माझ्या भाच्यासाठी केलेले जाकीट

Submitted by मीन्वा on 16 December, 2010 - 09:31

IMG_2518.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त... शाळेत ७ वी मधे स्वतःचा हाफ स्वेटर होता करायला.. अश्याच पॅटर्नमधे. तो आठवला. अर्थात तो इतका छान नव्हता झालेला. Happy

धन्यवाद सगळ्यांना.

नी आम्हाला पण होतं क्रोशा शाळेत पण फक्त लेस होती. ती सुद्धा जमली नव्हती तेव्हा वाड्यातल्या एका काकूंकडून करुन घेतली होती. क्रोशा मला झेपायचंच नाही तेव्हा. दोन सुयांवरचं मात्र जमलं होतं. त्यात पण मोज्याच्या टाचा, बाहीचं वळण काकूंकडून करुन घेतलं होतं.

आशू अगं या रंगाची लोकर संपवतेय Wink गंमत केली अगं हा रंग खूपच आवडला सगळ्यांना हाच रंग हवा म्हणतात सो हाच चाल्लाय. पण पुढचा तयार आहे तो मात्र एकदम वेगळा शेवाळी हिरवा आणि क्रीम. टाकेन लवकरच.

कांद्या गप्पे. घरी करते हे मी. हापिसात इथे मान मोडायची वेळ आलेय कुठली माबो आणि कसलं काय Sad

मीन्वा,

उगाच शहाणपणा करतोय असे मानू नका. पण खरच माझ्या आईची फार आठवण झाली हे जॅकेट पाहून! ती सतत असे काय काय करत असायची.

असो!

फारच गोंडस आणि लोभस जॅकेट आहे.

अभिनंदन!

खूप आवडले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मीन्वा, मी तुझी मैत्रीण कम (थोडी मोठी) भाची व्हायला तयार आहे Wink Proud

नेहेमीप्रमाणेच सफाईदार वीण आणि गोऽऽऽड स्वेटर Happy

अरे माझा घोळ झाला... सातवीतला हाफ स्वेटर दोन सुयांवरचाच होता की. Happy
क्रोशा त्यामानाने जास्त किचकट आहे पण. अंदाजच येऊ शकत नाही काही. आम्हाला पर्स होती करायला. मी किमानेस्ट मापाची केली होती. Happy

धन्यवाद सगळ्यांना.

बेफिकीर धन्यवाद. आजचं आमच्या कंपनीच्या साइटवरचं quote असं आहे. "If you rest, you rust." Helen Hayes स्वस्थ बसवत नाही ना मग हे असं काय काय सुरू होतं Happy

पॅटर्न टाकणार का प्लीज ? >>> मऊमाऊ प्रयत्न करते. पण वेळ लागेल.

अंजली नेटवरुन शिकता येईल युट्यूबवरही अनेक उत्तम विडीओ आहेत. www.justcrochet.com ही एक उत्तम साइट आहे. त्यावर इतर लिंक सुद्धा आहेत. काही लागलं तर सांग.

पुन्वा चालेल.

आश्विनी माझा भाच्चा Happy अक्षय त्याच्यासाठी केलंय हे.

बटणे सॉल्लीड आहेत एकदम.. मॅचींग.

आमच्या घरातही लवकरच दोनदोन बाळे येऊ घातलीत... तेव्हा माझ्या सुयाही बाहेर काढायला हव्यात. बरीच वर्षे काही केलेच नाहीये.

मीन्वा जरा क्लोजप टाक ना किंवा पुर्ण स्वेटरचा नाही दिलास तरी फक्त डिजाईनचा पॅटर्न टाक ना. म्हणजे अंदाज येईल.

Pages