सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार नमस्कार. कुठे
केदार
नमस्कार. कुठे आहात?
मामी
कुठले ते केदार चांगले सांगेल. पण ५७०० ते ५६१० हि निफ्टी चि रेंज ते घ्यायला चांगली असेल. निफ्टी Dec End पर्यंत ती दाखवेल असे चार्ट सांगतायत.
जर निफ्टी Dec 1st week पर्यंत ५६५० ला आला तर ५९०० वा ६००० चा कॉल चांगले पेसे देवून जाईल. कॉल व पुट चे उदाहरण देतो. दिवाळीत मार्केट ६३०० ला असताना ५९०० चा पुट घ्यावा असे वाटले. भाव बघितला तर तो १० च्या आसपास होता. पण मार्केट खाली येईल अशी काही चिन्हे नव्हती. Dec पर्यंत मार्केट ५६१० दाखवू शकते हे माहित होते. पण त्याला तेंव्हा २ महिने होते. पुट घेतला नाही. काल तो ७८ होता.
थोडे लाँग टर्म पाहिजे असेल तर ५४० ते ५०० ह्या भावात Tata investment, BSE 501301 चांगला आहे. ७६४ दाखवू शकेल असे वाटते. आधिचा हाय ८०४. चार्ट पण positive आहेत. किती वेळ हे नीफ्टी वर अवलंबून. किंवा काही न्युज. २००५ बोनस १:२, २००८ राईट १:५.
दाखवली व ती ला आली तर तेंव्हा Dec चा ६००० चा कॉल घ्यायला हरकत नाही. कारण
Nifty high was on in the week 5th Nov. at 6338. If nifty shows 5610 then at that level
आधी लिहिलेल्या बिबित शेवटच्या
आधी लिहिलेल्या बिबित शेवटच्या काहि नोटस डिलिट करायच्या राहील्या.
सुरेश धन्यवाद पण मला हे
सुरेश धन्यवाद पण मला हे तांत्रिक नोट्स कळत नाहीत. म्हणजे आर्टिकल वाचून पण नाही कळले.
मी कंपनीजची नावे टाकते उद्या.
निफ्टी मध्ये गुंतवणूक करायची म्हणजे कशी? त्या इंडेक्स मधील शेअर्स घ्यायचे का?
आता खरेदी करावी का?
आता खरेदी करावी का?
मामी निफ्टी मध्ये गुंतवणूक
मामी
निफ्टी मध्ये गुंतवणूक करायची म्हणजे कशी? त्या इंडेक्स मधील शेअर्स घ्यायचे का?>>>
तसे नाही. निफ्टी वर फक्त लक्ष ठेवायचे. ते पण रोज गरज नाही. आठवड्यातून एकदा केले तरी चालेल. त्यावरून मार्केट ची दिशा कळते. निफ्टी वाढू लागला कि त्याच्या थोडे पुढे मागे शेअर पण वाढायला लागतात. त्याप्रमाणे उलटे पण होते. काही शेअर तसे वागत नाहीत. पण ते प्रवाहाच्या उलटे फार काळ टिकत नाहीत.
उदाहरण म्हणजे
८/११ ला निफ्टी ६३३५ व आज ५९३४ आहे. त्या बरोबर एक निफ्टी चे व एक निफ्टीत नसलेल्याचे उदा. देतो.
SBI: ८/११:३५१५, आज २९५२ Asian Paint: १०/११: २७७०. आज २६३०.
ह्याचा फायदा म्हणजे एन्ट्री व एक्झीट थोडे योग्य होते. ह्याला अपवाद असतील पण ते १०%.
आता खरेदी करावी का?>>>
निफ्टी ५७५० दाखवेल असे सध्याचे चार्ट सांगतायत. पण त्या साठि न थांबता प्रत्येक फॉल ला थोडे घेत रहाणे चांगले. कारण मार्केट तसे वागेल ह्याची १००% खात्री नाही.
