ओल्या काजूंची उसळ

Submitted by शैलजा on 3 December, 2010 - 11:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओले काजू मुंबईत मिळतात का ? कुठे?याबद्दल कुणास माहिती असल्यास कृपया सांगावे.

शैलजा,फार छान वाटतेय ही डिश... Happy

मुंबैत पार्ले इस्टला क्वचित अन शिवाजीमंदिरच्या दाराशी हमखास मिळायचे काजू,
वडाळ्याला लग्नाचा हॉल आहे कोकणी लोकांचा, तिथल्या प्रत्येक लग्ना/मुंजीत सीझन मधे ही 'उपकरी' अगदी मस्ट ( अन मस्त सुद्धा) असायची.

हाsssss ईली उसळ... खराच शैलू जीभेचे हाल गो Happy
पण ओल्या काजूची चव सुक्याक नाय .
आता कुठून हाडू ओले काजू. Sad
>> सुकवलेले ओले काजूही मिळतात>> हे खय गावतत?

हाsssssय!
मला काजुची फळे (कळलं ना काय म्हणायचंय ते?) लाल-पिवळ्या रंगाचे.. प्रचंड आवडतात.. नुसतं मीठ लावुन खायचं.. घसा थोडा खवखवतो पण तरीही.. दर सुट्टीत त्यानादात एकतरी ड्रेस खराब व्हायचाच.. काजुच्या रसाचे डाग अजिबात निघत नाहीत!
तोपासु Sad

ह्या उसळीला मालवणी मसाला पण घालतात ना? मैत्रिणी कडून आलेत सुकवलेले ओले काजू. जमलं तर टाकते आज उद्या मधे फोटो. निलू ठाण्याला ते मार्केट मधे महादेवाचं मंदीर आहे त्यापाशी कातकरणी आणतात ओले काजू विकायला. पण लवकर जावं लागतं. पटापट संपतात.

प्रॅडी,आपण करु तितक्या पद्धती. कुठे असते तुमची मैत्रिण? मीही मागवीन तिच्याकडून ओले काजू. Happy टाका फोटो.
सायो, प्रॅडी टाकेल.
केदार्, करते की. पत्ता पाठव, मिळाले की करते. Happy
अम्मि, तुला कधी यायचय? ये.
चिंगी, ती काजूची बोंड गं. त्याला तिखट मीठ लावून खायला किती यम्मी लागतात.

शैलु मस्त रेसिपी गो.. पण झणझणीतच बरी लागात मगो ति साखर कित्याक? नि हिरव्या मिरचेपेक्षा मालवणी मसालो घालुन बनवली तर आजुन मस्त Happy

काय गो शैलु, खावंक कधी बोलवतसं???

माझी आजी करी गावाक गेलय की. "फका" हाडुन स्वता: काजु काढी , हात कुसत पण नातवंडांसाठी करी, तिची आठवण ईली. Sad

धन्यवाद हो!!!
आमच्या विनंतीचा मान ठेवल्याबद्दल!!!!!!!!!!!! Happy
Lol Proud
आता ओले काजु मिळाले कि करेन!!तुझी आठवण काढून काढून खाईन बरं का!! Proud

>>माझी आजी करी गावाक गेलय की. "फका" हाडुन स्वता: काजु काढी , हात कुसत पण नातवंडांसाठी करी, तिची आठवण ईली. >> माका पण Sad
प्रज्ञा तिथे मिळतात का!! मग बघायला पाहिजे एकदा. Happy

शैलजा मस्तच ग रेसिपी.
आता यायला लागतील ना ओले काजु. मी मागे दिनेशदांनी रेसिपी दिलेली तशी उसळ केली होती. छान झालेली. आता तुझ्या पद्धतीने करेन.

डॅफो Sad
रैना, घाबरते कायको? Happy खालच्या चित्रात ही काजूची पिवळी फळं आहेत ना बोंड म्हणतात त्याला. त्याच्या तोंडावर राखाडी रंगाचं काजू बी दिसत आहे ना, ते कवच आहे, ते फोडून काजू काढतात. हे कोवळे असताना काढतात आणि मग त्या काजूंची उसळ करतात. मी पाहून आणि खाऊनही खूप वर्षं झाली.. Sad

cashewfruits_200.jpg

आणि हे अगदी कोवळे काजू. झाडावर असे दिसतात.

young cashew nut_1.jpg

प्रॅडी फोटो टाक गं.

Pages