पाकिस्तानातून येणारे फोनकॉल्स.

Submitted by मनिषा लिमये on 8 February, 2011 - 01:26

काल माझ्या फोनवर एका वेगळ्याच नंबरवरुन कॉल आला. ९२ पासुन सुरु होणारा नंबर होता तो. मला मिसकॉल दिसल्यावर मी त्यावर फोन केला . तर पलिकडचा माणुस तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि बरच काही बोलायला लागला. मी फोन ठेऊन दिला. नंतर नवर्‍याशी बोलताना तो ९२ म्हणजे पाकिस्तानी नंबर असावा अशी चर्चा झाली आणि आज नवर्‍याच्या फोनवरही अशाच ९२ ने सुरु होणार्‍या नम्बरवरुन कॉल आला. मग नेटवर शोधाशोध केली असता हे सापडले

http://cribb.in/airtel-customers-getting-fraud-calls-from-pakistan.htm

http://www.consumercomplaints.in/complaints/355670/page/4

http://www.google.co.in/search?hl=en&source=hp&q=airtel+nos+getting+call...

तेव्हा अशा नंबरचे कॉल्स घेऊ नका

मला आलेला नंबर९२३४७९०२७७०१

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Please take care

IF SOME ONE ASKS YOU TO DIAL #09 or #90,Please Do Not Dial This When Asked,

Please circulate URGENTLY.

New Trick of Jehadi Muslim Terrorists to Frame Innocent People!!

If you receive a phone call on your Mobile from any person saying that they are checking your mobile line, and you have to press #90 or #09 or any other number. End this call immediately without pressing any numbers. Team
there is a fraud company using a device that once you press #90 or #09 they can access your SIM card and make calls at your expense. Forward this message to as many friends as u can, to stop it. This information has been confirmed by both Motorola and Nokia.

There are over 3 million affected mobile phones. You can check this news at CNN web site also.
http://www.chennai.bsnl.co.in/News/MobileDosNDonts.htm

हो गं... मला आलेल्या एका पत्रातली ही माहितीही महत्वाची वाटली या संदर्भात म्हणून चिकटवतेय इथे.

आम्हास सावध केल्याबद्दल त्रिवार धन्यवाद. मला अजून असे कॉल्स आले नाहीत....पण आता आले तर मी सज्ज असेन,.. Happy

पाकिस्तानमधून येणारे सर्वच फोन कॉल्स मॉनिटर केले जातात, असा आपला माझा समज होता.

आता परिस्थिती काय आहे कल्पना नाही, पण खूपदा परदेशातून आलेल्या कॉलचा
नंबरच डिस्प्ले वर येत नाही. कधी कधी ते आपले जेन्यूईन कॉल असतात.

सावध केल्याबद्दल धन्यवाद. घरी आईला सांगायला पाहिजे.

पण खूपदा परदेशातून आलेल्या कॉलचा
नंबरच डिस्प्ले वर येत नाही. कधी कधी ते आपले जेन्यूईन कॉल असतात.>>>>>>>अनुमोदन.

मलाही असे काहि Unknown Number चे कॉल आलेले, पण मी ते नाही उचलले. नंतर कळले कि ते माझ्या फिनलंडच्या मित्राचे होते. Sad (इमेलने कळवले).

मलाहि असे Unknown Number चे कॉल येतात. उचल्यावर कोणीच बोलत नाहि. ते पण पाकिस्तानवरुन येणारे असतात का?

योगेश, मी केलेले उचलत जा रे. मी फोन करणार आहे ते आधी फोन करुन कळवेनच !!

अशाच इमेल्स नी पण वैताग आणलाय. तूमच्या इमेलला बक्षीस लागलय. अमका तमका इस्टेट मागे ठेवून मेला वगैरे वगैरे. बर्‍याच इमेल्स स्पॅम मधे टाकल्यावर आता तो त्रास कमी झालाय.

मी टिव्ही बघत नाही पण अमूक एक नंबर भूताचा. अमूक नंबरावरुन कॉल आला कि स्फोट होतो, असे पण स्पेशल रिपोर्ट्स ओझरते बघितले.

फोनने जितकी सोय झालीय आणि जेवढे तंत्र सुधारले, तेवढेच त्याचा गैरवापर करणारे पण निर्माण झालेत.

मी फोन करणार आहे ते आधी फोन करुन कळवेनच !!>>>>>:) Happy

दा, तुमचा फोन पहिल्यांदा आल्यावर नंबर डिस्प्ले झाला होता तेंव्हाच सेव्ह करून ठेवलाय. Happy

जे नंबर डिस्प्ले होत नाहीत ते हमाखास आंतर्जालावरुन 'वॉईप' वापरुन केलेले कॉल्स असतात, ज्यात नो नंबर, अननोन, किंवा आलेच तर ३-४ आकडेच डिस्प्ले होतात.

हे कॉल्स कोणत्याही देशातुन अलेले असु शकतात, अगदी तुमच्या राहत्या घराशेजारुन सुध्दा.

चातक, खूपदा कॉल १, असाच डिस्प्ले येतो. शिवाय आफ्रिकेत काहि ठिकाणी, नेटकॉल सुविधा असते. या देशांत ते पूर्ण कायदेशीर आहे. आणि तिथून कॉल केला तर खूपच स्वस्त पडतो. अशा ठिकाणाहून कॉल केल्यास. भारतातल्या फोनवर तो नंबर येत नाहि, किंवा दूसराच कुठलातरी नंबर येऊ शकतो.

