भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस आईग बद्दल अनुमोदन. आता एवढी काही खास मिळत नाही तिथे भेळ, पापु.
पण गाड्यावर चाट खायची जी मजा आहे ती हॉटेलात टेबल्खुर्चीवर प्लेटमधे खाण्यात नाही. पाणीपुरी ही एक एक करुन तोंडाचा मोठ्ठा 'आ' वासुन खाण्यातच खरी गंमत आहे.

पुण्यात लक्ष्मी रोड वर शगुन चा चौक आहे.तिथे खेळीया दुकान आहे त्याच्या जवळ जो बोळ आहे तिथे मिळते बेडेकरांची मिसळ. (बहुतेक त्या बोळाला मुंजाबाचा बोळ म्हणतात.)

नी गल्ली चुकलीस की काय्??:हाहा:
पण चालुन जाईल इथे ही कमेंट कारण बर्‍याच लोकांना तिखट पाणीपुरी खाल्ली की नाकातोंडातुन धारा वहायला लागतात.

शुकु, वरचं वाच बरं.... बेडेकर मिसळीबद्दल चाललंय ते दक्षीच्या सर्दीबद्दल नाही..
तुझा राँग नंबर लागला बघ.. Happy

:जाऊ का नको या विचारातली भावली: >> दक्षे मला घेउन जा... मी संपवेण तुझी पण प्लेट Proud
१४ वर्ष पुण्यात असुन मला या प्रसिध्द मिसळी भेळी माहित नाहीत Sad

बेडेकर कडे जाताना टॉवेल घेऊन जाऊ? इतकी तिखट असते त्यांची मिसळ? >> नसते. रामनाथची खाल्ली तरच भोवळ येईल पण बेडेकर म्हणजे पुणेरी तिखट.कोल्हापुरकरांना काही होणार नाही. रामनाथला पण जा!

काटा किर्र् पण चांगली आहे. गरवारे कॉलेजसमोर अगदी छोटे दुकान पण मस्त!

जम्मूला गांधी सर्कलजवळ एका दुकानात 'पंचरंगी गोलगप्पे' मिळायचे. पाच वेगवेगळ्या चवीचे पाणी माठात भरून ठेवलेले असायचे. आपल्याला हवे तसे कॉम्बीनेशन घ्यायचे. Happy मस्त लागायचे Happy
लुधियानाला एक 'मुंबई पानीपुरी' नावाचे दुकान होते. प्रचंड गर्दी असायची. लोक लाइनमध्ये उभे राहून पापु खायचे. यम्मी पापु मिळायची तिथे. Happy

नॉर्थमध्ये महाराष्ट्रासारखी भेळ नाही मिळत. त्यात चाट मसाला घालतात आणि चव बिघडवून ठेवतात. Sad पण बठिंडाला आम्ही एक भेळवाला शोधून काढला. तो आधी मुंबईला चौपाटीवर भेळेची गाडी लावायचा. मग आम्ही त्याच्याकडून आपल्याला हवी तशी भेळ बनवून घ्यायचो. Happy

चंदीगडला सेक्टर १७ /२२ मध्ये टेस्टी कोरडी भेळ मिळते. पण तिथे ओली भेळ खायची चूक करू नका Proud

फिरोजपूरला सदर बझारमध्ये एक छोटे दुकान होते. तिथे आलूटिक्की मस्त मिळायची. अगदी मोठ्ठ्या पार्ट्यांमध्येही त्याचा स्टॉल असायचा.

ये रामनाथकडे मागच्या रविवारीच खाल्ली मी मिसळ Happy
भयंकर तिखट होती (हे पुणेरी नाही सार्वजनिक तिखट आहे) पण तिथल ताक आणि बटाटा भजी एकनंबर Happy
काटाकिर्र तर सवालच नाही. फक्त कुणाशेजारीही बसुन मिसळ खायची तयारी ठेवावी Lol
आमच्या इथे झालेली खासबाग मिसळ पण काही खास नाही Sad
रामनाथला पदार्थांची नावे मात्र मजेशिर आहेत. वर जाताना जिन्यात डोक सांभाळुन जावे ही नम्र विणंती. Happy

कोल्हापुरकरांना काही होणार नाही. रामनाथला पण जा!- केजो, दक्षी फक्त नावाला कोल्हापुरी आहे बाकी गुळखाऊ आहे नुसती Lol

Happy बरं मग गुळ घेऊन जा, रामनाथकडे मदत होईलच. पण बेडेकर एकदातरी खावी मगच रामनाथ किंवा मामी (म्हणजे ठाण्यातील मामलेदार मिसळ) ह्यांचे महत्व पटून येईल.

