तुझ्यासारखी माणसे
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
23
तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी
माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा
तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे
तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर
माझ्यासारखी माणसे
पळत सुटतात जीवाच्या आकांताने
क्लॉस्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात
मायेच्या तिक्ष्णतेत दिसते औषधी इंजेक्शन
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात
विषय:
प्रकार:
शेअर करा
कविता जुन्या जयाच्या
कविता जुन्या जयाच्या कवितांसारखी..
खूप आवडली.
खूप आवडली.
सुरेख.
सुरेख.
भेदक लिहिता तुम्ही. कविता
भेदक लिहिता तुम्ही. कविता आवडली मला.
आवडली.
आवडली.
आवडली
आवडली
मस्तय!
मस्तय!
>>माहिती असतात प्रत्येकाच्या
>>माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची माप
सहीच!
पेशवा ! ग्रेट वन .. किप ईट अप
पेशवा ! ग्रेट वन .. किप ईट अप अल्वेज.
माझ्यासारखी माणसे आपुलकीच्या
माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे >>> व्वा!!! आत्मभानाची कविता...
कळली असे नाही म्हणता येणार
कळली असे नाही म्हणता येणार पण, आवडलीच.
खूप आवडली!
खूप आवडली!
छान आहे
छान आहे
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
>>>>> हिरवे हात... सुन्दर !
मस्त
मस्त
तुझ्यासारखी माणसे टिपून जातात
तुझ्यासारखी माणसे
टिपून जातात असे काही
म्हणून (अजूनहि) वाचतात
माझ्यासारखी माणसे.
असम्या तुझ्यासारखी माणसे
असम्या तुझ्यासारखी माणसे अजूनही वाचतात हे आवर्जून सांगीतल्या बद्दल म.पा. धन्स
वेगळी आहे एकदम. मस्त!
वेगळी आहे एकदम. मस्त!
आणि तुझ्या गळ्याचे माप
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात
सुंदर..
छान उतरलीये...
वाह !!!!!!
वाह !!!!!!
फार आवडली. असामी, मस्तचं.
फार आवडली.
असामी, मस्तचं.
आवडली..... नीरजा म्हणते तसे
आवडली..... नीरजा म्हणते तसे पूर्वीचा फील आहे.
पेशवा... अप्रतिम!
पेशवा... अप्रतिम!