केल्याने भाषांतर - प्रवेशिका ८ (मणिकर्णिका)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:20

मूळ साहित्याचे शीर्षक: Page d’écriture

लेखक: झॅक प्रीव्हेर ( Jacques Prévert )

भाषा: फ़्रेंच

-----

"बे दुणी चाssर
चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
"पुन्हा एकदा!" बाई म्हणतात
"बे दुणी चाssर
चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
.
.
पण या इथे मुलाला दिसतो
आकाशातून उडत चाललेला
एक गाणारा पक्षी
"एय! मला बाहेर काढ इथून.
खेळ नं माझ्याशी"
.
तेव्हा त्या मुलाशी खेळायला
गाणारा पक्षी खाली उतरतो.
"बे दुणी चार.."
.
"पुन्हा एकदा!" बाई म्हणतात
मूल पक्ष्यात दंग.
पक्षी मुलात दंग.
"चार आणि चार आssठ
आठ आणि आठ सोssळा"
"सोळा आणि सोळा?- काय चाल्लंय तिथे?"
"सोळा आणि सोळा-काही नाही बाई!"
"सोळा आणि सोळा-बत्तीस नाssही"
चाल्लंय आपलं त्यांचं..

आता मुलगा बाईंच्या नजरेपासून दूर
पक्ष्याला टेबलाच्या खणात लपवतो
आणि तेव्हढ्यात पक्षी गाऊ लागतो.
सारया मुलांना पक्ष्याचं गाणं ऐकायला येतं.
"आणि आठ आणि आठ?"
श्शू! आठ- तुम्ही वळा-चालू लागा
"आणि चार आणि चार
बे दुणे?"
तुम्ही गेलात तर बरे!
एक आणि एक -एक आणि दोन,
काहीसुद्धा करत नाहीत.
एक आणि एक सुद्धा
निमूट निघून जातात.
गाणारा पक्षी गातच राहतो.
त्याच्या स्वरात स्वर मिसळून ,
मुलगाही गातच राहतो.
आता मात्र बाई किंचाळतात,
"तुझ्या माकडचेष्ठा झाल्या एकदाच्या की.."
पण सगळी मुलं गाण्यात गुंग आहेत
आणि मग..
वर्गाच्या भिंती नि:शब्द गळून पडतात.
खिडक्यांची हुळहुळणारी वाळू होते,
आणि शाईचे होते झुळझुळणारे पाणी.
बाकांमधून बनतात वृक्ष,
खडूचा होतो उभा कातळ,
आणि पेन्सिलींची पेटी बनते,
पक्षी..
पुन्हा एकदा!

---
भाषांतर: मणिकर्णिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

कांदापोहे, कविता अशी आहे-

Deux et deux quatre
quatre et quatre huit
huit et huit font seize…
Répétez! dit le maître
Deux et deux quatre
quatre et quatre huit
huit et huit font seize.
Mais voilà l’oiseau-lyre
qui passe dans le ciel
l’enfant le voit
L’enfant l’entend
l’enfant l’appelle:
Sauve-moi
joue avec moi
oiseau!
Alors l’oiseau descend
et joue avec l’enfant
Deux et deux quatre…
Répétez! dit le maître
et l’enfant joue
l’oiseau joue avec lui…
Quatre et quatre huit
huit et huit font seize
et seize et seize qu’est-ce qu’ils font?
Ils ne font rien seize et seize
et surtout pas trente-deux
de toute façon
et ils s’en vont.
Et l’enfant a caché l’oiseau
dans son pupitre
et tous les enfants entendent sa chanson
et tous les enfants
entendent la musique
et huit et huit à leur tour s’en vont
et quatre et quatre et deux et deux
à leur tour fichent le camp
et un et un ne font ni une ni deux
et un à un s’en vont également.
Et l’oiseau-lyre joue
et l’enfant chante
et le professeur crie:
Quand vous aurez fini de faire le pitre!
Mais tous les autres enfants
écoutent la musique
et les murs de la classe
s’écroulent tranquillement
Et les vitres redeviennent sable
l’encre redevient eau
les pupitres redeviennent abres
la craie redevient falaise
le porte-plume redevient oiseau.

छान! Happy

'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता आला यातच खूप आनंद आहे.
ज्या दिवसाचे औचित्य साधून हा अनुवाद इथे लिहीला गेला तो 'मराठी भाषा दिवस' काल गाजत-वाजत संपन्न जाहला. Happy
झॅक प्रीव्हेर अजून काही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी याहून दुसरा चांगला दिवस कुठला असणार?
मराठी-फ्रेंच मैत्र मी पुढे चालू ठेवीनच, ठेवत आले आहे, पण मायबोलीवर तशी संधी उपलब्ध करुन दिल्याकरता संयुक्ताच्या संयोजकांचे आभार!