वंशाचा दिवा ?? !!!!

Submitted by सायली on 23 January, 2011 - 12:56

परवा माबोवर ठमादेवींचा लेख वाचला "दुसरा मात्र मुलगाच हवा" http://www.maayboli.com/node/22748 आणि खुप विचार मनात घोळायला लागले..
मग लोकसत्ता मधला लेख..
एक मुलगी असल्याने असेल किंवा एक माणुस म्हणुन पण, पण पुर्वी असं काही वाचलं की खुप अपमानास्पद वाटायच.. Especially जेव्हा असं एखादी स्त्री म्हणते तेव्हा तो तिच्या आणि प्रत्येक बाईच्या स्त्रीत्वाचा तर अपमान वाटायचाच पण त्याचबरोबर आपल्या आईचाही अपमान वाटायचा..
परवा अपमान बरोबरच विषाद वाट्ला.. एकदम उदास वाटलं आणि लोकांच्या मानसिकतेची मजा वाटायला लागली..

आमच्या आईबाबांना आम्ही दोघी मुलीच .. पण त्यांच्या वागण्यातुन कधी त्याबद्द्लचा खेद, दु:ख जाणवलं नाही.. आम्ही अशा वातावरणात वाढलो की मुलगी म्हणुन जन्माला येऊन आपण काहीतरी पाप केलय(?!) Happy चुक केलीये(?!) Happy समाजाच्या दृष्टीकोनातुन हे जरा भयंकरच आहे असं काहीच माहिती नव्हतं अगदी कॉलेजला जाईपर्यंत.. अगदी सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य आम्हाला होती...

पण वंशाच्या दिव्यासाठी चाललेली लोकांची धड्पड पाहिली आणि विचार करायला लागले.. वंशाचा दिवा , वारस या शब्दाचं हसु यायला लागलं

वारस असला पाहिजे किंवा वंश चालला पाहिजे म्हणजे नक्की काय हो ???

एक बाई जेंव्हा असं म्हणते की मला मुलगा हवा कारण तो आमचा वंश चालवेल, तर तो मग सगळ्यात मोठा विनोद मानायला लागेल कारण so called वंश पुढे नेण्याचा संबंध फक्त पुरुषाशीच जोडला गेलाय.. त्यामुळे बाईचा नक्की वंश कोणता ? रक्ताने ती माहेरच्या वंशाची असली तर तो, ती सगळ्या दृष्टीने एका लग्नात (?) सोडुन, तोडुन आलेली असते. आणि सासरी तो आधीचा वंशाचा दिवाच तो पुढे नेणार असतो त्यामुळे.....
आणि तसही फक्त पुरुषच वंश पुढे नेणार असल्याने तिचा वंश कोणता या गोष्टीला तसही फारसं महत्व नाही, नाही का??

एखादा पुरुष असं म्हणतो तेंव्हा त्याला नक्की काय म्हणायच असतं ? मी, माझे वडील, त्यांचे वडील आणि so on यांचेच जीन्स माझ्या मुलात येऊदे.. बरं यांच्या खानदानाने असा कोणता तीर मारलेला असतो की यांचे जीन्स पुढे pass on नाही झाले तर अपरिमित हानी होणार असते... आणि चुकुन एखाद्या आईचे जीन्स आले तर!!! अरे बापरे... भयंकरचं ... पण सध्या तरी त्यावर काही control नाही .. so sad... Happy

मुलगाच हवा हा संबंध संपत्ती साठी असेल तर "आप मेला जग बुडालं" काय फरक पड्तो की ती कोणाला मिळाली... का मुलगी या शब्दाचाच इतका राग आहे की फक्त मुलालाच मिळाली पाहिजे.
(का आपल्याच रक्तामासाच्या मुलात एवढी धमक नाही की तो कमावु शकणार नाही??? Happy (जोक्स अपार्ट) )

मुलगा म्हातारपणी सांभाळेल आणि मुलगी सांभाळणार नाही या दोन्ही गोष्टींची मुल जन्माला यायच्या आधीच, छातीठोक खात्री देणारा माणुस मला तरी अजुन भेटला नाहिये...

मला अजुन एका गोष्टीची मजा वाटते. पटकन आपल्या खापरपणजोबांचं नाव आठवतं का हो आपल्या सगळ्यांना ??? एखाद्याला आठवेल सुद्धा पण त्यामागे??
मग आपले पणतु खापरपणतु यांना आपल्या खापरपणजोबांचं, पणजोबांचं म्हणजे आपलं नावही आठ्वणार नाहिये.. आपण आत्ता ज्या प्रकारे वागतो ते आपल्या पुर्वजांना आवडणारं पटणारं आहे का? आणि त्याच प्रकारे आपले वंशज जे काही असतील ते आपल्याला झेपेल का तरी???

