वर्तुळानंतर

Submitted by निंबुडा on 2 December, 2010 - 04:32

रेफरन्स: वर्तुळ

आता मी वर्तुळाला छेदायचं ठरवलंय
गप्प बसून सहन करण्यापेक्षा बोलायचं ठरवलंय

फार फार तर काय होईल??? चाकोरी मोडेल
मोडू देत.....
वाईटात वाईट काय होईल??? मी एकटी पडेन
पडू देत....

मूर्खासारखं त्याच त्याच परिघावर फिरायचं
पुन्हा पुन्हा एकाच बिंदूपाशी येऊन थांबायचं
तेच वर्तुळ परत परत नव्याने गिरमिटायचं

आता बास.....

त्यापेक्षा सरळ रेषेत चाललेलं बरं
मनात आलं की रस्ता बदलता तरी येतो

नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवी दिशा
एका रेषेला एक फाटा
नव्या पंखांना नव्या वाटा

आणि...
अगदीच दमून कुठे थांबायचं म्हटलं तरी
निदान.....
परत त्याच बिंदूपाशी येऊन पोचण्याची अगतिकता तरी नाही!

गुलमोहर: 

या विषयाशी साधर्म्य असणारी भुंग्याची पण एक कविता आहे असे आठवत होते.
बरेच दिवस त्या कवितेचे नाव आठवत नव्हते. आता आठवले.
चौकट

मस्तय ! Happy
<<पुन्हा पुन्हा एकाच बिंदूपाशी येऊन थांबायचं
तेच वर्तुळ परत परत नव्याने गिरमिटायचं>>.......हम्म्म्म्म!

निंबे Happy
परीघातुन सुटुन वर्तुळात पडल की कितीही त्रिज्येवर सरळ चाल शेवट परीघावरच होतो.

छान आहे वर्तुळ, चाकोरी न आवडणार्‍या सगळ्यांना असच वाटत असावं....

शेवटी पृथ्वी गोल आहे, कितीही सरळ चाललं तरी परत तिथेच पोहोचणार.:) Happy

कितीही त्रिज्येवर सरळ चाल शेवट परीघावरच होतो.
>>>
अगं गुब्बे, त्रिज्येवर कशाला??? वर्तुळातून सुटण्यासाठी टँजंट (मराठीत काय म्हणायचं?? Uhoh ) ला पकडून चालायचं!

आपल्या अवकाशयानांना सर्वात जास्त इंधन लागतं ते पृथ्वीचे वातावरण भेदण्यासाठी, पुढे अमर्याद आवकाश आहे.

निंबे.. छान वाटत ग असा निर्धार वगैरे कर्ताना.. पण प्रत्यक्षात किती काळ टिकेल हे अवसान कुणास ठाऊक?? असो..
कविता आवडली.. Happy

परत त्याच बिंदूपाशी येऊन पोचण्याची अगतिकता तरी नाही!..........

चांगली ओळ.... मस्त आहे हे वर्तुळ. Happy

नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवी दिशा
एका रेषेला एक फाटा
नव्या पंखांना नव्या वाटा ... पण त्या नवीन वाटा ही फसव्या असतात बर्याच वेळा निबुडा.

सुरेख

चांगली आहे कविता...
शब्दांमागच्या आणि between the lines भावना कळल्या...!