रंग

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चिंब भिजल्या झडीच्या रात्री
पान पानावर झरते
मेघ फुटल्या सावळ्या ढगातून
चंद्रवाही धुके उतरते

कुणाच्या आठवणीचे फुलं
अर्धपहाट रात्री घमघमते?
संपून गेलेली मोझार्ट
हृदय चिरचिर चिरते..

पहाटेच्या कळिरवाने
जेंव्हा पापणी उघडते
शार निळ्या नभाखाली
गर्द पोपटी रान हसते

सावळ्या रात्रीचा काळा
ढवळ्या दिवसाचा निळा
हिरव्या तरूचा पोपटी
जगा-हसायला शिकवते..

प्रकार: 

वा! चंद्रवाही धुके आणि कळीरव आवडले.
शुद्धलेखनाकडे लक्ष देत जा. रात्री जागत नको जाऊ. तब्बेतीवर परिणाम होईल Light 1
कविता आवडली Happy