वंशाचा संबंध आडनावाशी असेल तर फारच छोटी गोष्ट झाली. एक Affidavit (!) कोणताही वंश (?) पुढे न्यायला पुरेसं आहे.

मुलाच्या लग्नात हुंडा मान पान असतो.. मला वाटतं हा ही विचार तोच लोक करतात ज्यांना त्यांचा वंश पुढे नेण्यासाठी मुलगा हवा वाटतो... शेवटी आपणच निर्माण केलेल्या या अनिष्ट रुढी आहेत आणि आपणच ठरवलं तर त्या नक्कीच संपतील...

प्रत्येकाने असा विचार एकदा तरी करावा की आपण अशी कोणती जगावेगळी गोष्ट केलीये की ती पुढे गेलीच पाहिजे .. याची खात्री कोण देणार की मुलगाच ती पुढे नेऊ शकतो... आणि मुलगी नेऊच शकत नाही?? तार्किक दृष्ट्या थोडीफार शारिरीक ताकद सोड्ली तर मुलींमधे कोणत्या गोष्टींची कमी आहे?? आणि जर का तेच प्रमाण असेल तर मग सगळ्यांचे वंशज फक्त The Great khali च असावेत असं लोकांना वाटतं का?

असं का नाही वाटत की माझं मुल मग ते मुलगा /मुलगी जे काही असेल त्याला मी खुप उत्तम रित्या वाढवेन... इतकच कणखर बनवेन की योग्य गोष्टीसाठी जगाशी सामना करु शकेल...
उत्तम तर शिकवेनच पण त्याच्या बरोबरीने खुप human values, life values देईन जेणे करुन ते एक खुप चांगलं human being बनेल की तिला/ त्याला आपल्या आईवडिलांचं नाव सांगताना खुप अभिमान वाटेल..

मी मुलगा, मुलगी या कशाच्याच विरोधात नाही . जे माझं असेल, त्याला/ तिला मी खुप चांगलं वाढवेन..
आणि निसर्गाच्या नियमात , चक्रात ढवळाढ्वळ करण्याचा कोणालाच काहीच अधिकार नाही.. १०००:८३४ हा रेशो नक्की आपल्या कोणत्या आधुनिकीकरणाचं प्रतिनिधीत्व करतो???

मुलगाच का हवा याचं एकही rational कारण अजुन तरी मला सापड्लेलं नाही . याव्यतिरिक्त काही असेल तर मला ते नक्कीच ऐकायला आवडेल..

धन्यवाद..

सायली कोठावळे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वंशाचा दिवा ?>>>> ह्या गोष्टीला ९९% बायकाच जबाबदार असतात , आधी त्यांच डोक ठिकाणावर येऊ द्या.
ज्यादिवशी घरातल्या सगळ्या स्त्रीया खंबीरपणे म्हणतील मला मुलगीच पाहीजे, त्या घरातला कुठलाही पुरुष म्हणणार नाही मला वंशाला दिवा म्हणुन मुलगाच पाहिजे.

छान लिहिलयस... तळमळ पोचली..
काल जे म्हणालेलीस ते काल नीट कळालं नव्हतं.. आज कळालं..
१००% अनुमोदन!

ह्या गोष्टीला ९९% बायकाच जबाबदार असतात , >> किती सॅम्पल साइझचा आधार आहे या ठासून सांगितलेल्या स्टॅटिस्टिक्सला ?

भारतीय समाज स्टॅटस वर चालत नाही , शक्य असेल तर भारतात येऊन बघा काय प्रकार चालतात ते . नंतर मला स्टॅट्स विषयी विचारा.

सायली खूप छान! आवडलं. माझ्या ही मते खानदान्,कुळाचे नाव वगैरे सारं भोळसट आहे. आपला मुलगा काही शिवाजी बनून साम्राज्य स्थापन करणार असल्याचा आव आणणारे आपण खूप हिपोक्रॅट आहोत. मला एकच मुलगी आहे. आम्ही तिघे सुखी,मजेत जगतो. आणि माझ्या ऑफिसमधे देखील एकच मुलगी असणारे बरेच आहेत हा एक योगायोग! पण मुलगा नाही असे विचारणारे भेटले की कीव येते त्यांची या २१ व्या शतकात. असो.

आता हा विषय ईतका चर्चिला गेलाय, कि बोलण्यासारखे काही राहिले नाहीये.

लिखाण चांगले आहे.

