अळूवडी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 December, 2010 - 02:18
aluwadi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून सगळे बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे. मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे. (अगदी शेण सारवतात तसेच :हाहा:) मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी :स्मित:) आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत. थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा (हे तुम्ही सुचवा कश्यासारख्या ते). तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा. तो.पा.सु. टाईपतानाच.

वाढणी/प्रमाण: 
कितीही केल्या तरी कमीच
अधिक टिपा: 

आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

माहितीचा स्रोत: 
पाया आईने घडविलाय आणि त्याला वेगळे वेगळे आकार देण्याच काम मी करते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनी, प्राजक्ता, अखी, प्रेडि, सावली
दिपान्त पुढच्या आठवड्यात पुरणपोळी टाकेन.
रुनी, Lol मी अर्धा आठवडा शाकाहारी असते. प्रतिक्रिया नाही दिलीस तरी हाय हॅलो कर. म्हणजे निदान संपर्कात राहता येईल.

स्वरा धन्स. फोटो नाही काढलात ?
अश्विनी नाही हा मी शाकाहारी नाही झाले. त्याची प्रचिती कदाचीत मला वेळ मिळाला तर आज येईल तुम्हाला.

मनीषा किती जवळ आल्यासारख वाटत अस वाचुन. मी दिलेली झाडे तुझ्याकडे वाढतायत. Happy

अश्विनी त्या टिकल्यांच लाळेर कर.

जागू मस्त दिसतायेत वड्या. उचलून तोंडात टाकाव्या अशा. आता अळू कधी मिळेल मला आणि मग मी करेन या वड्या. कांदा मी पण कधी नाही घातला पण आता घालून बघेन

रेसीपी एकदम सेम पण कांदा खोबरे नाही घातले. दुसरे म्हणजे आमच्याकडे तांदूळाचे पीठ व बेसन असे मिक्स करून गरम मसाला लावतो. पानं खाजरी असतात म्हणून आणली की चिंचेच्या रसात बुडवून ठेवायची, दुसरे म्हणजे शिरा कापल्या की त्यांनी चिंच चोळून लावायची.

मसाला एकूण असा असतो, २ वाटी बेसन, पाव वाटी तांदूळाचे पीठ, १ चमचा गरम मसाला, तीळ, लाल तिखट, चिंचेचा रस, आलं लसूण वगैरे वगैरे सेम. छ्या, कोण करून देणार? भारताची ट्रीप पण कॅन्सल झाली गं जागू. नाहीतर तुझ्याकडे मासे नी हे आले असते खायला.

जागू तुझ्यासाठी,
आई भारतात गेलीय.. तिने रेणव्या आणल्या होत्या. रेण्व्या(मुडदुसे)... जीव एकदम कळवळला.. कधी मिळणार हे खायला.

मनस्वीनी आईला मुडदुशे सुकवायला सांग म्हणजे तुला सुके मुडदुसे मिळतील.

भारतात आलीस की नक्की ये माझ्याकडे मासे खायला.

जागु, यात चिंचेचे प्रमाण किती घ्यायचे? गेल्या आठवड्यात मी अळुची भाजी केली, त्यात चिंच जास्त होउन आंबट झाली भाजी. म्हणुन काल वड्या केल्या तेव्हा मुद्दामुन कमी चिंच घातली तर वड्या खाल्यावर घसा खाजायला लागला. तेव्हा चिंचेचे नेमके प्रमाण किती घ्यायचे? मी ५-६ पानांसाठी १ चहाचा चमचा भरुन दाट चिंचेचा कोळ घेतलेला. तर भाजी आंबट झाली. थोडी कमी घातली तर घसा खाजायला लागला. मी अरवी लावुन त्याची पाने वड्यासाठी वापरली होती. म्हणजे तो खास वड्यांचा अळु नव्हता.

विद्याक अळूवडीसाठी काळाच वरील फोटोत आहे तो अळू वापरलेला चांगला. त्याने वडीही निट वळते आणि जास्त खाजही नसते. पाच-सहा पानांसाठी लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ लागेल. गुळ त्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा म्हणजे चांगली चव येते.

हो, जागु काळा अळु वड्यांसाठी चांगला असतो. पण ईथे तसा अळु मिळत नाही. अरवी कुंडीत लावुन जो येईल तो अळु वापरावा लागतो. दुधावरची तहान ताकावर भागवते, दुसरे काय!
अजुन काही पाने येतीलच तेव्हा तुझे हे चिंचेचे प्रमाण वापरीन. पण किती दाट चिंचेचा कोळ घ्यावा?
धन्यवाद! लगेच उत्तर दिल्याबद्द्ल.

जागुताई, खोबरे, कांदा, लसुणा विरहीत बाकी सगळे सेम.>>>>>> +१०००० ...सुक्याऐवजी ओलं खोबरं घालून आमच्याकडे पण अशाच होतात अळूवड्या...आजच श्री.टोक्सांना डब्यात दिल्या.

विद्याक अर्धा वाटी पाणी घ्यायच आणि आधी तेच पिठात कालवायच.

टोकुरीका तशाही छान होतात वेळ नसतो तेंव्हा मी पण साधीच करते.

निवा धन्स.

तोंपासु>> जागु... काय काय करतेस, नॉस्टेल्जिक होतं ना मग फोटू पाहून Sad
गेल्या तीसेक वर्षात अळूवडी खाणं सोड.. अळूची पानं, अळकुड्यापण नाही बघितल्या.. Uhoh
तुझ्याकडे यायला म्हणून तरी भारतात यावंच लागेल आता.. Happy

वर्षू नक्कीच ये ग वाट पाहते.

विद्याक त्यात कसले आभार ? ही तर माझी आणि तुझी हौस.

Pages