सॅलड, कोशिंबिरी, रायते फॅन क्लब

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29

येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे! Happy

आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!

तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.

सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह्हा..मस्त धागा अकु.
मी ऑलमोस्ट रोज करत असलेलं सलाद
मुळा,काकडी,कांदा,सॅलड लीव्स,कॅप्सिकम ,पातळ लांब लांब चिरून,त्यात मिरपूड,लिंबाचा रस,मीठ, बेसिल लीव्स,थाईम , चिमुटभर ओरिगॅनो भुरभुरून नीट मिक्स करावे. सलाद तैय्यार.

बुंदी रायता
घट्ट दह्यात मीठ,काळं मीठ,चाट मसाला,भाजलेल्या जिर्‍याची पूड,तिखट,कोथिंबीर,साखर (ऑप्शनल).
आयत्या वेळी बुंदी अ‍ॅड करून वरून एक टीस्पून भर तूप जिर्‍याची फोडणी घालावी.

इथे एकदा एका समारंभात राईस क्रिस्प्स/राईस बबल्स (आपले चुरमुरे) चा रायत खल्ल होत. बुंदीच्या ऐवजी चुरमुरे घातले होते... लागदा झाला होता अगदी..

असं रायत करायच असेल तर नुसतं चा म, मीठ, जीरेपुड इ. घालुन दही एका भांड्यात तयार ठेवायचे, बाकी बोल्स मधे चुरमुरे, मोठ्या गाठ्या, कांदा, टॉमेटो, कोथिंबीर, मिरची ठेवायचे...आणि मग आयत्यावेळेला ज्याला हवे तसे 'मेक युअर ओन दहीभेळ सॅलॅड' करायचे Happy मी तर त्यावर चिंचेची चटणी पण घालणार Happy

भेळ नाहीये काही ही Proud रायत म्हणुनच सर्व केल होतं... अर्थात त्यात कांदा टॉमेटो नव्हते म्हना Wink

आपण त्याला "मेक युअर ओन दही-बबल सॅलॅड" म्हणु. आणि हव तर त्यात थोडी भिजलेली मटकी/मुग/मसुर घालु किंवा काकडी, कॅप्सीकम घालु... हाकानाका Lol

दह्यामध्ये बारीक चिरून कांदा, मेतकूट, कोथींबीर, मीठ, साखर, आणि हिरवी मिरची घालायची. वरून हिंग, मोहरी, आणि थोडं लाल तिखटाची फोडणी घालायची. फुलक्याबरोबर, किंवा खरं तर कशाबरोबरही मस्त लागतं.

मी हाताशी असेल त्याच्या कोशिंबीरी, रायते करते.

१) पालेभाजी (पालक, मेथी,) बारेक चिरुन त्याच्या निम्मा कांदा बारिक चिरुन, लाल तिखट १ चमचा, चवीनुसार मीठ. सगळ एकत्र कालवुन त्यावर हिंगाची हळद घालुन फोडणी वाढताना लिंबु पिळुन.

२) कोबी/ फ्लॉवर किसुन १ वाटी, मिरच्या ठेचुन २, चवीपुरते मीठ, कसुरी मेथी १ चमचा, भरपुर कोथिंबीर्, लिंबाचा रस. कोबी/फ्लॉवर उकळत्या पाण्यातुन काढायचा, त्यात ठेचलेल्या मिरचीचा ठेचा, कसुरी मेठी कुस्करुन, कोथिंबीर, मीठ घालुन चांगले हाताने कालवावे. वरुन जिरे मोहरीची फोडणी घालावी. लिंबाचा रस मिसळुन वाढावे.

३) कच्ची पपई/पायनापल/ हिरवे सफरचंद बारीक चिरुन, मीरपुड, साखर, मीठ चवीनुसार, साईचे दही.
साईचे दही चांगले फेटुन त्यात साखर मीठ घालावी. आयत्यावेळी फळांच्या फोडी घालुन मिरपुड भुरभुरुन खायला द्यावे.

४)पापड भाजुन ५-६, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव, लालतिखट, मीठ चवीप्रमाणे. पापड सोडुन सगळ चांगल मिक्स करावे. वाढत्यावेळी पापडाचा जरा मोठा चुरा मिसळुन वाढावे.