थोडक्यात काय, फोनवर दिसत असलेल्या नंबरवरुन तसा नेमका अंदाज करता येत नाही.

भारतातल्या फोनवर तो नंबर येत नाहि, किंवा दूसराच कुठलातरी नंबर येऊ शकतो.
थोडक्यात काय, फोनवर दिसत असलेल्या नंबरवरुन तसा नेमका अंदाज करता येत नाही.>>> बरोबर दिनेशदा, हे एक प्रकारचे "डायलर सॉफ्टवेअर" असते जे रेचार्ज करता येते बहुदा डॉलर किंवा युरो चलनात. उदा. एक्शन वॉइप, मोबाईल डायलर, ईझि टॉल्क. ईत्यादी.

उपयुक्त माहिती मनिषा. Happy

यासंदर्भात (पाकिस्तानातून फोन येणे) माझा एक मजेदार अनुभव आहे. लिहीते वेळ झाला की. Happy

मुळात ९१ सोडून इतर कुठल्याही आकड्यांपासून सुरू होणारा अनोळखी नंबर दिसला तर सावधच रहायला हवे.
मला मध्यंतरी असाच एक कॉल सतत यायचा. ७९ ने सुरूवात होणारा नंबर होता. अर्थात मी कधीच उचलला नाही. पण ५-६ वेळा आल्यावर शोधाशोध केली तर तो नेपाळचा कोड होता असं कळलं. फोन कं.ला कॉल करून नंबर ब्लॉक करता येतो का विचारलं. पण ती त्यांची पेड सर्व्हिस होती. मग माझ्या मुलानं एक भन्नाट आयडिया केली. तो फोन नंबर 'अनवॉन्टेड' म्हणून सेव्ह केला. फोनच्या साऊंड रेकॉर्डरवर शांतता रेकॉर्ड केली (!!) आणि ती कुठलाच आवाज नसलेली ऑडियो क्लिप त्या नंबरला रिंगटोन म्हणून असाईन केली. Lol त्यामुळे त्या नंबरवरून फोन आला तरी रिंग वाजायची नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. असं २-३ महीने सुरू राहिलं आणि आता त्या नंबरवरून फोन येणं पण बंद झालंय.
तेव्हा लोकहो, हा सोप्पा उपाय करा. Happy

अरे मला पण येताहेतत हे ९२ कोडवाले कॉल्स. +९२३४७६६६२४९० यावरून. मी अर्थातच घेतले नाहीत, घेत नाही.

<<मुळात ९१ सोडून इतर कुठल्याही आकड्यांपासून सुरू होणारा अनोळखी नंबर दिसला तर सावधच रहायला हवे.
मला मध्यंतरी असाच एक कॉल सतत यायचा. ७९ ने सुरूवात होणारा नंबर होता. अर्थात मी कधीच उचलला नाही. पण ५-६ वेळा आल्यावर शोधाशोध केली तर तो नेपाळचा कोड होता असं कळलं. फोन कं.ला कॉल करून नंबर ब्लॉक करता येतो का विचारलं. पण ती त्यांची पेड सर्व्हिस होती. मग माझ्या मुलानं एक भन्नाट आयडिया केली. तो फोन नंबर 'अनवॉन्टेड' म्हणून सेव्ह केला. फोनच्या साऊंड रेकॉर्डरवर शांतता रेकॉर्ड केली (!!) आणि ती कुठलाच आवाज नसलेली ऑडियो क्लिप त्या नंबरला रिंगटोन म्हणून असाईन केली. हाहा त्यामुळे त्या नंबरवरून फोन आला तरी रिंग वाजायची नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. असं २-३ महीने सुरू राहिलं आणि आता त्या नंबरवरून फोन येणं पण बंद झालंय.>>
मी याच गोष्टीच्या शोधात होतो. सगळ्या 'पर्सनल लोन' आणि 'इन्शुरन्स' वाल्या पोरींना हे करणे जरूरीचे आहे. कित्ती वेळ वाया जातो!

मनिषा धन्स!!

आयला शरद्जी

तुमच्या मुलाची आयडिया खरंच भन्नाटच की!!:दिवा:

ही 'जुगाडू' आयडिया खूप खूप आवडली! त्याला थांकू कळवाल कां?

paravaach dhaakaTii karavaadun sangat hotii, ek miss call alaa mhaNun tine parat call kelaa, tar tichaa balance sagaLaa sampunach gelaa. 17 rupaye sampale ekaa jhaTakyaat. mag tilaa saangitale kii koNatyaahii miss call laa uttar dyaayache naahiich. he 91 che paN punhaa saangitale paahije. Happy

माहितीचा नंबर नसेल तर मिस्ड कॉल मी सहसा डायल करत नाही. समस पाठवून विचारते की तुम्ही कोण? माझ्याकडे दुर्दैवाने तुमचा नंबर स्टोअर केला नाहीये.. जे खरंच व्यावसायिक्/वैयक्तिक कामाचे असतात त्यांचं उत्तर येतंच. बाकीचे सोडून देते

.

बीएसेनेल ला हे कॉल येत नाहीत, असं आमचा फोन डीलर मित्र सांगत होता आजच. किती तथ्य आहे ते ठाऊक नाही, पण मला असे कॉल कधीच आलेले नाहीत हेदेखिल खरे आहे.

तेव्हा लोकहो, हा सोप्पा उपाय करा. ... व्होडाफोनलाही असे कॉल आले नाहीत.कॉलरट्यूनसाठी नेहमी येणार्‍या कॉलला हा उपाय केला आहे. पाहू आता.

Pages