भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा. वर कुणी तरी उल्लेख केलेली मामा भेळवाले ची मटकी भेळ अप्रतीम असते. मालाडला एम एम ची पाणीपुरी आणी ईतर सर्व चाट एकदम सही. आणी त्यानंतर त्यांची मलई मारके लस्सी म्हणजे स्वर्ग. मुलुंडला वेस्टला स्टेशन जवळ झुलेलालचं चाट, पाचरस्त्याला मांडवी दाबेली वाल्याची दाबेली,भाजी मार्केट मधे एके ठिकाणी थंड पाणीपुरी मिळते. फक्त बुंदी आणी तिखट पाणी असतं. गोड चटणी नाही. पण छान लागते. ईस्टला स्टेशन जवळ योगेश्वरीचा बटाटावडा, जुन्या वामनराव शाळेजवळ वरदलक्ष्मी बिल्डिंग मधल्या भय्याची भेळ आणी पाणीपुरी वर्थ ट्राईंग.

पाणीपुरीचा एक छान प्रकार माझी इंदोरी मैत्रिण करते. पाणीपुरी मसाला (तयार, कोरडा असतो तो)मिक्स केलेल्या पाण्याला हलकासा केवडा एस्सेन्स लावायचा आणि आईस्-कोल्ड ठेवायच. पुरीत काहीही दुसर नाही हे पाणीच भरूनच खायची. रेग्युलर फ्लेवरच्या चार्-पाच पापु खाल्यावर ही केवडा एस्सेन्स वाली पुरी मस्त लागते.

सही बाफ आहे हा! पुरीच्या किंवा पाण्याच्या रेसिपी सुद्धा आहेत का माबोवर?

काय माणस आहेत, नेमकी भुक लागलेली असताना असे बाफ काढतात.... आज संध्याकाळी घरी येताना पाणीपुरीच पॅकेट आणणार होतो, पण दुकानात एकच पॅकेट शिल्लक होते आणि ते सुध्दा फाटलेले म्हणुन दुकानदाराला नको म्हणालो आणि वडापाव वर आजची वेळ मारून नेली, आता हा बाफ दिसला....
रच्याकने माझ्याकडची पाणीपुरीची रेसेपी:
स्टफिंगः उकडलेला मध्यम बटाटा, खारी बुंदी (गार्डन किंवा हल्दीरामची मस्त मसाल्यासोबत मिळते), चाट मसाला
पाणी: २-३ हिरवी मिरची बी काढून, पुदीना ची १०-१५ पाने, पाणीपुरी/चाट मसाला एक टे.स्पुन गुळ, २ खजुर, १/२ टी-स्पुन चिंचेची पेस्ट.... हे साहित्य खलबत्त्यात बारिक करून मी गार पाण्यासोबत शेकरमधे बनवतो.... शेकरमधे या साठी कारण नंतर पुरीमधे भरायला सोप जात Wink

अशक्य छळ आहे हा बीबी Happy
पापु सगळ्यात जास्त आवडती ह्या सगळ्या प्रकारात. पुण्यात शुक्रवारात रतन सायकल मार्ट च्या चौकात एक भेळीचं दुकान आहे. नाव नाही आठवतं अजिबात. पण त्याकडे तो हिरवा खर्डा भेळेवर मिळतो तो अफलातून असतो.
बाकीची ठिकाणं लिहिलीच आहेत सगळ्यांनी. ठाण्याला प्रशांत ( ?) कॉर्नर आवडीचं.
इकडे एकदा एडिसन ला मुघल मध्ये लंच बुफे ला गेले असताना अनेक पदार्थांपैकी एक म्हणुन पापु होती. आणि भय्या स्टाईल बनवून देत होते. मी इतर एकही पदार्थ न खाता फक्त पापु खाल्ली होती. पुर्वी बॉस्टनच्या बॉम्बे क्लब ला पण पापु चांगली असायची. देशातल्या पापुशी कंपेअर न करता खाल्ली तर त्यातल्या त्यात बरी असं.

"कुठे काय मिळते" हे ज्या त्या गावाच्या ग्रूपमध्ये "खादाडी" धागा (आधीच काढला नसला तर) काढून लिहा की.
इथे कसं शोधणार ते? Sad

>>मला तर ब्रेकफास्ट , लन्च ,चहा च्या वेळी , रात्री कधीही चालते पाणीपुरी!
अगदी अगदी. पाणिपुरीला नाही म्हणणार्‍याला पाप लागते Happy
पाणीपुरीमध्ये माझा जीव अडकलेला असतो. पण मला भैय्याकडची रगडा असलेली सगळ्यात जास्त आवडते. जर नाहीच मिळाली तर बटाटा/बुंदी काहीही चालते.
ठाण्याला प्रशांत कॉर्नर मला नाही आवडत. मला असे वाटते पाणिपुरी वगैरे प्रकार बाहेर गाडीवर किंवा अगदी छोट्या दुकानात जास्त चविष्ट असतात. प्रशांत कॉर्नरपासुन जवळ एक ज्युसवाला आहे. त्याच्याकडे सगळेच चाट प्रकार छान असतात.