येथील चकलीच्या ब्लॉग वरील मसाल्याने पण मिसळ उत्कृष्ट होते. कैकवेळा अनुभव घेतला आहे. Happy

गोरेगावला जवाहरनगर मध्ये एक चाटच आणि कुल्फीच दुकान आहे.
पाणी पुर तर मस्तच बनवतो. मि तर तिथे ३ प्लेट पाणीपुरी पण खाल्लेली आहे.
जेवणाचा कंटाळा आला तर तिथे जाउन चाट हाणतो मग मस्त कुल्फीवर ताव मारतो.

मस्त धागा.

पण इथे नुसती दुकानाची लिस्ट न देता घरी या वस्तु बनवताना चटपटीत होण्यासाठी आवश्यक त्या टिप्स पण द्याना.....

बेडेकर ची मिसळ नसते एव्हडी तिखट.

मुंबई मध्ये एल्को मर्केटमधली पापु बेस्टच. त्याचप्रमाणे, फार पुर्वी नाना चौकातल्या शेट्टीकडे पण चांगली पापु मिळायची. पापुसाठी अजून ठिकाणं म्हणजे सायनच्या एसआयईएस कॉलेजच्या बाजुचा पापुवाला. नाव विसरलो त्याचं. आणि दुसरं ठिकाण म्हणजे चेंबुर कँप मधला झामूज्.

माटुंग्याच्या सिटिलाईट्च्या बाजुच्या गल्लीत चांगली भेळ मिळते.

ठाण्यात स्टेशनजवळच्या एका मार्केटमध्ये पापुच्या पुर्‍या खुप छान मिळतात. दुकानाचं नाव विसरलो. त्या दुकानात पापु सुद्धा मिळते. ती पण चांगली असते. मी ठाण्याहुन येताना, पापुच्या पुर्‍यांची पाकिटं न चुकता आणतो.

प्राधिकरणात, भेल चौकाच्या मागच्या गल्लीत पापुचं एक दुकान आहे. तिथे पापु, भेळ, रपॅ चांगली मिळते. त्या दुकानाच्या जस्ट बाजुला गुजराथी / राजस्थानी फरसाण चं दुकान आहे. तिथे फरसाण खुप चांगलं मिळतं. त्याच गल्लीत एका टोकाला दिल्ली स्वाद म्हणून एक हॉटेल आहे. तिथे संध्याकाळी गरमागरम रपॅ, गुलाबजाम, जिलबी वगैरे पदार्थ मिळतात. तोंपासू ................. Happy

पुण्यात मुंबईच्या मानाने इतकी चांगली भेळ / पापु मिळत नाही. पण त्यातल्या त्यात चांगली म्हणजे कल्पना भेळ, गणेश भेळ आणि लॉ कॉलेज कॅनॉल वरचा भेळवाला .................. Happy
आणि सपडप (SPDP) साठी वैशाली एनी टाईम रॉक्स ............. Happy

ठाण्यात स्टेशनजवळच्या एका मार्केटमध्ये पापुच्या पुर्‍या खुप छान मिळतात. दुकानाचं नाव विसरलो. >> टीपटॉप का?

ठाण्यात स्टेशनजवळच्या एका मार्केटमध्ये पापुच्या पुर्‍या खुप छान मिळतात. दुकानाचं नाव विसरलो. >>

अरुण, गावदेवी मार्केटातला 'शंकर' म्हणतोयस का तू?

अ.आ. शेवटची तुलना नॉट पटेश बर्का! Happy
असो बाकीची माहित नसलेली ठिकाणे धुंडाळली पाहिजे आता.
साउथ बॉम्बे पासून सुरू करत एकदा वेस्टर्न आणि एकदा सेन्ट्रल अशी सगळी भेळीय ठिकाणे चाखली पाहीजेत.
द मुंबई भेळ ट्रेल असं नाव द्यायचं का? Happy

साउथ बॉम्बे पासून सुरू करत एकदा वेस्टर्न आणि एकदा सेन्ट्रल अशी सगळी भेळीय ठिकाणे चाखली पाहीजेत. >>>>>>> यासाठी एक पेशल गटग झालं पाहिजे....... Happy

शेवटची तुलना नॉट पटेश बर्का! >>>>>> यासाठी पेशल संयुक्त गटग झालं पाहिजे ............ Happy

द मुंबई भेळ ट्रेल असं नाव द्यायचं का? >>>>>>>>>> नुसती भेळच का? पापु, रपॅ पण सामील व्हायला पाहिजेत. 'द मुंबई चाट ट्रेल' असं म्हणायचं का??????? Happy

पण इथे नुसती दुकानाची लिस्ट न देता घरी या वस्तु बनवताना चटपटीत होण्यासाठी आवश्यक त्या टिप्स पण द्याना....<<<< साधो, साधना साधो.... मी ह्यासाठीच उघडला हा धागा...

