रंगीबिरंगी पनिर बुरजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 February, 2011 - 04:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनिर
लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन)
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१ ते २ मध्यम कांदे चिरुन
मटार अर्धा वाटी
कोथिंबीर थोडी चिरुन
मिठ
१ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस.
तेल
थोडा गरम मसाला

क्रमवार पाककृती: 

पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा. आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा. एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सिमला मिरच्या आख्या लागत नाहीत. प्रत्येकी अर्धी किंवा पाव मिरची बस होइल. बाकीच्या मिरच्यांची भाजी किंवा सुप करुन टाका.
बुरजी चविष्ट होते ह्यात शंकाच नाही. शिवाय मुल आवडीने खातात रंग बघुन.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला आता फोटो पाहुन रेसिपी बनउया.

ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या
panir.JPG

हे आहे कुस्करलेले पनिर
panir2.JPG

हे काही लागणारे जिन्नस
panir1.JPG

फोडणीला घातलेला कांदा, मिरची, मटार. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे.
panir3.JPG

मटार शिजल्यावर टोमॅटो घातला.
panir4.JPG

सगळ्या रंगित भाज्या घातलेल्या.
panir5.JPG

पनिर घालुन तयार झालेली बुरजी.
panir6.JPG

जागुटले, त्यात थोड चीज पण टाकायच एकदम तोंपासु. ब्रेडबरोबर पण मस्त लागते.
तुझी कृती मस्तच. Happy

जागू, प्रत्येक पायरीचा फोटो काढाण्याची तुझी कमाल आहे. असे फोटो पाहिल्यावर तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल Happy

आणि वर प्रत्येक सिमला मिरची अख्खी लागत नाही असे म्हणालियेस, मग ती भाजी ४-५ जणांना कशी पुरेल?

जागुतै मस्त.. यात थोडा टॉम सॉस घाला, किंवा टॉम-चिली मिळतो ना तो घालायचा... टोस्टेड सँडविच, रॅप्स साठी मस्त Happy

छान

जागू मला पनीर नाही आवडत आणि मासे मी खात नाही, पण तु टाकतेस त्या रेसिप्या आणि त्यांचे फोटो मात्रं मी मनापासून एन्जॉय करते. Happy
पाकृ आणि तुझी करण्याची पद्धत प्रचंड आवडते मला... Happy

दिनेश फोटू मस्त कि हो एकदम... पण वरून तुम्ही मिरपूड घातली आहे का?

वा वा. तों पा पा पा सु ....! मस्त रेसीपी..
रंगी बेरंगी भो.मि. म्हणजे अ‍ॅन्टी ऑक्सिडन्टस चा खजीनाच...!

दक्षिणा, मी वरुन तीळ आणि बेसिल घातले आहे. पनीर वगळूनही हा प्रकार करता येईल.
भाज्या प्रखर आचेवर परतल्यात, फार शिजवायच्या नाहीतच. खरे तर जागूच्या बुरजीपेक्षा हा फारच वेगळा प्रकार, मी आपला फोटो घुसडून टाकला !