माझे माहेर रायरी (अर्थात...... किल्ले रायगड)

Submitted by नील. on 29 December, 2010 - 11:00

मालवणला जायचे ठरवले तेव्हा मनात विचार आला की पार कोकणात जाणार मग येता येता रायगड वारी करायला काय हरकत आहे? ( तसाही मी संधीच बघत असतो गडावर जाण्याची). असेही तृप्ती ( माझी बायको) आणि ओम (माझा मुलगा) माझ्याबरोबर एकदाही रायगडावर आले नव्हते. तृप्तीलाही तिच्या सवतीची ( रायगड) ओळख माझ्याकडुन करुन घ्यायची होती. त्यामुळे तीचीही संमती मिळाली.

मालवणमध्ये पाच दिवस छान रंगलेल्या मैफिलीचा छान सुरेल शेवट झाला तो रायगड दर्शनाने....

रायगड पहाट
रात्रीने जाता जाता सुर्यदेवाच्या आगमनाची तयारीच की काय म्हणुन आकाशात रांगोळी काढुन ठेवली होती...
Raigad copy 1.jpg

रायगड सुर्योदय -
आणि दोन सुर्यांची पुन्हा भेट झाली....
Raigad copy 2.jpg

रायगड सकाळ १
सकाळच्या थंडीत गडाखालील गावांनी ढगांची दुलई लपेटुन घेतली होती...
Raigad copy 3.jpg

रायगड सकाळ ३
सुर्यांच्या असंख्य दुतांनी शिवसुर्याला स्पर्श करत दिवसाची सुरुवात केली......
Raigad copy 4.jpg

जगदिश्वर मंदीर १
Raigad copy 5.jpg

जगदिश्वर मंदीर २
Raigad copy 6.jpg

जगदिश्वर मंदीर ३
Raigad copy 7.jpg

शिव समाधी
अखंड बडबड करणारा मी इथे अबोल होउन जातो...... इथे शांतपणे मी कितीही वेळ बसू शकतो.
Raigad copy 8.jpgRaigad copy 9.jpgRaigad copy 10.jpgRaigad copy 12.jpgRaigad copy 13.jpgRaigad copy 14.jpgRaigad copy 16.jpg

पिठलं भाकरी
Raigad copy 15.jpg

गुलमोहर: 

असेही तृप्ती ( माझी बायको) आणि ओम (माझा मुलगा) माझ्याबरोबर एकदाही रायगडावर आले नव्हते. >>>
ये तो वो मिसाल हो गयी के जैसे "दिव्याखाली अंधार"!!!

मस्त Happy

एक नम्बर .निलु भाऊ तुझा फोटोगाफि मंधि जादु आहे राव ..पहाटे चे रायगड दर्शनाने तुप्त झालो

तिसरा फोटो आवडला.
कोंबड्याच्या फोटोमधले रंग भारी आहेत.

नील, अप्रतीम Happy
मी सुद्धा रायगडावर राज्यांच्या समाधीजवळ आणि मेघडंबरीच्या पायर्‍यांवर कितीही तास बसु शकते.

वा! Happy

महाराजांच्या फोटो खाली एकदम कोंबड्याचा फोटो ....
.
.
डोंगर चडत जावं अन अगदी शेवटच्या टप्प्यात पाय घसरुन धपकन तोंडावर पडावं ...असं काहीसं झालं Proud

मस्तच.

नीळुभौ, रायरी हे माहेर ? घरी खूपच सासूरवास होतो नै ? Wink

एकदा आलच पाहिजे तुझ्याबरोबर रायगडदर्शनाला, चल ठरव बघू प्रोग्राम. पण मी पोराला बरोबर घेउन येणारे मात्र.

गिरिजा, अस्थायी विनोद नकोत.

नील, अप्रतिम फोटो..

>>>>इथे शांतपणे मी कितीही वेळ बसू शकतो.
अगदी अगदी.. शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदीरातला गाभारा.

Pages