Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13
हा धागा खास लोकाग्रहास्तव
भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही अगदी दहीभेळसुद्धा
रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............
पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही
चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही....
चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक
हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा...
चटक मटक खाणार्या सर्व भेळकरांना अर्पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दादर शिवाजी पार्क च्या गटगला
दादर शिवाजी पार्क च्या गटगला मी आणि मधुरा हमखास फ्रँकी खातो...
>>>> येस्स! शिपाची फ्रँकी! पण ही भेळेत कशी आली?
हा धागा
हा धागा तुफ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फ्फान हिट चालणार (यासाठी भविष्य बघायची गरज नाही
रच्याकने,
हल्ली कुणी एअर ईंडियाने प्रवास केला असला तर ते कधीकधी नाष्टा म्हणुन भेळ देतात, तेही चांगली असते
तुम्ही पल्याडच्या
तुम्ही पल्याडच्या बायाबापड्यांनी आपापल्या घरी आपण कशी भेळ/ पापु करता ते लिवा बरं..
उदा: मिनोतीच्या धन्यांच्या हातची पापु... स्पेशल रेसिपी टाकणे..
नीधप, सांगली करांना नुसते
नीधप,
सांगली करांना नुसते दाणे नाहि आणी ती भेळेबरोबर मिळणारी उकडलेली हिरवी मिरची सुध्दा.
छान
छान
गावजत्रांमधे भरणार्या
गावजत्रांमधे भरणार्या कुस्तीच्या आखाड्याजवळ स्पेशल मटकी भेळ भेटायची. भेळ मटकत मटकत कुस्ती बघायची. एखाद्या पैलवानाला चितपट होताना पाहताना एखादा शेंगदाणा किंवा पापडीशेव दाताखाली चावून टाकायची हे लहानपणीचे भेळद्योग.
वांद्र्याच्या एल्को
वांद्र्याच्या एल्को मार्केट्ची पापु, रगडापॅटिस, शेवबटाटा पुरी... सगळेच उत्तम
अरे सॉरी, मी महत्वाची आणि
अरे सॉरी, मी महत्वाची आणि प्रसिद्ध कल्याण भेळ विसरलेच की. लाईनीत उभे राहुन घेतलेली भेळ. त्यांच्या गणेश वाल्यांसारख्या बर्याच शाखा आहेत. तिथे पाणी पुरीसाठी बिसलरीच पाणी वापरतात अशी पाटी आहे. बाकी तिथली दहीपुरी एकदम मस्त असते. प्रभात रोड आनि लॉ कॉलेज रोडला जोडणार्या मधल्या गल्लीत. (त्या गल्लीच्या एका टोकाला इन्कम टॅक्स ऑफिस आहे)
नी, गणेश भेळ च्या बह्रपुर शाखा आहेत. वेब www.ganeshbhel.com. कुठेही खा. तिथे जॉईंट सॅडविच, दाबेली असे पोटभरीचे प्रकारही मिळतात.
दावेली सॅडविच, पनीर कढाई सँडविच आणि चॉकलेट ग्रील्ड सॅडविच मस्त असते एकदम.
दिल्ली हाट मधली आणि आग्र्याची
दिल्ली हाट मधली आणि आग्र्याची आलूचाट, आलूभल्ला, राजकचौरी ... एकदम तोंपासू!!!
ह्म्म्म.... कल्याण भेळ :
ह्म्म्म....
कल्याण भेळ : बिबवेवाडी , मस्त...
आधी शनीपारापाशी रहायचो तेंव्हा कैलाश ची पण रगडापुरी खायचो, तांबडी जोगेश्वरीच्या बोळात असायचा , आता असतो की नाही माहीत नाही....
भेळ -पाणीपुरीचे फॅन सगळच
भेळ -पाणीपुरीचे फॅन सगळच पब्लिक असेल !
पुण्यात लहानपणी खायचो ती नळस्टॉप च्या चर्च जवळ 'संगीता भेळ ' फारच यम्मी असायची, अगदीच लहान होते तेंव्हा तरी ती टेस्ट आठवते .. एरंडवणे परिसरातले आमचे जुने शेजारी अजुनही भेटले कि संगीता भेळ ची आठवण काढतात.. अगदी रेग्युलरली तिथे भेळ खाणारे असायचे सगळे लोक !
तशी टेस्ट अगदी गणेश भेळ वाल्याकडेही नसते असं आई बाबा आणि पब्लिक म्हणतात :).
संगीता भेळ वाल्यानी नंतर भरत नाट्य मंदिरापाशी गाडी हालवली असं ऐकलं :(.
गणेश भेळ वाला त्याचाच नातलग आहे असं ऐकलय.
गणेश भेळ वाल्याची भेळ पण आवडते.
बाकी गुज्जु स्टाइल स्प्राउट्स, बटाटा, काकडी वाली गोड भेळ चेंज म्हणून आवडते .
पण माझ्यासाठी असली भेळ ही नॉर्मल चुरमुरे वाली ( रंकाळ्याच्या भडंग वाले चुरमुरे वापरलेल्या भेळेसारखी नाही ), त्यात चिंच-खजुर गुळाचं पाणी- लाल मिर्ची लसुण ठेचा, फरसाण, खारे दाणे-कांदा-कोथिंबिर-टोमॅटो, पुदिना , कडक कैरी घातलेलीच :).