बाजिंद्या... पटलं रे Happy

बाकी लेख छानच..... Happy
तुम्ही पुरुषांवर जास्तच चिडुन आहात असं उगीचंच वाटुन राहलंय...... की खरंय ते Wink

तळमळ पोचली.
मला काय किंवा माझ्या नवर्‍याला कधीच वाटल नाही की आम्हाला मुलगा नाही म्हणुन आमच काही बिघडणार आहे :स्मितः

मला अजुन एका गोष्टीची मजा वाटते. पटकन आपल्या खापरपणजोबांचं नाव आठवतं का हो आपल्या सगळ्यांना ??? एखाद्याला आठवेल सुद्धा पण त्यामागे??
मग आपले पणतु खापरपणतु यांना आपल्या खापरपणजोबांचं, पणजोबांचं म्हणजे आपलं नावही आठ्वणार नाहिये.. आपण आत्ता ज्या प्रकारे वागतो ते आपल्या पुर्वजांना आवडणारं पटणारं आहे का? आणि त्याच प्रकारे आपले वंशज जे काही असतील ते आपल्याला झेपेल का तरी??
>>>>>>>>

दुरदर्शन वरती.. आजपासुन साधारण .. १२-१३ वर्षा पुर्वी .. जनहिता साठी केंद्र सरकारणे स्त्री भ्रुण हत्या विरोधात जाहिरात काढली होती..
त्यात पण वरचा मजकुर सेम २ सेम होता Happy
"लडका लडकी फरक नही ये हमारा नारा है" .. असे काहीतरी गाणे होते त्या जाहीरातिचे..
तेंव्हा खुप लहान असल्यामुळे काही कळायचे नाही स्त्री भ्रुण हत्या म्हणजे काय प्रकार आहे..

पण जस जसा मोठा होत गेलो.. तेंव्हा समाजाचे अनेक वाईट पैलु दिसुन आले.. त्यातला भयंकर म्हणजे.. स्त्री भ्रुण हत्या..
आज सुध्दा गावा मधे अगदी बिनधास्त पणे लोक हा प्रकार डॉ. कडुन करुन घेतात..
आणी चांगले नावाजलेले डॉ. सुध्दा त्यांना विरोध न करता.. त्यांच्या कडुन जास्तीचे पैसे ऊकाळुन हे कर्म करतात..

आता अगदी अशातच घडलेला प्रकार..
माझा एक जवळचा मित्र डॉ. आहे..
त्या कडे एका बाईने प्रेग्नंसी टेस्ट साठी आली होती.. तिने आधीच ह्याला सांगितले जर मुलगी असेल तर
गर्भपात करायाचा ते पण एकदम चोरुन तिच्या नवर्याला आणी सासरी काहीच न कळवता.. कारण तिला ऑलरेडि २ मुली आहेत..
जर तिसरी मुलगी झाली तर तिचा सासरी खुप छळ करतील.. आणी कदाचीत मारुन पण टाकतील..
ती अगदी रडुन रडून त्याला पटवुन सांगत होती..
शेवटी सोनोग्राफी मधे तिसरी मुलगीच असल्याचे कळाले..
ह्या महाशयांनी मग तिचा आणी तिच्या २ मुलींचा विचार करुन गर्भपाताचे पातक स्वता:च्या नावाने करुन घेतले..
पण मला वाटले त्याने केले ते योग्यच होते एका प्रकारे जरी ते चुक असले तरी पण Sad

सायली खुप छान लिखाण. एक्दम मनापासुन लिहिलेले. आवडले. आवळा..... तुमच्या लिखाणातिल प्रसंग मनाला स्पर्शुन गेला. मी त्या डॉ. च्या जागी असते तर मी ही कदाचित ते च केले असते.
आता थोडे माझ्याबद्दल.... मी एक्टीच. पण आज माझ्या आई ची संपुर्ण जबाब्दारी ही माझी आहे. (ती आर्थिकदुर्ष्ट्या स्वतंत्र आहे). तिचे hip joint replacement revision operation मी आणि नवर्याने यशस्वीपणे पार पडले. नवर्‍याचा सहभाग मोठा.
आणि मुलगे आसुनही आइ-बापाला अडगळित टाकणारे ही पाहिलेत.

आता अशाबद्दल लिहिण्यापेक्षा मुल ( मुलगा किंवा मुलगी ) समान धरून लेख लिहिणं जास्त उचीत होईल न? पॉझीटिव्ह थिंकींग जास्त महत्वाच. निगेटिव्ह विचारांचा काथ्याकूट करण्यापेक्षा मुलगा किंवा मुलगी कसे बरोबरीने जबाबदारी उचलू शकतात आणि उचलावी आणि उचलतात ह्यावर लिहिलेलं वाचायला जास्त आवडेल.

