होमपेज आणि होमही.! - दै. प्रहारमध्ये "मायबोली".

Submitted by admin on 27 December, 2010 - 23:32

दै. प्रहारच्या रविवार पुरवणीत मायबोलीचे वेबमास्तर अजय गल्लेवाले यांची कोमल कुंभार यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

ती खालील दुव्यावर वाचता येईल.
दैनिक प्रहार , डिसेंबर २०१०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओघवती आणि सहज मुलाखत. मायबोलीची यशस्वी घोडदौड अशीच चालू राहावी यासाठी शुभेच्छा!

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलं तरी मायबोलीकरांना दिवसातून एकदा तरी इथे यावंसं वाटतंच. ‘‘मायबोलीशी नातं सांगणाऱ्या जगभरातल्या पाऊलखुणा या साइटवर उमटल्या आहेत आणि तेच आमचं यश म्हणता येईल,’’ असं गल्लेवाले सांगतात, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानानं भरून आलेला असतो! Happy

मुलाखात रविवारीच वाचली Happy

जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलं तरी मायबोलीकरांना दिवसातून एकदा तरी इथे यावंसं वाटतंच. >>>>रोहनला मोदक Happy

मायबोलीचा आतापर्यंतचा प्रवास छानच, पुढेही असाच यशस्वी प्रवास चालु राहो यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
मुलाखत छान आहे.

मायबोलीच्या मायाजालात आपल्यासारखेच लाखो जण फसले आहेत हे वाचून जरा बरं वाटलं ! गल्लेवाले दांपत्याला मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा.

ब-याच गोष्टी कळाल्या. ईतिहास कळाला.

वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाल्याचा खूप आनंद झाला.. माबो ला अनेक शुभेच्छा !!

'मायबोली'बद्दल कळले हे विशेष.. 'प्रहार'मध्ये आले त्याबद्दल काय विशेष वाटावे? ) प्रहारपेक्षा कैकपटीने जास्त चांगल्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण मायबोलीवर वाचायला मिळते... Lol

<<'प्रहार'मध्ये आले त्याबद्दल काय विशेष वाटावे?>> भटक्याजी, मायबोलिबद्दल नव्हे,"प्रहार"बद्दल हे विशेष नाही वाटले ? Wink

भाऊजी तुम्ही प्रहार नियमित वाचत नाही वाटतं? पक्का भटक्या, तुम्हीही वाचत नसाल तर जरूर वाचा... म्हंजे तुमचं मत थोडंसं बदलेल... असो... Happy

<<भाऊजी तुम्ही प्रहार नियमित वाचत नाही वाटतं?>>ठमादेवीजी, प्लीज, रागाऊं नका. मी फक्त एकच मराठी ["प्रहार" नव्हे व "सामना" पण नव्हे !]व एकच इंग्रजी दैनिक नियमितपणे वाचतो. तें पुरेसंही होतं. बाहेरगावी असलो तर तिथलं स्थानिक वर्तमानपत्र पण अगत्याने वाचतो. "प्रहार"मध्ये चागल्याला असे हारही घालत असले, तर उत्तमच आहे ! नावावरून तसं वाटलं नव्हतं एवढंच.

Pages