भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा तुफ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फान हिट चालणार (यासाठी भविष्य बघायची गरज नाही Wink

रच्याकने,
हल्ली कुणी एअर ईंडियाने प्रवास केला असला तर ते कधीकधी नाष्टा म्हणुन भेळ देतात, तेही चांगली असते

तुम्ही पल्याडच्या बायाबापड्यांनी आपापल्या घरी आपण कशी भेळ/ पापु करता ते लिवा बरं..
उदा: मिनोतीच्या धन्यांच्या हातची पापु... स्पेशल रेसिपी टाकणे.. Happy

छान

गावजत्रांमधे भरणार्‍या कुस्तीच्या आखाड्याजवळ स्पेशल मटकी भेळ भेटायची. भेळ मटकत मटकत कुस्ती बघायची. एखाद्या पैलवानाला चितपट होताना पाहताना एखादा शेंगदाणा किंवा पापडीशेव दाताखाली चावून टाकायची हे लहानपणीचे भेळद्योग.

वांद्र्याच्या एल्को मार्केट्ची पापु, रगडापॅटिस, शेवबटाटा पुरी... सगळेच उत्तम

अरे सॉरी, मी महत्वाची आणि प्रसिद्ध कल्याण भेळ विसरलेच की. लाईनीत उभे राहुन घेतलेली भेळ. त्यांच्या गणेश वाल्यांसारख्या बर्‍याच शाखा आहेत. तिथे पाणी पुरीसाठी बिसलरीच पाणी वापरतात अशी पाटी आहे. बाकी तिथली दहीपुरी एकदम मस्त असते. प्रभात रोड आनि लॉ कॉलेज रोडला जोडणार्‍या मधल्या गल्लीत. (त्या गल्लीच्या एका टोकाला इन्कम टॅक्स ऑफिस आहे)

नी, गणेश भेळ च्या बह्रपुर शाखा आहेत. वेब www.ganeshbhel.com. कुठेही खा. तिथे जॉईंट सॅडविच, दाबेली असे पोटभरीचे प्रकारही मिळतात.
दावेली सॅडविच, पनीर कढाई सँडविच आणि चॉकलेट ग्रील्ड सॅडविच मस्त असते एकदम.

ह्म्म्म....
कल्याण भेळ : बिबवेवाडी , मस्त...
आधी शनीपारापाशी रहायचो तेंव्हा कैलाश ची पण रगडापुरी खायचो, तांबडी जोगेश्वरीच्या बोळात असायचा , आता असतो की नाही माहीत नाही....

भेळ -पाणीपुरीचे फॅन सगळच पब्लिक असेल !
पुण्यात लहानपणी खायचो ती नळस्टॉप च्या चर्च जवळ 'संगीता भेळ ' फारच यम्मी असायची, अगदीच लहान होते तेंव्हा तरी ती टेस्ट आठवते .. एरंडवणे परिसरातले आमचे जुने शेजारी अजुनही भेटले कि संगीता भेळ ची आठवण काढतात.. अगदी रेग्युलरली तिथे भेळ खाणारे असायचे सगळे लोक !
तशी टेस्ट अगदी गणेश भेळ वाल्याकडेही नसते असं आई बाबा आणि पब्लिक म्हणतात :).
संगीता भेळ वाल्यानी नंतर भरत नाट्य मंदिरापाशी गाडी हालवली असं ऐकलं :(.
गणेश भेळ वाला त्याचाच नातलग आहे असं ऐकलय.
गणेश भेळ वाल्याची भेळ पण आवडते.
बाकी गुज्जु स्टाइल स्प्राउट्स, बटाटा, काकडी वाली गोड भेळ चेंज म्हणून आवडते .
पण माझ्यासाठी असली भेळ ही नॉर्मल चुरमुरे वाली ( रंकाळ्याच्या भडंग वाले चुरमुरे वापरलेल्या भेळेसारखी नाही ), त्यात चिंच-खजुर गुळाचं पाणी- लाल मिर्ची लसुण ठेचा, फरसाण, खारे दाणे-कांदा-कोथिंबिर-टोमॅटो, पुदिना , कडक कैरी घातलेलीच :).

