चिं. त्र्य. खानोलकर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभूंचा कवी म्हणून जन्म झाला तो त्यांच्या खानावळीत येणार्‍या दोन गिर्‍हाईकांच्या कुतूहलातून! नेहमी गल्ल्यावर बसणारा हा तरुण रोज कागदावर काय खरडतो, हे पाहावं म्हणून ते एकदा युक्ती करतात. पैसे देताना खानोलकरांच्या नकळत त्यांचे कागद ते लंपास करतात. घरी जाऊन पाहतात तर कागदावर उभ्या पद्धतीनं लिहिलेला मजकूर! म्हणजे नक्कीच कविता असाणार! ते त्या 'सत्यकथे'कडे पाठवतात. परंतु त्या साभार परत येतात. पोरीबाळींच्या नावावर पाठवल्यास त्या छापून येतील म्हणून खानोलकरांच्या 'प्रभू-खानोलकर' या नावातील 'प्रभू' घेऊन आधुनिक मुलीचं नाव म्हणून त्यापुढे 'आरती' हे नाव त्यांची जोडलं व त्याच कविता पुन्हा पाठवल्या. त्या श्री. पु. भागवतांच्या हाती पडल्या. या कवितांतील विलक्षण गूढ प्रतिमासृष्टीनं ते चकित झाले आणि पुढे त्यांनी खानोलकरांचं सर्व साहित्य 'सत्यकथा'तून प्रसिद्ध केलं. मात्र या अनपेक्षित प्रसिद्धीच्या झोतानं खानोलकर गुदमरुन गेले आणि त्यांनी कविता लिहिली -

'ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना...
फुले माझी अळुमाळू
वारा पाहे चुरगळू..'

वरील माहिती -- http://www.loksatta.com/daily/20030616/raj04.htm या संकेतस्थळावरून साभार घेतली आहे. 'आरती प्रभू' हे नाव खानोलकरांना कसे मिळाले हा माझा खूप दिवसांपासूनचा प्रश्न होता. आज ही माहिती मिळाली. ती तुमच्यासोबत देखील वाटून घ्यावीशी वाटली आणि माझा आनंद दशगुणित झाला. धन्यवाद.

विषय: 
प्रकार: 

म्हाऊ नव्हे, न्हाऊ आहे ते..

बी, तुझी चूक दाखवण्याचा वगैरे उद्देश नव्हता, सहज सांगितले मी. टंकलेखनाची चूक सुधारलीस हे बरे वाटले.

अरे वा बी.. बरं झालं लिहिलसं हे.. लिंक वरचा लेख पण वाचतो आता..

आणि हो.. ती टायपो सुधारलीस ते ही बरं केलसं ... Happy

शैलजा धन्यवाद! चुक दुरुस्त केली आहे.

अडम, धन्यवाद.

माझ्या एका मित्रास मी ई-मेल करुन ही माहिती पाठवली आणि त्यांनी मला खालिल उत्तर दिले.

छान छान. असल्या " कवी जन्म कथा " वाचल्यावर कां आनंद होतो ते मला नक्की ठाऊक नाही, पण होतो खरा. माझ्या माहितीनुसार पु ल यान्ची आपल्या सबंध आयुष्यात खानॉल कराशी अजिबात ओळख नव्हती , पण "नक्षत्राचे देणे" ची अर्पण पत्रिका "पु ल देशपान्डे याना" अशी असून ते पुस्तक पु ल नी खानॉल करांच्या म्रुत्यूनन्तर वाचले असे स्मरते. तेव्हा सुनीताबाईनी ही कथा सान्गणे फारच थोर. असो. चुकभूल द्यावी घ्यावी.
===================
मला माहिती नाही वरील विधान कितपत सत्य आहे. माझ्यामते पुल आणि आरती प्रभू एकमेकांना भेटलेले आहेत.

>>पु ल यान्ची आपल्या सबंध आयुष्यात खानॉल कराशी अजिबात ओळख नव्हती

पुलंच्या मैत्र नावाच्या पुस्तकात 'खानोलकरचे देणे' म्हणून एक लेख आहे. अजिबात ओळख नव्हती, हे खरे नसावे असे तो लेख वाचून वाटते.

शैलजा, खरचं तो लेख परत एकदा मी वाचायला हवा. पुर्वी वाचला होता पण आता तेवढा आठवत नाही.

माहिति आणि लिंक साठि धन्यवाद बी.

शान्ताराम बापूंच्या चानी चित्रपटाची कथा खानोलकरांची. तो त्यानी हिन्दीतही काढला. त्यात श्रेयनामावलीत कथा-- सी टी खनोलकर असे लिहिले होते. ठणठणपाळ त्याना नेहमी चिमत्र्यम खानोलकर म्हणत असे.

