पान खायो फॅमीली हमार

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काल देवान रस्तावर गेलो होतो. शिकागो ज्यांनी पाहीलय त्यांना देवान काय चिज आहे हे सांगायची गरज नाही पण न पाहीलेल्यांसाठी सांगतो. डेव्हॉन ऍव्हेन्यु नावाच एक रस्ता आहे त्यावर साधारण दोन मैल भारतिय व पाक दुकाने आहेत तिथे गेल्यावर अगदी भारतातल्या कूठल्याही रस्तावर गेल्यासारखे वाटते. सांगायची गोष्ट म्हणजे ईथे पान मिळते. ताजे पान घेन्यासाठी व खान्यासाठी मी ४२ मैल गाडी चालवत येतो. तुम्ही म्हणाला काय येड बिड लागलय का? तर हो महाराजा वेडच लागत पान खाल्यावर. माझ्यासोबत एक मराठी मित्र होता तो ईंग्रजाळलेला मराठी आहे. तिथे मी पान घेतल्यावर हा एकदम माझ्याकडे अविश्वासाने पाहू लागला? you it pan? (eat वर भर) ही त्याची प्रतिक्रिया होती. जनु काही मी एक खुप मोठा अपराध करतोय व तो त्यात माझी साथ देतोय, समाजात आता त्याचे माझ्यामुळे हसे होनार असा विश्वास त्याच्या डोळ्यात मला दिसला.
मी त्याला विचारले तु नाही खात पान. तो म्हणाला लहानपनी एकदा खाल्ल होत पण त्यानंतर कधीही नाही व त्याची चव मला आवडत नाही. आता अविश्वास माझ्या डोळ्यात होता. पण तो त्याला दिसला नसावा. त्याने त्याचे म्हणने पुढे चालु ठेवले. अरे पान बिन काय खातोस? मला तुझ्या कडे पाहुन तु त्यातला असशिल असे वाटले नाही.
त्यातला? म्हणजे कुठला : मी
अरे यु नो दोज गाईज. साले पान खाऊन जिथे तिथे थुंकतात.
ओह. अरे नाही मी रस्तावर थुकंत नाही पण तरिही पान मात्र खातोच.
परत एकदा त्याने माझ्याकडे तुच्छतेने पाहीले व मला डिसअप्रुव्ह केले.

च्यायला ह्याचा. साल्याने एकदाही पान खाल्ले नाही वर मला डिसअप्रुव्ह करतो. मी मनात विचार केला. म्हणल जाऊ द्या. ईथेही व्हिऐन्ड सी व्हायचा. मायबोलीवर होतो तो काय कमी की काय म्हणुन् मी गप्प बसलो.
पण गाडी चालवत वापस येताना विचार केला. पान खाने ईतके वाईट असते का? असे होन्याची ही काही माझी पहिलीच वेळ न्हवती. आधीही देशात दोन चार मित्रांनी मी पान खाल्ल्यावर विचीत्र चेहरा केलेला आठवला. ह्या लोकांनी काय मिस केले आहे हे त्यांना माहीत नाही. अरे साक्षात पु ल पण पानवाल्यावर लिहु शकतात तर पानात काही तरी नक्कीच असले पाहीजे.