वेगवेगळ्या भेळी, चाट चे नवे प्रकार, चायनीज भेळ, बास्केट चाट, रगडा पॅटिस वगैरे च्या रेसिप्या, आयडियाज टाका ना प्लिज Happy

वेगवेगळ्या भेळी, चाट चे नवे प्रकार, चायनीज भेळ, बास्केट चाट, रगडा पॅटिस वगैरे च्या रेसिप्या, आयडियाज टाका ना प्लिज>>> त्या टाकाच पण कोणीतरी पुढाकार घेऊन गटगला खायला पण घाला एखाद दोन रेसिपीज त्यातल्या Wink Proud

ती बास्केट चाटची बास्केट(मनमीत वाल्यासारखी) कुणी घरी करून बघितली आहे का? असल्यास कृती द्याना.

राजेश भेळ मंडई जवळ..टोंमॅटो न घालता केलेली ही भेळ कधीही बाधत नाही.. रात्री ८ वाजता दुकान बंद याची मात्र आठवण ठेवा..

अरारारा......काय बुद्धी सुचली आणि ह्या धाग्यावर टिचकी मारली !!! आता पापु / रपॅ खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही.
एल्कोची पापु आवडणार्‍या सगळ्यांशी सहमत. मस्तच !
कॉलेजात असताना महिन्यातले किती दिवस आम्ही पापु-रपॅवर जगलोय, ह्याची गणतीच नाही.
जेजे हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत एक पापुभेपुवाला होता..म्हणजे असेल आत्ताही. तो पापु असली सॉलिड बनवायचा....आठवणीनेच कसंकसं व्हायला लागलंय.:फिदी: आणि नंतरची "सुखा पुडी" तर झक्कासच.
कॉलेज सोडताना शेवटच्या दिवशी त्याच्याइथे जाऊन मनसोक्त पाउ हादडून आलो होतो. आणि शेवटी एक प्लेट नुस्ती सुखा पुडी !
हिंदमाताबाहेर एक-दोन गाड्या असतात. आत भटकून झालं की इथे हप्ता ठरलेला. बर्‍याच वर्षात खाल्ली नाहीये. पण तेव्हा फार आवडायची.

काय एकेक जागा माहीत झाल्या भेळ-पाणीपुरी खाण्याच्या! कधीतरी जायचं जमवावं लागेल..
लोकांना खोटं वाटेल पण एकदा सन अँड सँड च्या बुफेमध्ये इतकी सह्ही शेवपुरी/दहीपुरी खाल्ली होती की तितकी परफेक्ट अजुन कुठेही खाल्लेली नाहिये. परफेक्ट चव आणि कुरकुरीतपणा Happy
इथे कुणी झालमुरी (भेळेचं बंगाली व्हर्जन) चे फॅन्स आहेत का? एखादी यशस्वी रेसिपी (प्रमाणासहित) द्या प्लीज Happy

माझी पाणीपुरीचं पाणी बनवण्याची कृती (मूळ साबांची कृती थोडी बदलेली ) :

पुदिन्याची ताजी पानं भरपूर, थोडी कोथिंबीर, थोडं आलं, थोडा लसूण, थोडा कांदा, मिरच्या, साधं मीठ, काळं मीठ (रॉक सॉल्ट) आणि लिंबू. लिंबू वगळता बाकी सर्व गोष्टी मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्या. लिंबू पिळावे आणि मग हवे तेवढे पाणी घालावे. एकदम चटकदार बनते. थंड करून आणखीनच छान लागते.

याबरोबर हिरवी चटणी (कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ) आणि लाल चटणी (लाल मिरच्या जरा वेळ भिजवून, लसूण, मीठ) मी घरी करते. आंबट्-गोड चटणी बरेचदा विकत आणते.

पाणीपुरीत घालायला मी रगडा (ऑप्शनल), मूग वाफवून, उकडलेला बटाटा, बुंदी असे बरेच प्रकार ठेवते.

Pages