सध्या फारच व्यस्त असल्यामुळे
सध्या फारच व्यस्त असल्यामुळे इथे यायला / लिहायला वेळ मिळत नव्हता. मी स्वतः फार तर १० किंवा १२ स्टॉक्सचाच रिसर्च करतो. आणि अनेक वर्षांपासून ते सर्व तेच आहेत एक दोन इकडे तिकडे. (डिप डाईव्ह) त्यामुळे रॅन्डमली लिहिता येणे अवघड आहे. पण बॅकलॉग भरुन काढतो एक दोन दिवसात.
मी आधी लिहिले होते की दिवाळी नंतर मार्केट रेंजबाउंड राहून परत डिसेंमध्ये (तिमाही रिझल्टस) जोर पकडते. मार्केट वर जायचे असेल तर कन्सॉलिडेट व्हायला हवे. सध्या ती फेज आहे. ह्यावरही थोडे लिहितो.
तुमचे बरोबर आहे. आमचे पैके
तुमचे बरोबर आहे. आमचे पैके आले खर्च झाले परत आता HTM mode मध्ये प्रवास चालू आहे. आता एप्रिल परेन्त असेच त्यामुळे इथे रोमात राहणार.
केदार मी स्वतः फार तर १०
केदार
मी स्वतः फार तर १० किंवा १२ स्टॉक्सचाच रिसर्च करतो. आणि अनेक वर्षांपासून ते सर्व तेच आहेत एक दोन इकडे तिकडे. (डिप डाईव्ह) >>>
त्या स्टॉकची नांवे लिहिशील का?
मार्केट वर जायचे असेल तर कन्सॉलिडेट व्हायला हवे>>
कुठल्या रेंज ला कन्सॉलिडेट होइल?
should I invest in following
should I invest in following shares at this range ?
satyam 69
reliance 995
reliance capital 685
astramicro 59
ksoils 48
ricoauto 22
clutch auto 63
गडगडले.... ( वर ढग गडगडले
गडगडले....
( वर ढग गडगडले आणि खाली मार्केट गडगडले..
)
उत्तर कोरिया problem - आयरिश
उत्तर कोरिया problem - आयरिश बेलआउट... सुरवात आहे.. प्रोतुगाल, स्पैन लायनीत आहेत.
ढग गडगडणे थाबेल पण मार्केट गडगडत राहील...
केदार नमस्कार ५ वर्शसाथि
केदार नमस्कार
५ वर्शसाथि इन्वेस्. शएअर सुचवाल का?
शितल केदार लिहीलच. चार्ट बघून
शितल
केदार लिहीलच. चार्ट बघून काय वाटते ते लिहीत आहे.
सत्यम ६९ आज क्लोझ ६१.९. थोडा पुल मिळाला तर ६८ ल येईल. शॉर्ट व लाँग टर्म बेअरीश. वर यायला अडथळे. ७५, ९०. १०१. निफ्टी खाली आला तर आणखी खाली येवू शकतो.
reliance 995: क्लोझ ९६४. रेंज बाउंड झालाय. ९५० च्या आसपास घ्यावा. (निफ्टी खाली आला तर ९०० पण दाखवेल, आधीचा लो ८८५)) व ११०० च्या जवळ पास विकावा. खालि आला की परत घ्यावा. थोडे सेफ म्हणजे २५ ते ५०% च असे करावे. त्याने उरलेल्याची कॉस्ट कमी होईल. जर ११५० च्या वर टिकला तर १५०० दाखवू शकेल. निफ्टी मात्र तेंव्हा बुलीश पाहीजे.
बाकी बघितले नाहीत.
ढग गडगडणे थाबेल पण मार्केट
ढग गडगडणे थाबेल पण मार्केट गडगडत राहील...
दोन्हीही गडगडायचे थांबेल आता.................... निफ्टी २३.५० पी ई ला आलाय....
सुरेश, माहिती बद्दल धन्यवाद!
सुरेश, माहिती बद्दल धन्यवाद!
