Submitted by विशाल कुलकर्णी on 13 January, 2011 - 07:04
खुप जुनी कविता आहे ही, परवा जुन्या ट्रंका उचकताना सापडली.
माझ्या शर्टच्या बटनात
अडकायचं सोडलय
तुझ्या केसांनी...
ह्म्म्म...
भिरभिरत नाहीत अताशा
तुझ्या पापण्यासुद्धा,
मला पाहताना...
...
....
निष्क्रिय होवू लागलाय आजकाल
अंगठा..., तुझ्या पायाचा!
अन् ...
पुसट होत चाललीय...
माझ्या हातावरची,
तुझी रेषही....
हि लक्षणं..
शिशिराची का गं ?
का ग्रिष्माची?
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
अ प्र ति म कविता, विकु !!!
अ प्र ति म कविता, विकु !!!
<<पुसट होत चाललीय...
माझ्या हातावरची,
तुझी रेषही....
हि लक्षणं..
शिशिराची का गं ?
का ग्रिष्माची? << मस्त!
मस्त मांडलीस
मस्त मांडलीस
व्वा!!
व्वा!!
ए मस्त आहे रे...
ए मस्त आहे रे...
अरे बाबा विशाल, ही लक्षणे
अरे बाबा विशाल, ही लक्षणे नाहीतच. ही अवलक्षणे आहेत.
आपल्याले २१ व्या शतकात जायचं न्हवं?
मग केसांमध्ये बटना लटकल्यातर प्रगतीचा मार्ग अवरुद्ध होईल ना?
ते जाऊ द्या. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला.
छान ! तुमच्या कवितेवरून मलाही
छान !
तुमच्या कवितेवरून मलाही एक कविता सुचली.:)
आठवतं का तुला मी लिहिली होती कोरीच पत्रे
आत ठेवून दिली होती सोनचाफ्याची फुले....
त्यावर तुझं उत्तर आलेले....
अक्शर अगम्य..(पण तेन्व्हा तु साधा शिंकलास तरी वाटायचे कित्ती गोड...!)
आठवतं का तुला माझ्या हट्टापायी आपण दोघे मिळून
वाचत होतो एकच पुस्तक..कुठ्लं बरं... नक्की ना.धो. महानोरांचा कवितसन्ग्रह होता? हम्म नाही आठ्वत आता ..पण दहा मिनिटात तू ढाराढूर... ते आठ्वतय!
आठवतं का पहिल्यान्दा दोघे समुद्रकिनार्यावर गेलो होतो...सुर्यास्त पाहिला होता..मी झालेले "शब्दान्च्या पलिकड्ची.".. तू मात्र हळुच आजुबाजुच्या "प्रतिभा आणी प्रतिमा"न्याहाळत होतास...!
आठवतं का तुला एकदा चिंब पावसात भिजत दोघे घरी आलो...माझ्या केसांवरून मोती ओघळत होते..रेडिओवरती " एक लडकी को देखा तो ऐसा लगा".. ऐकू येत होतं...
आणी तू गावाला फोन लावून तुझ्या आईला सांगत होतास्.."पावसात भिजलो, आल्या आल्या तू करतेस त्या मिरची भजी आठवल्या गं.."!
सांग ना हा ग्रिश्म का शिशिर?
सांग ना रे...हेलो हेलो ...आज काल हे सिलेक्टीव बहिरेपण पण भारी वठ्वतोस बुवा...:)
good one! नोरा ची पण आवडली
good one! नोरा ची पण आवडली खास करुन सिलेक्टीव बहिरेपण
अतिशय सुंदर कविता .. का
अतिशय सुंदर कविता ..
का कुणास ठाऊक पण 'मेरा कुछ सामान' ची आठवण आली..
विशाल मस्त लिहिलय... अजुन
विशाल मस्त लिहिलय... अजुन काही जुन्या ट्रंका, कपाटं, कप्पे, चोरकप्पे उचकायचे राहिले असतील तर तेही उचकुन जुन्या सापडलेल्या कवीता आम्हाला नव्याने वाचायला टाक इथे
चिमुरीला १००००००००० %अनुमोदन.
चिमुरीला १००००००००० %अनुमोदन. नाहीतर उगाच दरोडा पडायचं शब्दांच्या सोन्यावर.
