माझी अन गर्दे काकूंची गोष्ट!

Submitted by नोरा on 1 February, 2011 - 14:38

सगळं काही अलबेल असताना अचानक डोळ्यात पाणी येणं म्हणजे आपले बदललेले हार्मोन्स असे वाटे तेव्हा!दिवसागणीक वजन वाढत होते,पायावर किंचीत सूज आलेली.अजूनी तारीख लांब होती,पण अगदीच घाईला आले होते.खरे तर आईकडे जावेसे फार वाटे पण ती बरी नव्हती,तिचा रक्तदाब आणी मधुमेह या मुळे मीच तिला समजावलं होतं,आणी सासरीच राहीन बेबीच्या वेळी हे सांगीतले होते.

हे तेव्हा फिरतिवर असायचे,सासु बै खुप काळजी घ्यायच्या.पण मन लागत नसे, न झोप लागे न अन्न पचे.नकोच वाटे काही सुद्धा! शिवाय मी पुण्यात नवी,सासरची माणसे नवी. घरातली भाषाही नवीच.कोणी मैत्रिणी अजुनी झाल्या नवत्या. शेजारी पाजारी ओळखी झाल्या होत्या इतकेच.

बर्याचवेळा खाली फिरून येई,लॉनवरति लहान मुले खेळत त्यांच्याकडे बघत बघता सम्ध्याकाळी छान वेळ जाई. अशाच एका संध्याकाळी गर्दे काकू भेटल्या.त्यांनी माझी विचारपूस केली.प्रेमळ बोलल्या.त्या माझ्या सासुबाईच्या ओळखिच्याच निघाल्या.मग हळू हळू आमच्या गप्पा रंगू लागल्या.खूप बरे वाटे,त्यांच्याशी बोलायला.

त्यांच्याशी गप्पा मारताना खूप बरे वाटे.एक तर त्या काही टेंन्शनचे बोलत नसत्.तेंव्हा माझ्या पोटाच्या आकारवरून जो तो ,हा आता लवकरच्..असे उद्गार काढत! त्यामुळे मी घाबरून जाई.

मधले काही दिवस त्या दिसल्या नाहीत्.मग मी त्याना भेटायला त्यांच्या घरी गेले. पहाते तर काय्?एकटा जिव सदाशिव्! त्यात आजारी.एक नर्स येउन त्यांचे करून जाई.काकूंचे ट्यूमरचे ऑपरेशन झाले होते.मुलगा अमेरिकेत होता त्याचे शिक्षण परिक्षा ई.चालू होते.त्यामुळे बरोबर कोणी नाही.खूप वाईट वाटले.त्यांना बोलायला त्रास होईल म्हणून थोडे बोलून मी घरी आले.

त्यांच्यासाठी काही तरी करावे असे वाटे, कधी तरि जाऊन काही खाऊ देऊन येई तर कधी डोके चेपून देई.पण हळू हळू माझे जिने चढणे उतरणे जिकिरीचे झाले.त्यामुळे भेट्णेही कमी झाले. तिन चार दिवसानी एखादा दिवस खाली लॉनवर जाऊन येई.पण त्यांच्या घरापर्यंत जाणे जमेना.सासूबाईना माझा काळजीखोर स्वभाव माहीत होता त्यामुळे त्या मला तसे प्रोत्साहन देत नव्हत्या.

काही दिवसांनी गर्दे काकू लॉनवर दिसल्या,तब्ब्येत सुधारू लागलेली दिसली. त्यांचा हुरूप पाहून बरे वाटले.आजू बाजूच्या लोकांशी गप्पा मारत मुलांशी बोलत त्यांचे जिवनगाणे त्यांनी पुन्हा सुरू केले होते.

एक दिवस सासूबाईंच्या माहेरून त्यांच्या भावाचा त्यांची आई अत्यवस्थ असल्याचा फोन आला.त्याना ताबड्तोब गावी जायला लागणार होते. त्या मला सोडून जायला तयार नव्हत्या पण आईसाठी त्यांचे मन अस्वस्थ होते. मग मीच त्याना जबरदस्ती तयार केले. शिवाय उद्याच्या दुपारी 'हे' परतणार होतेच.
सासूबाईंचे सामान भरण्यासाठी मी बॅग वरून खाली ओढली,ती जड नसेल असे कल्पुन पण त्यात काही जड होते,त्यामुळे एकदम माझ्या पोटात गोळा आला.पण तेव्हढेच्.भर भर बॅग भरली, रिक्शा मागवली.त्यांना खाली पोचवून मी वर आले.मग खूप झोप आली.

नंतर का कुणास ठावूक्,पोटातल्या हालचाली जाणवत नव्हत्या. मला जरा शंका आली.मग मी आई,आणी याना फोन केला तर काँटॅक्ट होत नव्हता. एव्ह्ढ्यात काकूना मी घरात एकटी आहे,सासुबाई गावी गेल्याचे कोणी सांगितल्याने त्यांनी मला फोन केला. बाळाच्या हालचाली बंद झाल्याचे ऐकून त्या धावतच माझ्या कडे आल्या!.