५) फ्लॉवर/गाजर चे बारेक चिरलेले तुकडे, लोणच्याचा खार, साखर थोडी, मीठ, गरम तेल, लाल तिखट. फ्लॉवर गाजराच्या तुकड्यांना लोणच्याचा (आंब्याचे लोणचे) खार चांगला चारी बाजुंनी लावावा. त्यावर मीठ (कमीच घाला खारात असते) साखर टाकुन वरुन तेलाची फोडणी द्यावी (गरम तेलात लाल तिखट टाकुन). दिसायला लाल जर्द पण वरण भात किंवा दही भाताबरोबर एकदम तोंपासु.

६) गाजर किसुन एक, टोमॅटो बारीक चिरुन एक, कोथिंबीर बारिक चिरुन, तिखट, मीठ चवीनुसार मिसळुन वरुन हिंग व वाळवलेल्या मिरच्यांची फोडणी. इथे गाजरा ऐवजी कोबी पण वापरु शकतो.

७) मुळ्याचा कीस १/२ वाटी, भिजवुन वाटलेली हरभर्‍याची डाळ १ वाटी, मिरच्या ठेचुन २-३, मीठ, हळद. सगळ मिक्स करुन वरुन जिरमोहरीची हळाद घालुन फोडणी.

८) लाल भोपळा वाफवलेला (फोडी करुन :हाहा:) साईचे दही, साखर मीठ, मेथ्या/कसुरी मेथी, लाल मिरची वाळलेली. साईचे दही फेटुन त्यात साखर मीठ घालावे कसुरी मेथी असेल तर कुस्करुन आणि मेथी दाणे असतील तर फोडणीत घालुन टाकावेत. लाल मिरची कुस्करुन सगळे एकत्र करावे.

बाकी आठवेल तस लिहिते.
मला हे सगळे मिनोतीचे ड्रेसिंगचे प्रकार खरतर खुप मनापासुन शिकायचे आहेत. पण आमची मजल मेयोनीज्च्या पुढे जात नसल्याने आणि बडी बुढी कितपत प्रतिसाद देतील हे माहित नसल्याने (मुळात आपल्याला जमेल हा ते सगळ हा प्रश्न असल्याने :हाहा:) आत्तापर्यंत कधी केले नाहीत पण आता इथे वाचल्यापासुन वाटतय जास्त अवघड प्रकरण नाहिये. Happy

मिनोतिने लिहिलेला पालेभाजीचा खुडा लिहिणार होतो. मी त्यात फक्त मेथीची पानेच घेतो (बाकिची कुठे मिळायला ?) त्यात टोमॅटो, दाण्याचे कूट, मीठ आणि तेल. एकदा चौफुला जवळ हा प्रकार खाल्ला होता, त्यावेळी मेथी चक्रीफूलाच्या फोडणीवर परतली होती. तो पण प्रकार मस्तच.

कोसंबरी सारखाच प्रकार मी मूळा वापरुन करतो. मूळा बारिक किसून घ्यायचा. त्याला मीठ लावायचे आणि त्यात कोरडी भाजलेली मूगडाळ घालायची. त्या पाण्यात ती भिजते. वरुन दही वगैरे.

भारतात मिळते ती मावळ काकडी वापरुन एक मस्त प्रकार. हिरव्या मिरच्या मीठ लावून बत्त्याने ठेचायच्या. मग त्यात मावळकाकडीचे उभे तूकडे घालायचे आणि त्यात खडा हिंग पूड करुन टाकायचा. मस्त प्रकार. काकडिचा कायरस पण अत्यंत आवडता प्रकार, पण तो या बीबीच्या कक्षेत बसत नाही.

मस्त बाफ आहे. वाचून फ्रेश वाटलं अगदी Happy
घट्ट दही/ चक्क्यात सगळी फळं घालूनही मस्त सॅलड/ डेझर्ट होतं.
पास्ता सॅलडही खूप आवडतं.
चिकन, अननस, कोबी आणि मेयो घालून फार भारी नॉनव्हेज सॅलड होतं.
बाकी, मूग, कोबी, टमॅटो, काकडी, बीट, गाजर- सर्व सॅलड/ कोशिंबीरी आवडत्या.

सह्हीच! अगदी तोंपासु.
नेहमीची कांदा टमाटा कोशिंबीर आणि खमंग काकडी माझा जीव कि प्राण आहे.

तरला दलालची एक झकास पाकृ.
काबुली चणे रात्रभर भिजवुन आणि मग शिजवुन घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा घालायचा.
दही (शक्यतो आंबट नको. आंबटच आवडत असेल तर ठीके), कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, जिरेपुड हे सगळं मिक्सर/ बिटर नी मस्त मिक्स करायचं मग चण्यांवर ओतायचं. मीठ आणि आवडीप्रमाणे मिरपूड घालुन छान मिक्स करायचं. हवीच असली तर हिंग, जिर्‍याची तुपातली फोडणी घालायची की झालंच तयार!
जेवणाऐवजी एक वाडगाभर हे सॅलड खाल्लं तरी गारेग्गार!