एक चागला लेख -
एक चागला लेख - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7068362.cms
केदार बाबा आहेस कुठे?
केदार
बाबा आहेस कुठे? पांडवांच्या अज्ञात वासावर एखादा लेख लिहीत आहेस काय?
थोडे अक्युम्युलेट करण्याच्या स्टेज मध्ये मार्केट आहे का? असेल तर कुठले व कुठल्या भावात?
मी मगच्या महीन्यात etf kotak
मी मगच्या महीन्यात etf kotak gold घेतलाय
तर मला etf बद्दल आजुन काहि माहीती मिळेल का?
म्हणजे कोणाचा आनुभव?
आणी मी सध्या intra day trading करयचा वीचार करतिये.. तर
समजा मी ५ share buy केले त्यातले
२ share खाली आले आणी ३ चढले तर
खाली आलेले तसेच थेउन मी चढलेले विकु शकते का?
म्हनजे intra day n long term असे काहि करु शकते का?
भाविका, तु इंट्रा डे साठी
भाविका,
तु इंट्रा डे साठी शेअर घेतलेस आणि जर तुला वाटले नाही विकायचेयत आता, तर तू त्यांची डिलीव्हरी घेउ शकतेस. त्या केस मध्ये तुला त्या शेअर्सची पूर्ण किंमत अधिक ब्रोकरेज द्यावे लागेल.
भाविका सर्व कंपन्यांची NAV व
भाविका
सर्व कंपन्यांची NAV व रिटर्न साधारण सारखे आहेत. १ वर्षात १८.६%. कारण तो सोन्याचा भाव आहे. हे सर्व exchange traded फंड आहेत. घेणाराल्या फक्त पेपर वर सोने मिळाले तरी they are backed by physical gold. Min investment 1 gm. Quantum गोल्ड फंडाकडे १/२ gm ची सोय असावी.
डे ट्रेडिंग करणार आहात तर दिवसा तेवढा वेळ देवू शकाल का?
भाविका, स्वाती --- intra day
भाविका, स्वाती --- intra day trading मधे दिवसाच्या शेवटी trade closing price ला clear होतात. उदा. मी XYZ चे १०० शेयर्स ५० च्या भावनी घेतले (खरेदी), आणि जर मी ते दिवसाच्या शेवटीपर्यन्त विकले नाहिस तर ते closing price ला विकले जातीलच (जर XYZ ४० ला close झाला तर १०००/- तोटा). intra day trading फारच risky असते.
खाली आलेले तसेच थेउन मी चढलेले विकु शकते का? -- सर्वच विकावे लागतील. intra day चे delivery मधे रुपांतर करता येत नाही.
केदार - आहेस कुठे? , bloodbath in mid-caps???
मी SBI च्या वेब साईट वर
मी SBI च्या वेब साईट वर ट्रेडिंग शीकण्या/करण्याचा प्रयत्न करत आहे. मार्केट वॉच मध्ये अॅड केलेल्या कंपन्यांच्या सेल चा रंग लाल, निळा होत रहातो, ह्या रंगाचे अर्थ कोणी सांगेल का?
सेन्सेक्सचा ग्राफ बघितला. डबल
सेन्सेक्सचा ग्राफ बघितला. डबल बॉटम किंवा W फॉरमेशन केले आहे. ब्रेक आउट जर काही दिवस सस्टेन राहीला तर आधिचा हाय दाखवू शकतो व त्याप्रमाणात स्टॉकस.

मला साधारणतः ५० ते ६० हजार
मला साधारणतः ५० ते ६० हजार रुपये गुंतवायचे आहेत.... पण लाँग टर्म नाही... पुढच्या डिसे (डिसे ११) मध्ये ते मला लागणार आहेत.... म्हणजे साधारणत एक वर्षासाठी गुंतवायचे आहेत!
शेअर्स मध्ये इतक्या कमी वेळात बर्यापैकी परतावा मिळेल आणि कमीत कमी रिस्क असेल असा काही ऑप्शन आहे का? की MF चा विचार करावा?
