चित्र

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

new_sav.jpg

MS paint वापरुन केलेलं चित्र.

(अजून पाच शब्द कुठून आणू?) Happy

आयटे, सावित्रीबाई का? प्रयत्न चांगला आहे.

सावित्रीबाई म्हणून काढले नाही गं चिन्नु, असेच काढले. साधारण ती ढब मनात होती. धन्यवाद.

आयटे नुसते काहीतरी ५ शब्द लिहीण्यापेक्षा चित्र कसे काढले हे नीट लिहीले असतेस तर Happy
मलापण चित्र बघीतल्या बघीतल्या ते सावित्रीबाईंचे वाटले कुंकवाच्या आणि पदरच्या पद्धतीमुळे.

रुनी, खास असं काही वेगळी पद्धत वापरुन वगैरे मी चित्र काढलेलं नाहीये. सहज हातानेच काढलय मायक्रोसॉफ्ट पेंट वापरुन, आणि भरपूर खोडाखोडी वगैरे करुन! त्याबद्दल खूप लिहिण्याजोगे काही नाहीये. Happy

मस्त आलय ग सावित्रीबाई वाटतायत खरं Happy

मग छानच की! Happy
श्यामली, माझ्या चित्रकलेच्या मर्यादा मला ठाउक आहेत गं Happy मला असे खूप ग्रेट चित्र वगैरे जमत नाही, असच मनात आले की काही तरी काढते, आणि कोणा व्यक्तीचे वगैरे चेहरे असे ठरवून नाहीच काढत, कारण ते इतके अचूक जमत नाही मला. Happy

>>रुनी, खास असं काही वेगळी पद्धत वापरुन वगैरे मी चित्र काढलेलं नाहीये. सहज हातानेच काढलय मायक्रोसॉफ्ट पेंट वापरुन, आणि भरपूर खोडाखोडी वगैरे करुन! त्याबद्दल खूप लिहिण्याजोगे काही नाहीये.
आयटे, मग तेच त्या पाच शब्दांकरता लिहायचंस. Proud
बरं, तू मायक्रोसॉफ्ट पेंट का बरं वापरतेस? जरा चांगली सॉफ्टवेअरं वापर की!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

LOL फ! अरे, ते रुनीला दिलेले पश्टीकरण आहे फक्त!! Happy
हापिसच्या ल्यापटापवर चालते माझे हे सगळे काम, त्यामुळे मला हवे ते सॉफ्टवेअर लोड करता येत नाही Happy

बरं, तू जरा चित्रातल्या चुका सांग मला, म्हणजे चुका सुधारुन, चित्र परत करुन बघेन.

रुनी Happy

आयटे असच सावित्रीबाईंच चित्र आजच्या सकाळ मधे आहे Happy

चांगला प्रयत्न आहे.

मी काल टाकलय रे योगेश Happy

छान चित्र आलय ग आय टी Happy
सावित्री बाईच वाटताहेत अगदी Happy

छान काढलंय चित्र.... लोकांनी सावित्रीबाई असं नामकरणही केलेलं दिसतंय.. Happy

तू जरा चित्रातल्या चुका सांग मला, म्हणजे परत करुन बघेन. >>>
चुका परत करुन बघण्यापेक्षा त्या सुधारल्या तर जास्त फायदेशीर होणार नाही का आयटे Proud

किरु, केदार, सँटीनो धन्यवाद.
किरु, एडिटलेस ना? Proud
खी, खी रुनी, नुसत्या चुका काढ हं तू! आणि जरा सकारात्मक दे बरं प्रतिक्रिया! Proud Happy

सुबक, रेखीव आहे चित्र!

आयटे, खरंच सावित्रीबाई वाटतायत. मस्त आलंय Happy

------------------------------
जिस जिस पथ पर भक्त साईका वहॉ खडा है साई

अरे व्वा आयटे, मस्तच की ग! Happy वेळेचा सदुपयोग, दुसरे काय?
मला तरी पहिल्यान्दा चित्र बघितल्या बघितल्या अहिल्याबाई होळकर आठवल्या! Happy
ग्रे शेडीन्ग कस केल हेस? मूळ आकार काय चित्राचा?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूदा, धन्यवाद.