माझ पानाशी ऐनकाऊंटर फार लहानपनी झाले. आम्ही म्हणजे माझे आई वडिल, काका-काकु, आजी असे सर्व एकत्र राहायचो तेव्हा कधीतरी नक्कीच माझ्या आजीने मला पान खायला दिले असनार. हो नक्कीच. कारन ती पान तर खायची पण ते ही तंबाखुचे. हो आमच्या घरी समानता तेव्हा पासुन आहे. ऊगीच न्हाय काय. तर माझी आजी ही कुट्टा तयार करायची. तो कुट्टा,
तंबाखु, चुना व कतरी सुपारी हे टाकले की तिचा विडा तयार होत असे. दिवसातुन नक्कीच ५-७ पान ति खात असे. (माझ्या विड्यात मात्र तंबाखु वजा). आमच्या घरी पट्टीचे पान-तबांखु खानारे लोक होते. आज्जी, आत्या, दोन काकू आणि तिन काका हे पान (त्यात तंबाखु टाकुन) खानारे होते. एकत्र राहात असल्यामुळे मी दर संध्याकाळी एकदा तरी एका काकाला " आई जरा माझ्यासाठी तमाखु लावती का?" हे ऐकले आहे. अन दुसरी काकु तर तिच्या सासु बाईच्या गळ्यात पडुन आजीबाई जरा लावा बर बार अस म्हणताना मी नेहमी ऐकले आहे. ( असे विचीत्र वाटुन घेउ नका. आजकाल नाही बर्याच घरात लोक एकत्र दारु पित असतात, त्यांना तुम्ही पुढारलेले म्हणता अन आमच्या काका काकु ला अडानी? का तर ते पान तंबाखु खातात म्हणुन?
माझे वंसत काका म्हणजे पान बहाद्दर होते. खास मगई पान ३००/१२० करुन मायेने आपल्या आईला देत व सोबत नारायन काकाला म्हणत नार्या तुझ्यासाठी काय लावु. अहो हे भावा भावातील संभाषन ऐकताना फार मजा यायची. रोजच्या (जावे जावे च्या भांडनात) संध्याकाळी पानच ते भांडन सोडवायला यायचे. माझे वडिल आणि आई दोघेही तंबाखु विना पान खातच असत. लहानपनी मी अनेकदा दुकानावर सुटे पानं आनायला गेलो आहे. सोबत तंबाखुच्या पुड्या ही आनल्या आहेत पण कधीही कोणाला पान खाऊन ते कुठेही थुंकतना पाहीले नाही. सगळे जन थुंकन्यासाठी बाथरुम पर्यंत जात असत व पाणि ही टाकत असत. बहुदा आजीने ही सवय लावली असेल. तंबाखुच्या अति सेवनामुळे वंसत काका वैकुंठवासी झाले. त्यांचा तेराव्याला नारायन काकांनी त्यांचा खास तंबाखु मिश्र विडा एका तंबाखु खान्यार्या ब्राम्हणाला खायला दिला व म्हणाले आता वसंताची मुक्ती झाली. मी ते जाताना सोबत न्हवतो पण ते नक्कीच माझ्या काकांना म्हणाले असतील नारायन जरा पान लावुन देतोस का? ईतके त्यांना वेड होते पानाचे.
तंबाखु खाने हे त्या पिढीबरोबरच सुटले. पण पान मात्र अजुनही आहेच. आमच्या पागल पान सेंटर वर ( हो नावही पागल आहे) जाऊन मसाला पान मागायचे व ते खात खात, आस्वाद घेत वापस यायचे हे माझे देशात घरी केल्यावरचे रोजचे कार्य.

माझे लग्न झाल्यावर आमच्या घरची पान संस्कृती चालु ठेवने माझ्यावर आले. माझ्या बायकोला देखील मसाला पान खायची माझ्यामुळे सवय लागलीये. ओरगांबादला असताना रोज संध्याकाळी आम्ही "तारा पान सेंटर" ला भेट द्यायचो. तारा चे पान म्हणजे ओरंगाबादेतील उत्कृष्ट पान. पानाची गादी म्हणजे पानपट्टी ऐवढी छोटी जागा असे तुम्ही तारा ला ईमॅजीन करत असाल तर चुकताय. एक मोठे दुकान म्हणजे तारा. तारा ही ऐक स्वंतत्र संस्कॄती आहे. जिथे मुस्लीम, दलीत, ब्राम्हण, मराठा असे सर्वच ऐकत्र येतात व मोठ्या भक्तीभावाने त्या दशगुणी बिड्याचे सेवन करतात. देशात असे पर्यंत रोज संध्याकाळी जेवन झाल्यावर मी व प्रज्ञा पान खायला जात असु. आधी ओरंगाबाद, नंतर पुणे, त्यांनंतर मुंबई येथील संध्याकाळ पाना शिवाय गेली नाही.
अमेरिकेत आल्यानंतर बरेचदा पानाची आठवन येते. आता देशी दुकानातुन तयार पानाचे (फ्रोजन) पाकीट मिळतात पण त्यात मजा येत नाही. पान कस ताज बनल पाहीजे. वाटत आत्ता जाऊन पट्टीवर थांबाव. पान वाल्याल म्हणाव जरा मसाला पान लगाव. हळुच ते पान उजव्या गालाकडे सरकवाव त्यावर दाताने टिचकी मारावी. तो जो रस येतो त्याचा आस्वाद घ्यावा व कस समाधिस्त व्हाव. रजनिशांनी पान खाल्ल असत तर त्यांनी पुस्तकाच नाव बदलुन पान से समाधी तक असे पुस्तक लिहीले असते.