आमच्या कॅन्टीनात नाष्ट्याला मिळणारी भेळ म्हणजे मुरमुरे+फरसाण्+हिरची मिरची ठेचा आणि सॉस, एकदम बकवास लागते ते प्रकरण.

मामी, एल्को मार्केटची आठवण केलीत... अहाहाहा!!
पण तरी आमच्या इर्ला बसस्टॉपच्या मागच्या गाडीवरची भेळ एकदा खायलाच हवीत. एल्को मार्केटपेक्षाही माझ्याकडून इर्लावाल्याला रेटींग जास्त.. Happy

नी, येते मी खायला.

शिवाजी पार्काजवळच सखाराम कीर रोडवर संध्याकाळी एकजण गाडी लावतो. काय झक्कास असतात सगळे प्रकार. प्रचंड गर्दी असते.

कसबा गणपतीकडून लाल महालाकडे येतानाच्या कॉर्नरला 'श्री मटकी भेळ' अशी एक गाडी गेली १०-१५ वर्षे आहे.. ऑस्सम मटकी भेळ! आणि उन्हाळ्यात त्यात कैरीच्या फोडी..
पूरम चौकात सणस प्लाझाच्या शेजारी पाणीपुरीवाला.. Happy

अजंता लेणी पहायला गेलो होतो तेव्हा तिथे पायथ्याशी मस्त भेळ खायला मिळाली होती, चवळीची उसळ घातलेली.

तिथे गेलात तर नक्की खा.

दत्त भेळ आणि दत्तराज भेळ - ईचलकरंजी. दोन्ही द बेस्ट आहेत. पुण्यात चुरमुर्‍यांची बनवतात . इचलकरंजीला भडंगापासुन बनवतात त्यामुळे आणखी मस्त लागतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नगिरीच्या समुद्रावर मिळणारी कैरी घातलेली भेळ..

जीव कसा अगदी थंड थंड होतो!!
समुद्राकाठची खारी चव मिसळली की मगच भेळेला खर्रीखुर्री चव येते हे माझं प्रामाणिक मत Happy
बाकी पुण्यात कल्पना भेळ, आजीकडची पापु, सहकारनगरला गोपी भेळ वगैरे छान असतात.

अनु३, प्रित्स् मधली ट्राय नाही केलिये पण इतर लोकांनी ऑर्डर केलेली. बघुनच खाविशी वाटत नव्हती.

एकदा घरी दोघांना बोलावलेल पाणिपुरी खायला तर चार जणांच्या चार तरहा निघाल्या पाणिपुरीत काय मसाला भरायचा याच्या
मी (मराठी) - पांढरे वाटाणे, मूग आणि बटाटा
नवरा - फक्त बटाटा
मित्र - छोले (उकडुन आणि मीठ लावुन) आणि बटाटा
मित्राची बायको (मेत्रिण नीट कस लिहायच?) - कांदा आणि बटाटा

हे पदार्थ तुम्हाला कसे खायला आवडतात,
>>
भेळ खाण्यासाठी स्टीलचा चमचा कधीही वापरु नये, चमचा खराब होतो व चवही लागत नाही...काही ठिकाणी पुठ्ठ्याचा (कागदी) चमचा मिळतो तो वापरावा, नाहीतर हात स्वच्छ धुवुन भेळ वरपावी.

भेळवाला भेळ करत असताना, त्याचे हात, अवतार, कपड्यांची स्वच्छःता, ई. गोष्टी नजरेआड कराव्यात किंवा पाहुनही न पाहिल्यासारखे करावे. अन्यथा भेळ घरीच बनवावी आणि वरपावी

Pages