अडालज

Submitted by वर्षू. on 11 January, 2011 - 04:10

अहमदाबादपासून जवळ असलेल्या गांधीनगर डिस्ट्रिक्ट मधे स्थित असलेली ही अडालज वाव (step well)
१४९९ मधे मुहम्मद बेगडा या मुसलमान राजाद्वारे, वाघेला वंशाचा राजा वीर सिंग याची राणी रूपबा,हिच्यासाठी बांधण्यात आली. पाच मजले खोल असलेल्या या विहिरीच्या भिंतींवर अप्रतिम बारीक नक्षी कोरलेली आहे. जुन्याकाळी या विहीरी चे पाणी पिण्याकरता,आंघोळीकरता,कपडे धुण्याकरता वापरले जाई.संपूर्ण गुजरात राज्यात पाचव्या शतकापासून १९साव्या शतकापर्यन्त बांन्धण्यात आलेल्या १२० अश्याप्रकारच्या विहीरी आढळून आल्या आहेत्.त्यापैकी अडालज ही सर्वात आधिक महत्वपूर्ण स्टेप वेल ठरली आहे.
या विहिरीमागचा संक्षिप्त इतिहास
१५व्या शतकातील 'दंडाईदेशावर (आत्ताचे गांधीनगर) वाघेला वंशाचा 'राणा वीर सिंग' राज्य करत होता. मुहम्मद बेगडा या मुसलमान राजाने दंडाईदेशावर आक्रमण केले. या युद्धात 'राणा वीर सिंगाचा मृत्यू झाला. त्याची अनुपम सुंदरी राणी रूपबा हिच्यासमोर मुहम्मद बेगडाने विवाहाचा प्रस्ताव मांडला. यावर शोकाकुल राणीने त्याचा प्रस्ताव मानला परंतु, बेगडा राजाला तिच्या नवर्‍याने सुरु केलेल्या या विहिरीचे काम आधी पूर्ण करायची अट घातली. त्याप्रमाणे विहीर बांधण्याचे काम संपूर्ण झाल्यावर मुहम्मद बेगडाने राणीला तिच्या वचनाची आठवण करून दिली.
पण स्वाभिमानी राणीने त्याच विहीरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.
ही विहीर बांधण्यामागच्या घटना येथील भिंतींवर चित्रीत करण्यात आल्या आहेत. राणीच्या विश्वासघाताचा बेगडा वर काहीच विपरीत परिणाम झाला नाही.पुढे त्याने ही विहीर नष्ट न करता वाटसरू,गरजू लोकांसाठी खुली केली.

adl1.jpg450px-Adalaj_Wav.jpgadl2.jpgadl3.jpgadl4.jpgadl5.jpg

गुलमोहर: 

.

अरे वा.. खूप मस्त आलेत फोटो..
प्रत्यक्ष पहायला पाहीजे आता
सुरभि मधे दाखवलीये का ?

स्थापत्यकलेचा अद्भूत आविष्कार आहे हा... आठ-दहा वर्षांपुर्वी इथे जायचा योग आला होता. बावेची बांधणी आणि कोरीवकाम बघताना हरवून जायला होतं. एक प्रकारची गूढता तिथे जाणवते. एखाद्या राणीचा अतृप्त आत्मा आपल्यात प्रवेश करेल असं वाटत राहतं Proud
आम्ही गेलो होतो तेव्हा फोटो काढायला मनाई होती.

बाप्रे, विहिरीचा हा प्रकार भन्नाटच म्हणायचा. मी आपली Blush नेहेमीची गोल काठ असलेली विहिर शोधत बसल्ये. Blush

सही Happy

कसली गूढ वाटते ही विहीर!
सुरेख नक्षीकाम.... आणि इतिहास चटका लावणारा!

निम्बे शेवटचा फोटू बघ!!

बेफाम्..सुरभि काय आहे?? सॉर्री मला खरच म्हाईत नाहीये!!!

मामी .. जुन्या काळी केंव्हा केंव्हा बाहेर च्या पायरीपर्यन्त ही पाणी यायचं असं गाईड सांगत होता.
भक्कम दगडी पायर्‍यांवर अजून पाण्याच्या खुणा दिसतात कुठे कुठे.

मंजूडी.. आजकाल फोटो तर काढू देतातच.. पण विहीरीच्या बाहेरच्या परिसरात शेकड्यांनी पडलेली गुटक्याची पाकिटे पाहून इतकं वाईट वाटलं ना.. Uhoh

एक म्हातारा राखणदार फक्त काळजी घ्यायला ठेवलाय. तो चेक करत होता मेन गेटमधून येणार्‍या लोकांच्या तोंडात तोबरा तर भरलेला नाही म्हणून.
लकीली विहीरीतल्या भिंती,पायर्‍या अगदी स्वच्छ,डागरहित होत्या. Happy

वर्षु नील -अतिशय अप्रतिम फोटो. दृस्तीला निव्वळ सुख मिळाले.
मन तृप्त झाले. कमाल आपली. मला वाटते आपण चीन मध्ये नि
अहमदाबादला येऊन हे सौदर्य टिपणे. मनापासून कौतुक मीपण अहमदाबादला गेलो होतो.
ह्या विहिरी विषयी मी पण येंकले होते .पण नाही बघितली. तुमच्या क्यामेरयातून दिसली.
कधी योग येतोय बघुया . खरेच छान नि मस्त आवडले. !!