प्युअर अन पर्फेक्ट फिलिंग्स !
हल्ली बेस्ट ऑफ विशाल सुरू आहे
हल्ली बेस्ट ऑफ विशाल सुरू आहे का?
धन्यवाद सगळ्यांचे नोरा,
धन्यवाद सगळ्यांचे
नोरा, सलाम...... अर्थात यावर उत्तर म्हणता येइल अशी कविता आहे माझ्याकडे, टाकेन लवकरच
सर्वांनाच मकर संक्रांतीच्या
सर्वांनाच मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा !
तिळ-गुळ घ्या आणि गोड गोड बोला
अर्थात यावर उत्तर म्हणता येइल
अर्थात यावर उत्तर म्हणता येइल अशी कविता आहे माझ्याकडे, टाकेन लवकरच << उत्तरांची माळ असेल रे तुझ्याकडे.
उमेश खरोखर बेस्ट ऑफ विशालच चालू आहे.
विश्ल्या मस्त कविता, आवडली..
विश्ल्या
मस्त कविता, आवडली..
विशालभौ , जुनं ते सोनं असतं
विशालभौ , जुनं ते सोनं असतं हे खरं आहे हे दाखवून दिलंस.
पण..
कदाचित..
तुझ्या ट्रंकेत पत्रं , लिफाफे , चिठूर्या
शेजंन लावून ठेवलेली होती..
म्हणून कदाचित सोन्यासारखी राहीली..
पण तीच्या मनाच्या कोपर्यातही
रोज भिजणार्या पत्रांची आख्खीच्या आखी ..
ट्रंक असेलच ना..?
तीला कोण उघडणार?
विशालभौ, मस्त लिवलंव. आवडलं!
विशालभौ, मस्त लिवलंव. आवडलं!
नादखुळा, सहीच
नादखुळा, सहीच
खुप जुनी कविता आहे ही, परवा
खुप जुनी कविता आहे ही, परवा जुन्या ट्रंका उचकताना सापडली.
>>>
अर्र्र्र्र्र्र्र्र गल्लत झाली माझी .मला वाटलं हीच कवितेची पहिली ओळ आहे. हल्ली काय काहीही खपतं ना कविता म्हणुन प्रामाणिकपणाच्या लेबलखाली . त्याचा प्रिणाम .
पण काय लिवलयस ते आवडलं रे भौ विशाल .
धन्यवाद नाखु... खरच रे ! या
धन्यवाद
नाखु... खरच रे ! या विषयावर एक कविता लिहीली होती मागे माबोवर, बघू तिची लिंक सापडली तर देइन येथे
कीली आहेत ट्रंक घरात उधळी
कीली आहेत ट्रंक घरात
उधळी लागायच्या आत टाक रे भाऊ
चांगल्या आहेत
एक शेर आठवला तुम जो चाहो तो
एक शेर आठवला
तुम जो चाहो तो इन हातोंकी तलाशी लेलो,
मेरे इन हातों मे लकीरोंके सिवा कुछ भी नही
अरे हे आठवतय तेवढच आपल्या हातात , आणी आता तिच्या शिवाय सगळा वैशाख वणवाच!
हे आता कळतय, आणि कविता पुर्वीची आहे, तेव्हाचे भावही खरेच आहेत.
आवडली कविता.
सुंदर कविता विशाल!
सुंदर कविता विशाल!
थोडक्यात बराच आशय ....
थोडक्यात बराच आशय .... छान
--------------------------------------------------------------------------------------
अवांतर : ग्रीष्म/शिशिर जाऊन
लवकरच प्रेम-वर्षाव होऊ दे ही सदिच्छा.
आवडली कविता
आवडली कविता
सगळ्यांचे आभार उल्हासदादा ,
सगळ्यांचे आभार
उल्हासदादा , आपली आज्ञा शिरसावंद्य
सुरेख! सुंदर!!
सुरेख! सुंदर!!
विशाल.. कविता आवडली रे..
विशाल.. कविता आवडली रे..
नोराची कविताही आवडली.. सिलेक्टीव बहिरेपणासाठी अगदी अगदी..
मस्तच...
मस्तच...
लइच भारी कविता आहे हो... पण
लइच भारी कविता आहे हो...
पण Sorry विडंबनाचा मोह आवरला नाही...
http://www.maayboli.com/node/22962
Pages