प्रकार: 

पान न आवडणारेही लोक असतात का??? ऐ. ते. न!! Lol

सही केदार, त्याच्या बंद अकलेचा ताला एकदा त्याला पान खिलावून खोल Happy पण येथे मला अजून चांगल्या चवीचे पान मिळाले नाही. ते फ्रोझन वगैरे बघितल्यावर खावेसे वाटत नाही. मी तर बनारस ला गेलो होतो तेथे बिना तंबाखू चे पान मागितल्यावर "मीठा" पान मागा असे सांगायचे. नाहीतर पान हे तंबाखूचे असाच अर्थ तेथे दिसला. पण लहानपणी डॉन पाहिल्यापासून बनारस ला जाऊन पान खाण्याची इच्छा होती ती मात्र पूर्ण झाली (बनारसी पान पुण्यात ही खाता येते हे खरे). आता देशात गेल्यावर जुन्या मित्रांबरोबर कोठेतरी जेवताना दोन अडीच तास गप्पा झाल्या की मग पानाच्या दुकानासमोर आणखी अर्धा तास घालवता येतो Happy

हो त्याला मिठाच म्हणतात. पान म्हणल की डिफॉल्ट १२०. तंबाखु टाकयची नसेल तर नुस्ता चमनबहार पण टाकता येतो वाटत पण मी नाही ट्राय केले अजुन. अन ते फ्रोजन पान ईतके बेकार असतात की त्याचामूळे पानाबद्दल उगीच राग निर्मान व्हायचा.

येडताक दिसतो तुझा मित्र ! तुझ्यासारखच आमच्या आख्या घरालाही पानात रस (विना तंबाखू एवढेच). आमच्याकडे पूर्वी बाबा सर्वांना पान लावून द्यायचे, पानाचं खास तबकसुद्धा होतं तेव्हा. 'पान से समाधी तक'.... अगदी अगदी. त्यातही मसाला पानाबरोबर चैतन्यकांडीचे ४-५ झुरके .... व्वा !! एकदा तरी ते तंबाखूयुक्त पान खायचे आहे. एका मित्राकडून १२०-३०० वगैरे नक्की काय ते समजावूनही घेतले होते, पण तो नुस्ताच थिअरीचा पेपर झाला.... आता तुझा लेख वाचून फुलचंद खाऊन बघण्याच्या इच्छेने परत उसळी घेतलीये Happy एक वाचलेले आठवले - तंबाखूवरुन माणसाच्या ४ जाती म्हणे - थुंक्ये, फुंक्ये, शिंक्ये अन् भुंक्ये.

This signature was written entirely with recycled electrons.

केदार,
फार छान लिहीले आहेस....
(आता लगेच पान खायची इच्छा होतेय!)
Happy

क्या बात है, केदार!
हैद्राबादला एक स्वीट शॉप मध्ये दोन्ही हाताच्या ओंजळीत मावेल एव्हढे मोठे शाही पान मिळते. आतमध्ये पानाच्या इतर मसाल्याबरोबर मस्त स्वीट बसवलेले असते. वर वर्ख वगेरे लावलेला आणि एक पान एका सुंदर काचेच्या पेटीत येते. काही वर्षांपुर्वी अश्या एका पानाची किंमत होती १०० रु. हे पान खाउन संपवायला मला दोन तास लागले! स्वाद बाकी अहा!
छान सुगंध दरवरळला- आठवणीचा आणि पानाचा पण. धन्यवाद! Happy

भारी लिहिलय. पण माझ रंगिबेरंगी पान वाचच्,याबद्दल लिहिलय मी

मस्त लिहिलंय केदार ... आमच्या जर्सीला चक्कर मार ... समोर उभं राहून पान लावून मिळेल Happy
पुण्यात गेलो होतो तेव्हा रोज रात्री पान खायचो .. पण 'मीठा' -- नो तंबाखू !
मला वाटतं तू पुलंचा 'पानवाला' एकदम पाठ केलं असशील !

सर्वाना धन्यवाद.

अरे चिन्या मी तंबाखू विरोधीच आहे. (मी खात नाही) पण माझ्या घरचे काही लोक खायचे.

