि चर्चा अतिशय छान रन्गलि आहे, त्यबद्दल धन्यवाद!
दत्त बावनि या लिन्क वर हि देव नागरित आहे पि दि एफ फोर्म मधे दिलि आहे.
http://www.dycusa.org/eresources/prayers/DattaBaavani/HindiScriptDattaBh...

नृसिंहसरस्वती अष्टक

इन्दुकोटीतेज करूणासिंधु भक्तवत्सलम नंदनात्रिसुनूदत्तमिन्दिराक्षश्रीगुरूम
गंधमाल्याक्षतादिवृंददेववंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||१||

मायापाशंधकारछायादूर भास्करम आयताक्ष पाहि श्रियावल्लभेशनायकम|
सेव्यभक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||२||

चित्तजादिवर्गषटकमत्तवारणांकुशम तत्वसार शोभितात्म दत्त श्रियावल्लभम|
....................................... वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||३||

व्योमतेजवायूआपभूमीकर्तुमिश्वरम काम क्रोध मोहरहित सोमसूर्यलोचनम|
कामितार्थदातृभक्त कामधेनूश्रीगुरुम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||४||

पुन्डरीकाअयताक्ष कुंदलेंदुतेजसम चंड दुरितखंदनार्थ दंडधारिश्रीगुरुम|
मण्डलीक मौली मार्तंडभासिताननम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||५||

वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्तीश्रीगुरुम नादबिंदूकलातीत-कल्पपादसेव्ययम|
सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||६||

अष्टयोगतत्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधीम कृष्णावेणीतीरवासपंचनदी सेवनम|
कष्टदैन्यदूरीभक्ततुष्ट काम्यदायकम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||७||

नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तीकम हारकृत शारदेन गंगाधराआत्मजम|
धारणीक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||८||

परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्रदायकम नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत|
घोर संसारसिंधू तारणाख्य साधनम सारज्ञानदीर्घाअयुरारोग्यादिसंपदम|
चारुवर्ग काम्यलाभ वारंवारयज्जपेत|
इति श्री गुरुचरित्रांतर्गत श्रीनरसिंहसरस्वतीअष्टकसंपूर्णम|

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी
कडाडीले ब्रह्मांड डाके त्रिभुवनी
सुरवर नरनीशाचर ज्या झाल्या चरणी
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नी प्रसादे नभी ये कृतांता
जय देव जय देव

दुमदुमले पाताळ उठीला प्रतिशब्द
थरथरला धरणीधर मानीला खेद
कडालिले पर्वत उड्गण उच्छेद
रामी रामदासा शक्तीचा शोध
जय देव जय देव जय श्री हनुमंता
तुमचे नी प्रसादे नभी ये कृतांता
जय देव जय देव

सूर्यस्तुती

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं। नसे भूमी आकाश आधार काहीं। असे सारथी पांगुळा ज्या रथासी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।

करी पद्म माथां किरीटी झळाळी। प्रभा कुंडलांची शरीरा निराळी।। पाहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी। नमस्कार त्या सूर्य. ।।2।।

सहस्त्रद्वये दोनशे आणि दोन। क्रमी योजने जो निमिषार्धतेन। मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी। नमस्कार त्या सूर्य. ।।3।।

विधीवेध कर्मासि आधार कर्ता। स्वधाकार स्वाहाही सर्वत्र भोक्ता। असे अन्नदातां समस्तां जनांसीं। नमस्कार त्या सूर्य.।।4।।

युगे मंत्र कल्पांत ज्याचेनि होती। हरिब्रह्मरूद्रादी त्या बोल‍िजेती। क्षयांतीं महाकाळरूप प्रकाशी। नमस्कार त्या सूर्य. ।।5।।

शशी तारका गोवुनी जो ग्रहांते। त्वरें मेरू वैष्टोनियां पूर्वपंथें। भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी। नमस्कार त्या सूर्य. ।।6।।

समस्तांसुरांमाजि तूं जाण चर्या। म्हणोनीच तू श्रेष्ठ त्यानाम सूर्या। दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं। नमस्कार त्या सूर्य.।।7।।

महामोह तो अंधकारासी नाशी। प्रभा शुद्ध सत्त्वाची अज्ञान नाशी। अनाथा कृपा जोकरी नित्य ऐशी। नमस्कार त्या सूर्य.।।8।।

कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची। न पाहू शके शत्रु त्याला विरंची। उभ्या राहती सिद्धी होऊनि दासी। नमस्कार त्या सूर्य. ।।9।।

फळे चंदनें आणि पुष्पे करोनी। पुजावें वरें एकनिष्ठा धरोनी। मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी। नमस्कार त्या सूर्य. ।।10।।

नमस्कार साष्टांग बापा स्वभावें। करोनी तया भास्करलागीं ध्वावें। दरिद्रें सहस्त्रादि जो क्लेश नाशी। नमस्कार त्या सूर्य. ।।11।।

वरी सूर्य आदित्य मित्रादी भानू। विवस्वान इत्यादीही पादरेणू। सदा वांछिती पूज्य ते शंकरासी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।12।।

@ नानबा

> कडाडिले ब्रह्मांड डाके त्रिभुवनी

इथे डाके नसून 'धाके' त्रिभुवनी असे आहे (पाठभेदही असू शकतो)

> सुरवर नरनीशाचर ज्या झाल्या चरणी
चरणी नसूण 'पळणी' आहे.
-> ब्रह्माड कडाडलं, त्रिभुवन हलायला लागलं त्यामुळे सगळेच
सुरवर, नर, नीशाचर (म्हणजेच राक्षस) पळणी लागले- सैरावैरा पळू लागले असा अर्थ आहे.

> रामी रामदासा शक्तीचा शोध
शोध नसून बोध असावे (पाठभेदाची शक्यता)
पण एकूणात आधीचं कडवं आणि नंतरचं कडवं यातून मिळून रामदासास शक्तीचा (मारुतीच्या शक्तीचा) बोध झाला असा अर्थ योग्य वाटतो.

अजून एक म्हणजे
नभी ये कृतांता- म्हणजे कृतांत नभी येतो असा अर्थ नाही.
न भी (भिणे, घाबरणे) कृतांता-
मारुतिरायाच्या कृपाप्रसादामुळे मी कृतांताला (यमालाही) भीत नाही असा अर्थ.

धन्यवाद,
चैतन्य.

मला "पवमान सुक्त" आणि "अन्नपुर्णा स्तोत्र" MP3 Format मधे हवे आहे. कोणी देवु शकेल का?

ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी....

यावर्षी २ मार्चला महाशिवरात्र आहे. म्हणजे आता नंदीपक्ष चालू झाला आहे. ५, ११,... असं कितीही वेळा शिवपञ्चाक्षर स्त्रोत्र म्हणणे.

.

ते प्रमथनाथ असं आहे.
गौरीवदनाब्जवृन्दसूर्याय अशी संधी आहे.

खुपच छान , माझी बायको रोज करुनात्रीपदी पाठ करते तीला संपुर्ण मुखपाठ आहे मी पाठ करण्याचा प्रयत्न करत आहे.

Pages