लगेचच रिक्शात बसून त्या मला माझ्या डॉक्टऱकडे घेऊन गेल्या. पाणी कमी झाल्याने लगेचच सिझेरिअन करायचा निर्णय घेतला. लगेचच डॉक्टरकडे गेल्याने संभाव्य धोका टळला होता.बाळ बाळंतीण सुखरूप! हे सगळे घडलेले ते काकुनी मग साबाना आणी यांना फोनने कळवले. तेव्हा हे आणी सासूबाई हवालदील झाले होते. ते यायला निघालेच होते. यांची आणी गर्दे काकूंची तर ओळखही नव्हती.अशी सगळी गम्मत!

मला त्या घरून मऊ भात्,मेतकूट तूप्,लिम्बाचे लोणचे घेऊन आल्या.तो पर्यंत हे ,साबा ,आई सगळे पोचले.
त्यांनी माझी इतकी काळजी घेतली त्यामुळे सगळेजण खुप सेंटी झाले होते.

किती मायेनं केलं त्यांनी.मुख्य म्हणजे न घाबरण्याचं न बोलता शिक्षण दिलं! घट्ट हो बै,हे लाडू खा डिंकाचे! असं म्हणून ते हि लाड केले!

मी मात्र स्वतःलाच हसले,की काही दिवसांपुर्वी आपण याच गर्दे काकूं साठी काही तरी करू,कसे होणार यांचे ? असा विचार करत होतो.पण उलट त्याच आपल्याला आधार देऊन गेल्या!त्यांनीच खंबीर मदत केली.आणी मला,बाळाला सुखरूप ठेवलं. हा अनुभव खरेच वेगळा होता!!

गुलमोहर: 

धन्यवाद.मला कथा लिहिता येत नाही.त्याचे ललित झाले!:) असो.
बावळट : अरे/अगं, गोष्ट साध्या माणसांची,साध्या प्रसंगांची,साध्या भाषेतच लिहायची होती.काहीही उत्कट शब्द कथन्,उपमा इत्यादी न वापरता. काही अल्वार अलगूज वगैरे नाही, टिंब टिंब नाहीत्,फक्त सरळ साधे लिहायचे होते.त्यातूनच कथा खरीखुरी फुलेल असं वाटलं. कथा वाचून झाल्यावर मला क्षणभर ती लक्षुंबाई टिळकांच्या शैलीत झाल्या सारखी वाटली. तुम्ही त्या नवख्या लेखिका असताना,किंवा स्वयंपाकघरात सासरे बुवांकडून पदार्थ शिकताना,किंवा लिहयला वाचायला शिकतानाचे अनुभव कथन वाचले आहे का?भारी गोड बाई होती ती.एकदम साधी ,खरि खुरी .मला त्यांचे लेखन खूप आवडते.प्रत्येक प्रसंगात त्या नवखेपणाला मी नोटीस करते,त्यात त्यांचे साधे व्यक्तीमत्व जाणवते.कथेतली पहिलटकरीण तशीच साधी आहे,तिची भाषा, गोष्ट पण साधी आहे.लक्षुंबाईंसारखी.
तुम्हाला हे बादरायणी वाटले तर क्षमस्व.

नोरा...कथा/गप्पा/स्वगत/ललित आवडलं पण त्याहीपेक्षा जास्त तू लक्षुंबाईंचा संबंध लावत जी प्रतिक्रिया नोंदवलेस ती आवडली. साधी सरळ भाषा!

आधी मलाही "ह्या बावळटाला कोणी सांगेल का?" हा प्रश्न पडलेला...(काय करणार एका कॅटेगरीचे ना... सेम प्रश्न पडणारच! बावळट, Light 1 Happy )

लिहीत राहा... मलाही साधी भाषा वाचायला आवडते...पटकन समजते, लवकर रिलेट होते... पण तरीही, शब्दबंबाळ कथा/ललित यांचं वावडं मुळीच नाहीय... उलट त्यांचा मोह जास्त होतो... ते अलंकारीत नजाकतदार सौंदर्य वेगळं, हे साधं सोज्वळ सौंदर्य वेगळं.. तू लिहीती राहा.. तुझी भाषाशैली साधी आणि छान आहे. मस्त!!!

ड्री:तू म्हणतेस ते अगदी खरं आहे,अलंकारीत्,नजाकतदार सौंदर्य वेगळं, साधं सोज्वळ सौंदर्य वेगळं.. दोन्ही मला भुरळ घालतात्.

असे काहीच्या काही बादरायण संबध लावु नका हो. तुमची शैली छान आहे. लिहीत रहा. बाकीच्याना सांगु दे. लक्षुंबाई सारखी आहे का आणखी कोणासारखी आहे ते. नावावरुन अजिबात कळत नाही. तेव्हा काहीतरी छानस नाव द्या.
असो. मला बावळटाला वाटले ते सांगितले.

छान

कथा छान आहे. पण नाव बदलावे असे वाटते. उगाचच कथेचा फोकस लक्षुंबाईंवर जात राहतो आणि त्या आता कथेत डोकावतील, मग डोकावतील असे वाटत राहते.

मस्त मस्त गोड कथा आहे... कथा आहे, हे आधी वाचले नव्हते. स्वानुभव आहे असे वाटले. ड्रिमगर्लला अनुमोदन! साध्या सोप्या भाषेत लिहिलेली ही कथा खुप सहज सुंदर आहे. Happy