सोन्यामधे गुंतवणुक कितपत फायदेशीर ठरेल?
जाणकारांनी मार्गदर्शन करावे!
केदार , सुरेश please please,
केदार , सुरेश
please please, रोज शेअर मार्केट बददल कहितरि महिति देत रहा. जाणकारांनी मार्गदर्शनाखालि गुंतवणुक सोपि होते. खुप मदत होते.
केदार १ महिना पूर्ण झालाय
केदार १ महिना पूर्ण झालाय आपल्या अञ।तवासाला. आता मायबोलीवर परतावे ही नम्र विनंती!!!!
२०१० च्या जानेवारी पासून तुम्ही जे सल्ले दिलेत ते खूप फायद्याचे ठरले आहेत. पण तेव्हा जे ह्या फायद्यापासून वंचित राहिलेत त्यांना मार्गदर्शन करायला लवकर आलात तर बरे होईल.
आजकाल बरेच ब्रोकर अकाउंट ओपन
आजकाल बरेच ब्रोकर अकाउंट ओपन करुन देतात.. पण बरोबर एक रिलेशन मॅनेजर ही देतात जो तुमच्या अकाउम्टला ट्रे ड करतो.... बर्याचदा तुमची इच्छा असो वा नसो , तो ट्रेड करतोच... असा त्याचा हस्तक्षेप, त्याला द्यावा लागणारा प्रॉफिटचा शेअर हे सगळे मुद्दे आधीच क्लिअर करुन घ्यावेत....
मानसी मला साधारणतः ५० ते ६०
मानसी
मला साधारणतः ५० ते ६० हजार रुपये गुंतवायचे आहेत.... पण लाँग टर्म नाही... पुढच्या डिसे (डिसे ११) मध्ये ते मला लागणार आहेत.... >>>
ह्यात एक अडथळा असा आहे कि प्रॉफीट जर बुक केला नाही व सर्व डिसेंबर एंड ला विकायचे ठरवले तर त्या वेळी निफ्टी कुठल्या भावाला असेल त्यावर फायदा वा नुकसान ठरेल (लॉस होत असेल तर लवकर बाहेर पडणे चांगले). निफ्टी ६१०० च्या वर एक दोन दिवस टिकला तर ट्रेंड बुलीश होईल. २५% खाली येण्याची शक्यता अजून उरली आहे.
म्हणजे आपण घेणारा स्टॉक त्याहून कमी भावात मिळेल का ते निफ्टीच्या चढ उतारा वरून ठरेल. खाली २ स्टॉकस देत आहे.
1. tata Invest: सध्या भाव ५६५. घ्यायची रेंज ५५० ते ५२०. टार्गेट ६७०. ५०० च्या खाली जाईल से आज तरी वाटत नाही. .
२. tata steel. सध्या भाव ६७३. ६३० वा त्याच्या खाली जास्त चांगला. टार्गेट ७३७.
३१/१२ ला quarter va month संपेल तेंव्हा टार्गेट आणखी चांगली सांगता येतील. तुम्ही काही शेअर्स सुचवा. ग्राफ बघणे मग सोपे जाईल.
केदार १ महिना पूर्ण झालाय
केदार १ महिना पूर्ण झालाय आपल्या अञ।तवासाला. आता मायबोलीवर परतावे ही नम्र विनंती!!!!
>>. संदिप
मी ज्या क्लायंट कडे जात आहे तिथे नेट उपलब्ध नाही म्हणून सर्वच बंद होते. सध्या एक दोन आठवडे घरुन काम त्यामुळे नक्कीच वेळ मिळेल.
