मी ,शिवराय आणि एक स्त्री ...

Submitted by ज्ञानु on 12 January, 2011 - 12:02

एकदा यु-ट्यूब वर डिजिटल पेंटिंग सर्च करत होतो अन त्या कश्या बनवतात तेही पाहिलं आणि माझ्यातला हौशी कलाकार पुन्हा एकदा जागा झाला काहीतरी नवीन करून पाहायला आणि पडलो सुरु अन अनपेक्षितच माझ्या मनातल्या या दोन कलाकृती photoshop मध्ये अवतरल्या !कश्या वाटल्या जरूर कळावा?
shivba.jpg
©MADHURI complite.jpg

गुलमोहर: 

प्रयत्ने पेन्सिल रगडीता चित्रही बने !! प्रयत्न चालू आहेत नेक्स्ट टाइम अजून छान आणि accurate काढण्याचा प्रयत्न करेल !thanks अनिलभाई

महाराजांचे सुंदर जमलेय.

माधुरी तितकीशी जमली नाही.

काही सजेशन्सः
लता
सचिन
पहायला आवडतील.

आजकाल १२ वी कि परीक्षाका भूत डोकेपे सवार है वो उतर जाने के बाद सचिन जरूर सिक्स मारेगा और लता दीदी जरूर गाना गायेगी ! तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !

महाराजांचे छान आहे! अन माधुरीचे 'माधुरी' म्हणून नाही; केवळ एका स्त्रीचे चित्र म्हणूनही चांगले आहे.

सायो, नाव नसते दिले तरी ती माधुरी म्हणून ओळखू आली असती असे मला वाटते. बहुधा चित्र अ‍ॅडजस्ट करताना तिचे कपाळ अणि डोके काटकोनात कापले गेल्याने ते विरूप (विद्रूप नव्हे) दिसत आहे. इव्हन महाराज देखील वरच्या पट्टीत आडवे कमी झालेत.
अर्थात महाराजांच्या तुलनेत माधुरीचे चित्र 'डावे' आहे हे स्वतः चित्रकारही मान्य कर्तोच आहे. वी कॅन एक्स्पेक्ट बेटर फ्रॉम हिम (आता बरं वाटलं जरा इन्ग्रजी बोल्ल्यावर :फिदी:)

दोन्ही चित्र मस्त आलीयेत....
महाराजांच्या चित्रात कपाळाच्या बाजूला मंदील थोडासा बाहेर आल्यासारखा वाटतोय.. तो डोक्याला घट्ट बसल्यासारखा वाटत नाहीये...
आणि माधुरीच्या चित्रात तिचं नाक थोडंस जास्त लांब वाटतय.. किंवा उंची आणि रुंदीचं समीकरण कुठेतरी थोडंस पुढे मागे वाटतय.. कदाचित रुंदी तेव्हढीच ठेवून उंची कमी केली तर अजून छान वाटेल. हे मावैम...

अवांतर प्रतिक्रिया...

अर्थात महाराजांच्या तुलनेत माधुरीचे चित्र 'डावे' आहे.

>> डावे म्हणजे कमीपणा किंवा वाईट हा विचार आपण कधी बदलणार आहोत का? उजवे - डावे करणे कधी सोडणार का?

मला अपेक्षित नव्हता एवढा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून मी भारावलो चित्रच काय तसे तर खूप काढता येतील पण तुम्हा सर्वांमधला "चित्र रसिक" खूप विलक्षण आणि जिज्ञासू आहे हे पाहून आनंद वाटला . मी तसा व्यावसायिक चित्रकार नाही आत्ताशी १२ वी चालू आहे पण करिअर चित्रकलेत करण्याचा विचार आहे . तुम्ही माझ्या चित्रातल्या उणीवा दाखवल्यात या बद्दल "धन्यवाद " नेक्स्ट टाइम अजून चांगला प्रयत्न करेल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! सर्वांना .

पुर्वी गाढवीणीत पण माधुरीच दिसायची ती गोष्ट वेगळी )


हल्ली माधुरीच गाढवीण दिसते असे म्हणायचे का तुम्हाला?

माझ्या प्रतिसादाने मला चित्रकाराला नाऊमेद करायचं नाही/नव्हतं. पण मला ती खरंच माधुरी वाटली/वाटत नाही. त्याबाबतीत आशूडीशी सहमत. एक चित्र म्हणून चांगलंच आहे पण त्याला माधुरीचं लेबल नको.

बाजो, सॉरी, मला तसं नाही वाटलं. बाकी काटकोन, चौकोन मला कळत नाहीत तेव्हा चालू द्या.

चित्रकार, येऊ द्या तुमची आणखीन चित्रं.

तुम्ही सर्वांनी सुचवलेल्या बदलांचे मी जरूर स्वागत करतो .मला असं वाटते कि तिच्यात माधुरी जरी दिसत नसली तरी ती एक स्त्री म्हणून नक्की छान वाटते .पण तुम्च्या प्रतिक्रीयां बद्दल धन्यवाद !© एक छोटासा बद्ल करतो. पहा .

Pages