प्रका>>श!!!!!! का नाही बघितली?? अहमदाबादला जाऊनही???
माझ्या आधी तूच हे प्रचि टाकले असतेस Happy

अरु. अजूनही या विहिरीमधे पाणी आहे आणी ते अतिशय स्वच्छ आणी पिण्याजोगे आहे असं म्हणतात. सरकारने आता दणकट लोखंडी जाळी लावून विहिरीचे तोंड बन्द करून टाकले आहे..

वर्षू नील, Please don't mind पण ते पाणीच्या निशाण्या जरा पाण्याच्या खुणा करा ना.

ह्म्म.. मी पण पाहीले आहे हे, तरीच अडालज वाचल्यावर ऐकल्यासारखे वाटत होते. बर्‍याच वर्षांंपूर्वी अहमदाबादला होते तेव्हा तिथले हे सर्व पाहीले होते. अडालज, पालिताणा ही नावे पण आता विसरले होते, असे कुठे पाहीले की आठवते. माझ्याकडे खूSSप फोटो आहेत इथले, फार गूढ वाटते कडेकडेने आत गेल्यावर, कोरीवकाम तर सुरेखच आहे.
(अहमदाबाद म्हणल्यावर तिथली अजून एक आठवण म्हणजे तिथे 'इडली टकाटक' नावाचा एक प्रकार पहील्यांदा खाल्ला होता, त्यात इडल्यांचे छोटे तुकडे करुन त्यावर पावभाजी पसरुन द्यायचे, मजा यायची तेव्हा खायला. आणि एक म्हणजे लॉ गार्डन ला तिथल्या उच्चाराप्रमाणे लो गार्डन म्हणायचे, ते मला कित्येक दिवस लव्ह गार्डन वाटायचे म्हणजे फक्त लवर्स साठी आहे असेच. शिवाय Drive-in थिएटर तिथेच पहील्यांदा पाहीले, त्यातही मूर्खासारखा उर्मिलाचा एक डेंजर कौन की असाच काहीतरी मूव्ही पाहीला रात्री अन देवाचे नाव घेत घेत घरी आलो. असो. फारच अवांतर झाले. बरेच वर्षांनी एकदम अहमदाबाद आठवले. )

मवा 'लव्ह गार्डन'' Rofl
आता इडलीचा हा टकाटक प्रकार बहुदा बन्द झाला असावा.. आम्हाला नाय मिळाला खायला Happy
ड्राईव्ह इन थिएटरची वाट लागलेली दिसली.. बंद पडलय आता बहुतेक!!!

असेल वर्षू, मी हे जवळजवळ ११-१२ वर्षांपूर्वीचे सांगत आहे. Happy
ड्राईव्ह इन थिएटरची वाट लागलेली दिसली.. बंद पडलय आता बहुतेक >>> अरेरे :(.. गाड्या पार्क करुन मस्त चटया वगैरे अंथरुन भरपूSSर खाणे-पिणे घेवून पिक्चर बघत बसायला जाम मजा आली होती.
अजून एक म्हणजे तिथून हावरटासारखे बांधणी अन गुर्जरीचे इतके प्रकार आणले की नंतर २-३ वर्ष पुरले. आधी आधी सगळे कौतुकाने पहायचे तेव्हा मी टेचात 'अहमदाबादचा' असं म्हणायचे मग मात्र १ वर्षाने लोकच 'अहमदाबादचा वाटतं' असं कुचेष्टेने म्हणायला लागले. Proud

वर्षु नील - परत आपले फोटो बघितले. [आवडले ] जुन्या आठवणी सळसळत बाहेर आल्या .
मुंबई ते अहमदाबाद बसने प्रवास केला. सकाळी सकाळी कोठ्लेसे शेत दिसले. शेतात बंगला
मस्त आवार. शेत . बाजूला एखादा मोर. बंगल्याच्या व्हरांड्यात झोपाळा टांगलेला त्यावर कोणीतरी हलकासा झोका घेत हातात छान कप. अजूनही ते आठवले.
अर्थात तुमच्यामुळे. फार प्रसन्न वाटले. खूप लिहावेसे वाटते. बोअर व्हाल . तुमच्या फोटो विषयी बोलायचे सोडून हे काय भलतेच . ??तब्येत सांभाळा. खूप शुभेच्छा.
.

प्रकाश.. इतकं छान लिहितोस कि अवांतर वाटतच नाही.. फोटोंमुळे कोणाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर त्या फोटोंच भाग्यच समजा Happy
बिन्दास जे मनात येईल ते मनापासून लिहित राहा..
तब्येतीला काय झालय माझ्या/??? Proud फिट्टै एक्दम मी Happy

जबरी.. माबोवर असलेल्या आणि सर्वत्र पसरलेल्या अश्या तुम्हा उत्साही लोकांमुळे आम्हाला नव्या भटकंती जागा कळायला मदतच होते... ती नक्षी सुंदरच ... Happy

धन्स भटक्या.. Happy
आपल्याकडे अशी अनेक ऐतिहासिक स्थळे नुसती विखुरलेली आहेत. कोणती कोणती मेंटेन्डही असतात..
ही विहीर जर कोणत्या दुसर्‍या देशात असती तर प्रवेश शुल्क आकारून त्या सरकारने चांगलं रेवेन्यू कमावले असते.

Pages