'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by ऋयाम on 14 December, 2010 - 09:41

एका उपक्रमाअंतर्गत गीतकार, नाटककार, लेखक, लोककलांना प्रोत्साहन देणारे 'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.

"केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर", "अवघे गरजे पंढरपूर", "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" अशी अजरामर गीते लिहीणारे अशोकजी परांजपे यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.

ईटीव्ही वरील, 'अशोकजी परांजपे' यांच्या गीतांवर आधारित 'कैवल्याच्या चांदण्याला' ह्या कार्यक्रमात लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या परदेशातील कारकिर्दीची सुरुवात अशोकजी परांजपेंमुळेच झाली असे बोलून दाखवले होते!

अशा या कलाकाराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये, पण मायबोलीकरांना याबद्दल नक्की माहिती असेल, अशी आशा वाटल्याने इथे पोस्ट करत आहे. जरूर मदत करा.
@आभार्स! Happy

*उपक्रमाबद्दलः -
एका सुगम संगित वर्गात 'अशोकजी परांजपे' यांच्या गाणयांचा कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. सदैव प्रसिद्धीपरामुख असलेल्या अशोकजींच्या कारकिर्दीचा छोटासा आढावा घेण्याचा मानस आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋयाम, संपर्कातून मेल करतोस का? मी काही संदर्भ देऊ शकेन. ब-याच गोष्टी सांगता येतील, हवे असतील तर काही संपर्क देऊ शकेन बहुतेक.

त्यांनी गेल्यावर्षी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आयुष्य संपवल Sad

धन्यवाद श्यामली. Happy आभारी आहे!
तुम्हाला संपर्कातून ई-मेल केलं आहे.

त्यांच्या आयुष्याच्या शेवटाबद्दल पेपरमधे वाचलं होतं Sad
दुर्दैवाचे शापच असतात बहुतेक काही प्रतिभावंतांना.

ऋयाम, अशोकजी माझ्याही आवडत्या गीतकारांपैकी एक

त्यांनी लिहिलेल्या गाण्यांची लिस्ट इथे मिळेल.

श्यामली, ऋयाम अधिक माहिती मिळाली तर कृपया मला ही ईमेल करा.

अशोक जी परांजपे हे मूळचे सांगली जवळील हरिपूर येथिल. जर माझा अंदाज खरा असेल तर ते सांगलीचे संस्थानिक पटवर्धन यांचे राजवैद्य परांजपे यांच्या घराण्यातील. पुढे ते मुंबईस गेले आणि गीतकार म्हणून प्रसिद्दिस आले. माझ्या माहितीनुसार आयएनटी या संस्थेत ते लोकगीत आणि साहित्यावर संशोधन करत होते. यापेक्षा जास्त माहिती सांगली येथील डॉ परांजपे किंवा हरिपूर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे चवकशी करावी लागेल. मला मिळाली तर देईन अथवा आपण ही ती करु शकता.