मला साधारणतः ५० ते ६० हजार रुपये गुंतवायचे आहेत शेअर्स मध्ये इतक्या कमी वेळात बर्यापैकी परतावा मिळेल आणि कमीत कमी रिस्क असेल असा काही ऑप्शन आहे का? >>>
हो आहे. तुम्हाला साधारण १ वर्ष गुंतवायचे आहेत त्यामुळे हा अगदीच शॉर्ट टर्म कालावधी नाही. मागच्या जानेवारी पासून मी इथे दिलेले कित्येक शेअर १०० % नी वाढले आहेत. (उदा टाटा मोटर्स, ओरियन्टल बँक इ इ). त्यामुळे चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणू़क केली तर अगदीच २० टक्के फायदा कुठेही गेला नाही!
की MF चा विचार करावा? >> हो MF चा पण विचार करता येईल. पण MF हे थोडे उशीरा धावायला सुरुवात करतात व मार्केट पडल्यावर मात्र ते ही सोबतच पडतात, त्यामुळे परतावा कमी असतो.
तुम्ही निफ्टी मध्ये फ्युचर्स घेऊ शकता. हा एक पर्याय आहे. (लवकर पैसे कमविने व घालन्याचा.)
सोन्यामधे गुंतवणुक कितपत फायदेशीर ठरेल? >> शेअर्स इतके राहणार नाही. कारण सोने भरपुर वाढले आहे. मेमरी बरोबर असेल तर २००८ च्या आसपास गोल्ड $१४०० झाले व तिथून खाली आले होते. सोने सध्या $१४०० आहे. त्यामुळे ह्या लेवलला मी गुंतवणूक म्हणून पाहणार नाही, अगदीच हौस म्हणून खरेदी करायचे असेल तर जरुर करा. पण परतावा १ वर्षाने मिळेल की नाही हे सांगता येत नाही. मागे जाने-फेब २०१० मध्ये मात्र मी लोकांना सोने खरेदी करा असा सल्ला देत होतो तेंव्हा ते साधारण $११०० होते.
निफ्टी : निफ्टीला ५७३० +/- मध्ये मस्त सपोर्ट आहे. व ६१०० ला रेसिस्टन्स. त्यामुळे सध्या लाँग असेल तर ६०५० + मध्ये प्रेशर दिसले की सेल. पुढे सलग दोन दिवस पडला तर डेफिनेट शॉर्ट. अन्यथा स्टे पुट.
शॉर्ट असाल तर ६०५० + झाले तर कव्हर करुन ६१०० क्रॉस होतोय का ते बघायचे.
माझ्या मते मार्केट पडले हे चांगले झाले. पुढच्या १ वर्षासाठी परत चांगले रिटर्न्स मिळायचे असतील तर आत्ता मार्केटने पडणे आवश्यक होते. रेंज नेहमी दिवाळी पर्यंत ठेवायची. दिवाळी नंतर विक्री करायची. हा ट्रेन्ड कदाचित २०११ मध्येही राहिल त्यामुळे मागच्या जानेवारी जसे मार्केट पडले व आपण खरेदी सुरु केली तसे आता खरेदी चालू करायला हरकत नाही.
रिलायन्स सध्या खूप पडला आहे. आता तो अजुन खाली जाईल असे मला वाटत नाही. ६ महिन्यात १५ टक्के परतावा (आजच्या रेंज पासून) नक्कीच मिळावा. तो १००० मात्र क्रॉस करेन असे आत्ता वाटत नाही.
टाटा मोटर्स : पूर्ण वर्षात १००% रिटर्नस. थोडी विश्रांती घेईल असे वाटते. बदल झाला तर लिहिनच.
बँकींग : मला वाटतं बँकेमध्ये अजून स्टिम आहे. खासकरुन ती शेवटची मुव्ह व्हायची आहे. मगच बँक्स थंड होतील त्यामुळे ८ ते १२ टक्यांसाठी SBI, ICICI कडे बघायला हरकत नाही.
केदार बरेच दिवसाने तुझा सल्ला
केदार
बरेच दिवसाने तुझा सल्ला एकुन बरे वाटले. थोडी कॅश आहे. सत्कारणी लावेन.
Pages