केरळ डायरी - भाग १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कोचीनला विमान केवळ २० मिनीटे उशीरा उतरले तेंव्हा कोट्टायमला नेणारी टॅक्सी तयारच होती. वाटाड्या स्टुडंट जेंव्हा दरवाजा उघडणे, बॅग पकडणे असे करु पाहु लागला तेंव्हा आपले काम आपण (निदान अशी कामे तरी) चा बाणा लगेच सरसावला. जुजबी आणि बोलण्यासारखे बोलुन झाल्यावर पुढचे दोन तास अर्धवट झोपेत, आपण चुकुन घोरत तर नाहीना या विवंचनेत गेले. साधारण ९ वाजता गाडी एका पॉश रेस्टॉरंटसमोर उभी ठाकली. तसा मी खूप खात नाही, पण माझे तलम अॉर्डर करुन झाल्यावर त्याने फक्त फ्रुटसॅलड मागवले. सगळे काही अॉटोपायलटवर असल्याने थोड्यावेळात माझ्या डोक्यात प्रकाश पडला की विद्यापीठ पैसे भरणार असल्याने त्याला बहुदा कमी खाण्याबद्दल सांगण्यात आले असावे. आपल्या स्टॅटसला साजेसा उशीर करुन केवळ ठिकठाकच असलेले जेवण आले व यथावकाश महात्मा गांधी विद्यापिठाच्या विश्रामगृहाच्या पाहुणेवहीत माझी नोंद केल्या गेली.

गर्मी असली तरी फुल्ल पंखा चालणार नसल्याने हिटर जरी छोटे असले तरी त्या दुसऱ्या खोलीत बदली मिळवली. पांघरुणाचा कन्सेप्ट येथे नसावा. मागुन घेतले. छान झोपलो. आजुबाजुला आसलेल्या गर्द झाडीतील कौकाल, कोकीळ व पावशा यांनी कोंबड्याचे काम केले. मी लख्ख जागा होईपर्यंत करत राहिले. नवाला दोशांच्या नाश्त्यासहीत सर्व गोष्टी आटोपुन शेजारीच असलेल्या 'स्कुल अॉफ प्युअर अॅंड अप्लाईड फिजिक्स'च्या ईमारतीत हजर. नाताळच्या सुट्टिनंतरचा पहिलाच दिवस असल्याने जंता हळुहळु अवतरत होती. माझा थोडाफार 'बॉलिवुड कॉलींग' झाला.

२ डॉक्टरेटचे विद्यार्थी येऊन त्यांच्या प्रबंधांबद्दल बोलले. अनेक शिक्षकगणपण येऊन गेले. पंखा नसलेली पण स्वतंत्र खोली असल्याने सगळ्यांशी आरामात बोलता येत होते. बाहेरच्या जंगलवजा परिसरातील एका गाईचा मधुनच ऐकु येणारा हंबरडा ऐकुन मात्र गम्मत वाटत होती. दुपारी दुरवर असलेल्या एका आगळ्या सेटींगमधल्या रेस्टॉरंट मध्ये मला नेण्यात आले (कुमारानल्लुतील पुळ्ळ्याअोरम). आजुबाजुला री-कन्स्ट्रक्ट केलेली जुन्या पद्धतीची घरे व बाजुला संथ वाहणारी नदी. कॉटेजेस मधील परदेशी पाहुणे बाहेर कुठेतरी आणि हे रेस्टॉरंट अोस पडलेले. येथेही येरे माझ्या मागल्या - स्टुडंटचे जेवण आधिच झाले होते. हे कसे बदलता येईल?

मग पुन्हा थोडे काम, कामाच्या गप्पा व मग स्नातकोत्तर (प्रथम वर्ष) विद्यार्थ्यांना दिलेले टॉक. हे अक्षरश: टॉक झाले कारण अॉडीटोरीअम तयार नसल्याने स्लाईड्स वापरता येणार नव्हत्या. माझ्या परीने मनोरंजक बोलुन सुद्धा एखादा शब्द देखील त्यांच्या तोंडुन वदवता येईल तर शपथ! उद्या त्यांची 'टीचर' त्याना मी सांगीतले ते मल्लु मध्ये सांगेल, मग मी पुन्हा स्लाईड्स सकट सांगेन व मग पुढे जाऊ. त्यांच्यातील तीन-चतुर्थांश पुढे खगोलशास्त्र घेणार नसल्याने जास्तच अनास्था असावी. खरेतर १०० टक्के साक्षरता मिळवणारा कोट्टायम हा भारतातील पहिला जिल्हा होता. माझे काम मुख्यत: खगोलशास्त्र घेतलेल्या द्वितीय वर्षाच्या स्नातकोत्तर विद्यार्थ्यांशी आहे. पण आजच्या अनुभवावरुन उर्वरीत टॉक्सची तयारी करतांना नक्कीच मदत होईल.

