ती बंद खोली

Submitted by निनाव on 25 January, 2011 - 12:58

त्या खोलीत जात नाहि कोणी
आत्ता तिथे रहात नाहि कोणी
येतात कधि वारसे अधून मधून
बद्लते चश्मे डोळ्यांवर चढ्वून

होते त्या भिंत्यांवर त्यांचे काहि चित्र
होते त्या लोखंडी पेट्यांमढे काहि पत्र
अत्ता ते चित्र कोणी बघत नाही
पत्रांच्या घड्या कोणि मोड्त नाहि..

भिंत्यांवर आल्या आहेत काही रेशा
बहुदा..कालांतराने
वाहिल्या त्यावरुन पावसाच्या धारा
खिड्क्या दरवाजे असतात नेहमी बंद
येतात आवाज फर्श्यां मधल्या भेगातून

देउन टाकली जुनी भांडी
आत्ता कोण ती वापरणार
लाल मातीच्या कोयरीतून
आत्ता शिंदूर कोण लावणार

उघड्तो दार त्या खोली चे एकदा वर्षातून
धुळ झटकण्यासाठी..
पसरतो गंध आठ्वणींचा खोली भर
खोली नं घेतलेल्या श्वासातून!!

गुलमोहर: 

छान!

देउन टाकली जुनी भांडी
आत्ता कोण ती वापरणार
लाल मातीच्या कोयरीतून
आत्ता शिंदूर कोण लावणार

हे आणि शेवटचया दोन ओळी खूप आवडल्या.