चानी ही कथा खूप जबरदस्त होती. माझ्या (वैयक्तिक) मतानुसार चानी चित्रपट फसलेला वाटतो. चानी आणि गणुराया अश्या दोन दीर्घकथांचे/कादंबरिकांचे ते पुस्तक आहे.

पुलंच्या मैत्र नावाच्या पुस्तकात 'खानोलकरचे देणे' म्हणून एक लेख आहे. अजिबात ओळख नव्हती, हे खरे नसावे असे तो लेख वाचून वाटते.
-------------------------------------------------------------
पुल आणि आरती प्रभूंची ओळख होती. कारण पुलंच्या एक पुस्तकात त्यानी लिहिलेले आहे (नाव आठवत नाही पुस्तकाचे)..
त्यानी एकदा आरती प्रभूना विचारले होते .."काय रे , रात्र काळी घागर काळी मधल्या अच्याला लंगडा का केलेस?"
त्यावर आरती प्रभू नी उत्तर दिले होते "मी नाही केले ..तो झाला".
(कुणाला पुस्तकाचे नाव आठवल्यास द्या..कदाचित "मैत्र" च असेल).

"ये रे घना" हे नेहमी पावसाळा चालू झाला की रेडिओवर लागायचे. पण शाळेत ही कविता शिकवताना इनामदारसरांनी सांगितलेला अर्थावरुन त्याचा पावसाळ्याशी तसा संबंध नाही असे कळले. अर्थ मात्र विसरुन गेलो. कोणाला माहीती असल्यास येथे पोस्टावा.

एम भुरे, वरती बी ने दिला आहे ना रेफरन्स ये रे घना चा..

पुल आणि आरती प्रभुंची ओळख होती. नेमाडेने साहित्यातील कंपूबाजीवर लिहिलेल्या एका टिकालेखात खानोलकरांनी पाडगावकरांना वगैरे कवितासंग्रह अर्पण करण्यावरुन बरीच जळजळीत टिका केली आहे.

खानोलकरांचा आणखी एक किस्सा म्हणजे: विंदा एकदा सावंतवाडी की मालवणला गेले होते. त्यांना भेटायला एक तरुण मुलगा आला व त्याने विंदांकडून त्यांच्या कविता ऐकण्याची विनंती कली. विंदा गडबडीत होते व म्हणाले उद्या दुपारी ये, मी तेव्हा काही कविता ऐकवेन.. हा मनुष्य दुसर्‍या दिवशी दुपारभर विंदाकडे कविता ऐकत बसला.. सगळं झाल्यावर विंदांनी नाव काय असं विचारलं.. 'चिं त्र्य खानोलकर'..
कितवीत आहेस वगैरे? -- मॅट्रिकला आहे.
परिक्षेचे दिवस सुरु होते.. विंदांनी विचारले परिक्षा नाही का.. ह्याने उत्तर दिले, आहे ना. आज अमुक अमुक विषयाचा बोर्डाचा पेपर होता. पण तुम्ही दुपारी कविता ऐकायला या म्हणाला म्हणुन मग परिक्षेला गेलो नाही..

--
श्रीनांच्या एका पुस्तकातून..

--------------------------
A philanthropist is the worst enemy of the society.

मानस, मैत्रमधलेच आहे ते.

हे स्फुट बरे केले मी लिहिले नाहीतर ही सर्व माहिती जी तुम्ही देताहात ती मिळाली नसती. धन्यवाद!!!!

पण त्या दोन तरुणांचा हा फारच मनाचा मोठेपणा की त्यांनी कवितांचे श्रेय मूळ कवीला दिले व स्वतःच्या नावावर कविता खपविल्या नाहीत! नाहीतर हा श्रेष्ठ कवी कदाचित मराठी साहित्य सृष्टीला अपरिचीतच राहीला असता. अर्थात माणिक झाकून लपत नाही म्हणा.

सूर्यास्त

जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे,
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.
मेघ रेंगाळून गेला क्षितिजरेघी किरमिजी,
वाजती या मंद घंटा: कंप त्यांचे गोरजी.
वेळुरंध्री कां परंतू जीवघेणी स्तब्धता?
का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता?
काचसा काळोख भोवती: त्यांतुनी गावातल्या
थेंब जैशा दीपपंक्ती हालती काळ्यानिळ्या.
पारवा शेला तुझा हा: सांडणे का त्यावरी?
दूर दृष्टी लागली कां? कां तनू ही बावरी?
धून पर्णी निर्झराची लागली आता भरूं,
नेत्र का ओथंबले ग? हात हाती ये धरूं.
झहाला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे,
दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे.

-- आरती प्रभू