मला दिल्यागेलेली भलीमोठी छत्री घेऊन खोलीवर आलो व बॅग टाकुन उरलेल्या वेळात थोडे विद्यापीठ परिसरात फिरावे म्हणुन बाहेर पडलो तर हा-हा म्हणता हा पाऊस! दोन बिल्डींग पलिकडे असलेल्या संगणक-विज्ञान संस्थेच्या पोर्च मध्ये बसुन पावसाकडे पहात आरामात बसलो (त्या दरम्यान बाहेरुन कुलुप असलेल्या बिल्डींग माधुन दोन मुली बाहेर आलेल्या पाहुन थोडे नवल वाटुन गेले). पावसापाठोपाठ पावशाचे पण पार्श्वसंगीत सुरुच होते. संधीप्रकाश पुर्णपणे सरला नसल्याची संधी साधुन थोडा आणिक फिरुन आलो. सकाळच्या कॉफी बरोबर लागेल म्हणुन एक टायगरचा पुडा आणला. विश्रामगृहाजवळ पोचतो तर अचानक सगळीकडे अंध:कार पसरला. गर्मीमुळे पडलेल्या पावसाने गर्मीला पुरेसे पळवले नसल्याने त्याच पावली पुन्हा बाहेर.

मार्ग जेमतेम दिसत होता. मधुनच मात्र कडाडणाऱ्या विजांनी आसमंत लखलखुन जात होता. आणि जेंव्हा विजा शांत असत तेंव्हा असंख्य जरी नाही तरी बहुसंख्य काजवे मनोरंजन करत होते. मन:चक्षुंसमोर हैद्राबादजवळील वेधशाळेजवळ पाहिलेले काजवे चमकुन गेले. दोन चार चकरा मारुन अजुन फिरण्यात अर्थ नाही असे म्हणत परत आलो तोच दिवे आले. थोड्यावेळाने हे लिहायला घेतले. दिव्यांनी पुन्हा दोन-चार वेळा लपाछपी खेळुन घेतली. ईंडीअन ईन्स्टीट्युट अॉफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या कावेलुर येथील वेधशाळेत मिळणारे जेवण मनात घोळवत मेस मध्ये पोचलो तर केवळ पोळ्या आणि चिकन! नाही म्हणायला एक केळे. निदान जेवतांना बोलायला सोबत तरी चांगली होती - ईंडीअन ईन्स्टीट्युट अॉफ सायन्सचे किटकांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे एक संशोधक. परवा त्यांचे त्यावरील टॉक ऐकायला मिळेल.

मधले भाग अजुन तयार नाहीत
भाग २ - http://www.maayboli.com/node/25445
भाग ३ - http://www.maayboli.com/node/25476
भाग ७ - http://www.maayboli.com/node/23569
भाग ८ - http://www.maayboli.com/node/23702
भाग ९ - http://www.maayboli.com/node/23781

प्रकार: 

उद्या त्यांची 'टीचर' त्याना मी सांगीतले ते मल्लु मध्ये सांगेल, मग मी पुन्हा स्लाईड्स सकट सांगेन व मग पुढे जाऊ. >> Lol

मस्त लिहिले आहेस Happy

शैलू, फोटो बहुतेक वेगळे येतील Wink

अश्चिग, दिव्यांच्या लपाछपीत हे टाईप केल्याने मधे मधे कळफलक घरंगळलाय. लपाछपी थांबली की नीट लाव तो Happy

सकाळच्या कॉफी बरोबर लागेल म्हणुन एक टायगरचा पुडा आणला. >>>> मोठ्यांच्या साधेपणा दाखवणार्‍या गोष्टी Happy

बॉलीवुड कॉलींग Lol खूप वाट पहावी लागलेली दिसतेय.
आवडले. तू ओएचपी नसतांना खगोलशास्त्राबद्दल कसा काय बोलु शकलास... आसमानमे लाखों तारे वगैरे का? Lol

पुढवे लिहायला अजुन वेळ मिळाला नाही, पण होपफुली लवकरच (फोटो सहीत)
रुनी, थोडेफार हवेतच - कारण त्यांना काय कळते आहे हे मला कळत नव्हते Sad

मस्त. फोटोही टाक असतील तर.

सोबत तरी चांगली होती >>> येथे थांबून वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडायचे होते Happy

मस्त पण हैदराबादेस येउन गेलात एक विपू पण नाही ? आम्ही आलो अस्तो ना भाषण ऐकायला? जेवायचे हाल का बरे. भात अवियल मीन मिळायला हवे.

अमा., ती हैद्राबाद ट्रीप मायबोलीच्या जन्माआधीची होती Happy
५-६ वर्षांपुर्वी पण एकदा आलो होतो, पण तेंव्हाही आपली ओळख नव्हती.