सेंट्रल माटुंगा स्टेशनातून बाहेर पडलं की रस्ता ओलांडून समोरच छेडाचं दुकान आहे. त्याच्या कॉर्नरला असलेला पापुवाला खुपच फेमस आहे. मस्तच असतात पापु. आणि तो केवळ पापु (आणि दहीशेवपुरी) बनवतो. एकदम फोकस्ड! Happy

F C रोडवर बहुतेल ब्रिटिश लायब्ररीच्या जवळ, एक पापुवाला मुलगा असे. भारी पापु. अजून असतो का माहिती नाही. फक्त पापुच्या चटण्यांचा मटका असे, आणि रगडा. मला खरं म्हणजे पापुत रगडा नाही आवडत, पण एकूण चव छान असे.

रत्नागिरीला थिबा पॉइंटवर बोन्द्रे काकूंकडची भेळ आणि मसाला कोन!!
काय जी चव असते त्याला तोड नाही!! मुद्दाम हे खायलाही आम्ही जायचो कॉलेज झालं की!!

गणेश भेळ, मनमीतचे बास्केट चाट, आईग्ग..! , कल्याण भेळ, पुष्करिणी भेळ!!
कसं होणार माझे??

आईग्गं मध्ये दही पुरी चाट फार अफलातून मिळते.. एमायटीत असतानाचा रोजचा खुराक तिथला.. Happy
सरदवाडी माझा नवरासुद्धा (माझ्या) सासरी जाताना तिथे थांबतो. आता सवयीने मीही थांबते.. चांगली असते कोरडी भेळ. पण मुळात कोरडी भेळ खूप्शी आवडात नाही..

हा छळ आहे पण. आता करावीच लागेल भेळ.. Sad

आईग्ग... नावाची जागा आहे? मला वाटलं तू आठवणीने विव्हळत्येस. Proud

प्रॅडी, मुलुंड वेस्टमधली जनता भेळ नाही लिहिलीस.

अजुन एक (बे करांना माहित असेल ).
फ्रिमॉन्ट च्या कॅश अ‍ॅन्ड कॅरी चाट काउंटर वर भेळ गार्निश करताना सोललेल्या (क्रिस्पी )आल्याचे लांब सळया स्टाइल तुकडे पण घालतात, सही लागतं फार.

बहुदा पुणेकर धरून हाणतील मला पण लिहितेच. पुण्याला शिकायला असताना वैशालीच्या SPDP साठी अगदी जीव टाकत जायचो तिकडे. मागच्या भारतवारीत अगदी नॉस्टॅलजिक होऊन मी आणी माझा नवरा वैशालीत गेलो SPDP खायला आणी ह्यासाठी आपण का बरं ईतका जीव टाकायचो ???? असा प्रश्णच पडला. वाढत्या महागाईने रेट्स (५० का ६५ रु.) बघून पण डोळेच फिरले. बाकी कल्पना भेळ ला अनुमोदन. पुढच्या वारीत कल्याण भेळ ट्राय करायला हवी. मनमीत ची एक शाखा सारस बागे जवळ होती. मला वाटतं "पुढारी" च्या बिल्डिंग मधे. २०००-२००१ च्या सुमारास खरंच छान होती तिथली टेस्ट.

हेहे.. वर येऊन गेले की नाव एकदा आईग्गंचे..
मस्तय छोटंसं.. कॉलेज मध्ये परवडायचे.. आत्ता कसे आहे माहित नाही..

मला पण वैशालीची एस पी डी पी ओव्हर हाइप्ड वाटते, फार गोड करतात !
भेळ चाट खायला स्पेशल चाट गाड्या/स्टॉल्स/ दुकानं च च हवीत :).

सरदवाडीच्या भेळेचा दर्जा आता पूर्वीइतका चांगला वाटत नाही. मागच्या आठवड्यात खाल्ली तेव्हा तर फरसाणला जुनाट वास येत होता.
कल्पना भेळ मस्त आहे.. कल्याण भेळेचे मात्र नाव आणि किंमत दोन्ही जबरी आहे; परत भेळेत शेंगदाणे अती असतात अगदी

पुण्यात कँपमध्ये हनुमान मंदिराच्या बाहेरची पापु पण मस्त असते.
बस्के, 'आई ग!' मध्ये जेव्हा त्या काकु करायच्या तेव्हा सगळे मस्त असायचे आता दर्जा खालावलाय.

पुण्यात ही बेडेकरची मिसळ मिळते कुठे? Uhoh ठिकाणाचा पत्ता सांगावा कृपया.. फार इच्छा होतेय खायची..

वरती पुण्यातली भेळेची सांगितलेली ठिकाणं आहेत त्यांना अनुमोदन... त्याशिवाय आमच्या कर्वेनगरात मनिषा भेळ मिळते, ती पण सॉलिड.. इतकी की तिथल्या गणेश भेळ वाल्यांच्या आऊटलेट्सना मागे टाकलंय.. मनिषाची पापु तर तोंपासु Happy
मनिषाची एक शाखा कोकण एक्प्रेसच्या गल्लित पण आहे, तिथे अजिबात गर्दी नसते.

दुसरं ठिकाण म्हणजे स्वारगेट ला जाताना सारसबागेच्या समोर संतोष भेळ मिळते. ती ही सुरेख असते... भरपूर दाणे आणि फरसाण.. Happy अप्रतिम..

पुण्यात कँपात क्लोव्हर सेंटरच्या बाहेर एक माणूस कळकट्ट हातानी एक कोरडी भेळ करून देतो... १५/२० रू. असते किंमत.. खाल्लेय का कधी कुणी? Uhoh
सॉलिड असते अगदी.. मी गेले की खातेच.... भरपूर असते आणि.. त्यामुळे एकात दोघांनी खाल्ली तर घरी जाऊन जेवू शकतो.

Pages