संदिप तिकडे आलो की नक्की खाईनच.
स्लार्टी तसे तबक आमच्या क्डे अजुनही आहे. अजुनही घरी मैफल जमली की मध्ये पान असतेच.

कृष्ण चालले वैकुंठाला
राधा विनवी पकडुनी बाही
इथे तमाखू खाऊनी घे रे
तिथे कन्हैय्या तमाखू नाही!

छान लिहिलंसं. असं कधी वाटलं नव्हतं कि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोठेपणी इतका काही जीव तुटेलं म्हणून. पानाची किती व्यसनी लोकं पाहिलीत मी पण आता पान हरवले आहे..

>>असे विचीत्र वाटुन घेउ नका. आजकाल नाही बर्याच घरात लोक एकत्र दारु पित असतात, त्यांना तुम्ही पुढारलेले म्हणता अन आमच्या काका काकु ला अडानी? का तर ते पान तंबाखु खातात म्हणुन?>> खरचं..!

- बी

सही केदार, छान! मी सुद्धा औरन्गाबद्चा आनि पान शोउकिन! तारा पान वर तर आम्च्य कित्येक चकरा व्हायच्यात. या लेखामुले त्या आथ्वनि जाग्या झाल्यात. :):)

केदार छान अनुभव व लेख. रात्रीच्या जेवणानंतर पान खाण्याचे सुख न घेणारे कमनशिबीच. मागे एकदा म.टा मध्ये मुंबईतल्या पानवाल्यांवर दररोज एक लेख यायचा त्यात प्रत्येक पानवाला पान कसे बनवतो त्याची माहिती असायची. पान खाण्यापेक्षा ती वाचणेही मला फार आवडायचे. पानाच्या टपरीवर पानाबरोबर इतरही खुप गोष्टी चघळायला मिळतात. मजा येते.

म्म्म्म्म मिठा पान.....सही पान! आणि मघइ तर सही रसाळ मधाळ....

खरच पान न आवडणारे लोक असतात, कस शक्य आहे?
केदार तुझा मित्र " --- क्या जाने अद्रक का स्वाद" प्रकारात मोडणारा दिसतोय. proud.gif

केदार
अगदी मस्त लिहिलंय. सुटीच्या दिवशी, आप्तेष्टांबरोबर निवांत जेवण झालं की पान हे हवंच! या देशातील सर्व भारतीय रेस्टॉरंट मधे एकसारखं ( उत्तर भारतीय पद्धतीचं) जेवण मिळतं हा एक त्रास. अन शिवाय बाहेर आल्यावर गप्पा मारत पान खाता येत नाही हा दुसरा. इथल्या भारतीय दुकानात पानं मिळाली की आम्ही न चुकता आणतो. पण पानवाल्या सारख्या पानाची मजा त्यात नाही.

माझ्या आजोळी बरेच जणांची सुपारीची शेती असायची. सुपारीच्या झाडांवर साधारण पणे मिरीचा वेल लावत. पण प्रत्येक सुपारीच्या बागेत एक-दोन झाडांवर तरी विड्याच्या पानाचा वेल लावायची प्रथा होती. त्यामुळे घरात कायम ताजी पानं असायची. ताजं पान, थोडा काथ्-चुना, चिमूट्भर बडिशेप, थोडी सुपारी, एक 'कातली कुडको'( खोबर्‍याचा तुकडा) अन एखादा वेलदोड्याचा दाणा अशी पानं असायची सगळ्या घरातून. तूप कढवताना त्यात टाकलेलं विड्याचं पान खाण्यासाठी आम्ही भावंडं किती हट्ट करत असू. शिवाय क्वचित त्या पानांची भजी पण व्हायची आमच्या कडे.

अमेरिकेत रहाणारा आमचा एक पानवाला मित्र आहे ( त्याचंही नाव केदारच आहे - काय योगायोग ?). तो कधी जेवायला येणार असला तर आधी मेनू विचारतो - मग त्याच्या पसंतीला उतरला तर मग आपली 'चंची' घेऊन येतो अन जितकी मंडळी असतील त्या सर्वांसाठी माणशी चार पानं कमीत कमी या हिशोबाने सगळा सरंजाम आणतो. त्याच्या त्या सुरेख मखमाली ( कस्टम मेड ) चंची मधे त्याच्या पुण्याच्या पानवाल्याने दिलेली सामग्री असते - पान कापायची कात्री, काथ -चुना लावायची काडी, गुलकंद, काथ, तीन चार वेगवेगळ्या साइझ मधे कापलेली सुपारी, शिवाय मसाला सुपारी, दोन प्रकारची बडीशेप, लवंगा सगळा 'माल' पुण्याच्या पानवाल्या कडून आणतो दर खेपेस. जेवणं आटपली की टेबल साफसूफ करून त्यावर पानाचं दुकान लागतं- प्रत्येकाला हवं तसं पान बनवून मिळतं अगदी.