आमच्या कॅन्टीनात नाष्ट्याला
आमच्या कॅन्टीनात नाष्ट्याला मिळणारी भेळ म्हणजे मुरमुरे+फरसाण्+हिरची मिरची ठेचा आणि सॉस, एकदम बकवास लागते ते प्रकरण.
वा वा.. मस्त यादी तयार होते..
वा वा.. मस्त यादी तयार होते.. भेळ , पापुच्या गाड्यांची
मामी, एल्को मार्केटची आठवण
मामी, एल्को मार्केटची आठवण केलीत... अहाहाहा!!
पण तरी आमच्या इर्ला बसस्टॉपच्या मागच्या गाडीवरची भेळ एकदा खायलाच हवीत. एल्को मार्केटपेक्षाही माझ्याकडून इर्लावाल्याला रेटींग जास्त..
पुष्करणी मधे बर्याचदा बारीक
पुष्करणी मधे बर्याचदा बारीक चिरलेली कैरी (बरोबरीने कांदा घातलात हल्ली) सिझनमधे
नी, येते मी खायला. शिवाजी
नी, येते मी खायला.
शिवाजी पार्काजवळच सखाराम कीर रोडवर संध्याकाळी एकजण गाडी लावतो. काय झक्कास असतात सगळे प्रकार. प्रचंड गर्दी असते.
पण ही भेळेत कशी आली? >>> मामी
पण ही भेळेत कशी आली? >>> मामी मी बाफ भरकटवत होतो....:फिदी:
७ स्टार ...वेलकम बॅक..
कसबा गणपतीकडून लाल महालाकडे
कसबा गणपतीकडून लाल महालाकडे येतानाच्या कॉर्नरला 'श्री मटकी भेळ' अशी एक गाडी गेली १०-१५ वर्षे आहे.. ऑस्सम मटकी भेळ! आणि उन्हाळ्यात त्यात कैरीच्या फोडी..
पूरम चौकात सणस प्लाझाच्या शेजारी पाणीपुरीवाला..
कधी येताय? मिळूनच जाऊ..
कधी येताय? मिळूनच जाऊ..
अजंता लेणी पहायला गेलो होतो
अजंता लेणी पहायला गेलो होतो तेव्हा तिथे पायथ्याशी मस्त भेळ खायला मिळाली होती, चवळीची उसळ घातलेली.
तिथे गेलात तर नक्की खा.
इथे कृती सुद्धा लिहाल का?
इथे कृती सुद्धा लिहाल का?
आशु, रस्त्यावर ती सरकारी दुध
आशु, रस्त्यावर ती सरकारी दुध डेयरी आहे तिथे कुठे आसपास आहे का ग ही गाडी??
दत्त भेळ आणि दत्तराज भेळ -
दत्त भेळ आणि दत्तराज भेळ - ईचलकरंजी. दोन्ही द बेस्ट आहेत. पुण्यात चुरमुर्यांची बनवतात . इचलकरंजीला भडंगापासुन बनवतात त्यामुळे आणखी मस्त लागतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत
उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नगिरीच्या समुद्रावर मिळणारी कैरी घातलेली भेळ..
जीव कसा अगदी थंड थंड होतो!!
समुद्राकाठची खारी चव मिसळली की मगच भेळेला खर्रीखुर्री चव येते हे माझं प्रामाणिक मत
बाकी पुण्यात कल्पना भेळ, आजीकडची पापु, सहकारनगरला गोपी भेळ वगैरे छान असतात.
अनु३, प्रित्स् मधली ट्राय
अनु३, प्रित्स् मधली ट्राय नाही केलिये पण इतर लोकांनी ऑर्डर केलेली. बघुनच खाविशी वाटत नव्हती.
एकदा घरी दोघांना बोलावलेल पाणिपुरी खायला तर चार जणांच्या चार तरहा निघाल्या पाणिपुरीत काय मसाला भरायचा याच्या
मी (मराठी) - पांढरे वाटाणे, मूग आणि बटाटा
नवरा - फक्त बटाटा
मित्र - छोले (उकडुन आणि मीठ लावुन) आणि बटाटा
मित्राची बायको (मेत्रिण नीट कस लिहायच?) - कांदा आणि बटाटा
भेळ खावी तर पुण्यातल्या
भेळ खावी तर पुण्यातल्या कल्याण भेळची असे मत आहे.
हो शुभांगी, त्या गाडीच्या
हो शुभांगी, त्या गाडीच्या शेजारीच एक फुलवाला आहे, मागे दत्ताचे देऊळ आहे तिथेच.
कोल्हापूरला भडंगांची भेळ का
कोल्हापूरला भडंगांची भेळ का करतात काही समजत नाही राव!
कैलाश परबत ची भेळ सुद्धा छान
कैलाश परबत ची भेळ सुद्धा छान असते.
हे पदार्थ तुम्हाला कसे खायला
हे पदार्थ तुम्हाला कसे खायला आवडतात,
>>
भेळ खाण्यासाठी स्टीलचा चमचा कधीही वापरु नये, चमचा खराब होतो व चवही लागत नाही...काही ठिकाणी पुठ्ठ्याचा (कागदी) चमचा मिळतो तो वापरावा, नाहीतर हात स्वच्छ धुवुन भेळ वरपावी.
भेळवाला भेळ करत असताना, त्याचे हात, अवतार, कपड्यांची स्वच्छःता, ई. गोष्टी नजरेआड कराव्यात किंवा पाहुनही न पाहिल्यासारखे करावे. अन्यथा भेळ घरीच बनवावी आणि वरपावी
Pages