भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे..... तासाभरात ८७ पोस्ट्स... मी एक्स्पेक्ट्च केल नव्हत Uhoh

स्टॅटिस्टीकली पुरुष मंडळीच जास्त आंबट शौकिन निघाली Proud Wink Light 1

भेळ, चाट म्हणजे अगदी केव्हाही द्या... खायला तय्यार Happy

आमच्याकडे घरीच भेळ, पापु... आता विकेंडला नक्की Happy

वारजे मधे सिप्ला सेन्टर जवळ........ krushna भेळ>>> सहमत आहे,

त्यचबरोबर तेथेच एक गुजराथी दुकान आहे. तेथे फक्त ढोकळा आणि तत्सम गुजराती पदार्थ मिळतात. उत्तम असतात.

बास्केट चाट हा प्रकार भारी असायचा. >>> हा प्रकार दादरला क्रीश्ना हॉटेलात खाल्ला होता..कुठल्याशा फेमस स्कूल समोर(नावच आठवत नाहीये :अओ:) प्रचंड गर्दी..चाट,भेळ वगैरे लोकं उभं राहुनच खातात...

स्टॅटिस्टीकली पुरुष मंडळीच जास्त आंबट शौकिन निघाली >>>

लाजो,

आपणही दिवा वगैरे घ्या.

पण बायका आवडतात आणि बायकांना हे पदार्थ आवडतात त्यामु़ळे ती टेस्ट डेव्हलप करावी लागत असेल असा एक मानसशास्त्रीय सिद्धांत मांडता येईल. हे या बाफचे बायप्रॉडक्ट!

पुण्यात नारायण खमणचे ढोकळा प्रकार सगळेच उत्तम. त्यातल्या त्यात पांढरा ढोकळा आणि सँडविच ढोकळा पण भारी. तिथे जिलेबी मिळते ती एकदम तोंपासु.

आताच मुंबइत महाराष्ट्र सरस झाल तिथे मि पुणेरी भेळ खाल्लेली. मस्तच बनवलेली त्या माणसाने. फक्त चुरमुरे, गोड चटणी, फरसाण, कांदा आणी भरपुर कोथंबीर. यम्मी होती.

मनजीत चाट आहे अजून. एकदा तिथल्या बास्केट चाटला जुन्या आणि खराब झालेल्या तेलाचा वास होता. (बास्केट तळून मग त्यात बाकी मालमसाला भरून देतात) तेव्हापासून तिथे जावसं वाटलं नाही.

बास्केट चाट मस्तच Happy

इथे लिहीलेया प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची तर माझे पुढच्या देशवारीचे सगळे दिवस भेळ, चाट खाण्यातच जातिल बहुदा Happy

लोकहो, जरा भेळ, चाट यांच्या नव्या रेसिप्या पण सांगा ना...

सिप्ला सेंटर जवळ भेळेच्या गाड्या बिड्या!!
आम्ही तिकडे जायचो तेव्हा आजूबाजूला फारसं काही बघितल्याचंही आठवत नाही. ६-७ वर्षात वाढलं बहुतेक खूप.

मनजीत चाट आहे अजून. एकदा तिथल्या बास्केट चाटला जुन्या आणि खराब झालेल्या तेलाचा वास होता>>>

खरच की! मनजीत नाही का? मला मनमीत वाटत होते.

तेलाचा वास? >> जाण्यात अर्थ नाही आता.

सुमेधा म्हणतात त्या प्रमाणे उभे राहून जिथे खाता येत असेल तिथेच बहुधा अधिक स्वच्छाता असावी.

पण एक मात्र आहे! घरी पाणीपुरी करण्यात अर्थ नाही. तो प्रकार बाहेरच खाण्याचा!

मामी, तुम्ही माझ्या इर्ल्यात या मी तुमच्या लो.प. मधे येते. असं करत आपण सगळ्या मुंबईतल्या भेळ-पापु ठिकाणांचा सर्व्हे करू काय! Happy

एक ब्राह्मण दांपत्य व त्यांचू पंचवीस एक वर्षांची मुलगी यांनी आमच्या भागात एक गाळा घेतला. अगदी लायसेन्स वगैरेही घेतल!

आणि पाणी पुरी सुरू केली विकायला.

छान स्टीलच्या डब्यात दोन प्रकारचे पाणी वगैरे! बसायला खुर्च्या नाहीतच, पण टेबलवरील इंतझाम अगदी 'उच्चकुलीन'!

आणि मी अन मित्र गेलो आपले सहज!

एक प्लेट पाणीपुरी बनवणे हा प्रकारच दहा मिनिटे चालला होता. वडील पुरी काढून आईकडे देणार, आई ती नाजूकपणे फोडून त्यात बुंदी वगैरे मोजून घालणार, मग मुलगी अगदी नेलपेन्ट लावल्याच्या नाजूकपणे त्यात पाणी घालणार चमच्याने!

एवढे करून टेस्टची बोंबच!

तेव्हा मान्य केले.

की रस्त्यावरचा खेडवळ माणूस जेव्हा भराभरा पुर्‍या हातानेच माठात बुडवतो तेव्हाच पापु टेस्टी होत असावी,.

'कॉपर चिमनी' मध्ये खाल्ला होता 'बास्केट चाट' हा प्रकार सुरवातीला. तिथे अ‍ॅज अ स्टार्टर म्हणुन दिला होता. अफलातुन लागतो. त्यानंतर एकदा 'ओन्ली पराठाज' मध्येपण खाल्ला होता.

मामी, तुम्ही माझ्या इर्ल्यात या मी तुमच्या लो.प. मधे येते. असं करत आपण सगळ्या मुंबईतल्या भेळ-पापु ठिकाणांचा सर्व्हे करू काय! >>> नी, अग भेळेकरता मी इथियोपियातही जाईन, इर्ला क्या चीज है! एका चाकावर तैय्यार!

पुण्यात पौडरोडवर पीएनजी आणि जुनी रुपी बँक या मधल्या बोळात 'आई ग!' अस एक दुकान आहे एका कुटुंबान चालवलेले. तिथेही वरील प्रकारेच पाणीपुरी मिळते.

पुण्यात पौडरोडवर पीएनजी आणि जुनी रुपी बँक या मधल्या बोळात 'आई ग!' अस एक दुकान आहे एका कुटुंबान चालवलेले. तिथेही वरील प्रकारेच पाणीपुरी मिळते.

>>> तिखट असणार! खाल्ल्यावर 'आई ग!' म्हटलच पाहिजे. Happy

मामी Lol तिथे प्रचंड स्वच्छता असते. मिनरल वॉटर वापरतात. एकदाच गेलेले पण चव भन्नाट होती तेव्हातरी आता माहित नाही.

>>> आताच मुंबइत महाराष्ट्र सरस झाल तिथे मि पुणेरी भेळ खाल्लेली. मस्तच बनवलेली त्या माणसाने. फक्त चुरमुरे, गोड चटणी, फरसाण, कांदा आणी भरपुर कोथंबीर. यम्मी होती.

>>

मी पण खाल्ली होती. छान होती.

चेंबुर स्टेशन जवळ एक राजस्थानी दुकान आहे (ए. पी मणीच्या शेजारी) तिथे पाणीपुरी छान मिळते.

पुण्यातऔंधला ओझोन मध्ये पण खुप छान चाट असतात. भेळ आणी पापु पण वेगळी असते.
मी ३ वर्षापुर्वी ओझोन ला खाल्ल आहे. आता पण तेवढेच चांगले प्रकार मिळतात की नाही माहित नाही.

Pages