खूप छान, जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

कसलं सही!! पानाचं दुकान घरबसल्या!!

वाह छान लिहील आहे, मनमोकळ सरळसोट.. झक्कास!!! पण कुणी काही म्हाणो पान खाउन पिंक टाकायाची मौजच न्यारी असते...

केदार ण चा न किती जागी केला आहेस... पानात खाताना दाताखाली खडी आल्या सारख वाटत रे वाचताना... भैया उतना जरा देखो.

धन्यवाद परत एकदा.
हो तो ण आणि न चा बर्याचदा माझा घोळ होतो खरा.

केदार,
मस्त जमलय पान.
पान मलाही आवडते, पण साधे मसाला पान. सुपारी पण नाही खात मी.
मुंबईत आता, सुकवलेले मसाला पान मिळते. अप्रतिम चव असते त्याची. सूकवलेले आहे असे जाणवतही नाही खाताना. पुढच्या भारत भेटीत याचे मोठे पार्सल घेऊन जा.

ज्या दुकानात तंबाखु वगैरे घाऊक मिळतो, त्यांच्या दुकानात ठंडक म्हणुन एक स्फटिक मिळतात. बहुतेक मिंट असावे ते. त्यातला एक कण फक्त कुठल्याहि विड्यात टाकायचा. त्याने मस्त गारगार वाटते. त्याचीपण शिशी सामानात हवीच.

केदार, मस्त लिहिलयस एकदम. आमच्याकडेही सुग्रास आणि साग्रसंगित जेवण झालं की पान हवंच. पण मला पटकन संपणारं पान आवडतं. लोक तासन् तास कसं काय ते पान चघळत बसतात कोणास ठाऊक.

केदार, छानच लिहिलयस!!
पानाचा खरा आस्वाद घ्यायचा तो मस्त मटण - भाकरीच्या जेवणानंतर!!! ए वन मुखवास!!

मंजू,
पान चघळतच खावं... पटकन खाल्लेलं ते पान नव्हेच...
बाकी केदार, मस्तच रे भो.. घरी गोडाधोडाचं जेवण झालं किंवा हॉटेल मधे जेवलो की पान हवंच बुवा..
ते न, ण चं बघ बुवा काहीतरी... पान खडे टाकून खाल्ल्यासारखं वाटत होतं Lol

तोंडात पान असल्यावर 'न' चा 'ण' किंवा उलट चालायचंच! Happy

कालच पान खायचा विचार चालला होता नि आज हे (रंगीबेरंगी) पान दिसावं समोर! काय मस्त योगायोग म्हणायचा हा! Happy
छान! Happy

आमच्याकडे इथे पानाचे सर्व सामान आहे. बरेचदा नवरा घरी साग्रसंगीत पानं करतो, मित्रमंडळीला पण खाऊ घालतो. सासरी पारंपारीक पानाचे दुकान आहे सध्या नॉस्टॅल्जिया या एकाच कारणामुळे सासरे, चुलत सासरे ते चालवतात. पण घरात एकालाही पान, सुपारी, तंबाखूचे व्यसन नाही.

भरपेट जेवण झाल्यावर पान खायला मिळणे याला नशिब लागते त्यामुळे निव्वळ पानासाठी ४२ मैल गाडी हाकणे समजतो.

आम्ही WI ला असतांना देवान (गांधी-जिना?) स्ट्रिट ला नियमीत भेट द्यायचो... एकदम भारतात आल्यासारखे वाटायचे.

ओरंगाबादेतील "तारा पान सेंटर" ला भेट मी ही दिलीय ......... पण नावाजलेली जागा नि अति गर्दी यात ते मस्तवालपण(पान खाल्यांनंतर च) काही निटसं उपभोगता येत नाही........... आपल्याच नेहमीच्या पानवाल्याकडे जावं नि शान से उभं राहवं......... पान चघळत. !!!