बर्‍याच नाविन रेसीपीज मिळतायत. जमे रहो लोक्स.

काय छळ चाललाय नुसता.. एव्हड्या छान छान कोशिंबीरी असतील तर नुसती कोशिंबीर पण चालेल Happy

आईग्गं....तोंपासु धागा. मीसुद्धा कोबीच्या कोशिंबीरीबद्दल लिहायला आले होते. पण ही रेसिपी वर आधीच लिहिलेली आहे. डाळिंबाचे दाणे घालून तर मस्तच लागते.
मला एक शंका आहे......टिनमधली प्रिझर्व केलेली फळे आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत ? ( हा प्रश्न जरा अस्थानी आहे....पण इथे 'पाककृती आणि आरोग्य' ह्यातली मातब्बर मंडळी दिसत आहेत, म्हणून इथे विचारत आहे. मला इथे केळी, संत्री आणि सफरचंद सोडून विशेष काही मिळत नाही. Sad मग कोशिंबिरीत घालायला आवडते डाळिंबाचे दाणे वगैरे कुठून आणायचे ? )

खूप उशिरा आले या बाफवर. एकादे वेळी हे सॅलड रिपीट झालं असेल.
माझ्या बड्डेला लेक ५ स्टार हाटेलात घेऊन गेला . तिथे वॉल्डॉर्फ सॅलड होतं. खाऊन पाहिलं. मग खूपच खाल्लं कारण खूप आवडलं आणि कुठेही बाहेर गेल्यावर सॅलड/ कोशिंबिरींवर मी पोट भरते(आवडीने).
तर इतकं अवघड नाव असलेल्या सॅलडमधे अंदाजाने काय काय असेल याचा विचार करून घरी केलं.
खूप मस्त झालं.
सफरचंदाची सालं काढून मोठ्या फोडी करणे. त्यात आक्रोडाचे तुकडे घालणे. हे सर्व टांगलेलं दही(चक्का)+ मीठ + साखर + मिरपूड + क्रीम(हे ऑप्शनल)यात कालवावे.
किंवा सफरचंदाच्या फोडी आणि आक्रोड हे थोडे क्रीम आणि मेयॉनीज यात मिक्स करणे. (मला मेयॉनीजला कधी कधी अंड्याचा वास येतो म्हणून मी टाळते)
घरी बर्‍याच वेळा हे करते ---
मूग मोड आणून, थोडे शिजवून+ शिजवलेले बिटाचे बारिक तुकडे+बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो+कोथिंबीर+डाळिंबाचे दाणे+मीठ, साखर, चाटमसाला.
कधी बदल म्हणून डाळिंबाचे दाणे कॅन्सल करून उरलेल्या पदार्थांच्या सॅलडवर अगदी थोड्या तेलाची मोहोरी,हिंग, मिरचीची फोडणी द्यायची. मस्त!

मन्जू, मी देसी पद्धतीने- टमॅटो किंवा व्हाईट सॉसमध्ये करते. पण गूगल करता ही साईट सापडली.

http://www.pasta-recipes-made-easy.com/index.html
इथे ऑथेंटिक रेसिपी आहेत. आपण भारतीय वाटतील असे योग्य बदल करून करू शकतो.

रताळ्याचे अर्धा सेमी जाडीचे काप करायचे. पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. मग ते ठेचून घ्यायचे.
त्याबरोबर मिरच्या ठेचायच्या. मीठ आणि लिंबूरस. हवा तर दाण्याचा कूट. हा प्रकार ओल्या खोबर्‍याच्या चटणीसारखा लागतो. साबुदाणा वडा वगैरे प्रकाराबद्दल मस्त लागतो. आणि जास्तच खाल्ला जातो.

नल राजाला (नल दमयंती वाल्या) उष्णतेशिवाय जेवण तयार करायचे तंत्र माहीत होते. बहुतेक सलादच खात असावा.

रुणूझुणू, एखाद्या पाककृतित हवीच असतील (खूपदा अननस टिनमधला वापरायला सांगितलेला असतो.) तर टिनमधली फळे वापरावीत. पण त्यात अतिरिक्त साखर असल्याने शक्यतो नकोच. ताज्या फळांना पर्याय नाहीच. सगळीच फळे सगळीकडे नाही मिळणार. पण मोसमात जी मिळतील तिच खावीत. सुकवलेली फळे पण तितकी वाईट नाहीत.

