मृत्यूपत्राविषयक माहिती

Submitted by शैलजा on 29 December, 2010 - 06:06

मला मृत्यूपत्राविषयक माहिती हवी आहे. सद्ध्याच काही वेब साईटस वर वा काही जणांशी बोलून मी जी माहिती गोळा केली ती परस्पर विरोधी वाटली.

कोणाला खालील पैकी माहिती असल्यास इथे लिहाल का?
१. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का?
२. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का?
३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते?

अजून काही ह्या विषयासंबंधी काही माहिती कोणाला असल्यास ती इथे लिहिण्याची विनंती. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा,
मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं 'इच्छापत्र, मृत्युपत्र कसं करावं' हे पुस्तक तुला उपयोगी पडेल, असं वाटतं. शीर्षक कदाचित चुकलं असेल, पण या पुस्तकात इच्छापत्रासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केलं आहे.

तुझ्या प्रश्नांची उत्तरे:

मृत्यूपत्राची सर्वात महत्वाची अट म्हणजे ते दोन व्यक्तींनी विटनेस केले पाहिजे.

त्या व्यक्ती शक्यतो घरातील नातेवाईक नसाव्यात, मृत्यूपत्रापासून त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा होत नसावा आणि शक्यतो मृत्यूपत्रकर्त्यापेक्षा वयाने लहान असाव्यात.

भारतातल्या आणि इंग्लंडमधल्या कायद्यानुसार बाकी कुठलीही अट नाही.

तरीही जर स्टॅम्पपेपरवर केले असेल आणि नोटरीकडे मृत्यूपत्र रजिस्टर केले तर तारखेचा वाद असेल तर त्यावर पडदा पडू शकतो.

तसेच शक्यतो सर्व मालमत्तेचा वेगळा आणि स्पष्ट उल्लेख आणि विभागणी असेल तर फारसे वाद उत्पन्न होत नाहीत.

मृत्यूपत्र बनवण्याचे कुठलेही विशिष्ट फॉर्मॅट नाही. तरीही मृत्यूपत्रकर्त्याचे नाव, वय, पत्ता, तारीख आणि स्थान स्पष्ट असावे.

'हे मृत्यूपत्र मी संपूर्ण शुद्धीत असताना, कुठल्याही दडपणाखाली नसताना स्वतःच्या इच्छेने मी करत आहे' हे किंवा अशा स्वरूपाचे वाक्य असणे अत्यंत जरुरी आहे.

आणखी स्पष्टीकरण हवे असल्यास मला विपु केलास तरी चालेल.

'हे मृत्यूपत्र मी संपूर्ण शुद्धीत असताना, कुठल्याही दडपणाखाली नसताना स्वतःच्या इच्छेने मी करत आहे' हे किंवा अशा स्वरूपाचे वाक्य असणे अत्यंत जरुरी आहे>>>>>>>>>>

शरदने उपयुक्त माहिती दिली आहे..... पण फक्त हे वरील सांगणे पुरेसे नाही.....

''मृत्युपत्र करणारी व्याक्ती, हे मृत्युपत्र करताना पूर्णपणे शुद्धीत होती,कोणत्याही दडपणाखाली अगर अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली नव्हती ( CAMPOSE MENTIS )'' हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित करावे लागते .... व ते त्याच मृत्युपत्राच्या कागदावर लिहावे लागते... वेगळा कागद चालत नाही.

<<<हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित करावे लागते .... व ते त्याच मृत्युपत्राच्या कागदावर लिहावे लागते... वेगळा कागद चालत नाही.>>>

असा कायदा नाही. पण जर असे केले असेल (विशेषतः म्हातार्‍या लोकांच्या बाबतीत) तर त्याची विश्वासार्हता नक्कीच वाढेल)

डॉक्टरने खूप्च चांगला input दिला आहे. Happy