मुलगा किंवा मुलगी कसे बरोबरीने जबाबदारी उचलू शकतात आणि उचलावी आणि उचलतात ह्यावर लिहिलेलं वाचायला जास्त आवडेल.
>> जे आपल्याला मिळालय (दृष्टीकोन/स्वातंत्र्य/सशक्तीकरण) ते इतरांना देण्यासाठी/हवं आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी काय करता येईल यावरही विचार करायला पाहिजे.

सायली, फक्त एवढेच नाही. आणखी बरेच समज असतात.
मूलाशिवाय अग्नि कोण देणार ? तोंडात पाणी कोण घालणार ? असे पण समज आहेत.
मूलगा नसल्यास (किंवा मूल नसल्यास म्हणा ) काहि धार्मिक कार्यात पुर्वी आमंत्रण दिले जात नसे.
बरेच समज होते, आता ते थोडे शिथिल होताहेत. त्याबाबतीत आपण मराठी लोक जरातरी पुढारलेलो आहोत. बाकिच्या राज्यात भयानक स्थिती आहे.
अगदी गेल्याच आठवड्यात, तूमच्या ओळखीने भारतात कुठे खात्रीशीर चाचणी होऊ शकेल का ? मुलगी असेल तर "कट" करुन घेऊ, असे मला विचारण्यात आले होते. ( हो "कट" करणे, हा कोडवर्ड आहे त्या प्रकाराचा.)

ज्यादिवशी घरातल्या सगळ्या स्त्रीया खंबीरपणे म्हणतील मला मुलगीच पाहीजे, त्या घरातला कुठलाही पुरुष म्हणणार नाही मला वंशाला दिवा म्हणुन मुलगाच पाहिजे. >>>

म्हणजे आता पुरुष भ्रूण हत्येचा पुरस्कार !
आपण न्यूट्रल नाही का राहू शकत ?

काल पद्मगंधाचा दिवाळी अंक वाचला. त्यात एक कथा आहे. १०वीतल्या मुलीला तीची आत्या लॅपटॉप भेट देते. ती वडलांकडुन हट्ट करुन इंटरनेट कनेक्षन घेते. मुलगी हुशार आहे, आईवडलांची लाडकी आहे, पण तरीही बाबा दुस-या अपत्यासाठी प्रतत्नशील आहेत कारण त्यांना पोलिटिकल हेअर हवाय. आईबाबांच्या बोलण्यातुन कानावर पडलेले नविन शब्द ती नेटवर गुगलते आणि त्या अर्थांमधुन तिला वडिल आईला जबरद्स्तीने मुलीचा गर्भ पाडायला लावताहेत याचा शोध लागतो. आई दरवेळी रिकाम्या पोटाने का येते घरी परत हे कळते. ती वडलांवर 'तुम्ही माझ्या होऊ घातलेल्या बहिणीचे मारेकरी आहात' म्हणुन आरोप तर करते पण त्याचवेळी आईला मानसिक आधार देते. वडलांना 'मी सगळ्या बाबतीत हुशार आहे हे तुम्ही मान्य करता, मग तुमची पोलिटिकल हेअर मी का नाही बनु शकत?' असा सवाल करुन निरुत्तर करते. अतिशय सुंदर आणि वास्तवाच्या जवळ जाणारी गोष्ट, लहान मुलीच्या नजरेतुन दिसणारे वास्तव खुप छान मांडलेय.

सगळ्यांचे आभार...
दिनेशदा धन्यवाद .. हे मुद्दे माझ्या लक्षातच आले नव्हते..
मी हताशच होते हे असं काही वाचल्यावर... Sad

साधना धन्यवाद ही कथा शेअर केल्याबद्दल...

शहरांमधे याबाबतीत परिस्थिती खूपच सुधारत असली तरी इतरत्र मानसिकता बव्हंशी पूर्वीसारखीच आहे हें जाणवतं व वाईटही वाटतं.
[ एक किस्सा - माझी मुलगी मुलींच्या शाळेत शिकत असताना 'सेक्स एज्यूकेशन'साठी आलेल्या बाहेरच्या शिक्षिकेने या विषयालाही तोंड फोडलं; ' तुम्हाला एक मुलगी असेल तर दुसरा तरी मुलगाच व्हावा , अशी प्रार्थना कराल का ? ', या तिच्या प्रश्नाला सर्व मुलीनी हात वर करून जोरदार होकार दर्शविला. शिक्षिकेने आश्चर्य व्यक्त करतांच एका सूरात मुलीनी हंसत उत्तर दिलं ,' फक्त आमच्या मुलीचेच सगळे लाड केल्यावर त्या मुलाला काय वाटतं , हें बघायला मजा येईल !'. अर्थात त्या मुली हें मस्करीत बोलल्या असल्या तरीही त्यांत खोलवरची सल दडलेली असणारच !!! ]