मस्त धागा... कोशींबीर माझ्या आवडीची Happy
माझ्याकडून पण....

मोड आलेले चणे (हिरवे किंवा लाल) + मोड आलेले मूग , मटकी कुकरमध्ये एक शिट्टी करून वाफवलेले+ कांदा+ मिरपूड ( किंवा थोडी मिरची पावडर ) +कोथींबीर्+लिंबू+ मिठ / चाट मसाला + खायच्या वेळी लिंबू

कच्चे बीट किसून ते थोड्याश्या तुपात जिर्‍याची फोडणी घालून परतायचे आणि मीठ मस्त लागत Happy

वाफावलेले मक्याचे कोवळे दाणे+थोडे बटर्+कांदा+किसलेले गाजर्+कोथिंबीर्+मीठ्/ चाट मसाला + घट्ट दही Happy

कच्चा कोबी बारीक चिरलेला + कांदा+ टॉमेटो + मिरची + कोथिंबीर +मीठ + लिंबूरस

मला कोशींबीर आणि रायत यात थोड कन्फ्युजन आहे.
पदार्थात दही फेटून घातले की ते रायत का?
मला बुंदी रायत माहित आहे. शिमला मिरचीचे रायत , पालकचे रायते कसे करतात ?

अहाहा! काय एकेक तोंपासु प्रकार सांगितलेत सगळ्यांनी! मस्त रे मस्त! आता हा अख्खा उन्हाळा ह्या सर्व सॅलड्समुळे छान जाणार!

माझ्याकडून अजून एक प्रकार : काकडी, लाल मुळा, पांढरा मुळा, गाजर यांचे लांबट उभे तुकडे करून फ्रीजमध्ये थंडगार करायचे. ३ - ४ वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांचे डिप्स तयार करून ते डिप्स बोल्समध्ये ठेवायचे. (उदा : पुदिना चटणी + दही चा डिप, टोमॅटो-लसूण-गूळ-जिरे-मीठ चटणी वरून फोडणी चा एक डिप, मेयॉनीजमध्ये मीठ मिरपूड बारीक चिरलेला पालक/ शेपू/ कोथिंबीर घालून तो एक डिप किंवा अजून आपल्या आवडीची इतर डिप्स ठेवणे.) फटाफट संपणारा प्रकार! Happy

बटाटा उकडून लगदा करून त्याला ह्या मिश्रणात मिसळायचे : दही+ भाजक्या जिर्‍याची भरड पूड + भाजलेली मिरची + सैंधव/ मीठ + कोथिंबीर + मिरपूड. ह्याचप्रमाणे त्यात इतरही उकडलेल्या भाज्या ( मटार, स्वीट कॉर्न, गाजर, फ्लॉवर, श्रावण घेवडा इ.) घालता येतात.

धन्यवाद दिनेशदा.
रताळी मिळतात इथे. करून बघते आता ही रेसिपी.
अकुने सांगितलेला फटाफट संपणारा प्रकारही मस्त वाटतोय. Happy

ज्वारीला पण मोड काढता येतात. त्यासाठी ती १० ते १२ तास भिजत घालावी लागते. मग कपड्यामधे बांधून ठेवायची, तीन दिवसात मस्त मोड येतात. रोज एकदा ती पोटली पाण्यातून बुडवून काढायची.

अशा मोड आलेल्या ज्वारीची उसळ चवदार लागते पण तिची कोशिंबीरही मस्त लागते. उकळत्या पाण्यातून हे मोड काढून निथळून घ्यायचे. मग त्यात मीठ, व दही घालायचे. मिरची, हिंग व जिरे यांची फोडणी द्यायची. हे ज्वारीचे मोड खूप गोड लागतात. नूसतेही खाता येतात.

अजून एक मिनोतीने सांगितलेल्या सॅलड ड्रेसिंगशी मिळता-जुळता प्रकार : पॅशनफ्रूट/ संत्रे/ मोसंबे इत्यादी लिंबूवर्गीय फळांचा गर काढून गार करायचा. लेट्यूसची पाने, स्वीट कॉर्न, गाजराचा कीस, मोड आलेले मूग किंवा हव्या त्या आवडत्या भाज्या चिरून त्यात काढलेला गर, मीठ/ सैंधव, साखर, लिंबाचा रस (आवश्यक वाटल्यास), मिरपूड घालून हलक्या हाताने मिक्स करायचे. साखरे ऐवजी मधही वापरतात. हे सॅलड गारच छान लागते. आणि एकदम रिफ्रेशिंग. पॅशनफ्रूटच्या गराचा स्वाद फार मस्त लागतो. ह्यात अजून स्वाद वाढवायचा असल्यास ऑलिव्ह्ज, काळी द्राक्षे, सफरचंदाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे इत्यादीही घालता येते.