आधी ग्रे रंगाची बॅकग्राउंड करुन घेतली. मग त्यावर केलय. तसं शेडींग सोपं पडेल असं वाटलं, आणि ते तसं सोपं पडलंही. चित्र काढताना - म्हणजे काढण्यासाठी झूम करुन घेतले होते. ग्रे बॅकग्राऊंडवर मग काळा आणि पांढरा रंग वापरला. झूम वरुन नॉर्मलला आणल्यावर लहान झाले आहे चित्र खूपच. म्हणून इथे थोडे मोठे करुन टाकले, ते थोडे ब्लर झाल्यासारखे वाटते. मला वाटतं की ग्रे रंगाच्या वापराने तसे वाटत असावे...

झूम करुन काढताना रेषा ठळक काढू शकले आणि सोपे गेले. फक्त नॉर्मलला आल्यावर चित्र लहान झाले! नॉर्मल रिझोल्यूशन ठेवून चित्र नीट काढायला शिकायला हवं! Happy

आश्विनी, भोसले, अभिजित खूप आभार!

आयटे, गुड! ग्रे शेडिन्गची आयडिया चान्गली हे (अर्थात अवघड पण हे)
तपशीलात सान्गितल्याबद्दल धन्यवाद!
आता चित्र झुम न करता काढायचा प्रयत्न कर! Happy मी बहुतेक चित्रे तशीच काढली हेत, अगदी सूक्ष्मातील दुरुस्तीकरता झुम करुन घ्यायचो! नि नॉर्मलि लहान आकारातला ब्रश वापरायचो! पेन्सिल नाही!
बायदिवे, अजुन एक शन्का, तुझ्या लॅपटॉपला सेप्रेट माऊस बसवला हेस का? नाहीतर माउस ऐवजी बोटाने काही काढणे फारच अवघड होईल असे वाटते! की उलट बोटाने सोप्पे जाईल? काय की!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

नाही, सेपरेट माऊस नाही आहे, बोटानीच काढते Happy ते सोपे वाटते.

बोटा ऐवजी एखादी काडी वापरुन बघ की! Happy
माझ्याकडे लॅपटॉप नाही नाहीतर प्रयत्न केला अस्ता!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

तुम्हीच पहा! जेनू काम, तेनू थाय Happy
दिवे हां Happy

आयला, मी तसली "काडिरामाकडची" काडि वापर अस नाय काय म्हणल! Proud अस कस सान्गेन मी तुला?????
खरोखरची काडी, सम्पलेली रिफिल अस काहीतरी वापर!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

असं होय! तसं असेल तर मनापासून सॉरी हं Sad माझी समजण्यात खूप गफलत झाली... सॉरी, सॉरी..

तसं नाही वापरता येणार. लॅपटॉपच्या पॅडला चिरे वगैरे पडायचे.

मला वाटतं आयटी, लिंब्या म्हणतो तस केलस तर सेपरेट माऊस घ्यावाच लागेल तुला Proud

मला त्या जिजाबाई वाटल्या होत्या. पण आता खरचं सावित्रीबाई वाटतं आहे. आरती छानं.

बी, ही आरती कोण आहे?? माझं नाव आरती नाही.
जीजीबाई कोण? जिजाबाई म्हणायचं आहे का तुला??
किती रे हे बेसिकमधेच राडे तुझे!!! Sad

जीजी आज्जी की जीजी आत्त्या रे नक्की काय म्हणतो Proud

खरच तू चुकतोस का मुद्दाम असं बोलतोस कळतच नाही ब-याचवेळा Uhoh विदर्भात जीजीबाई म्हणत असत का जीजाबाईंना. हो आम्ही विदर्भ कधी पाहिला नाही त्यामुळे ही एक शक्यता नाकारता येत नाही.

Pages