काही वेळा सॅलड ड्रेसिंगमध्ये संत्र्याचा/ सफरचंदाचा/ द्राक्षाचा थोडा रस घातला तरी मस्त स्वाद येतो. फळांचा रस + सैंधव + मिरपूड/ जिरेपूड/ किसलेले आले + सॅलड + हवे असल्यास लिंबाचा रस हे कॉम्बोही सह्ही लागते!

पास्ता सालाड
२५० gram शिजवलेला पस्ता.
अर्धा वाटी शिजवलेले मटार (or canned green peas)
१ रन्गित कॅप्सिकम , बारीक तुकडे करुन.
मीठ, मिरपुड
१ मोठा चमचा केचप, २ मोठे चमचे मेयॉनीज
हे सर्व नीट mix करणे आणि फ्रिज मध्ये १ तास ठेवणे.
यात german लोक ham चे तुकडे पण घालतात.

पालक रायत्याचं हे एक वेगळं व्हर्शन : कांदा बारीक चिरून थोड्या लोण्यावर गुलाबीसर परतून घ्यायचा. पालक उकळत्या पाण्यात ब्लांश करायचा. (म्हणजे पाच मिनिटे ठेवायचा, त्याचा करकरीतपणा गेला पाहिजे.) पालकाला चिरून दही+मिरपूड + मिरचीचे तुकडे (ऐच्छिक) + मीठ ह्यांच्या फेटलेल्या मिश्रणात घालायचा. परतलेला कांदा गार झाल्यावर तोही त्यात मिसळायचा. मिरपुडीऐवजी मिरीचे दाणे भरडून घातले तर अजून वेगळी टेस्ट येते. लोण्यावर परतलेल्या कांद्याचा स्वाद अफलातून लागतो.

अकु, उकळत्या पाण्यातुन पालक काढला की लगेच बर्फाच्या पाण्यात टाकायचा. याच्यामुळे पालक करकरीत रहातो. तसाच गरम ठेवला तर शिजण्याची प्रक्रिया चालुच रहाते आणि मग पालक लवकर पुचाट होतो.

लाजो, वरच्या पालक रायत्यात तसे करायलाही हरकत नाही. पण मला त्यात पालकाची किंचित शिजलेली चव जरा जास्त बरी वाटली. Happy

अनघा, पास्ता सलाड सोपे वाटतेय.

दिनेशदांनी सांगितलेली बाँगला कासुंदी ड्रेसिंगची ही कृती :

मोहरीची डाळ घेऊन आधी कोरडीच बारीक करायची. आणि मग थोडे थोडे पाणी घालत वाटायची. (याचा वास मात्र थेट घेऊ नये, डोके दुखते) कढीसारखा दाट प्रकार होतो. मग त्यात हळद, हिंग आणि मिठ टाकायचे, लागत नाही पण गरज भासलीच तर थोडे तिखट टाकायचे.
मग हा प्रकार किसलेला मूळा / उकडून ठेचलेला आवळा / उकडलेली कैरी / पिकलेली केळी आदी प्रकारात चांगला लागतो.

हे माझ्या आवडीचं पालक रायतं. पालक ब्लांच करायचा. गाजर किसून घ्यायचं. डाळिंबाचे दाणे. थोडा पुदिना हे सर्व दह्यात घालून मिक्स करायचं. चवीला मीठ्,साखर्,चाट मसाला,जिरेपूड.

माझ्याकडची कोशिंबीर रेसेपीजः
१. टॉमेटो + कांदा् + हिरवी मिरची + कोथिंबीर + दही + मिठ
२. टॉमेटो + कांदा् + हिरवी मिरची + कोथिंबीर + किसलेले ओले खोबरे + मिठ
२. किसलेला पांढरा मुळा + हिरवी मिरची + दही + मिठ

........ काही दिवसांपुर्वी मी टॉमेटो कोशिंबीर मधे स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड दही वापरले होते, घरामधे सर्वांना टेस्ट आवडलीchef-anim-chef-cook-food-smiley-emoticon-000273-medium.gif

Pages